महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या घरी केरवारे करायला येणार्‍या माणसाचं नाव आयोगाने आधी चिठी दिलेल्या केंद्रात नव्हतं. त्याला दुसरीकडे शोधून मिळालं. .
लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांसाठी नागपूरच्या पोरांना रत्नागिरी सेंटर देतं , कर्नाटक वाल्यांना बिहारात पाठवतं त्यांच्याकडून आपल्या वाघमारेंनी प्रेरणा घेतलेली दिसते.

पैसे वाटले हे तर युतीतलेच पक्ष एकमेकांबद्दल बोलताहेत.
एवढं करून मुंबईत काय?

गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाहीं..!!
कोट्यावधींचा पाऊस पाडून फक्त ४ ...!!!

शिवसेना UBT चे 20/२५ नगरसेवक होते. आज ६५ आहेत.

मनसेचे ६ नगरसेवक हा फायदा वेगळाच!

शाहसेनेचे ५३ नगरसेवक होते... आज २८ आहेत.

भाजपाचे ८४ नगरसेवक होते. ते ४ने वाढले

२७ महापालिका आम्ही जिंकू म्हणणारी भाजपा प्रत्यक्षात फक्त ९ ठिकाणी स्वबळावर तर १५ ठिकाणी कुबड्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करतेय.

काय भक्तुल्यानो, कळलं का ? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही..!!

सुषमा अंधारेंचं ट्वीट.

काँग्रेसच्या ३१ जागा होत्या. त्यातलेही काही भाजप सेनेत गेले. आता २४ आल्या. वंचितसाठी ६० सोडल्या होत्या. त्यात त्यांनी ४६ ठिकाणी उमेदवार उभे केले. ० आले.

वंचित पक्ष नाही. प्लॅटफॉर्म आहे. लोकसभा विधानसभेला त्यांच्याकडे असेच तिकीट मागायला आलेल्यांना फॉर्म दिले. विचारसरणी बघायची गरज नाही. निव डणुका झाल्यावर तो पक्षात आहे की नाही हे बघायची गरज नाही. मायावतींवर तर पैसे घेऊन तिकीटे विकल्याचा आरोप आहे.
लोकसभा विधानसभेला वंचितच्या उमेदवारांना भाजपचं फंडिंग होतं.

रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर मुंबईत एकही उमेदवार नव्हता? भाजप सेनेच्या चिन्हावर लढले का माहीत नाही. रामदास आठवलेंनी स्वतःच्या मंत्रीपदासाठी पक्ष मोडीत काढला. समाजकल्याण खातं बघतात ना? दलित अ त्याचाराच्या एका तरी प्रकरणात मंत्री म्हणून दखल घेणं दूर , बोलतात तरी का?

दहिसर ते कांदिवली शत प्रतिशत युती. धारावीत काँग्रेस.

काय भक्तुल्यानो, कळलं का ? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही..!!
सहमत, भक्तुले असेच आहेत. २०१४ साली बहुमता पेक्षा केवळ १० चं जागा जास्त जिंकले होते. पण जग जिंकल्याचा अविर्भाव होता.
२०१९ साली केवळ २१ जागाचं वाढलेल्या, पण बोलत तर असे होते जस कांय दोन तृतीयांश बहुमत मिळलं. भक्तुल्ले कुठले.

२०२३ मध्ये तर खरं तर हरलेच होते. दुसरा एखादा असता तर सरळ राजीनामा देऊन विरोधकांना वाट मोकळी करून दिली असती. पण नाही.

2026 मध्ये मुंबईत सर्वात मोठा पक्ष आणि पहिल्यादाच महापौर बनतोय म्हणून कांय झालं? वाढल्या तर केवळ चारच जागा ना. कधी सुधारणार भक्तुल्ले कांय माहिती.
हिथंच कोणी तरी लिहलंच होत की भाजप समर्थक फक्त निकाला दिवशी खुश असतात, तर विरोधक इतर सर्व दिवशी. होतंय पण असचं.
भाजप EVM, मतदार याद्याचा घोळ करून जिंकतोय असं समजू. पण खाली दिलेले महानगरपालिका च्या प्रचार सभा, रोड शो चे आकडे वाचा. मला माहिती नाही खरे आहेत का नाही ते. कदाचित चुकीचेही असतील पण ट्रेंड मात्र जवळपास सेमच असेल. हिथं असतील बरेच राजकारणाला follow करणारे. त्यांना माहिती असेल कोणी किती सभा, रोड शो घेतले ते. पण हे आकडे जवळ पास जरी खरे असतील तर भक्तुल्ले असेच निकाला दिवशी खुशीत असणार.
Fadanvis 33
Shinde 29
Ajit dada 25
Uddhav thakare 3
Raj thakare 4
Vijay vadettivar 25

