महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
बलात्कारी, भ्रष्ट, नीच लोकांचे समर्थन करायला अजिबात लाज वाटत नाही का भगवट अन शेंड्यांना?
<<
https://www.thehindu.com/news/national/kerala/who-is-rahul-mamkoottahil-...
भ्रष्ट, बलात्कारी वगैरे लोक सर्व पक्षात आहेत.
पवित्र, शुचिर्भूत, गंगेसारखे निर्मळ वगैरे पक्ष इतिहासजमा झालेत (तसेही पूर्वी देखील असे कुठले पक्ष होते यावरही विश्वास बसत नाहीच).
तेव्हा त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ पाहून त्यांना मत देणे हाच एक पर्याय आहे.
ज्यांना मत देतो त्यांच्यावर मतदार पूर्ण फिदा असतो असे नाही. अनेकदा नाक मुठीत धरून नाईलाजाने मत दिले जाते कारण द्सरी बाजू आणखी वाईट असते.

राज ठाकरे अंबानीवर घसरत नाही फक्त अदाणी वर घसरत आहे. निवडणुकीत यश तर मिळेल का ते ठाऊक नाही निदान या निमित्ताने खंडणी उकळता आली तर घ्यावी असा विचार दिसतोय.

यात मला तर फडण२० पण सहभागी असेल असे वाटत आहे.

अदानीवर हल्ला केला म्हणजे जिंकले का?शरद पवारांना दुखावले जयंत पाटलांसमोर.
मराठी उद्योजकांच्या मालमत्तेचे खळ फटाक. नाशिककरांनी नंतर दूरच ठेवले. का?
अंबानीवर हल्ला केलेले गुपचुप जामनगरला जेवून आले.

खरे सांगायचे तर मला राज वर अजिबात विश्वास वाटत नाही.

भाजपवाल्यांचीच खेळी वाटते ही.

जितका राज बोलतो तेवढी मते त्याच्या विरुद्ध लोकांना पडतात. आता राजने जाहीर च करून टाकले की विरुद्ध वाले ५००० रुपयांचा रेट देत आहेत म्हणून. म्हणजे जाहिरातच केली की थोडक्यात.

शिवाय राज + उद्धव एकत्र करून त्या दोघांना जाणारी एकूण मते लिमिटेड करायचा डाव आहे की काय या भाजप वाल्यांचा?

राज फक्त अदानी वरच का घसरतोय? कारण तर उघड आहे.

आता ज्या ब्यागा पोचतील त्या थोड्या विभागून घेण्याचा तर डाव नाही ना?

की अडाणीच्या उत्कर्षातून भाजपच्या स्थानिकांना लोकांना फार फायदा होत नाही आहे? कारण अमित शहा विरुद्ध खाली काहीतरी शिजत असणारच आहे.

केरळच्या बातमीत म्हटलंय बलात्कराचा आरोप झालेल्या नेत्याला कॉंग्रेसने पक्षातून कढून टाकलं.
भाजपची सरकारे बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहिलेली अनेक वेळा दिसली. उन्नाव प्रकरण पुन्हा ताजे झाले.
बिल्किस बानोच्या बलात्कारी व खुन्यांची शिक्षा माफ केली‌
त्यांना ओवाळलं गेलं.
बलात्कारी बाबा बुवांना वरचेवर पॅरोल दिला जातो.
बदलापूर प्रकरण सांगते की हे आता महाराष्ट्रात पण होते आहे. संजय राठोडवर फडणवीसांनीच आरोप केले होते.
तेव्हा याबाबत सगळे पक्ष सारखेच असं फक्त भाजपायी म्हणू शकतात.
--

वर नार्वेकरांच्या भावाची स़ंपत्ती वाढल्याचे जे समर्थन आले आहे, त्याने हा धागा काढल्याचे सार्थक झाले.

भाजपची सरकारे बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभी राहिलेली अनेक वेळा दिसली. उन्नाव प्रकरण पुन्हा ताजे झाले.>>> सरकारे पाठी उभी राहीली तर राहू देत, पण अग्रभागी राहून (नाक मुठीत घेऊन) हिरीरीने अशांचे समर्थन करणाऱ्या समर्थकांची अशी कोणती असहायता आहे की आणखी काही हा शोधाचा विषय आहे.

असहायता नाही. मनापासून समर्थन. बलात्कार हे शस्त्र, सामर्थ्याची चुणूक असं सगळ्या दमनकारी विचारसरणींत दिसेल. इस्रायल बघा.
लैंगिक विकृतीही. मायबोलीवर सभ्यपणाचा आव आणून लिहावं लागतं.
इतर प्लॅटफॉर्म्सवर हलाला की पैदाइश, आईवरून हिडीस कमे़ंट्स हे फार कॉमन आहे.

https://marathi.abplive.com/news/politics/navi-mumbai-municipal-election...

मतदारांना पैसे वाटतो म्हणून. भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला चोपले.

