Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजिबातच स्वामीभक्त नाही.
अजिबातच स्वामीभक्त नाही, ओढच वाटली नाही कधी. पहिला देऊळ बंद सुद्धा उत्सुकता न वाटल्याने पाहिला नाही. यात अजून सुद्धा काही आहे का ? ह्यूमन इलेंमट असेल तर त्यासाठी पाहेन. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून तसं वाटत आहे. फारच गंभीर आणि दुर्दैवी विषय आहे. देवावर सोडलेला सुद्धा आवडणार नाही, रागच येईल खरेतर. चमत्कार स्पिरिच्युॲलिटीत येत नाहीत, रिलिजन मधे मात्र येतात. आपल्याकडे चित्रपटात चमत्कार दाखवले तरच ते चालतात.
अशा काही तरी संमिश्र प्रतिक्रिया आल्या मनात. कितीही लांब सिरीज आली आणि चालली तरी मी काही दत्तप्रभूसाठी पाहणार नाही, माणसांसाठी काही नवीन विचार असला तर मात्र आवर्जून पाहेन. (मोहन जोशीला जवळपास नग्न बघणं सुद्धा असह्य झाले. अनकंफर्टेबल वाटलं होतं ट्रेलरमधे. )
अगं अस्मिता, देऊळ बंद सिरीज
अगं अस्मिता, देऊळ बंद सिरीज ही क्रिंजोत्तम आहे म्हणून पाहतात. काय तू पण लईच अपेक्षा ठेवायलीस.
हे "ठेवायलीस" साठी. मी असंच
देऊळ बंद २ मध्ये शेतकऱ्यांचा
देऊळ बंद २ मध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न ऐकून हा भाग पहिल्या भागापेक्षा वेगळा असावा असे वाटत आहे. म्हणून उत्सुकतेने थोडे गुगल केले. दोनेक रिव्ह्यू मध्ये हे सापडले. जर हे असे असेल म्हणजे देवाधर्माच्या माध्यमातून जर या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले जात असेल तर बघायला आवडेल.
----
या भागात दुष्काळ शेतकरी आत्महत्या कर्जबाजारीपणा ग्रामीण भागातील गंभीर वास्तव यावर थेट भाष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी स्वामींना प्रश्न विचारणारी आणि व्यवस्थेला जाब विचारणारी शेतकरी महिला केंद्रस्थानी आहे.
----
देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा असून आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तर बदलत्या परिस्थितीनुसार\ काळानुसार शेतीत बदल करण्याची गरज असल्याचा संदेश देते.
---
>>मी कुठलाच देव धर्म चमत्कार
>>मी कुठलाच देव धर्म चमत्कार मानत नसलो तरी मला पहिला भाग मजेशीर वाटला होता.<<
मला कायच्याकाय वाटला होता. म्हणजे स्वामींना मोठं दाखवण्या करता नासा सायंटिस्टला छोटं दाखवलं गेलंय. बकि काहि प्रसंगां बाबत अनिसवाले गप्प कसे बसले, हा प्रश्न पडला होता...
बकि काहि प्रसंगां बाबत
बकि काहि प्रसंगां बाबत अनिसवाले गप्प कसे बसले, हा प्रश्न पडला होता...>>>>
गप्प बसलेलेच बरे. फुकटची प्रसिद्धी लाभते आणि जे बघणार नसतात तेही लोक चित्रपटाला गर्दी करतात.
मी स्वामी समर्थांबद्दल न्युट्रल आहे. भक्त नाही आणि अभक्तही नाही. मठ कुठे दिसला तर मठात जाते, पण आंबोलीतील मठात अजुन गेले नाहीय. पण कोणाही सद्गुरु लोकांवरील चित्रपट किंवा मालिका पाहणे जमत नाही. त्यात त्या सद्गुरुंची शिकवण अजिबात दाखवत नाहीत पण उगीच काहीही चमत्कार दाखवतात. सद्गुरु म्हणजे नेमके कोण याचा विसर त्यांच्या भक्तांना व समाजालाच पडलाय तिथे त्याचेच प्रतिबिंब मिडियात येणार.
राज, मला आता सर्व डिटेल आठवत
राज, मला आता सर्व डिटेल आठवत नाहीत पण त्या सायंटिस्टला विज्ञानापेक्षा मोठी शक्ती कुठलीच नाही असा अहंकार झाला असतो तो उतरतो असे दाखवले आहे. यात काही वावगे नाही.
