Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे अदृश्य शक्तीच्या सांगण्यावरून शिवसेना फोडायच्या उद्योगाला लागले. आता हे शिंदे ठाकरेंचेच होते. तसेच ते वाझेही ठाकरेंचेच. त्यांच्याशीही तेव्हाच अदृश्य शक्तीने वेशांतर करून संपर्क साधला नसेल कशावरून?
अँटिलाच्या बाहेर जिलेटिनच्या काड्या ठेवण्यामागचं आणि मनसुख हिरेनला मारण्यामागचं मोटिव्ह काय होतं?
या प्रकरणी फडणवीसांनी (विधानसभेत ?) भाषण करताना सचिन वाझेचाच या प्रकरणाशी संबंध आहे हे अगदी स्वतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यासारखं वर्णन करून सांगितलं होतं.
तेव्हा सचिन वाझे अडचणीत आला होता की कोणी त्याला चक्रव्यूहात पाठवलं होतं?
सुशांतसिंग प्रकरणात ५०-६० थियरीज आहेत - सलमान खान , रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे. त्यात एक थियरी हेही ठाकरे सरकार अस्थिर करण्यासाठी घडवून आणलं अशी एक थियरी मांडायला काय हरकत आहे?
पालघर साधूंबद्दल बोलताना
पालघर साधूंबद्दल बोलताना आमदार राम कदम किती भावुक झाले होते , बघा.
https://youtu.be/mUwX95okvj4?si=0dMRSPgQSLcbZnrn
या प्रकरणाच्या चौकशीबाबतही गंमतीजमती आहेत. जरा वेळाने लिहितो
भाजपच्या नव्या बनपावाने
भाजपच्या नव्या बनपावाने काशीनाथजी चौधरी ह्यांचा पक्षप्रवेश स्थगित केल्याची माहिती दिली. मामा राजवाडे आणि बागुल च्या बाबतीत हेच केले आणि नंतर प्रवेश दिला. दोघेही आज तुरुंगात आहेत
इतर सर्व पटले पण वाझे बाबत
इतर सर्व पटले पण वाझे बाबत मात्र I will have to respectfully disagree.
हे पाप मविआ आघाडीचेच आहे. मुळात परमबिरसिंग यांना मुंबईचे कमिशनर म्हणून आणायलाच नको होते, रिबेरो यांनी तर तेव्हाच इशारा दिला होता.
पालघर साधू प्रकरणी काँग्रेस
पालघर साधू प्रकरणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ऑक्टोबर अखेरीस एक पत्रकार परिषद घेतली होती . तिथे मांडलेले मुद्दे
पालघरमधील साधूंच्या दुर्दैवी हत्येचा तपास मविआ सरकारने केला होता. ही हत्या मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे गैरसमजातून झाली हे स्पष्ट होते. मरण्यापूर्वी स्वतः साधूंनी त्यांना जमाव चोर समजत आहे हे पोलिसांना सांगितले हे प्रथम तपासणी अहवालात स्पष्ट नमूद आहे. गडचिंचले गावात दहा वर्षे भाजपा ची सत्ता असून आरोपींमध्ये काही भाजपाचे कार्यकर्ते होते असे असूनही भाजपाने मात्र या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी यामागे मोठे कारस्थान असल्याचा बोभाटा केला होता. मविआचे सरकार अनैतिक पद्धतीने घालवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ही केस सीबीआय ला सोपवली. धर्मवीर २ चित्रपटात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ही घटना कारणीभूत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
याच अनुषंगाने महायुती सरकारने ११ ऑक्टोबर २०२२ रोजी हे प्रकरण सीबीआयकडे देत असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले. परंतु त्यानंतर जवळपास चौदा महिन्याच्या कालावधीनंतर ६ फेब्रुवारी २०२४ ला सरकारने त्याचा आदेश काढला. या आदेशान्वये तपास करावयाची कलमे चुकीची असल्याचा साक्षात्कार राज्य सरकारला त्यानंतर अजून सव्वा वर्षानंतर झाला. २२ मे २०२५ रोजी मुळ आदेशाचे शुद्धीपत्रक काढून कलमे बदलण्यात आली आणि या आदेश व शुध्दी पत्रकान्वये ८ ऑगस्ट २०२५ ला केंद्र सरकारने सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आले. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सीबीआयने पालघर मधील कासा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेले तीन एफआयआर पुन्हा नोंदवले. सरकारने सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात तीन वर्षे एवढा वेळकाढूपणा का केला, असा प्रश्न उपस्थित करून पालघर हत्या प्रकरणाची राजकीय गरज संपली आहे का, धर्मवीर -२ याचे उत्तर देतील का?
