Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
नियतीने ठरवलेल्या मार्गाला
नियतीने ठरवलेल्या मार्गाला अनुकूल होतील अशा घटना नियती घडवून आणत असते. >> मग मोदी, त्याचे तथकथित हिंदुत्ब ह्याचा कशाला उदो उदो करायला हवा ?? आणि अजित दादा - शिंदेला चढवून घ्यायला हव ?
नियतीने ठरवलेल्या मार्गाला
नियतीने ठरवलेल्या मार्गाला अनुकूल होतील अशा घटना नियती घडवून आणत असते. >> नियती???

ही नियती कोण ते शोधायला हवे .
ही नियती कोण ते शोधायला हवे . तिलाच शोधयला राहुल गांधी परदेशात जात नसेल ना?
सध्या भाजप, हिंदुत्व (
सध्या भाजप, हिंदुत्व ( वेगवेगळे रंग आहेत) यांची चलती आहे.
तरीही पश्चिम बंगालात नवीन बाबरी मशीद बांधायला सुरुवात केलेली आहे.
इथे अमेरिका, इस्लाम, हिंदू
इथे अमेरिका, इस्लाम, हिंदू आणि बांग्लादेश हे विषय निघाले होते म्हणून
https://x.com/State_SCA/status/2003188741586976817
@State_SCA
Today, Special Envoy for SCA Ambassador Sergio Gor held a productive call with Chief Advisor Yunus
@ChiefAdviserGoB
to discuss recent events in Bangladesh and shared US interests to advance prosperity through trade.
ही त्या देशातल्या हिंदूंची नियती.
या निवडणुकांत गोळीबार झाला
या निवडणुकांत गोळीबार झाला नाही, असं मी म्हटलं होतं. पण झाला झाला. कल्याणमध्ये नाही, पण अंबरनाथ मध्ये
https://www.youtube.com/watch?v=sZn1P7-EHdM
बेछूट गोळीबार ते शेकडो बोगस मतदार, भाजप- शिवसेनेत इतका राडा का? शिवसेना म्हणजे शिंदेसेना बरं का.
https://www.lokmat.com/thane/ambernath-election-money-distribution-to-vo...
शहरातील नगरपरिषदेसाठी आज मतदान पार पडत आहे. परंतु मतदानाच्या आदल्यारात्री भाजपा कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे भाजपा उमेदवाराच्या पावतीसह नोटांची बंडले सापडली. पूनम पाटील असं भाजपा उमेदवाराचे नाव या पावतीवर होते. त्यानंतर निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांनी भाजपाच्या २ कार्यकर्त्यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा या दोघांकडून इमारतीतील लोकांची नावे आणि पैसे सापडले.
त्यानंतर कोहोजगाव परिसरात शेकडो महिला एका सभागृहात जमल्या होत्या. या महिला बोगस मतदार असल्याचा संशय असल्याने भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहचत शिंदेसेनेवर आरोप केले. महिला बोगस मतदान करण्यासाठी आणल्याचा आरोप काँग्रेसने केला. सध्या या महिला कुठून आणि कशासाठी आल्या होत्या याबाबत चौकशी केली जात आहे.
दरम्यान, नगर परिषदेच्या मतदानासाठी प्रशासनाची जोरदारी तयारी सुरू होती. त्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अंबरनाथ येथे ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ माजली. प्रभाग क्रमांक ५ च्या ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप शिंदेसेनेने केला
विरोधी पक्ष संपतोय म्हणून तुम्ही खुष व्हा. पण मतदार आणि नागरिक म्हणून तुमचं मोल पहलगामला मारल्या गेलेल्या हिंदूंइतकंच आहे, हे लक्षात ठेवा.
१५ डिसेंबर २०२५ गुंड मयूर
१५ डिसेंबर २०२५ गुंड मयूर शिंदेचा भाजप प्रवेश रद्द
२३ डिसेंबर २०२५ गुंड मयूर शिंदेचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
स्वागत नहीं करोगे हमारा?
>>
>>
अमेरिका कायम पाकिस्तान धार्जिणी आहे. १९७०-७१ मध्ये तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात हिंदूंचा वंशसंहार होत असताना अमेरिका पाकिस्तानच्या पाठी ठामपणे उभी होती. आणि इस्लामला विरोध वगैरे म्हणजे आपल्याच चष्म्यातून ट्रंपकडे पाहणे. अमेरिकेने अफगाणिस्तान तालिबानला सोपवला. स्वतःच ज्याला दहशतवादी म्हटले अशा सिरियन नेत्याला जवळ केलं.