२०१९ मध्ये फडणवीसांनी सगळ्यात जास्त स्ट्राइक रेट आमचाच अशी एक थियरी मांडली होती, ते आठवलं.
तसंच याही विजयावर भाजप समर्थकांचाच तो न्याय्य मार्गाने मिळवला असा विश्वास नाही, हेही दिसलं. विधानसभेत इतकं दणकन बहुमत मिळूनही भाजप वाल्यांना व्हावा तसा आनंद झाला नव्हता, कारण तो विजय विश्वसनीय नव्हता, तसंच.
मोदी शहांनी सभा घेतल्या असता तर मुंबईत भाजपची एकहाती सत्ता आली असती की मग.
कोणी किती पैसे वाटले त्याची आकडेवारी नाही का?
मनपा निवडणुकांसाठी सभा कधीपासून व्हायला लागल्या? घरोघर जाऊन प्रचाराची पद्धत आहे. काँग्रेस प्रचाराच्या बाबत आळशी आहेच. पण वर्षा गायकवाड बर्‍याच फिरल्यात. आदित्य ठाकरे फिरलाय. इतर नेत्यांना मी फॉलो करत नाही, त्यामुळे त्यांच्या माहीत नाहीत.

लातूरने रवींद्र चव्हाणांना उत्तर दिलंय.

ही निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई होती. मुंबईत तरी त्यांनी शिंदेसेनेला जागा दाखवून दिलीय. राज ठाकरे मतं मिळवण्यात नेहमीच कमी पडतात. त्यांनी शिवसेनेत विलीन व्हावं.
शरद पवारांनी अजित पवारांच्या पक्षात विलीन व्हावं आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री करावं. त्यांच्या पक्षात जे खरंच विचारसरणीला धरून लोक असतील ते प्रशांत पवारांसारखे काँग्रेसमध्ये जातील.
फडणवीसांनी अजित पवारांना डंप केलं तर ते पुन्हा काकांकडे जातील.

<महापौर, स्थायी समिती वगैरे रसमलाई वाली खाती आता उधोबाच्या घशात जाणार नाहीत.> भाजपच्या घशात जातील,

The investigation wing of the Directorate General of Income-Tax, Mumbai, seized Rs 2 crore cash, mainly from the premises of Shiv Sena corporator and BMC standing committee chairman Yashwant Jadhav's family and his close associate businessman Bimal Agrawal during the search that commenced on Friday.

या यशवंत जाधवाची पत्नी यामिनी जाधव शिंदेसे नेत आहे आणि आता पुन्हा नगरसेवक झाली आहे. ईडीपासून वाचावं म्हणूनच ही आणि हिच्यासारखे अनेक भाजपच्या वळचणीला गेले. हिला लोकसभेचं तिकीट दिलं होतं. आता नगरसेवक झाली. नेत्रदीपक प्रगती.

निवडणूक आयोगाच्या गमतीजमती या माझ्या धाग्याची महाराष्ट्र एडिशन काढण्याएवढं मटेरियल आहे. फक्त तेवढा वेळ हाताशी नाही.
लिहिलेलं सगळे वाचत असतात. मान्य करायची तयारी नसते. तेच पी चिदंबरम आणि त्यांच्या पोराने पाकिस्तानला खोट्या नोटा छापायला मदत केली यावर विश्वास ठेवतात आणि जिथे संधी मिळेल वा न मिळूनही लिहितात.

Mim ला 95 जागा आल्यात पूर्ण महाराष्ट्रात. हे mim चे पाप आणि विषवल्ली पूर्ण भाजपची जबाबदारी आहे. इतके धार्मिक ध्रुवीकरण केले आहे. अजून दहा वर्षांनी अत्यंत बिकट परिस्थिती आली तर नवल वाटायला नको. आणि ह्यांची it cell इतके तत्पर तर कोणी नसते. काल चॅनेलवाले भाजप वर हे पाप फोडत होते, आज लगेच दोन तीन english forward आले ज्यात भाजप सोडून इतर सर्वांना mim साठी दोषी धरले आहे.

भाजपल हेच हवं आहे. आता mim ची भीती दाखवून आणखी ध्रुवीकरण करतील.
Mim च्या कोणत्या नेत्याच्या मागे ईडी, सीबीआय, आयटी लागलेत का कधी?

MIM व वंचीत आघाडी भाजपच्याच फायद्याची कामे करतात.
धनुष्यबाण नसताना, केवळ २२ नगरसेवक उरलेले असताना, भाजप कडे पैसा व ईडी असताना, उबाठाची कामगिरी चांगलीच म्हणायला हवी.
खरे तर उबाठा समोर राज किंवा काँग्रेस हेच दोन पर्याय होते, राज शी युती केली तर अमराठी लोक नाराज, कोंग्रेस बरोबर जावे तर राज चा कोअर मतदार नाराज. त्यातल्य त्यात राज ला निवडले. कोंग्रेस सोबत गेले असते तर वेगळे चित्र असते का ? जर तर चा प्रश्न.