आपापल्या पार्टीचे समर्थक
आपापल्या पार्टीचे समर्थक सध्या आपापल्या नेत्यांना माफ करण्यात, चालवून घेण्यात, त्यांच्या भानगडींना विसरण्याचा मागे लागले आहेत.
राजकारणाचा चिखल म्हणजे यंदा
राजकारणाचा चिखल म्हणजे यंदा होऊ घातलेल्या स्था.स्व. संस्थांच्या निवडणुका! कणकवलीमध्ये राणे कुटुंबियांना हरविण्यासाठी ठाकरे-शिंदे सोबत. तिथे शहाजी बापूला हरवायला भाजप-उबाठा-राकॉ-कॉ एकत्र. असं विचित्र चित्र महाराष्ट्र भर दिसतंय किंवा दिसेल.
हॉलोवीन पार्टीत पालघर साधूचा
हॉलोवीन पार्टीत पालघर साधूचा वेष परिधान केलेला अमृता फडणवीस यांच्या वडिलांचा फोटो १०० % खरा आहे ?
शिवसेना आणि राष्ट्रवादी
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून झाले. काँग्रेसमधले अनेक नेते आपलेसे केले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने शिंदेसेनेतलेच नेते पळवायला सुरुवात केली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची बातमी आहे. एकटे शिंदेच हजर होते. हे सगळे मंत्री निवडणुकीच्या कामासाठी आपापल्या मतदारसंघात आहेत इति बावनकुळे.
पार्थ पवार प्रकरणात स्वतः महसूल मंत्री बावनकुळेंनीच स्टँप ड्युटी कशी लागते असा प्रश्न आपल्याच अधिकार्यांना विचारला.
दुसरीकडे बहुधा मनसेसोबत आघाडी तत्त्वांत बसत नसल्याने काँग्रेस मुंबई मनपा निवडणूकीत आघाडी करणार नाही.
पण मी काय करू? काय करू मी
पण मी काय करू? काय करू मी सांगा तुम्ही.
भाजपाचा कॉंग्रेस होऊ लागला
भाजपाचा कॉंग्रेस होऊ लागला आहे.
आता स्थानिक स्वराज्य
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने शिंदेसेनेतलेच नेते पळवायला सुरुवात केली. >>> आमच्या एरीयातले आणि आमच्या आसपासच्या एरीयातले दिसतायेत हे सर्व, मी आत्ता बघितलं. आमचे नगरसेवक मागच्यावेळी कॉँग्रेसमधून भाजपत आलेले, भाजपतर्फे निवडून आले. मग शिंदेसेनेत गेले दोन वर्षांपूर्वी. आता परत भाजपत. आम्हा दोघांचे नाव भलत्याच एरियात आहे (घोळ दुसरं काय) त्यामुळे मतदान केलं नव्हतं. यावेळी पत्ता बदल केलाय, नवऱ्याचा बदलून आला पण माझा नाही. आमच्या एरियातली कामं केली मात्र त्यांनी. त्याआधी सेनेचे यायचे, ते ही काम करणारे होते.
मागच्यावेळी भावाच्या एरियात भाजप उमेदवार फक्त दोन मतांनी आलेला . सेनेचा उमेदवार काम करणारा, एरियात सर्वांना जाऊन भेटणारा होता. त्यामुळे सर्वांनी अगदी भाजप वाल्यांनीही सेनेला दिलेली मतं. ती फॅमिली अगदी विधानसभा निवडणुकीपर्यंत उद्धव यांच्याशी निष्ठावंत होती, खरंतर बरेच वर्ष होती, माझे मामेआजोबाही त्यांच्याबरोबर उद्धव यांचे कार्यकर्ते होते, अगदी निष्ठावंत अर्थात त्यांना म्हणजे आजोबांना कुठल्याही पदाची कधीच अपेक्षा नव्हती, त्यांनी फक्त काम केलं आणि दुर्दवाने ते आता या जगात नाहीत (ते विधानसभा निवडणुकीच्या खूप आधी गेले, आमच्याकडे बहुतेकजण भाजपवाले असताना हे मात्र कट्टर शिवसैनिक होते) . विधानसभेला मात्र त्या फॅमिलीत तिकीट न देता शिंदे गटातून ऐनवेळी आलेल्याला दिलं गेलं (शिंदे गटात जायच्या आधी उद्धव गटात, त्याआधी बहुतेक राष्ट्रवादीत होता हा उमेदवार). त्यामुळे त्यांनी उद्धव गट सोडला आणि शिंदे गटात गेले. ज्याला विधानसभेला तिकीट दिलं उद्धव यांनी, त्याने यावेळी त्यांना सोडलं आणि भाजपत गेला.