चित्रपटावर अनिस काय आक्षेप घेणार हे समजले नाही.
छोटी मोठे देवाचे चमत्कार तर कित्येक चित्रपटात दाखवले असतात.
भुताचे सगळे चित्रपट तर असेच असतात.
शेतकरी आत्महत्या हा विषय
शेतकरी आत्महत्या हा विषय सरकारी अनास्थेचा आहे. भारतीय जनता पक्षाची शेतीबद्दलची एक स्वतःची विचारसरणी आहे, ज्यात शेतकर्यांनी शेती कशी करावी याचे ठोकताळे आहेत. त्यात जैविक खतं वगैरे बरंच काही आहे. कॉण्ट्रॅक्ट शेतीचा त्यात स मावेश आहे. मध्यप्रदेश आणि गुजरात मधे आता भाजपची सरकारे ३० वर्षांहून अधिक काळ आहेत. गुजरात मधे तर वाघेला १९९२ मधे सत्तेत आलेत. उत्तर प्रदेशमधेही कल्याणसिंग तीन वेळा सत्तेत होते. महाराष्ट्रात दहा वर्षे झाली आहेत. या काळात त्यांनी या संकल्पना राबवल्या का? काय रिझल्ट मिळाले हा डेटा त्यांनी शेतकर्यांपर्यंत पोहोचवायला हवा होता. उत्तर प्रदेशात आणि गुजरात मधे कॉण्ट्रॅक्ट शेतीत शेतकर्यांना जास्त नुकसान झाले. सामूहिक शेतीचा नुसता गाजावाजा झाला. पण तिची अंमलबजावणी झाली नाही.
जैविक खतांनी उत्पादन कमी होतं. शेतकरी त्याला तयार होत नाहीत. अशा परिस्थितीत जैविक खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान, नुकसानभरपाई अशा योजना राबवायच्या सोडून भाजपच्या चित्रपट आघाडीकडून शेतकर्यांना दैवी चमत्कारांचा हवाला देऊन या फेल गेलेल्या कल्पना गळी उतरवण्याचा प्रयत्न सरकार म्हणून निषेधार्ह आहे. ट्रेलर मधे मोहन जोशी वगळता बहुतेक कलाकार हे भाजपच्या चित्रपट उद्योग आघाडीचे दिसतात.
राज अज्ञानी,
राज अज्ञानी, महाराष्ट्रातल्या शेतीशी तुमचा किती जवळचा संबंध आहे हे मला माहित नाही पण महाराष्ट्रातल्या शेतीत एक क्रांती येऊ घातलीय आणि तीही शाश्वत शेतीची हे मी शेतकरी म्हणुन सध्या अनुभवतेय. हरित क्रांती ही देखिल एक चांगली क्रांती होती पण ती शेतीच्या मुळाशी आली. शेतजमिन नष्ट व्हायची वेळ या क्रांतीने आणली. याला जबाबदार योजना राबवणारे, हरित क्रांती संकल्पनेचा यात काही दोष नाही.
पानी फाउंडेशनने सरकार व उमेदला हाताशी धरुन
जी क्रांती त्यांनी आधी मोजक्याच जिल्ह्यात घडवुन आणली ती यंदा पुर्ण महाराष्ट्रात घडवताहेत. मीही शेतकरीच आहे आणि कृषी खात्यातल्या वेगवेगळ्या अधिकार्यांचा मला उत्तम अनुभवही आलेला आहे.
चित्रपटही भाजपा सरकार बनवते आणि त्यातुन शेतकर्यांना संदेश देतेय ह्या भ्रमातुन बाहेर या. पानी फाऊंडेशनला भेट द्या व यंदा काय करताहेत ते एकदा पाहा.
साधनाताई, तुमचे किंवा माझे
साधनाताई, तुमचे किंवा माझे एकेकट्याचे कय अनुभव आहेत यावरून शेतीबद्दलचा निष्कर्ष काढायचा का?
ज्यांचे जीवन पारंपारिक रित्या शेतीवर अवलंबून आहे अशा सर्व कुटुंबांचा डेटा, सर्व्हे काही असेल तर द्या. माझी मतं मी बदलू शकतो.
माझा शेतीशी काय संबंध आहे हे गौण आहे. तरी सांगतो आमचं कुटुंब शेतमजुरांचं आहे. साठ कुटुंबात तीस गुंठे जमीन आहे. त्यामुळे आमच्यासारखी अनेक कुटुंबं शहरात निघून आली आहेत.