लातूर कोल्हापूर मध्ये काँग्रेस ने चांगली कामगिरी केली आहे, तिथे काय क्लिक झाले हे पाहून काँग्रेसने अभ्यास करावा, दुर्दैवाने अशी यंत्रणा काँग्रेस कडे नाही.

शरद पवारांनी आता खरेच काँग्रेस मध्ये विलीन व्हावे, नाहीतरी ज्या करणाने ते अलग झाले ते आता अप्रस्तुत झाले आहे.

गौरी लंकेश खूनातील आरोपीही निवडून आले. गौरी , कलबुर्गी, दाभोलकर या हत्यांचा संदर्भात माझा जो अंदाज आहे तो इथे लिहिणे प्रशस्त होणार नाही. Deep state.

विकु, भाजपवाले म्हणतात ना की राहुल गांधी आमचा स्टार प्रचारक आहे, तसं आदर्णीय रवींद्र म्हात्रे लातूरमध्ये कॉंग्रेसचे स्टार प्रचारक होते. तेव्हा या विजयाचं श्रेय त्यांचं आहे. देशमुख बंधूंचं नाही. Wink

शरद पवारांनी आता खरेच काँग्रेस मध्ये विलीन व्हावे, नाहीतरी ज्या करणाने ते अलग झाले ते आता अप्रस्तुत झाले आहे. >>>> विकु, एकनाथ शिंदे "अलग" नाही झाले का? ते मात्र गद्दार? Happy तुम्ही केला नसेल पण त्यांचा उल्लेख माबोवरच पन्नास वेळा गद्दार म्हणून वाचला आहे.

इतक्या गदारोळात काँग्रेस फार जिंकली नसली तरी आपल्या धोरणाशी कन्सिस्टंट राहिले आहेत. बाकी विरोधी पक्षांबद्दल तसे म्हणता येणार नाही.

ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटलंय. त्यांनी तसं म्हणणं चूक आहे का? गद्दारनाथ शिंदे , मिंधे असं त्यांचं नाव ठेवलंय.
शरद पवारांनी काँग्रेस सोडण्याचं कारण सोनियाचं परदेशी मूळ हे दिलं असलं तरी ते खरं नव्हतं. त्यांना पक्षाध्यक्ष केलं नाही हे होतं, असं मला वाटतं. पण ते लवकरच काँग्रेससोबत आले. शिंदे ठाकरेंवर ज्या प्रकारची टीका करतात (आपण त्यांच्यासोबत होतो, हे विसरून) तशी पवारांनी काँग्रेसवर केली नाही.

शिंदेंना शिवसेनेने मोठं केलं. पवार स्वकर्तृत्वाने मोठे झाले. काँग्रेसमध्ये सुरुवातीला त्यांना विरोध सहन करावा लागला - पहिलं विधानसभा तिकीट मिळवण्यापासून.

त्यां नी सेक्युलर विचारसर णी सोडली नाही. ती फेक असो वा जेन्युइन.

पण अडाणीच्या मुद्द्यावर ते काँग्रेससोबत नाहीत. तेव्हा त्यांनी आता काँग्रेससोबत येण्यात अर्थ नाही. शिवाय २०१४ पासून महाराष्ट्रात त्यांनी भाजपला कायम दूर ठेवलं असं खात्रीने म्हणता येत नाही. २०१४ च्या निवडणुकां आधी आघाडी तोडली. विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्तावाला विरोध केला नाही. २०१९ मध्येही कदाचित दोन्ही डगरीवर पाय ठेवून होते, पण सीमा ओलांडली नाही. कदाचित हवी तशी डील झाली नसेल.
महाविकास आघाडी त्यांच्यामुळेच झाली. लोकसभेत महाविकास आघाडी च्या यशात त्यांचाही वाटा आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा सल्ला घेतला असता तर २०२२ मध्ये चित्र वेगळं दिसलं असतं. उद्धव हे राहुलप्रमाणेच मुरलेले राजकारणी नाहीत. शरद पवार त्याबाबत सगळ्यांचे गुरू आहेत.
काँग्रेसनेही पवारांवर १०० टक्के विश्वास ठेवलेला नाही, ते अजित पवारांना सामील नाहीत, असं खात्रीने सांगता येत नाही. जे ठाकरेंनी शिंदेंबाबत केलं.
शिवाय शिंदे शिवसेनेत होते. पवार २५+ वर्षे वेगळ्या पक्षात आहेत. युपीए आणि महाविकासमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. शिंदे २०१९ पासूनच फडणवीसांच्या संपर्कात होते. फडणवीस व भाजपने कधीही शिंदेंवर टीका केली नाही. ३ वर्षे ते आमदार फोडायच्या कामात होते. ते २०२२ मध्ये अचानक झालं नाही. म्हणून ते गद्दार.