भाजपचे मूळ समर्थक एकच
भाजपचे मूळ समर्थक एकच प्याल्यातल्या सिंधूसारखे आहेत. नवरा कसाही वागू लागला तरी कशी या त्यजू पदाला? नवरा अट्टल दारुडा झाला, त्याच्यामुळे पोटचं पोर मेलं तरी त्याचा दोष तळीरामाला.
उद्या भाजपने पहलगामच्या दहशतवाद्यांना पक्षात घेतलं आणि डोंबिवलीतून उभं केलं तरी हे त्याला मत देतील.
अंजू, हे तुम्हांला उद्देशून नाही. तुम्ही भाजपच्या खटकलेल्या गोष्टींबद्दल किमान इथे लिहिता तरी!
सावंतवाडीहून भाजपने
सावंतवाडीहून भाजपने नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धा सावंत भोसले यांना तिकीट दिलं. त्यांचे आजेसासरे भाजपचे आमदार होते आणि पती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
भाजपचा घराणेशाहीला विरोध आहे.*
* अटी लागू.- घराण्याचे नाव गांधी नेहरू , यादव, असे काही असेल तरच विरोध.
सावंतवाडीहून भाजपने
सावंतवाडीहून भाजपने नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धा सावंत भोसले यांना तिकीट दिलं. >> त्या बाई क्सलं भयानक मराठी बोलतात (क.हा.मा.बा)
भाजपचा घराणेशाहीवर आरोप, पण
भाजपचा घराणेशाहीवर आरोप, पण नांदेडमध्ये एकाच घरात सहा जणांना उमेदवारी
त्या बाई मूळच्या गुजराती आहेत
त्या बाई मूळच्या गुजराती आहेत म्हणे.
भाजपचा घराणेशाहीवर आरोप
त्या बाई क्सलं भयानक मराठी
त्या बाई क्सलं भयानक मराठी बोलतात
>>
हो. बघितला तिचा व्हिडिओ.
त्यांचा म्हणा.
त्यांचा म्हणा. राजघराण्यातल्या आहेत.
(No subject)
भरत असं अगदीच नाहीये
भरत असं अगदीच नाहीये सिंधुसारखं, मी सहमत नाही यावर. वर मी एक उदाहरण दिलेलं, भावाच्या एरीयात बहुतेक सगळ्यांनी भाजपला मत दिलं नव्हतं कारण एकतर उमेदवार पसंत नव्हता, संघाच्या कोणा कार्यकर्त्याला तिकीट द्यावं अशी मागणी होती, ते ऐकलं नव्हतं. नाहीतर त्या एरीयात भाजप उमेदवार जेमतेम दोन मतांनी निवडून नाही येत. भरघोस मतांनी येतो, सेनेचा उमेदवार खरंच काम करणारा होता. हि दोन्ही कारणं होती. लोकल लेव्हलवर लोकं विचार नाही, कृती करुन दाखवतात. ती दोन मतांची नामुष्कीच होती.
क्रिकेट बोर्डावर आव्हाड निवड आणि साधु प्रकरणातल्या त्याला घेणं ह्यावर बऱ्याच भाजपच्या लोकांनी सो मि वर टीका केली. आय टी सेल वगैरे मी वाचत नाही. अर्थात मी कोणालाच फॉलो करत नाही पण फेसबुकवर समोर हल्ली येतात पोस्ट तेव्हा मला टीका समजली.
आमच्या ईस्ट एरियात भाजप, सेना, मनसे यांचाच जोर असतो. वेस्टला कॉँग्रेस होतं थोडंफार, तिथली सगळीही आत्ता भाजपकडे गेली.
यामुळे मूळ भाजप ज्यांनी रुजवली, वाढवली, झोकून काम केलं त्या लोकांवर अन्याय होणार का तर हो नक्कीच होतो अन्याय, असं मला वाटतं. माझं नाव अगदीच लांबच्या मतदारसंघात टाकलंय, काही संबंध नाहीये, त्यामुळे मी जात नाही वोटिंग करायला. नाव इथे आलं तर विचार करेन, नाहीतर नोटा आहेच. बाकी दुसऱ्या एरियात नाव आहे त्याचा फरक लोकसभा, विधानसभेला पडत नाही, फक्त लोकल लेवल वर पडतो.