जैविक खतांचा प्रयोग आमच्या भागात ज्याच्याकडे अद्याप ४० एकर जागा टिकून आहे अशी कुटुंबं काही भागात करतात. पण मुख्य शेती रासायनिक खतांवरच करतात. तसेच शहरात राहून पैसा कमावल्यानंतर गावी येऊन शेती करणारे लोक प्रयोग म्हणून अशी शेती करतात. ते शेतीवर अवलंबून नाहीत हे माझं निरीक्षण आहे. ते सार्वत्रिक आहे हा माझा दावा नाही. पण सरकारकडे डेटा असतो, तो त्यांनी सार्वजनिक करायला कय हरकत आहे?
हा धागा चित्रपटाचा असल्याने इथे थांबतो.
तुम्ही शेतकरी आहात तर तुम्ही
तुम्ही शेतकरी आहात तर तुम्ही सर्वे शोधा. मला जी माहिती हवी होती ती मी स्वतः शोधली. तुम्ही निदान ऑनलाईन पानी फाऊंडेशनला भेट देऊ शकता. ते करा. मी त्यांच्या इथल्या अधिकार्यांच्या रोज संपर्कात आहे. त्यावरुन व जे पाहिले ते सांगितले. बाकी जैविकच करा हे मी सांगत नाही. पानी फाऊण्डेशन चा शाश्वत शेतीसाठी प्रयत्न आहे. त्याची सुरवात जैविकनेच करणार असे नाही. पण शेवट जैविकलाच शरण जावे लागणार कारण रासायनिकचे परिणाम शाश्वत नाहीयेत. तुम्ही शेती करत असलात तर २५ वर्षसंपुर्वी किती युरियात काम होत होते आणि आज किती लागतोय हे तुम्हला माहित असणार.
असो. मी पानी फाऊंडेशनवर लिहितेय. तिथे लिहा पण माहिती मिळवुन लिहा, विरोधासाठी विरोध करु नका. सरकार कुठ्स्लेजी असले तरी शेवटी आपण हातपाय हलवल्याखेरिज काही होत नाही.
तुम्ही मला मुख्यमंत्री समजताय
तुम्ही मला मुख्यमंत्री समजताय पण याने गुदगुल्या होण्याचं कारण नाही, सोडा, तुमच्याशी पुन्हा चर्चा करण्यात राम नाही. काहीच्या काही उत्तर.
चित्रपटाचा पानी फाउंडेशनचा
चित्रपट पानी फाउंडेशन निर्मित आहे का किंवा त्यावर बनवला आहे का?
----
सर्च करून कळले की नाहीय.
ओके, ओघात आलेला विषय होता ठीक आहे.
चित्रपटही भाजपा सरकार बनवते
चित्रपटही भाजपा सरकार बनवते आणि त्यातुन शेतकर्यांना संदेश देतेय ह्या भ्रमातुन बाहेर या. +100
"भारतात जे काही होतं ते सगळं बीजेपी/ मोदींमुळेच" यातून अंधबीजेपीभक्त आणि अंधबीजेपीविरोधक बाहेर येतील तो सुदिन !!
मी आधी अंधभक्त (घरातल्या संघी वातावरणामुळे) ते भक्त ते समर्थक ते न्यूट्रल ऑब्झर्वर हा प्रवास स्वतःशी प्रामाणिक राहून केल्यामुळे हे बोलण्याचा नैतिक अधिकार मला आहे असं समजते.
चित्रपट बघितलाच नाही तर नक्की काय संदेश देत आहेत हे कसं आणि कुठून कळलं?
स्वामींचा सिनेमा आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी चमत्कारच दाखवले असतील असं का ठरवताय?
जैविक खतांनी उत्पादन कमी होतं. शेतकरी त्याला तयार होत नाहीत. अशा परिस्थितीत जैविक खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान, नुकसानभरपाई अशा योजना राबवायच्या सोडून भाजपच्या चित्रपट आघाडीकडून शेतकर्यांना दैवी चमत्कारांचा हवाला देऊन या फेल गेलेल्या कल्पना गळी उतरवण्याचा प्रयत्न
>> चित्रपटात जैविक खते वापरावीत की रासायनिक यावर चकार शब्दाचे भाष्य नाहीये.
इथे जे काही सिनेमाबद्दल
इथे जे काही सिनेमाबद्दल सांगितलेय त्यावरून मी माझे मत मांडले आहे. ते मत सुद्धा मांडण्याचा अधिकार नसेल तर अबघडच आहे.
