महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२३ मार्च २०२३ सूरत न्यायालयाने राहुल गांधीला एका खटल्यात दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिली. दुसर्‍याच दिवशी लोकसभा सचिवालयाने त्याची खासदारकी रद्द केली.

२३ डिसेंबर २०२३. नागपूर न्यायालयाने काँग्रेस आमदार सुनील केदार यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवून पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. दुसर्‍याच दिवशी विधानसभा सचिवालयाने त्यांची आमदारकी रद्द केली.

२० फेब्रुवारी २०२५. नाशिक न्यायालयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. विधानसभा सचिवालयाने आधीसारखीच तडफ दाखवून त्यांची आमदारकी रद्द केली का? नाही. त्यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने ५ मार्च रोजी स्थगिती दिली.
काल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून शिक्षा कायम ठेवली. विधानसभा सचिवालयाने त्यांची आमदारकी रद्द केल्याची बातमी अजूनतरी आलेली नाही. उलट सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे हायकोर्टात जात आहेत. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई नाही अशी माहिती समोर आली आहे.

आज कोकाटेंविरोधात अटक वॉरंट निघाले आणि ते कोकाटे रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी आहे.

विधिमंडळात रमी खेळली म्हणून कृषी खाते जाऊन क्रीडा खाते मिळालेले हेच ते मंत्री.

भक्तों , बजाओ टाली. बजाओ थाली.

आपल्या बाजूचे निवडून आलेले लोक प्रतिनिधी त्यांच्याच कर्तृत्वाने अपात्र झाले तरी तरी त्यांना हात लावायचा नाही. विरोधातले निवडूनच येणार नाहीत, हे पाहायचं.

<धनदांडग्यांसमोर पक्षातल्या लोकांचेही काही चालत नाही( कसं चालणार?)> देवाभाऊ सारखा हतबल मुख्यमंत्री नसावा. चोर सोडून संन्याशाच्या पाठी ही म्हण यांना पर्फेक्ट लागू आहे. चोर, दरोडेखोर, खुन्यांचा पाठीराखा आहे हा.
--
ते एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेतल्या ड्रग रॅकेटचं काय प्रकरण?

(येथे निव्वळ भाजप द्वेषाने भरलेल्या पोस्ट पहायला मिळावीत अशी अपेक्षा असणार्यांची क्षमा मागून!)
भाजप आणि मित्रपक्षांनी महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांत जोरदार मुसंडी मारून विजय संपादन केला.
पांचट विनोद करणारे उबाठा आणि त्यांच्या पक्षाचा धुव्वा उडवला.
१२ वाजता उठणारे नकलाकार नेहमीप्रमाणे खातेही उघडू शकले नाहीत.
महानगरपालिकेत काय होणार याची उत्सुकता आहे. १५ जानेवारी ही तारीख आहे असे ऐकतो. फार दिवस उरले नाहीत.
आता विरोधी पक्षांचे इव्हीएम, निवडणुक आयोग, व्होट चोरी वगैरे मुद्दे काढून ऊर बडवून ढसाढसा रडणे वगैरे कार्यक्रम बाकी आहेत.

सगळीच इवीएम मशीने नासली होती?/ महाराष्ट्राने मविआला का नाकारले?
एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकिट दिले तरी मतदार जागा आहे.
बाळासाहेबांनी शिवसैनिकांना सर्वोच्च मानले होते; आणि जनतेनेही. प्रमुख नेते फिरले तरी जनता शिवसेनेच्याच विचाराने राहिली.
बाकी चालू द्या.

अरे वा! उठा उठा! निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत जिथे फिरकत नव्हतो, त्या राजकारणाच्या धाग्यावर तोंड दाखवायची वेळ झाली.

या निवडणुकांत फार मजा आली नाही. म्हणजे भाजप वि. शिंदे सेना अशा कुस्त्या झाल्या. दोघा भावांमध्ये जुंपली. पण मागच्या वेळी कल्याणमध्ये भाजप आमदाराने शिंदेसेनेच्या नेत्यावर पोलिस स्टे शनात गोळ्या झाडल्या होत्या, तसे काही झाले नाही.

बरं. त्या कोकाटेंची आमदारकी रद्द करायची अधिसूचना निघाली का? की विधिमंडळ सचिवालयाला मुहूर्त मिळत नाहीए? कोकाटेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला की त्यांना बिनखात्याचं मंत्री ठेवलंय?