जो कधीच १००% विश्वासार्ह नाही, त्याला गद्दार कशाला म्हणणार ? आणि शेवटी पवारांचं राजकारण कोणालाही कळत नाही, हेच खरं. अजित पवारांनी त्यांच्याशी गद्दारी केली का हे त्या दोघांनाच माहीत. फडणवीस - शहांनाही माहीत नसेल.

>>>
काय भक्तुल्यानो, कळलं का ? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही..!!
<<
शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यावरही एक बेडूक फुगवण्याचा हास्यास्पद प्रयोग झाला होता. दोन भाऊ एकत्र आले आता एकगठ्ठा मराठी मते मिळणे निश्चित झाले. शिवाय उधोबा इस्लामचे कडवे अनुयायी झाल्यामुळे मुस्लिम मतेही आपल्याच खिशात असे बेडूक फुगवण्याचे प्रकार चालू होते. समस्त मराठी वाहिन्या आता विजयोत्सव कुठे आणि कसा साजरा करावा इतकी औपचारिकताच काय ती बाकी आहे असे वातावरण निर्माण करण्यात गुंतले होते. पण हा हंत हंत हंत ! म्हणावे लागते आहे.
कितीही काठावरचा असला तरी भाजप आणि मित्रपक्षांनी उधोबाच्या शिवसेनेला हरवले आहे.
मुंंबई महापालिका ही मातोश्रीच्या आवारात बांधलेली गाय आहे. हवे तेव्हा, हवे तितके दूध काढा आणि मलई खा असे गेल्या काही दशकातील समीकरण निकालात निघाले आहे. निदान काही दिवस तरी मातोश्री ३, ४ वगैरे महाल बांधणे स्थगित करावे लागेल! देवाचे (pun intended!) आभार!
मलई वरून आठवले:
राज ठाकरेने आपल्या बहारदार नकला वगैरे मनोरंजनात्मक भाषणात अण्णामलाईचा रसमलाई असा उल्लेख करून त्याच्या आया बहिंणींचा उद्धार केला. आता ह्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना पेढ्यांबरोबर रसमलाई वाटून राजच्या जखमेवर छानसे मीठ चोळले आहे असे कळते!

मराठी माणूस काय फक्त मुंबईत राहतो का? भाईंदर, विरार, ठाणे, कल्याण, पुणे ह्या गावात मराठी लोक राहात नाहीत का? त्यांनी तर शिवसेना आणि मनसे ह्या जोडगोळीला साफ कचर्यात फेकले आहे त्याचे काय? मराठी माणसाची अस्तित्वासाठी शेवटची लढाई वगैरे वल्गना कुणी मनावर घेतलेल्या नाहीत. मुंबईतही सरसकट एकगठ्ठा भरघोस मराठी मते उधोबाच्या पदरात टाकली आहेत असे चित्र नाहीच.

कदाचित मुंबईमध्येच फक्त मराठी माणसाला मराठी असल्यामुळे नोकरीमध्ये, घर घेण्यामध्ये किंवा सार्वजनिक व्यवहारांमध्ये परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक मिळते. किंवा असं त्यांना वाटत असावे. पुण्यात तसं काही होत नाही. मराठी माणसांना खूप छान आनंदात जगता येतं. मुंबई पुरताच काहीसा प्रश्न वेगळा आहे.

< समस्त मराठी वाहिन्या आता विजयोत्सव कुठे आणि कसा साजरा करावा इतकी औपचारिकताच काय ती बाकी आहे असे वातावरण निर्माण करण्यात गुंतले होते.> मुंबईत फक्त ८० जागांवर मतमोजणी सुरू झाली होती, तोवर मराठी वाहिन्यांनी युतीला बहुमत मिळाल्याच्या बातम्या दिल्या.

भाईंदर मध्ये भाजपच्या महापौर २०१५-१७ गीता जैन. २०१७-२० डिंपल मेहता.
मराठीच्या मुद्द्यावर तिथल्या दुकानदारांनी संप केला आणि मोर्चा काढला.

