कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन कैऱ्या = मीठ लाऊन नुसत्याच खाणे, सुकी भेळ, मेथांबा / लुंजी, थाय सलाड, छुंदा, ताजे शॉर्ट लाइफ लोणचे, हिरवी चटणी इतके पर्याय सुचत आहेत.

एक एक करून सर्वांचाच आनंद घेणार !

ऋतुराज, वासंतिक लेखाची प्रतिक्षा आहे, येऊ द्या लवकरच.

कामसूत्राच्या एका version मधे उद्यानातल्या लतावृक्षांना फुलेफळे लगडण्यासाठी, बहर येण्यासाठी नवयौवनांनी करावयाच्या कृतींबद्दल हे वर्णन वाचले :

तिलकवृक्ष (?) = याकडे फक्त दृष्टिक्षेप टाकणे पुरेसे
कुरबक वृक्ष (?) = याला बाहुपाशात घ्यावे
अशोक वृक्ष = याला लाथ घालावी 😀
बकुळ वृक्ष = मदिरेनी चूळ भरावी, ती वृक्षावर थुंकावी
नेमरू वृक्ष (?) = याखाली बसून गाणे गावे
मंदार वृक्ष = याच्याशी मृदुभाष्य करावे
चंपक वृक्ष = याला हास्य ऐकवावे
कर्णिका वृक्ष (?) = याच्यासमोर नृत्य करावे

आणि सर्वात भारी आपला आंबा ….

आम्रवृक्षाला नवयुवतीने फक्त हळुवार फुंकर घालावी, तो फुलणारच 😍

>> मदिरेनी चूळ भरावी, ती वृक्षावर थुंकावी >> मदिरा इफेक्ट का कामसूत्र इफेक्ट हरीजाणे पण तीन वेळा हे वक्ष वाचुन कोणाच्या वक्षावर करण्यात गेली. Lol Light 1

अनिंद्य, माझेमन लेख टाकला आहे.
कामसूत्राच्या एका version मधे उद्यानातल्या लतावृक्षांना फुलेफळे लगडण्यासाठी, बहर येण्यासाठी नवयौवनांनी करावयाच्या कृतींबद्दल हे वर्णन वाचले :>>>>> मी आताच त्या दोहद वृक्षाबद्दल लिहिले.
मला हा कामसूत्र संदर्भ माहीत नव्हता.
तुमच्याकडे असला तर मला संपर्कातून पाठवा तो संदर्भ.
तिलकवृक्ष - Long-Stamen Wendlandia
कुरबक - कोरांटी
नेमरू - याबद्दल भेद आहेत. रुद्राक्ष की सुरपुन्नाग (सुरंगी)
कर्णिकार - बहावा

अमितव >>>>>> आता तसंच वाचलं जातंय Lol

किती सुंदर, काव्यात्मक शृंगार आहे. Happy तथ्य नसले तरी पोएटिक असल्याने सुरेख वाटले. समृद्ध आणि आधुनिक संस्कृती होती आपली!

होय अस्मिता, कवीकल्पनाच ह्या पण वाचायला फार सुंदर वाटतात.

युवतीच्या हळुवार फुंकर घालण्याने आंब्याला मोहोर येतो म्हणजे काय ! इस झूठ पर तो भरोसा करने को जी चाहेगा ❤

कोरांटीला बाहुपाशात घ्यायचं म्हणता? Proud

जोक्स अपार्ट, खरंच वाचायला सुंदर वाटतात या कल्पना. Happy

झाडांशी बोलायची कल्पना तर फार आवडते मला.
जाईच्या पाकळ्यां सलणारं दंव... Happy

आपल्या बऱ्याच कविकल्पना निसर्गाचा आविष्कार आणि शृंगार अशा जोडीने येतात. कृष्ण- रुक्मिणीची पारिजातकाची गोष्ट काय किंवा मेघदूत काय. ऋतूबदल सुद्धा आवर्जून कनेक्ट केल्यासारखे येते बरेचदा. हल्लीच मेघदूत (परीक्षण) वाचलं तर ठायी ठायी निसर्गाची वर्णनं आहेत. जेथे जेथे तो ढग जातो तेथले. सुरेख आहे फार!

नावडतीला द्यायचा टास्क>>> Lol

अनिंद्य...
Happy
खरंच आपले पूर्वज खूपच रसिक म्हणायचे!
आजकाल मदिरेने चूळ भरण्याच्या ऐवजी, पान खाऊन पिंक टाकतील फार तर.

असे इंटर स्पेसिज वूइंग फक्त तुळशीच्या लग्नात बघितले आहे या आधी !

>>> स्वाती, पाकळ्यांस ना?
हो हो. Happy
अस्मिता, हे बघ आले विभक्ती प्रत्यय माझ्या मागे परत. Proud

<झाडांशी बोलायची कल्पना तर फार आवडते मला.> हे राखीने गुलजारला सांगितलं होतं - झाडांशी बोलायचं असतं. अजूनही आवडेल का ही कल्पना? Wink

हल्लीच मेघदूत (परीक्षण) वाचलं तर ठायी ठायी निसर्गाची वर्णनं आहेत. जेथे जेथे तो ढग जातो तेथले. सुरेख आहे फार!
>>> फारच अवांतर आहे पण शांताबाई शेळक्यांचं मेघदूताचं समश्लोकी भाषांतरही फार छान आहे.
आणि असं ऐकलं होतं की पुण्यातल्या एका माणसाने (नाव विसरले) मेघदूताच्या मार्गावर काही ठिकाणी हेलिकॉप्टरने प्रवास केला आणि त्याला तशी वृक्षसंपदा दिसली होती.

पुण्यातल्या एका माणसाने (नाव विसरले) मेघदूताच्या मार्गावर काही ठिकाणी हेलिकॉप्टरने प्रवास केला आणि त्याला तशी वृक्षसंपदा दिसली होती.>>>>>>>आठ-दहा वर्षापूर्वी यावर लोकसत्ता मध्ये लेख मालिकाच होती बहुतेक.
एका ग्रुपने मेघदूताच्या वाटेने त्यात वर्णन केलेल्या कालावधीत प्रवास करून घेतलेला अनुभव होता

आठ-दहा वर्षापूर्वी यावर लोकसत्ता मध्ये लेख मालिकाच होती बहुतेक.
एका ग्रुपने मेघदूताच्या वाटेने त्यात वर्णन केलेल्या कालावधीत प्रवास करून घेतलेला अनुभव होता>>> हो मी अधूनमधून वाचलं होतं.

मेघदूत कितीही वेळा वाचलं तरी नवीन काहीतरी गवसतच.
लोकसत्तामध्ये अशी मालिका होती का ते आठवत नाही पण लोकप्रभा मध्ये एक छान लेख मालिका होती आणि त्याच्या जोडीला वासुदेव कामथ यांची चित्रे. अफाट सुंदर, माहितीपूर्ण. माझ्याकडे त्याची कात्रणे आहेत.

माझ्याकडे नोटस् मधे असलेले आंब्यासंबंधित दोन संदर्भ इथे डकवतो.

एक हा :

आम्रश्चूतो रसालोऽसौ सहकारोऽतिसौरभः।
माकन्दः पिकबन्धुः स्याद्रसालः कामवल्लभः॥

आम, चूत, रसाल, सहकार, अतिसौरभ, माकन्द, पिकबन्धु (कोकिळेचा मित्र), आणि कामवल्लभ - सर्व आंब्याची नावे.

आणि दुसरा हा :

e0eff9a7-70fe-42f3-956d-10664824d448.jpeg

(सौजन्य : Funskrit )

Pages

नवीन प्रतिसाद लिहा