सर्वांनी सर्वच सिनेमे बघितल्यानंतरच मात द्यायचे असा कायदा असेल तर टुकारातले टुकार सिनेमे बघणे सक्तीचे होईल. चमत्काराच्या आडून शेतकर्यांना आत्महत्येबाबतचा संदेश द्यायचा प्रकार अजब आहे हे माझे मत मांडले म्हणून तो गुन्हा होत असेल तर पोलीसात तक्रार करावी. सिनेमा बनवणारे कोण आहेत हे सूज्ञांना सांगायची गरज नाही.
एकदा प्रतिसाद दिल्यानंतर तो बदलला तर त्याची दखल घ्यायची गरज नाही.
इथे जे काही सिनेमाबद्दल
इथे जे काही सिनेमाबद्दल सांगितलेय त्यावरून मी माझे मत मांडले आहे. ते मत सुद्धा मांडण्याचा अधिकार नसेल तर अबघडच आहे. चमत्काराच्या आडून शेतकर्यांना आत्महत्येबाबतचा संदेश द्यायचा प्रकार अजब आहे.
>> हे चित्रपटात आहे असं तुम्ही इथल्या कुठल्या प्रतिसादात वाचलं? बरं समजा सिनेमात स्वामींच्या तोंडून (चमत्काराच्या आडून नव्हे) शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं जात असेल तर त्यात चूक काय आहे नक्की?
की सरकार नीट उपाययोजना करत असेल.. अमुक तमुक योजना नीट राबवली जात असेल.. चमत्कार न दाखवता सर्वसामान्य व्यक्तीच्या तोंडून संवाद येत असतील तर आणि तरच परावृत्त केलेलं चालेल असं काही आहे का?
पाहिला सिनेमा आजिबात आवडला
पाहिला सिनेमा आजिबात आवडला नव्हता. दुसरा बघण्याची शक्यता नाही.
पहिल्या सिनेमात स्युडो सायंटिफिक संवाद खचाखच भरलेले होते आठवते आहे.
पियू, इथले प्रतिसाद वाचले
पियू, इथले प्रतिसाद वाचले नाहीत का?
मी पुन्हा पुन्हा सांगत नाही. इथे जे लिहीले आहे त्यावरून माझे मत मांडले आहे. पुन्हा विचारले तर हा आयडी इग्नोर करावा लागेल.
तुमच्या श्रद्धेला दुखवायचे नव्हते. पण थेटच सांगतो पहिला भाग दुर्दैवाने टिव्हीवर पाहिला.
त्या सिनेमाचा उद्देशच वैज्ञानिक दृष्टीकोणाला कमी लेखणे हा होता.
पकडले गेले नसते तर खरात महाराज आणि रामरहीम दोघांच्याही भक्तांसाठी सिनेमे निघाले असते. कुठपर्यंत चालवून घ्यायचं हे कळत नाही.
सोडा, तुमच्याशी पुन्हा चर्चा
सोडा, तुमच्याशी पुन्हा चर्चा करण्यात राम नाही. >>>>
धन्यवाद. तुमच्या लक्षात राहिल ही अपेक्षा.
पियू, इथले प्रतिसाद वाचले
पियू, इथले प्रतिसाद वाचले नाहीत का?
मी पुन्हा पुन्हा सांगत नाही. इथे जे लिहीले आहे त्यावरून माझे मत मांडले आहे.
>> मी पुन्हा वर जाऊन सगळे प्रतिसाद वाचले की तुम्ही म्हणताय तसं कुठे चित्रपट पाहिलेल्या (इथे फक्त भाग २ विषयी बोलू कारण तुम्ही शेतकरी आत्महत्येविषयी बोलताय आणि या विषयाचा भाग १ शी काहीही संबंध नाहीये) कोणीही कोणत्याही प्रतिसादात लिहिलेलं नाही. त्यामुळे तुमचं "इथे जे लिहिले आहे त्यावरून मी माझे मत.." या पुन्हा पुन्हा लिहिलेल्या वाक्याला नेमका कोणी काय लिहिल्याचा संदर्भ आहे हे प्रामाणिकपणे विचारायचा प्रयत्न केला. तुम्ही कुठे वाचलं या प्रश्नाचे उत्तर दिले नाही म्हणून पुन्हा एकदा विचारून पाहिले.