गेले दोन महिने सातत्याने अशा बातम्या येताहेत. चक्क राणे बंधूंची आपापसात जुंपली होती.

या नूरा कुस्त्या की शिदेसेनेसाठी अस्तित्व टिकवण्याची लढाई?

यावेळेस प्रचाराकरता मराठी सिरीयल्सचा वापर केलेला दिसतोय. "ठरलं तर मग" मधे सीन चेंज होताना मधेच रस्त्याच्या बाजूला लावलेले एकनाथ शिंद्यांचे मोठे बॅनर्स दिसले. इतरांनी हे केले आहे का माहीत नाही. दुसर्‍या एखाद्या सिरीज मधे असेल. आयडिया भारी आहे.

https://www.facebook.com/reel/25519636664312090/
डोंबिवलीत भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांत मा रा मा री.
कारण पैसे वाटप करताना पकडलं.
मायबोलीवरच्या डोंबिवलीकरांना पैसे मिळाले की नाही?

पुण्यात सार्‍यांना मिळताहेत. कोणता पक्ष वाटतोय, कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते वाटताहेत, कोणत्या पक्षाच्या मतदारांना वाटताहेत असा काही भेदभाव नाही. अशा प्रकारचं विश्वबंधुत्त्व पहिल्यांदाच पुण्यात बघायला मिळालं.

एक भावी नगरसेवक तर जाहीर आवाहन करत होते- लक्ष्मी आली, कितीही वेळा आली, कितीही मार्गांनी आली तरी घ्या, परत पाठवू नका.

आमच्या कामवाल्या मावशी म्हणे - त्या, त्यांची सून आणि मुलगी- अशा तिघींमुळून रोज पंधराशे मिळताहेत गेले २ आठवडे. रोज नवीन पक्षाचा प्रचार. रोज नवीन झेंंडे. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. त्या म्हणतात- जनतेचेच पैसे होते हे. का नाकारा?

बायकांचं प्राबल्य आहे रोडशो आणि इतर कँपेन्समध्ये. पुरुष / मुलांना ५०० रुपये + बाटली + बिर्याणी पार्सल असा मेहेनताना लागतो. त्या तुलनेत बाय्कांना ५०० पुरतात. बापड्या दारू पीत नाहीत. पुढल्या निवडणुकांत नक्की पिणार हे सारं बघून..

आज संध्याकाळी ६ नंतर जंगी पार्ट्या चालू आहेत. उद्या बहुतेक संक्रांतीचं छुपं वाणवाटपही होणार.

असंख्य किस्से आहेत. निवडणुकांच्या कथा आणि किस्से, असा बाफ आहे काय?

असंख्य किस्से आहेत. निवडणुकांच्या कथा आणि किस्से, असा बाफ आहे काय?
काढायला हरकत नसावी !

भाजप व शिंदे सेना या दोघांना उबाठा मनापासून संपवायची आहे. शिंदेंना उबाठा परत उभी राहिली तर भविष्य फारसं राहाणार नाही.
तर भाजपाला आपली हिंदू व्होट बॅंक वाढवायची फार मोठी संधी उबाठानी मिळवून दिली आहे.
त्यामुळे शिंदेची मते भाजपाला व भाजपाची मते शिंदेंना परफेक्ट हस्तांतर होणार यात वाद नाही.
परिणामी शिंदेसेना व भाजपाचा स्ट्राईक रेट जबरदस्त असणार आहे.

जर मतदान टक्केवारी वाढली तर अफलातून निकाल येतील असं वाटतंय.

अजूनपर्यंत दोनच खून पडलेत ना या निवडणुकींत?
फडणवीस बिहारमध्ये पुढची छटपूजा मुंबईत करायला या, असं आवतण देऊन आलेत.
बिहारी लोकांना अगदी घरच्यासारखं वाटावं याची गृहमंत्री आणि भाजपनेते म्हणून ते व्यवस्थित काळजी घेताहेत.

मुख्यमंत्री म्हणून खात्यांचा आढावा घेताना पायाभूत सुविधांच्या कामांचे काही प्रकल्प वाढीव खर्चाचे आढळून आले होते. त्यावर विचारविनिमय केल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच सुमारे ४० हजार कोटींचे प्रकल्प रद्द करण्याची कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात दिली. तसेच ‘एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या (यूडीसीपीआर) आधारे जादा चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मुक्तहस्ते दिल्याने काही अडचणी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा फेरआढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

म्हणजे दोन्ही बाबी शिंदेंच्या खात्याशी संबंधित.

शिंदेसेनेला वाटत़य, आणि भाजपवालेही म्हणत आलेत ( २०२९ मध्ये स्वबळावर) की भाजप आता शिंदेसेनेलाही संपवायच्या मागे आहे. ठाकरे पाकिस्तानी आहेत तसे शिंदे काही काळाने बांग्लादेशी होतील.