ठाकर्‍यांनी खुशाल म्हणू दे. त्यांचा पक्ष शिंदे सोडून गेले. त्यामुळे ते म्हणणारच. पण जनरल पब्लिकही इथे इतक्या वेळा म्हणाले त्याबद्दल मी बोलतोय. स्वतःचा मूळचा पक्ष सोडून गेलेले शिंदे काही पहिलेच नाहीत. आणि कोणीही अशी पावले उचलते तेव्हा असे निर्णय सहसा एकाच दिवसांत घेतलेले नसतात. एकनाथ शिंदे बराच काळ नाराज होते. त्यांना फारशी किंमत दिली गेली नाही. उठांना भेटायला गेले तेव्हा तासन्तास दालनाबाहेर बसवून ठेवण्यात आले - वगैरे शिवसेनेला अनेक वर्षे फॉलो करणार्‍या व सेनेबद्दल सहानुभूती असणार्‍या पत्रकारांच्याच लेखनात वाचले आहे. २०२२ मधे मुंबईतून बाहेर पडल्यावर सुरतमधे असताना उठा व त्यांच्यात बोलणे झाले - तो एकच प्रयत्न त्यांना परत आणण्याचा झाला. पण तोपर्यंत सेनेच्या लोकांनी मुंबईमधे व जाहीर वक्तव्यांमधे सगळे दोर कापून टाकले होते. त्या काळात सुरूवातीला शिंद्यांनीही उठांवर थेट टीका केली नव्हती. इतर एखाद्या पक्षाच्या नेत्यांनी राजकीयदृष्ट्या परिपक्वपणे हाताळले असते. सेनेचे सगळे रोखठोक असते.

आणि गद्दारी पक्षाशी महत्त्वाची का मतदारांशी? पक्ष हा मतदारांपेक्षा मोठा नाही. ज्या पक्षाशी युती निवडणुकीआधी होती व ज्यांच्याशी बराचसा अजेंडा जुळतो त्यांच्याबरोबर राहणारे, की निवडणूक झाल्यावर १८० अंशात फिरून कसलेही साम्य नसलेल्या पक्षाबरोबर जाणारे - यात पहिल्यावर जितकी टीका इथे वाचली त्याच्या दहा टक्केही दुसर्‍याबद्दल वाचली नाही (भक्त लोक वगळता). उलट दोन्हीमधल्या साम्यस्थळांचा शोध लोकांना लागू लागला. सेनेचे हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वापेक्षा कमी धोकादायक वाटू लागले. १०५ घरी बसवले वगैरे कौतुके ऐकली. ते करणार्‍यांना पडद्यामागे काय चालले होते याचा पत्ताही नसावा. एक दोन तडजोडीचे मुद्दे इकडून तिकडे गेले असते ते हे सो कॉल्ड घरी बसवणारे त्याच १०५ बरोबर स्वतःच बसायला निघाले होते.

आजच १९८२ च्या गिरणी कामगार संपाबद्दल लेख येत आहेत, कारण सुरूवात १८ जाने. ला झाली होती अशी माहिती वाचली. बहुसंख्येने मराठी असलेले गिरणी कामगार देशोधडीला लागले तेव्हा जे मालकधार्जिणे होते, नंतरही ज्यांनी हिदुत्वाकरता मराठी मुद्दा वार्‍यावर सोडला त्यांना आता त्याबद्दल नव्याने जेन्युइनली काळजी वाटत आहे यावर कोण विश्वास ठेवणार.

भाजपच्या उघड हिंदुत्वाच्या राजकारणावरून मुस्लिमांना वाटणारी भीती साहजिक आहे. पण मीमच्या यशाचे ते एकमेव कारण नसावे. इतकी वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीकडे जाणारे मुस्लिम मतदार गेल्या काही वर्षांत त्यांनी सेनेला चुचकारलेले व आता मनसेलाही बरोबर घेतलेले पाहून दुरावले असतील. त्यांना आता कोणीच भरवशाचे वाटत नसेल.

शिवाय उधोबा इस्लामचे कडवे अनुयायी झाल्यामुळे >> अकोट मधे भाजपे सुंता करुन राहिले भौ. आता ओवेसी गोड लागु लागला ते बघा. काही दिवसांनी मोदोबा पण ओवेसीला मांडीवर घेईल

ओवेसीने आज फतवा काढला की स्थानिक पातळीवर आमच्या लोकांनी परस्पर कुणाशी एकोपा केल्यास पक्षातून हकालपट्टी होईल. स्थानिक पातळीवर काही लोक एकमेकांचे पक्के मित्र असतात वेगळ्या पक्षांत असले तरी हे विसरून चालणार नाही.

भाजपच्या उघड हिंदुत्वाच्या राजकारणावरून मुस्लिमांना वाटणारी भीती साहजिक आहे. पण मीमच्या यशाचे ते एकमेव कारण नसावे. इतकी वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीकडे जाणारे मुस्लिम मतदार गेल्या काही वर्षांत त्यांनी सेनेला चुचकारलेले व आता मनसेलाही बरोबर घेतलेले पाहून दुरावले असतील. त्यांना आता कोणीच भरवशाचे वाटत नसेल.>> २०१४ नंतर सामान्य आजूबाजूच्या हिंदू लोकांची मुस्लिम समाजाबद्दलची मते ऐकली की थक्क व्हायला होते. असा एखाद्या धर्माबद्दल आकस इतक्या ग्रास रूट लेव्हलला आणि इतक्या घाऊक प्रमाणावर असेल तर तो दुसरा समाज तसाच उजवा पर्याय का नाही निवडणार. सगळीकडे ते सनातन चे तुणतुणे. १५०० खात्यात आले आणि असे धर्मांध बनवले की अजून काय हवे.