यावरून राहुल आणि सुनील केदारेंसारखी आणखी एक केस आठवली.
लक्षद्वीपचे राकॉचे खासदार मो हम्मद फैजल यांना कर्नाटकातील एका सत्र न्यायालयाने खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात दोषी ठरवून दहा वर्षे कैदेची शिक्षा सुनावली. तारीख ११ जानेवारी २०१३. १३ जानेवारीला लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. ते उच्च न्यायालयाकडे केले. केरळ उच्च न्यायालयाने त्या निकालाला २५ जानेवारी रोजी स्थगिती दिली. तरीही त्यांची खासदारकी रद्द राहिली मग ते सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर २९ मार्च रोजी केरळ उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्यांची खासदारकी पुन्हा बहाल झाली. तोवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची अधिसूचनाही काढली होती. ती स्थगित करावी लागली.

ऑक्टोबर २०२३ मध्ये केरळ न्यायालयाने आपला निर्णय फिरवल्यावर त्यांची खासदारकी पुन्हा रद्द झाली.

दुसरीकडे उत्तर प्रदेशचे भाजप आमदार रामदुलार गोंड यांना १२ डिसेंबर २०२३ रोजी एका जिल्हा सत्र न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली २५ वर्षे तुरुंगवासाची सजा सुनावली. त्यांची आमदारकी रद्द व्हायला २३ डिसेंबर उगवला. म्हणजे कोकाटेंपेक्षा लवकरच झालं.

आपले सभापती राहुल नार्वेकर अत्यंत अभ्यासू असल्याने पूर्ण अभ्यास करूनच निर्णय घेत असतील.

बाकी चालू द्या.

भाजप खेडोपाडी पोहोचायला लागलीय. एकूण जागांच्या ४८%जागा मिळाल्या आहेत. मागच्या वेळेस २४% जागा मिळाल्या होत्या. भाजप खूपच सशक्त झालाय. मुमं फडणवीस सुध्दा सहकारी पक्षांना सांभाळून आपली ताकद वाढवताहेत. ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे. धुरंदर राजकारणी असल्याचं जाणवतंय.

अजूनही भाजप विरोधक फक्त आरोप करत राहण्यातच धन्यता मानताहेत. लोकसंग्रहासाठी काही करताना दिसत नाहीयेत.
अजून मतदान टक्केवारी कळलेली नसल्याने नक्की सांगता येत नसलं तरी हिदूत्वाला मत वाढत असल्याचा कल अबाधीत राहिल्याचं जाणवतंय.
त्यामुळे १६ जानेवारीला शरद पवार गट, उबाठा व आता मनसे यांची पाळेमुळे खणली जाणार असं वाटायला लागलंय.

दुसर्‍या धाग्यावर शाम भागवतांनी लिहिलं होतं -
दुसरी शक्यता म्हणजे पहलगाम इफेक्ट. बांगलादेशातील हिंदूवर झालेल्या हल्यामुळे जसा महाराष्ट्राच्या मतदानावर परिणाम झाला तसाच परिणाम बिहारमधे दिसायची शक्यता आहे. तसे झाले तर कॉंग्रेस व तेजस्वी हे दोघेही एकत्रीत ५० पेक्षा कमी आमदारांचे धनी होतील.

आता सुद्धा बांग्लादेशात एका हिंदूचे मॉब लिंचिंग झाले. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला यश मिळाले. शिवाय पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरचा आफ्टर इफेक्ट आहेच. मतदार सगळं बरोबर लक्षात ठेवतात.

बरं. ते पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतले काही लोक मारले गेले होते. त्या व्हॅलीपर्यंत दह शतवादी कसे पोचले, तिथे एकही सुरक्षाकर्मी का नव्हता, असे प्रश्न डोंबिवलीकरांना पडले का? की झाला दहशतवादी हल्ला. हिंदूंना धर्म विचारले मारले. करा भाजपला आणखी मजबूत असा साधा सोपा फंडा आहे?

>>
बरं . ते पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतले काही लोक मारले गेले होते. त्या व्हॅलीपर्यंत दह शतवादी कसे पोचले, तिथे एकही सुरक्षाकर्मी का नव्हता, असे प्रश्न डोंबिवलीकरांना पडले का?
<<
कदाचित असा प्रश्न पडला असेल की जर काही काळ प्रत्येक इन्चावर एक सुरक्षा अधिकारी इतका कडेकोट बंदोबस्त नसेल, किंचितही ढिलाई असेल तर लगेच इस्लामी दहशतवादी लांडगे लचके तोडायला का सरसावतात?
कश्मीरी लोक ढोंगीपणा करून टुरिस्ट लोक आमचे अ तिथी आहेत वगैरे गहिवरून बोलतात ते खोटे आहे. त्यांच्यातीलच अ तिरेकी लांडगे संधी मिळेल तिथे हल्ले करून दर वेळी काहीतरी नवे भयानक कृत्य करतात. असे का? त्यांना आपल्या भाईबंदांच्या उपजीविकेला महत्त्व द्यावेसे का वाटत नाही? धर्मासाठी आपले भाईजानाची रोजीरोटी हरपली तरी बिघडत नाही अशी आसुरी दुश्मनी का आहे? असे प्रश्न पडत असतील.
थोडक्यात, मोदी भाजप हेच असल्या भयानक दहशतवादी हल्ल्यापासुन आपल्याला वाचवू शकतात असे उत्तर त्यांनी शोधले असेल.