<<
नेहरुनी जाणीवपूर्वक अमेरिकेला दूर ठेवून सोव्हियत रशियाला जवळ केले असा इतिहास आहे. कारण नेहरूंना जरी थेट साम्यवाद भारतात राबवायची हिंमत नसली तरी त्यांना त्या विचाराचे विकृत आकर्षण होते. यामुळे अमेरिका दुरावला आणि गांधी नेहरू घराणे सत्तेत असेपर्यंत अमेरिकेशी संबंध वाईटच होते. पण इथे एका हाताने टाळी वाजलेली नाही. दोन्ही बाजूंनी हा निर्णय घेतलाय की आम्ही मित्र देश नाही.
आजच्या काळात ट्रंप पाकला झुकते माप देण्याचे कारण रशिया युक्रेन युद्धात त्याची कोंडी झाली आहे. तो शक्य तितक्या देशांना रशियाच्या विरुद्ध जायला भाग पाडतो आहे. भारताला ते करायला भाग पाडण्यासाठी पाकला मदत करून दबाव आणतो आहे आणि भारत तो दबाव झिडकारून टाकतोय.
<<
पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळी तात्या पाकिस्तानसोबत होते, ये याद रख्खा जाएगा. इथेही त्यांचे भक्त पहलगामसाठी पाकिस्तानला सरळ दोष देत नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारताच्या चौकशी यंत्रणांनी ते पाकिस्तानी अ तिरेकी होते असे म्हटल्यावरही हे नाकारतात.
<<
सिंदूरच्या वेळी भारताने जे हल्ले केले त्यात अमेरिकेच्या एका छुप्या आण्विक शस्त्रागाराचे मोठे नुकसान झाले. जे झाले असे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अमेरिकेची परिस्थिती आहे (अशी किंवदंता आहे). भारत इतका खोलवर हल्ला करेल अशी कदाचित अपेक्षा नसेल त्यांची. परंतु ह्यामुळे अमेरिका इथे भारताविरुद्ध जाताना दिसत आहे. पण हे माझ्या मते फार काळ टिकणारे धोरण नाही.
एकंदर भूमिका पाहता ट्रंप इस्लामी देशांच्या आहारी जात नाही. उलट तो अशा देशांचा तिरस्कारच करतो. कधी ना कधी तो जागा होईलच. पाक हे एक दिवाळखोर राष्टर् आहे. त्या मानाने भारत श्रीमंत आहे. एक मोठी बाजारपेठ आहे. दुर्लक्ष करण्याजोगा देश नाही.
तोवर अमेरिकेचे नाव घेऊन शिवीगाळ न करता आपले जे काही धोरण आहे ते खंबीरपणे राबवणे हे भारताचे धोरण उत्तमच आहे.
>>ही त्या देशातल्या हिंदूंची
>>ही त्या देशातल्या हिंदूंची नियती.
म्हणून मोदींनी सी ए ए सारखी योजना जाहीर केली जी वापरून धर्मपिसाट इस्लामी देशातील हिंदूना भारतात स्थायिक होणे सोपे जावे. पण ह्याला आपल्यासारखे पुरोगामी आंधळा विरोध करत असतात.
बांगला देशातील हिंदू कधीही सुरक्षित नसणार. त्यांना भारतात आश्रय देणे हाच एक उपाय व्यावाहारिक आहे.
प्रश्न काय? उत्तरे काय?
प्रश्न काय? उत्तरे काय?
<बांगला देशातील हिंदू कधीही सुरक्षित नसणार.> १९७० मध्ये ते असुरक्षित होण्यात अमेरिकेचा मोठा वाटा होता. त्याआधी ब्रिटनचा. हा अमेरिकेचाच वयाने थोरला भाऊ.
किंवदंति
अशा बर्याच किंवदंति आहेत
उदा : WMD
गेल्या दीड वर्षांत बांग्लादेशात जे चाललं आहे, त्यामागे अमेरिकेचा हात आहे, असं भारतात बोललं जातं. म्हणजे बांग्ला देशी हिंदू असुरक्षित होण्याचे कारण पुन्हा अमेरिका.