जर का युतीला बहुमतासाठी तीन चार जागा कमी पडल्या असत्या तर पाच वर्षे रणकंदन झाले असते. अपेक्षांना विरोधकांनी लपवून ठेवले असते, घेरले असते आणि फारच वाईट राजकारण रंगले असते.

कोंग्रेसने मनसेला बरोबर घेतलेले नाही. तेवढ्या कारणामुळे मुंबईत काँग्रेस वेगळी लढली.

शिवसेनेची भूमिका मराठी माणूस - हिंदुत्व अशी सीनियर ठाकरेंच्याच काळात बदलली. शेंडीजानव्याबद्दलचं वक्तव्य त्यांचंच आहे. भाजपचं हिंदुत्व हे मुस्लिमद्वेषावर आधारित आहे, तसं सेनेचं नाही.

सामान्यतः नगरविकास खातं मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. ठाकरेंनी २०१९ मध्ये ते शिंदेंना दिलं. आताही मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने रुसलेल्या शिंदेंकडे ते आहे. त्यामुळे शिंदेंची उपेक्षा वगैरे सिनेमात छान वाटतं. ठाकरेंबद्दल उलटही वाचनात येतं. हेच शिंदे २०१४-१९ खिशात राजीनामा घेऊन फिरत होते.

< ज्या पक्षाशी युती निवडणुकीआधी होती व ज्यांच्याशी बराचसा अजेंडा जुळतो त्यांच्याबरोबर राहणारे, की निवडणूक झाल्यावर १८० अंशात फिरून कसलेही साम्य नसलेल्या पक्षाबरोबर जाणारे - यात पहिल्यावर जितकी टीका इथे वाचली त्याच्या दहा टक्केही दुसर्‍याबद्दल वाचली नाही> यावर २०१९ पासून बरेच वेळा लिहून झालं आहे. त्यांच्या मते सगळी पदे ५०-५० % . २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपद ठाकरेंना हवं होतं. तेव्हा ते आमदारही नव्हते. पहिल्यांदा आमदार झालेल्या आदित्यला मुख्यमंत्री करा असं म्हणाले असतील असं वाटत नाही. म्हणजे शिंदे किंवा भास्कर जाधव यांनाच संधी होती. युती त्यावरून फिसकटली. आणि फडणवीसांनी अजित पवारांबरोबर पहाटे शपथ घेऊन युती पूर्ण तोडली. तिथे हे १८० चाललं मग ठाकरेंनी केलं तेवढं चूक?

ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका पातळ केल्यावर आम्ही का टीका करावी? ते सेक्युलर झाले, तर त्याचं स्वागतच आहे. कोशियारींनी त्यांना पत्रात सेक्क्युलर झालात असं शिवीसारखं म्हटलं होतं.
करोना महामारीचा काळ उद्धव ठाकरेंनी जसा हाताळला, त्यावरून ते अधिक आवडले. भाजपवाले त्यावरून त्यांची कितीही टीका करोत. लोकसभेत आणि आता मुंबई मनपातही त्यांचा मतदार त्यांच्यासोबतच आहे.

शिंदे हास्यास्पद कुठे झाले? ज्या पक्षात ते होते त्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप केला. पालघर साधू प्रकरणी व्यथित झाले म्हणे. शेवटी बाहेर पडताना कारण दिलं अजित पवारांचं. आणि पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले.
शिंदेंचं हिंदुत्व इतकं अस्सल होतं, तर २०१९ मध्येच बाहेर पडायचं होतं. किमान मंत्रीपद घ्यायचं नव्हतं. पण त्यांना फडणवीसांनी मिशन गौहा टी दिलं होतं. ते पक्षात राहून करत होते. याला गद्दारी म्हणायचं नाही तर काय?
आणि आता भाजप शिंदेमध्येच जो कलगीतुरा सुरू आहे, त्यावरून त्यांच्या हिंदुत्वाच्या बाताही किती पोकळ आहेत ते दिसतंय. खरं कारण ईडीची भीती आणि लक्ष्मीदर्शन हे होतं. जे आता भाजपवालेच बोलून दाखवताहेत.