पण ते दहशतवादी तर ट्रंपतात्यांच्या लाडक्या पाकिस्तानातून आले होते ना?

>>पण ते दहशतवादी तर ट्रंपतात्यांच्या लाडक्या पाकिस्तानातून आले होते ना?
नाही. ते शांतिदूत कश्मीरचेच रहिवासी होते. पाकिस्तानने शस्त्रे, प्रशिक्षण आणि अन्य सामग्री पुरवली असे वाटते.
अर्थात ह्या शांतिदूतांना पहारा ढिला पडला रे पडला की निरपराध टुरिस्ट शोधून, वेचून वेचून ठार मारावे अशी प्रेरणा कोण देते बरे? ट्रंप? पाकिस्तान की इस्लाम?

https://www.newsonair.gov.in/nia-files-chargesheet-in-pahalgam-terror-at...

The chargesheet identifies three Pakistani terrorists, Faisal Jatt alias Suleman Shah, Habeeb Tahir alias Jibran, and Hamza Afghani, who carried out the killings on religious lines

ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी होते ना?

या दहशतवाद्यांचा धोका आहे हे माहीत असताना सुरक्षा व्यवस्था ढिली का होती? तुम्ही इंचाइंचावर लिहिलंय. त्या अख्ख्या पठारावर एकही सुरक्षाकर्मी नव्हता. वर ती व्हॅली सुरक्षायंत्रणेला न सांगताच पर्यटकांसाठी खुली केली अशी माहिती ग्रेप व्हाइनद्वारा पसरवली गेली.

माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.कोकाटेंची स्थगितीची मागणी न्यायालयाने मान्य केली असून राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान माणिकराव कोकाटेंची आमदारकी काढून घेतली जाणार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मात्र, असं असलं तरी यादरम्यान कोकाटेंना कोणतंही मंत्रीपद, महामंडळाचं प्रमुखपद किंवा इतर कोणतंही अधिकारपद भूषवता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

चला. बरं झालं. आता ते ऑनलाइन रमी खेळू शकतील.

>>
या दहशतवाद्यांचा धोका आहे हे माहीत असताना सुरक्षा व्यवस्था ढिली का होती? तुम्ही इंचाइंचावर लिहिलंय. त्या अख्ख्या पठारावर एकही सुरक्षाकर्मी नव्हता. वर ती व्हॅली सुरक्षायंत्रणेला न सांगताच पर्यटकांसाठी खुली केली अशी माहिती ग्रेप व्हाइनद्वारा पसरवली गेली.
<<
पण पहारा ढिला पडताच काफीरांच्या कत्तलीचा परवाना मिळतो असे कश्मीरी अ तिरेकी का समजतात ?
जर कश्मीरी लोक इतके अ तिथ्यशील, प्रेमळ आहेत, टुरिस्ट म्हणजे जणू त्यांचे मायबाप आहेत तर अशा प्रकारे क्रूर खून करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
आणि ह्यातून काय बोध घेणार? कितीही नाटके केली तरी कश्मीरी लोक आतून कट्टर इस्लामी आहेत आणि संधी मिळताच ते आपल्या नरडीचा घोट घेणार. आणि असे करण्याची प्रेरणा इस्लाम देत असेल तर बाकी देशातले मुस्लिमही असेच वागू शकतात. अशा लोकांपासून कोण वाचवू शकेल तर (सध्यातरी )मोदी आणि त्यांचा भाजप.

सुरक्षा यंत्रणेला प्रत्येक वेळी यशस्वी व्हावे लागते. अ तिरेक्यांना एकदा यश मिळाले तरी पुरते. अशी ही अन फेअर फाईट आहे!
हा घिसा पिटा डायलॉग इथे लागू आहे.

ऑपरेशन सिंदूर थांबवावे लागल्यावर मोदी आणि भाजप ट्रंपतात्यांचे नाव घ्यायला लाजत होते. इथे हे पाकिस्तानचे नाव घ्यायला लाजतात.

>>ट्रंपचा लाडका पाकिस्तान सेक्युलर आहे की इस्लामी राष्ट्र?
पाकिस्तान निर्मिती कशाच्या आधारावर झाली होती? सेकुलर विचार की इस्लामी विचार ?
ट्रंपचा लाडका वगैरे भ्रम आहे. सोयीची राजकीय समीकरणे म्हणून पाकला जवळ करत आहे तो. भारतावर दबाव यावा म्हणून. रशिया युक्रेन युद्धात भारत रशियाच्या बाजूने जाताना दिसतो आहे म्हणून केलेली खेळी आहे. ट्रंपला इस्लामी तत्त्वज्ञानाबद्दल काडीचेही ममत्व नाही. गरज सरताच तो पाकला खड्यासारखे बाजूला सारणार. तोवर पुरोगाम्यांनी ट्रंपचा लाडका पाकिस्तान हा जप करत रहावे!