तोवर अमेरिकेचे नाव घेऊन
तोवर अमेरिकेचे नाव घेऊन शिवीगाळ न करता आपले जे काही धोरण आहे ते खंबीरपणे राबवणे हे भारताचे धोरण उत्तमच आहे.
" अगली बार ट्रम्प सरकार " असा फुकट प्रचार करून ट्रम्पला खांद्यावर घेतले, त्याने कानात अमृत अभिषेक केल्यावर शहाणपण आले. आता अमेरिकेचे नाव घ्यायलाही हिंमत होत नाही डरपोक्याची. आता तर अमेरिकेच्या दबावासमोर झुकून रशियाकडून स्वस्त कच्चे तेलही घेणे बंद केले.
मोदीने बांग्लादेशमधील
मोदीने बांग्लादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराबद्दल ब्र देखील उच्चरला नाहीये. हिंदूंचा तारणहार म्हणे
<बांगला देशातील हिंदू कधीही
<बांगला देशातील हिंदू कधीही सुरक्षित नसणार. त्यांना भारतात आश्रय देणे हाच एक उपाय व्यावाहारिक आहे.> अमेरिकेत द्या.
आधी स्वतः अमेरिकेतून इथे या
आधी स्वतः अमेरिकेतून इथे या आणि मग आपटा
US China Economic and
US China Economic and Security Review Commission च्या वार्षिक अहवालात
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला insurgent attack म्हटलं आहे. insurgent - a person fighting against the government or armed forces of their own country म्हणजे हे दहशतवादी पाकिस्तानी नसून भारतीय होते, असे अमेरिका म्हणते.
त्याचीच री हे महाशय ओढतात. भारत सरकार काय म्हणते याच्याशी यांना देणंघेणं नाही.
म्हणजे अमेरिका आणि हे , दोघेही पाकिस्तानचा यात हात नाही म्हणतात.
याच रिपोर्टमधलं आणखी एक वाक्य Pakistan’s military success over India in its four-day clash show cased Chinese weaponry.
आता तरी वाळूत खुपसलेल्या माना बाहेर काढा. अर्थात तोही अभिनयच असेल. या गोष्टी यांना माहीत नाहीत, असे होणे शक्य नाही.
>>आधी स्वतः अमेरिकेतून इथे या
>>आधी स्वतः अमेरिकेतून इथे या आणि मग आपटा
येऊ हं येऊ. वाट बघा थोडी. सब्र का फल मीठा होता है!
>>
>>
US China Economic and Security Review Commission च्या वार्षिक अहवालात
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला insurgent attack म्हटलं आहे. insurgent - a person fighting against the government or armed forces of their own country म्हणजे हे दहशतवादी पाकिस्तानी नसून भारतीय होते, असे अमेरिका म्हणते.
<<
अमेरिका काय म्हणते आणि चीन काय म्हणते यावरून किती रडारड आदळआपट करा. भारताला ते मान्य नाही हे भारताच्या प्रतिक्रियेवरून सिद्ध झालेले आहे. भारताने आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही. पाकिस्तानवर हल्ले करून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारत कुठल्याही देशाचा मिंधा नाही.
सध्या अमेरिका भारताच्या विरोधात आहे. म्हणून लगेच तावातावाने भारताने अमेरिकेला शिवीगाळ करत सुटावे ही अपेक्षा मूर्खपणाची आहे. शांतपणे आपल्याला हवे ते करत राहाणे हे ह्या परिस्थितीत योग्य भूमिका आहे. जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा अमेरिकेचे धोरण बदलेल ह्याची खात्री आहे.
>>गेल्या दीड वर्षांत
>>गेल्या दीड वर्षांत बांग्लादेशात जे चाललं आहे, त्यामागे अमेरिकेचा हात आहे, असं भारतात बोललं जातं. म्हणजे बांग्ला देशी हिंदू असुरक्षित होण्याचे कारण पुन्हा अमेरिका.
<<
बकवास. बिनबुडाचा दावा. बांगला देशात हिंदू असुरक्षित होण्याचे कारण कट्टर इस्लामी लोकांचा उदय. केवळ इस्लाम.
ढोंगी पुरोगाम्यांना इस्लामला दोष द्यायची हिंमत होत नाही म्हणून अमेरिका, चीन, म्यानमार अशा लोकांवर भुंकणे सुरू!