भाग १ विषयी बोलत असाल तर मग शेतकरी आत्महत्या, बीजेपी, रासायनिक खते की जैविक खते, सरकारच्या योजना, चमत्कार करून आत्महत्येपासून प्रवृत्त करणे वगैरे विषय कशाला आणलेत मध्ये? इन जनरलच देवाचे अवतार.. त्यावरचे सिनेमे ही कॉन्सेप्ट आवडत नाही.. पटत नाही.. म्हणा आणि पुढे चला. किंवा स्पेसिफकली या सिरीजचा भाग १ आवडला नाही म्हणून पुढचे बघण्यात रस नाही असेही म्हणू शकता. चित्रपटात बीजेपीचा काहीतरी पॉलिटिकल अजेंडा रेटला आहे असा शोध लावून तुम्हीच स्वतःचे हसे करून घेतले आहे.
पुन्हा विचारले तर हा आयडी इग्नोर करावा लागेल.
>> तुम्हाला इग्नोर करायचे असेल तर आत्ताच करा. "पुन्हा विचारले तर" वगैरे धमकी नको. तुम्ही माझ्या आयडीवर कृपादृष्टी टाकल्याने माझ्या अंगावर पुष्पवृष्टी वगैरे होत नाही.
राहता राहिला प्रश्न माझ्या श्रद्धेचा.. तर स्वामी समर्थ आणि राम रहीम यांना एका तराजूत तोलण्यानेही ती दुखावली जाऊ शकते. पण श्रद्धा ही प्रत्येकाची अतिशय वैयक्तिक बाब आहे. ती कोणीही एकमेकांवर लादू नये.. त्यात कोणीही तुलना करू नये.. एकमेकांच्या श्रद्धास्थानांचा आदर करावा या विचारांची असल्याने मी तुम्हाला त्याबद्दल दोष देणार नाही किंवा माझे श्रद्धास्थान दुखावले म्हणून गळेही काढणार नाही. असो.
इति लेखनसीमा.
श्रद्धा ही प्रत्येकाची अतिशय
श्रद्धा ही प्रत्येकाची अतिशय वैयक्तिक बाब आहे. ती कोणीही एकमेकांवर लादू नये.. त्यात कोणीही तुलना करू नये.. एकमेकांच्या श्रद्धास्थानांचा आदर करावा या विचारांची असल्याने मी तुम्हाला त्याबद्दल दोष देणार नाही किंवा माझे श्रद्धास्थान दुखावले म्हणून गळेही काढणार नाही. असो.+१११११
भाग एक मला आवडला होता
गाणी - काल भैरवष्टक आणि गुरुचरिताचे करा पारायण
खूपच आवडती आहेत.
कसली positive energy!!!
हो किल्ली. पहिल्या भागातील
हो किल्ली. पहिल्या भागातील गाणी एकसेएक आहेत. ❤️
मी पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे या भागातील एकूण एक गाण्याने माती खाल्ली आहे. :facepalm:
हो का जाऊ दे मग गाणी
हो का जाऊ दे मग गाणी
पहिल्या भागात कुरवपूर पिठापूर दर्शन बसल्या जागी मिळाले ह्यातच खुश झाले होते मी
पियू फक्त वाद घालायचाय का?
पियू फक्त वाद घालायचाय का? नाही सापडणार प्रतिसाद. शोधायचा असेल तर सापडेल.
काहीही अर्थ लावून वाद घालत आहात. भाजपच सिनेमे काढतंय असं वाक्य माझ्या कुठल्या प्रतिसादात आहे हे मी विचारू शकतो. पण एकंदरीतच तुम्हाला काय करायचंय हे समजलं.
शेतकर्यांच्या आत्महत्या हा संवेदनशील विषय आहे, त्यावर सिनेमा काढायचं स्वातंत्र्य आहे पण सारासारविवेक असायला हवा. सत्ताधारी पक्षाच्या चित्रपट सेलने अंधश्रद्धेशी हा विषय जोडला याचा निषेध. आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न म्हणून हे असे प्रयत्न होत असतील तर निषेधच.
हो आणि अंधश्रद्धा दुखावत असतील तर उद्या खरात महाराजांच्या भक्तांच्याही दुखावल्या जातील. काय करणार.
देऊळ बंद २ मध्ये तलाठी,
देऊळ बंद २ मध्ये तलाठी, तहसीलदार शेतकऱ्यांना कसा त्रास देतात हे दाखवलं आहे. कृषी मित्र, कृषी सेवा केंद्र, बी-बियाणे आणि खत कंपन्या शेतकऱ्यांना निकृष्ट माल आणि चुकीचे सल्ले देऊन कस फसवतात हेही दाखवलं आहे. यात कुठेही भाजपाची बाजू घेतलेली किंवा भाजपावर टीका केलेली दिसली नाही. उलट झालंच तर नुकसानच आहे, कारण राजकारणी आणि व्यापारी लोकांची युती दाखवली आहे.