दुसरीकडे एक वाटतं की भाजपची लोकं इथे तिथे जात नाहीत. निवडून येत नव्हते तरी पक्षाशी एकनिष्ठ राहिले. बाकी लोकं जे निवडून येतात तिथे जातात, कारण काही असो. अर्थात म्हणून भाजपने आयतोबाना तिकीट देणं, दुसरीकडून आलेल्याना पदे देणं सुरू ठेवलं आहे त्याबद्दल लोकांनी नक्कीच आवाज उठवायला हवा आहे . उद्या भाजप तिकिटावर मुळ तिथले नसलेले, मुख्यमंत्रीही होतील.
आसाम मध्ये झालेत की, आयात
आसाम मध्ये झालेत की, आयात केलेले मुख्यमंत्री
इथे नको व्हायला.
इथे नको व्हायला.
अन्जू, ते तुम्हांला उद्देशून
अन्जू, ते तुम्हांला उद्देशून नाही, हे मी आधीच लिहिलंय.
--
लोकसत्तेच्या बातमीत म्हटलंय की मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना शिंदेसेनेचे मंत्री मंत्रालयातल्याच अन्य एका दालनात बसून होते. आपले कार्यकर्ते , माजी नगरसेवक पळवणे आणि आपल्या खात्यांना निधी न मिळणे या त्यांच्या तक्रारी आहेत. ते फडणवीसांना भेटले तर कार्यकर्ते पळवायला तुम्हीच आधी सुरुवात केली असा त्यांनाच उलट दम मिळाला.
डोंबिवलीत अतिरेकी आलेत? कधी
डोंबिवलीत अतिरेकी आलेत? कधी आले? कुठे आहेत अतिरेकी? मी पकडायला जातोय त्यांना. भरत सर पकडून पोलिसांकडे देऊ काय की तुमच्याकडे आणू? तुम्ही द्या मग त्याना शिक्षा.
अन्जू, ते तुम्हांला उद्देशून
अन्जू, ते तुम्हांला उद्देशून नाही, हे मी आधीच लिहिलंय. >>> हो हो. ते मी वाचलं होतं.
https://www.loksatta.com
अग्रलेख : पुराण पक्षफोडकांचे.. (लोकसत्ता)
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/maharashtra-politics-socia...
शिंदेचा हातच के पण सगळेच
शिंदेचा हातच के पण सगळेच दगडाखाली आहे. फडणवीसने इशारा केला की उदय सामंत 20-25 आमदार घेऊन भाजपमध्ये उडी मारेल बघा
लोकांनी भाजपा महायुतीला मतदान
लोकांनी भाजपा महायुतीला मतदान केले तर मराठी माणूस मुंबईचा महापौर करेल हे खात्रीने सांगू शकते का असा प्रश्न आशिष शेलार यांना विचारला गेला. त्यावर शेलार म्हणाले की, बिल्कुल मुंबईचा महापौर हिंदू होणारच, भाजपाचा महापौर हिंदू असेल त्यावर पत्रकाराने मराठी माणूस होईल का असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा मराठी आणि हिंदू वेगळा आहे का असा प्रतिप्रश्न शेलारांनी विचारला. परप्रांतीय भूमिकेला आम्ही मान्यता देत नाही. मुंबई मराठी माणसाची आहे आणि मुंबईत काम करणारा मुंबईकर आहे. त्यामुळे हिंदू महापौर बनेल असं सांगत त्यांनी मराठी माणूस हा उल्लेख टाळण्याचा प्रयत्न केला.

--
एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार घेऊन गेलेत की महाराष्ट्र भाजप विशेषतः रवींद्र चव्हाण पैसे देऊन आमचे नगरसेवक व स्थानिक नेते फोडत आहेत. # पन्नास खोके नॉट ओके?
--
काय हाटिल काय डोंगर काय झाडी फेम शहाजी बापू पाटील काय म्हणतात बघा
जनप्रतिनिधी - विशेषतः आमदार
जनप्रतिनिधी - विशेषतः आमदार , खासदार तुमच्या कार्यालयात येतील तेव्हा उठून उभे राहावे, त्यांच्याशी नम्रपणे वागावे इ. सूचना असलेला जी आर महाराष्ट्र शासनाने काढला आहे.
Pages