चिकन मटण भाकरी खाल्लीत काय?
चिकन मटण भाकरी खाल्लीत काय? मस्त लागते.
अमेरिकन नागरिक भारताच्या
अमेरिकन नागरिक भारताच्या भूमिकेबद्दल कशाला बोलताहेत? ती आम्हांला चांगली कळते. त्यांनी अमेरिकेच्या भूमिकेबद्दल बोलावं.
<बकवास. बिनबुडाचा दावा> हे भारतातले उजवेच म्हणताहेत
निवडणुका जिंकण्यासाठी केवळ
निवडणुका जिंकण्यासाठी केवळ विचारधारा पुरेशी नसून संघटनात्मक ताकद वाढवणे तितकेच महत्त्वाचे आहे. जिथे भाजप स्वतःच्या बळावर ५१ टक्के मतांचा टप्पा गाठू शकत नाही, तिथे अन्य पक्षांतील प्रभावी व क्षमतेची माणसे पक्षात घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी एखाद्या पक्षाच्या झेंड्याच्या मागे लोकांची रांग लागरे, तिथेच खरी ताकद असते. त्यामुळे पक्ष वाढवायचा असेल तर माणसे जोडावी लागतात - चंद्रशेखर बावनकुळे.
(ही माणसं कशीही असली तरी चालतात हे अध्याहृत आहे.
<माझं म्हणणं एकच आहे की कारणे कोणतीही असोत. हिंदूहितैषी मतदारांची संख्या वाढत चाललीय. हा कल ४० वर्षे चालू आहे. येणारी प्रत्येक निवडणूकीत हे चालू राहीले आहे. हा नियतीने ठरवलेला कल आहे. भाजपा हिंदूहितैषी भूमिका घेतीय म्हणून तिला फायदा होतोय. त्या विरूध्दची भूमिका घेणाऱ्यांना नुकसान होतंय.> शाम भागवतांच्या या म्हणण्याची बावनकुळ्यांच्या म्हणण्याशी सांगड कशी घालायची? अजित पवारांनी अजूनतरी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली नाही.
---
<नियतीने ठरवलेल्या मार्गाला अनुकूल होतील अशा घटना नियती घडवून आणत असते.>
भाजपच्या मागे हिंदूंनी उभं राहावं म्हणून नियतीने पुलवामा आणि पहलगाम घडवून आणलं. दहशतवादी केवळ निमित्त. आपल्या पौराणिक कथांमध्ये शापित यक्ष गंधर्व राक्षसाच्या वगैरे जन्माला यायचे तसंच. ज्यांचे जिवलग दहशतवादी हल्ल्यांना बळी पडलेत, त्यांनी ती त्यांची नियती होती आणि नियतीचा उद्देश हिंदूसंघटन होता, हे समजून त्यांना हिंदू संघटन यज्ञातील समिधा समजावं.
मनपा निवडणुकीसाठी पक्षांच्या
मनपा निवडणुकीसाठी पक्षांच्या याद्या जाहीर होऊ लागल्यात. आरक्षणामुळे अनेकांची पळापळ झाली आहे. आमच्या बोरिवली दहिसर भागातले भाजपचे उमेदवार पाहिले.
गेल्यावेळी काँग्रेसकडून निवडून आलेल्या श्वेता कोरगावकर भाजपमध्ये गेल्या. त्यांना यावेळी वेगळ्या वॉर्डातून तिकीट मिळालं आहे.
एका प्रभागात तेजस्वी अभिषेक घोसाळकर शिवसेनेच्या नगरसेविका होता. अभिषेक घोसाळकर यांचा फेसबुक लाइव्ह करताना गोळ्या झाडून खून झाला. गोळ्या झाडणार्याने दुसर्या बंद खोलीत जाऊन स्वतःलाही संपवलं म्हणे, तोही नगरसेवक पदासाठी इच्छुक होता.
गाडीखाली श्वान आला तरी माझाच राजीनामा मागतील असं यावर देवाभाऊ म्हणाले होते.
हल्लीच तेजस्वी घोसाळकर भाजप मध्ये गेल्या. त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांना शेजारच्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.