<जर का युतीला बहुमतासाठी तीन चार जागा कमी पडल्या असत्या तर पाच वर्षे रणकंदन झाले असते. अपेक्षांना विरोधकांनी लपवून ठेवले असते, घेरले असते आणि फारच वाईट राजकारण रंगले असते.>

Biggrin हे विधान नार्वेकर संपत्तीवाढी बद्दलच्या विधानाच्या वरताण विनोदी आहे. भाजपवाल्यांनी विरोधी पक्षाच्या उमेद वारांना धाक दाखवून माघार घ्यायला लावली. कुठे उमेदवारी अर्ज भरू दिले नाहीत. अपक्षांना पळवून न्यायला लागणारी यंत्रणा कोणाकडे आहे हे माहीत नाही? कर्नाटक काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत आणून कोणी ठेवलं होतं? त्यांच्याच सीडीज नंतर कशा येऊ लागल्या?

<फारच वाईट राजकारण रंगले असते.> भाजप हे करत आलाय. ते उदात्त महन्मंगल वाटत असेल ; नाही?

>>>मुंबईत हुतात्मा चौकात येऊन हुतात्मा स्मारकावर.....>>>
जेव्हा भुजबळ बाहेर पडले सेनेतून ( किंवा तसं करायला भाग पडावं लागलं, किंवा आणखी काही कारणाने) तेव्हा ते एक नवीन संघटना काढण्याचं आजमावण्यासाठी दिल्लीपर्यंत फिरण्याअगोदर हुतात्मा स्मारकावर फुले चढवून निघाले. मग चार दिवसांनी सेनेकडून ते स्मारक धुण्यात आले होते. याबद्दल आता काही मागील बातमी सापडत नाही. पेपर वाल्यांनी जुने archive काढून टाकलेत.

https://bolbhidu.com/chagan-bhujbal-hutatma-chowk-gomutra/

मेमरी कशी ऑल्टर केली जाते बघा. जाणूनबुजून की चुकून ते ज्याचं त्याला माहीत. अपप्रचाराच्या वर्षावात रोज भिजल्याचे परिणाम असे दिसताहेत एकामागोमाग एक. आधी निवडणूक आयोगाची तरफदारी. मग भ्रष्टाचाराचं कौतुक. विरोधकांवर लोकप्रतिनिधी पळवण्याचा आरोप. आता हे हुतात्मा चौक शुद्धीकरण प्रकरण १८० अंशात फिरवलं.

सिंधू आणि धृतराष्ट्र म्हटलं ते पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय.

ती जुनी बातमी ( फोटोसह होती) सापडेल का?
मुंबई ग्रंथ संग्रहालयात असतात जुने पेपर्स, पण ते फक्त तिथे पाहता येतात.
.... बोलभिडूची बातमी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

>>
अकोट मधे भाजपे सुंता करुन राहिले भौ. आता ओवेसी गोड लागु लागला ते बघा. काही दिवसांनी मोदोबा पण ओवेसीला मांडीवर घेईल
<<
अकोट वगैरे कुग्रामाचे सोडा. प्रासंगिक राजकारणी तडजोड आणि मूलभूत तत्त्वाशी तडजोड ह्यात फरक आहे. भाजपने हिंदूत्व सोडलेले नाही.
उलट उधोबाने जय श्रीराम म्हणणारे हरामखोर वगैरे तुघलकी, घोरी, अघोरी वक्तव्ये करून आपला हिंदूत्वाबद्दलचा तिरस्कार वेळोवेळी अधोरेखित केला आहे.
बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात "इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो" अशी होत असे त्यातला नेमका हिंदू शब्द वगळून टाकणे हे बरेच काही सांगून जाते.
मुस्लिम मतावर हक्क सांगणारे आता बरेच तयार झाले आहेत. काँग्रेस तर आहेच. शिवाय उबाठा इस्लामी सेना, एम आय एम वगैरे वाटेकरी निर्माण झाले आहेत. मुस्लिमांनी तातडीने पाच पाच पोरे जन्माला घालून मतदार संख्या वाढवली नाही तर ह्या पक्षांची मोठी पंचाईत होणार आहे!

रात्रीच्या शेवटच्या बातमीनुसार शिंदेंनी निवडून आलेले उमेदवार एका हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवलेत. काही जण उद्धव सेनेकडे जाऊन महापौर निवडीत ( बहूमतात) घोळ करू नये म्हणून.
समजा नगरसेवक फुटले तरी उद्धव सेनेलाही बहुमत सिद्ध करता येणार नाही पण भाजपची कढी मात्र बिघडवण्यात यश येईल. मग काय प्रशासक आणावा लागेल पुन्हा. कॉन्ग्रेस ( एमाइएमसह) २४ जण सेनेला सामिल होणार नाही, "आम्ही विरोधी बाकांवर बसायला तयार आहोत" हेच सांगेल. यावेळी सोनियाकडून ठाम नकार येईल. त्यांची मुस्लिम मते त्यांना दवडायची नाहीत.