निकालानंतर बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. मविआवरचा विश्वास उडाला आणि त्याचा फायदा इतरांना झाला. इतर काही नेक कामं करताहेत का हा मुद्दा बाजुलाच पडला.

काश्मिरात अतिरेकी (ते पाकिस्तानी होते म्हणे, म्हणून सिंदूर वगैरे घडवलं) असतात हे माहीत असताना सुरक्षा व्यवस्था न ठेवणं ही मोदीची हिंदूंना वाचवण्याची नीती असावी. जय मोदी, जय भाजप!

माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.कोकाटेंची स्थगितीची मागणी न्यायालयाने मान्य केली असून राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान माणिकराव कोकाटेंची आमदारकी काढून घेतली जाणार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. >>> कितीही वर्षांपूर्वी घर लाटण्याकरता केलेली कृती ही चुकीचीच होती आणि त्याला आमदारकी रद्द ना करणे आणि कुठलेही पद न भूषवणे अशी सौम्य शिक्षा असू शकत नाही. कारण गुन्हा घडल्यानंतरच्या कित्येक वर्षात सगळे लाभ आणि पदे भूषवली आहेत. कुठल्या विवेकबुध्दीने न्यायालयाने हा निर्णय दिला हे अनाकलनीय आहे.

मविआ पिढीजात भाजप- जनसंघ मतदारांची निराशा कशी करेल?
भाजप आणि महायुतीचा कारभार उत्तम आहे, म्हणून त्यांना जनतेने निवडून दिलं असं लिहायला हवं ना? Wink
---
अमेरिका कायम पाकिस्तान धार्जिणी आहे. १९७०-७१ मध्ये तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात हिंदूंचा वंशसंहार होत असताना अमेरिका पाकिस्तानच्या पाठी ठामपणे उभी होती. आणि इस्लामला विरोध वगैरे म्हणजे आपल्याच चष्म्यातून ट्रंपकडे पाहणे. अमेरिकेने अफगाणिस्तान तालिबानला सोपवला. स्वतःच ज्याला दहशतवादी म्हटले अशा सिरियन नेत्याला जवळ केलं.

पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळी तात्या पाकिस्तानसोबत होते, ये याद रख्खा जाएगा. इथेही त्यांचे भक्त पहलगामसाठी पाकिस्तानला सरळ दोष देत नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारताच्या चौकशी यंत्रणांनी ते पाकिस्तानी अ तिरेकी होते असे म्हटल्यावरही हे नाकारतात.

ये रिश्ता क्या कहलाता है?

रशिया भारताचा जुना मित्र आहे. जसे ट्रंप आर्थिक हित बघतात, तसे भारताने पाहिले तर बिघडले कुठे?

असो. हे विषय या धाग्याशी संबंधित नाहीत. भागवतांनी प्रत्येक मतदानाचा संबंध हिंदू खतरे में सोबत जोडला म्हणून हे सगळं इथे आलं.

तर येथे जमलेल्या माझ्या बंधुनो,भगिनीनों आणि रसिक श्रोतेहो आता तुम्हाला ऐकवण्यात येत आहे त्या कॅसेटचं नाव आहे पहलगाम हल्ला. तुम्ही सगळे मंत्रमुग्ध झाला आहात पण थांबा पुढची कॅसेट आहे ‘हल्ला घडवला भाजपने’ ती कॅसेट ऐकून तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता आहे. कुठेही जाऊ नका सबको मजा आना चाहिये.

भागवतांनी प्रत्येक मतदानाचा संबंध हिंदू खतरे में सोबत जोडला म्हणून हे सगळं इथे आलं.>>

काहीही Happy

माझं म्हणणं एकच आहे की कारणे कोणतीही असोत. हिंदूहितैषी मतदारांची संख्या वाढत चाललीय. हा कल ४० वर्षे चालू आहे. येणारी प्रत्येक निवडणूकीत हे चालू राहीले आहे. हा नियतीने ठरवलेला कल आहे. भाजपा हिंदूहितैषी भूमिका घेतीय म्हणून तिला फायदा होतोय. त्या विरूध्दची भूमिका घेणाऱ्यांना नुकसान होतंय.

हेच नगरपालिकांच्या निकालात दिसले आहे व १६ जानेवारीला दिसणार आहे.
हे सगळे मतदान टक्केवारीवरून मी मांडत आलोय. कोणी पक्ष बदलले, कोण वॉशींगमधून आला वगैरे बाबत मला रस नाही. नियतीने ठरवलेल्या मार्गाला अनुकूल होतील अशा घटना नियती घडवून आणत असते.

Pages