<<
<<
<बकवास. बिनबुडाचा दावा> हे भारतातले उजवेच म्हणताहेत Lol
<<
"काही" उजवे म्हणतायत असे म्हणू शकता. आणि ते चूक असू शकतात.
बांगला देशात तुलनेने जास्त हिंदू आहेत ह्याचे कारण बांगला देशात बांगला अस्मिता आहे जी काही वेळा इस्लामी धर्मपिसाटपणाला झाकोळून टाकते. निदान १९७१ च्या सुमारास झाकोळत होती. परंतु कुठल्याही अधिकांश इस्लामी असणार्या भागात होते तसे इथेही धर्मपिसाट इस्लामी लोकांचा उदय होत आहे आणि त्यातून आम्ही मुस्लिम आहोत ही भावना आम्ही बांगला आहोत ह्यापेक्षा प्रबळ होत आहे. अनेक नवे पक्ष हे केवळ इस्लामी विचारधारेवर आधारित आहेत.
आता नगर परिषदांच्या
आता नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये तीन मोठ्या उमेदवारांत स्पर्धा/ लढती निश्चित.
कारण मविआतून बाहेर पडून १. कॉन्ग्रेस वेगळे उमेदवार उभे करत आहे, २.महायुतीकडून दुसरा, ३.उबाठा+मनसे+ शरद पवार यांचा तिसरा.
मराठी मतदार ( मुंबईत) क्रं. ३ कडे जातील; अमराठी क्रं. २कडे; मुस्लीम मतदार क्रं.१ कडे. ; वंचित क्रं.१ कडे.
इतर ठिकाणी मराठी मतदार क्रं २ कडे, मुस्लीम क्रं. १कडे; वंचित क्रं.१ कडे.;
अर्थात मुख्य लढत महायुती विरुद्ध कॉन्ग्रेस होणार.
कोकणात क्रं २, काहीजण क्रं ३ कडे जातील.
आताच्या बातम्यांनुसार
आताच्या बातम्यांनुसार महायुतीत फूट पडली आहे. शिंदे सेना स्वतंत्रपणे जागा लढवणार आहे. कोकणात निलेशच्या विजयानंतर शिंदेगटाचा आत्मविश्वास वाढला आहे. मतदार त्यांच्याकडेच जातील याची खात्री वाटतेय. उद्धव ठाकरे आणि राज जो प्रचार करताहेत की मुंबई मराठी माणसाकडे राहिली पाहिजे ते लोकांना (मराठी मतदारांना) पटेल आणि ते मतदान मात्र शिंदे सेनेला करतील असा कयास आहे. कोकणात तर उद्धव गटाला मोठी लढाई लढायची आहे. इथेच नाही तर कुठेही नाही अशी परिस्थिती येऊ शकते.
_________________
बोलभिडू चानेलने शरद पवार - गौतम अडाणी मैत्रीवर बराच उजेड पाडला आहे. एकीकडे शरद पवार उद्योगपतींना संभाळताना दिसतात तर दुसरीकडे कॉन्ग्रेसने प्रथितयश उद्योगपतींना धुडकावण्याचे धोरण ठेवले आहे. सत्तेत येण्यासाठी मोठी अडचण ठरू शकते.
भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते
भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते रडताहेत.
भाजपच्या एकनिष्ठ मतदारांची अवस्था तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार, सहन होत नाही सांगता येत नाही, अशी आहे.
हे आमच्या शेजारच्या
हे आमच्या शेजारच्या वॉर्डातलं
आमदार मनिषा चौधरी, उमेदवार तेजस्वी घोसाळकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी व्यासपीठावर बसलेत. कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्तीने थेट माइकवरून सुनावलं
थरारक दृश्ये - भाजप
थरारक दृश्ये - भाजप नगराध्यक्षांनी एबी फॉर्म्स घेऊन पळ काढला. निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांनी मोटारींतून त्यांचा पाठलाग केला
पक्ष तुमच्या बापाचा आहे का?" संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक; सावे आणि कराड यांना घेराव
पक्षशिस्त आणि वचक कुणाचाच
पक्षशिस्त आणि वचक कुणाचाच राहिला नाही. मतदारांनी मत तरी का द्यावे?
पक्षांना स्वतःला कुठे शिस्त
पक्षांना स्वतःला कुठे शिस्त राहिली आहे?
सगळीकडे आवकजावक सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युत्या आणि आघाड्या.
Pages