'गद्दार' हे विशेषण एकनाथ शिंदेंना (किंवा व्ही पी सिंग, नाना पटोले , कुणालाही) लावू नये असे माझे मत आहे. हा एक feudal शब्द आहे. देशाशी बेइमानी करणार्‍यांना लावायला हरकत नाही. इथे धूर्त, कावेबाज, स्वार्थी, संधीसाधू, अशी अनेक विशेषणे उपलब्ध आहेत.

कोंग्रेसने मनसेला बरोबर घेतलेले नाही. तेवढ्या कारणामुळे मुंबईत काँग्रेस वेगळी लढली. >>> हो पण ते आत्ता. विधानसभेत व आधी एकत्र होते ना? त्यातून अविश्वास वाढीस लागला असेल.

२०१४ नंतर सामान्य आजूबाजूच्या हिंदू लोकांची मुस्लिम समाजाबद्दलची मते ऐकली की थक्क व्हायला होते >> हो सिरीयसली! ते ही आहेच. मात्र पुण्यात कोथरूड मधल्या सोसायट्यांमधे एकमेकांना "सतर्क" राहण्याबद्दल सांगणार्‍यांचा जेथे मीम आली आहे तेथे काय परिणाम आहे त्याबद्दल मी साशंक आहे. द्वेष वाढला आहे यात वाद नाही. "कॉजेशन" किती आहे याबद्दल शंका आहे.

त्यामुळे शिंदेंची उपेक्षा वगैरे सिनेमात छान वाटतं >> मी शिवसेनेला अनेक वर्षे फॉलो करणार्‍यांच्या लेखांमधे वाचले आहे. एक पुस्तकही आहे - 'महाराष्ट्राचे महासत्तांतर'

तिथे हे १८० चाललं मग ठाकरेंनी केलं तेवढं चूक? >>> उठांचे चूक मी म्हणालो नाही. सगळे राजकारणाचे जुगाड आहेत. पण एकट्या शिंद्यांनाच गद्दार बिद्दार म्हंटले गेले म्हणून मी तो मुद्दा काढला. पण २०१९ नंतर उठांचे सगळेच पावन करून घेतले गेले. ते ही चुकीचे आहे. इतकी वर्षे धार्मिक व भाषिक अस्मिता हेच मुख्य धोरण असलेले लोक एका दिवसात सेक्युलर म्हणून पावन झाले. त्यांची ती राजकीय गरज होती.

त्यांच्या राजकीय खेळीला विरोध नाही. विरोध आहे तो आमची राजकीय खेळी नैतिक आहे व तुमची भ्रष्ट आहे असल्या आर्ग्युमेन्टला. भक्तांना डिवचायला लिहीणे वेगळे व खरोखरच तसे समजणे वेगळे.

उठांबद्दल मला अजिबात आकस नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ चांगला होता. इमेजही चांगली होती. करोनाच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली होती. पुढेही त्यांना संधी मिळाली तर चांगले काम करतील यात शंका नाही. पण तो विषय नाही. बाय द वे २०१४-१९ हा फडणविसांचा कार्यकाळही चांगलाच होता. मात्र "सेक्युलर" म्हणून आयुष्यभर नावाजलेले नेतेच त्यात "पेशवे" वगैरे आणून जातीयवाद आणत होते.

राज ठाकर्‍यांबद्दलही आकस नाही. उलट अजूनही उठांपेक्षा काकणभर जास्तच आवडतात. राठा व रागा मधे मला खूप साम्य वाटते. एकेकाळी एक राज्य चालवायला योग्य तरूण नेतॄत्व वाटत होते, दुसरे देश चालवायला. इंग्रजी फ्रेजचे शब्दशः भाषांतर करायचे तर दोघांचेही "हार्ट" योग्य जागी आहे. पण अशा नेतृत्वाला लागणारी कन्सिस्टंसी नाही. रागांनी ती गेल्या २-३ वर्षांत नव्याने दाखवली आहे. राठांनी अजूनही नाही.

>>Mim ला 95 जागा आल्यात पूर्ण महाराष्ट्रात. हे mim चे पाप आणि विषवल्ली पूर्ण भाजपची जबाबदारी आहे<<
हि भाजपची रणनिती असु शकते. पुर्वि मुसलमानांची मतं एकगठ्ठा काँग्रेसला जायची, आता ती एकगठ्ठा एखाद्या माय्नॉरिटी पक्षाला जात असतील तर ते भाजपाचं यश आहे. ऑपरेशन लोटसची व्याप्ती कुठवर जाउ शकते याचा प्रत्यय काश्मिरमधे आलेला आहेच, त्याची पुनरावृत्ती होउ शकते..

शेवटी काय तर, एवरिथिंग इज फेअर इन लव, वॉर अँड पोलिटिक्स...

<बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात "इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो" अशी होत असे त्यातला नेमका हिंदू शब्द वगळून टाकणे हे बरेच काही सांगून जाते.> हे वाचल्यावर मला उद्धव ठाकरे आणखी आवडायला लागले.

Pages