>>>शिंदेसेनेला वाटत़य, आणि भाजपवालेही म्हणत आलेत ( २०२९ मध्ये स्वबळावर) की भाजप आता शिंदेसेनेलाही संपवायच्या मागे आहे. ठाकरे पाकिस्तानी आहेत तसे शिंदे काही काळाने बांग्लादेशी होतील.>>

असं का करतील? ते एकमेकांच्या वाट्यातला थोडासा लचका तोडायला पाहतील पण ते राजकारणात होणारच. प्रत्येक विभागात कुणी एक स्थानिक नेता प्रभावशाली असतो. आता त्याला तिथेच राहायचे असते. वरती विधानसभेत किंवा लोकसभेत जायचे नसते. तो कोणत्याही पक्षाचा असला तरी तो निवडून येतोच. जागावाटपात एखादी जागा दुसऱ्याला सुटली तरी हा नेता निवडून येतोच. हे कोकणात हल्लीच आपण पाहिले. बाकी शिंदे बांगलादेशी झालेच तर मात्र तिसरा कुणी त्यांची जागा घेईल. संपूर्ण पक्ष बांगलादेशी होणार नाही.
प्रतारणा करणे हे जनता सहन करत नाही.

Lol
फडणवीसांनी अजित पवारांच्या गळ्यात गळा घातला हे दोघांच्याही मतदारांनी लोकसभेत सहन केलं नव्हतं. शिंदेंनी ठाकरेंशी केलेल्या प्रतारणेलाही तेव्हा नाकारलं.
मग विधानसभेत मतदार याद्या, निवडणूक यंत्रणांत योग्य ते बदल झाल्यावर जनतेने आशीर्वाद दिला.
Wink

मला मनपा निवडणुकीत मतदान करता येणार नाहीए. ( आयोगाचा संबंध नाही Wink )
मुंबईत आणि फक्त मुंबईतच वेगळ्या पद्धतीची मतदानयंत्रे आहेत आणि हे कालच जाहीर केलं म्हणे.
इतरत्र vvpat आहे की नाही?

मतदानकेंद्रनिहाय मतदारयाद्यांची संबंधित पानं हाउसिंग सोसायट्यांना देण्यात आली. तीनचार दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीला दिलेल्या यादीनुसार आम्हांला दोन किलोमीटरवरचं केंद्र आलं होतं. हे केंद्हल्यांदाच आलं.
काल बदलून आलेल्या याद्यांत ३००-४०० मीटर्सवरचं केंद्र आलंय. दोन्ही याद्यांतले मतदारांचे फोटो सारखे नाहीत. म्हणजे एकाच मतदाराचा दोन याद्यांतला फोटो वेगवेगळा.
काहींचे फोटोच नाहीत.
एका नातलगाच्या आयोगाच्या साइटवरच्या अनुक्रमांकासमोर मतदानकेंद्रात भलतंच नाव. त्याला मतदान करण्यासाठी भांडण करावं लागलं

आज मला शहराबाहेर असल्यामुळे मतदान करता येणार नाही आहे, पण ते एक कारण झाले. आजवर ८ वेळा चुकीची दुरुस्ती करायला दिली त्यात फक्त २ वेळा चुकीच्या बिल्डिंगचे नाव टाकले आणि इतर ६ वेळा दिलेल्या फॉर्मचे काय झाले माहित नाही. त्यामुळे माझे नाव वेगळ्याच प्रभागात दिसते जरी माझे नाव ज्या बिल्डिंग मध्ये आहे ती माझ्या बिल्डिंग समोरच आहे तरी. आधार आणि निवडणूक कार्ड लिंक करायला दिले तर काय झाले पुढे याचा काही पत्ता नाही. थोडक्यात दर मतदानाच्या वेळी शोधाशोध करायची आणि जाऊन मतदान करायचे असा प्रकार सुरु आहे. या वेळी इच्छाच होत नाही आहे, रोजच्या जीवनातले मुद्दे ज्यावर महानगरपालिकेने काम करणे अपेक्षित आहे ते सोडून बाकी सगळे मुद्दे चघळले गेले आहेत.

महाराष्ट्रात काही ठिकाणी मतदारांच्या बोटाला शाईऐवजी मार्करनी शाई लावली जाते, जी सहज पुसली जाते. चांदी महाग झाल्याने हा निर्णय घेतला की काय अशी शंका येतेय.

आमच्या घरातल्या तिन मतदारांची नावं तीन वेगवेगळ्या केंद्रांवर आहेत.
मुलगा तर इथे नाहीच.
आम्ही दोघं रोज फिरायलाही वेगवेगळ्या दिशांना जातो हे त्यांना कळलं असावं.

(एका नातलगाच्या आयोगाच्या साइटवरच्या अनुक्रमांकासमोर)
याचा अर्थ काय होतो ग्यानेशकुमार?
त्याने केंद्रावरच्या अधिकाऱ्यांनाही ते दाखवलं.

Pages