स्वामींना एका तालुक्यातील आत्महत्या थांबवायच्या आहेत, त्या देखील कोणताही चमत्कार न करता. थोडे योगायोग नक्कीच आहेत, पण ते तर जवळपास सगळ्याच चित्रपटांत दिसतात.
राजकारण डोक्यात न आणता चित्रपट पाहिला तर यात भाजप, काँग्रेस असं काहीच नाही. पण जर २४ तास तेच डोक्यात असेल, तर मात्र अवघड आहे.
रात्रीचे चांदणे +१२३
रात्रीचे चांदणे +१२३
पियू फक्त वाद घालायचाय का?
>> अजिबातच नाही. पण वाद टळावा म्हणून सिनेमात जे नाहीये ते का मान्य करू हे कळेना.
भाजपच सिनेमे काढतंय असं वाक्य माझ्या कुठल्या प्रतिसादात आहे हे मी विचारू शकतो.
>> मग विचारा. मीच कशाला.. इथले इतर आयडी सुद्धा सांगतील कोणता प्रतिसाद ते.
आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न म्हणून हे असे प्रयत्न होत असतील तर निषेधच.
>> ओके. मग जाऊदे. माझ्यामते कोणाचेही आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान न करता कोणत्याही मार्गाने एका जरी आत्महत्या करणाऱ्या माणसाचा जीव वाचत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. हा विषय श्रद्धेशी जोडण्यापेक्षा जीव गेला तरी चालेल असं मला कधीच वाटू शकत नाही. त्यामुळे इथे थांबते.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाला माझा पास.
रक्तरेषा नावाचा मराठी पिक्चर
रक्तरेषा नावाचा मराठी पिक्चर आहे. रितेश देशमुख, पुष्कर जोग, मंजिरी फडणीस असे स्टार्स आहेत.
रितेश देशमुख मिस्टर जोशी झालाय. जो पूर्वेकडच्या राज्यांच्या व्यापारी संघटनेचा अध्यक्ष असतो. बर्याच कॉमर्स इन्स्टिट्यूटचा तो अध्यक्ष असतो ज्याच्यामुळे या भागात उद्योगधंदे वाढलेले असतात. सुरूवातीलाच मीटिंग सुरू होते. त्यात एक नटवी बाई हिंदीत आधी बोलते. मग ती मिस्टर जोशींना बोलावते. जोशी येतात आणि मराठीत बोलतात. ते सर्वांना कळतं.
म्हणून मराठी माणसाने अशा संघटनांमधे टॉपला गेलं पाहीजे. म्हणजे आपोआप त्या त्या राज्यात लोक मराठी शिकून घेतील. ब्रिटीश भारतात आल्यावर भारतियांनी इंग्रजी शिकून घेतलं तसंच. चांगला मेसेज दिलाय.
आयेम सोल्ड! देऊळ बंद पोस्टरवर
आयेम सोल्ड! देऊळ बंद पोस्टरवर बुवा बापू चित्र बघुन तो कधीच बघावासा वाटला न्हवता. पण त्यात इतकं काही आहे समजल्यावर एकदा बघावा का काय वाटू लागलं आहे. फोमोच येईल का काय! चिडचिड झाली तर बंद करूच शकतो.
फोमो येत असेल तर मला हाक द्या
फोमो येत असेल तर मला हाक द्या. मी फोमो काढणारा बुवा होऊ शकतो.
उत्तर बघितला. गुटगुटीत अभिनय
उत्तर बघितला. गुटगुटीत अभिनय आवडला, रेणुका आवडली. प्रॅक्टिकल नाही वाटला. रेणुका त्याला काहीच सांगत नाही आजारपणाबद्दल हे फारच खटकले. शेवटी तो रोबोट का तोडून टाकतो, हृता कधी आणि काय रेकॉर्डिंग केलेलं त्याला ऐकवते काही कळलं नाही. हृता कॉलेजमधली वाटत नाही, असो, आपण अंकुश चौधरी आणि स्वप्नीलला कॉलेज विद्यार्थी म्हणून चालवून घेतले आहे त्यामुळे मुलींवर अन्याय नको.
Pages