तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Shiddat title track
सध्या वेड्यासारखे ऐकत आहे

https://youtu.be/iSo9l950QLo?si=t7cA2PA58PPOyEqa

छूटे कभी ना.. वो आदत बना लू... आ शिद्दत बना लू तुझे..

आणि दरवेळी ही लाईन मोठ्याने गातो Happy

सध्या डोक्यात संत तुकडोजी महाराज कविता आणि गाणं.

सहावीत त्यांची एक कविता होती ती खूप आवडते मला.

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या.

दुसरं गाणं

मनी नाही भाव रं, अन देवा मला पाव रं.

नुकताच फकीरीयत हा हिंदी चित्रपट बघितला. त्यातली दोन गाणी खूप आवडली, तिच सध्या ऐकतेय. तिसरं गाणं विशेष लक्षात नाही राहीलं. अजून एक गाणं आहे, एकंदरीत चार आहेत पण ही दोन खूप आवडली.

https://www.youtube.com/watch?v=vH_xol_09LM&list=RDvH_xol_09LM&start_rad...

गुरु मै तेरे शरण, पुज्य तेरे चरण, तू दर्सन दे.

https://www.youtube.com/watch?v=H3JrJCthra0&list=RDH3JrJCthra0&start_rad...

इतना गुरुर मत कर.

हे अजून एक धमाल ट्रेंडींग गाणं रिपीट वर वाजतंय
झट पट पटा पट
https://youtu.be/enYwcT6hjLQ?si=fL3r019xJXk6RQCC
संदर्भ हा रील https://youtube.com/shorts/KKKByVVwjDU?si=IPAqLF6WnE4jo3S5
सोशल मीडियामध्ये आणि युट्युब वर ऍक्टिव्ह असणार्यासाठी डॅनी पंडित हे नाव नवीन नाही. हा एक यंगस्टर मध्ये फेमस कॉटेंट क्रियेटर आहे ऍक्टर आहे . वरचं गाणं हे रील फेमस झाल्यावर त्यावर काढलंय जसं यशराज मुखाते ने "रसोडेमे कोन था" बनविलेले त्याचप्रमाणे हेही गाणं मस्त जमून आलंय.

याचं ओरिजनल रील वाल्या दादांना क्रेडिट दिलंच पाहिजे हे ते रील https://youtube.com/shorts/5iT1X2oJu6s?si=5SgyHZ0Ge1ts9lcK

झटपट पटापट गाणे रील वर ऐकले होते. ओरिजनल गाणे शोधायला गेलो नव्हतो. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. डीजे वर नाचायला छान ठेका आहे.

'धुरंधर' मधले "ना तों कारवां की तलाश हैं" ह्या माझ्या खूप आवडत्या जुन्या गाण्याचे 'इश्क जलाकर' हे फ्युजन/रिमिक्स्ड व्हर्जन आठ-दहा दिवसांपूर्वी ऐकण्यात आले होते, परंतु काल संध्याकाळी हा चित्रपट पाहिल्यावर मात्र हे गाणे एवढे आवडले आहे की कालपासून त्याची नशा उतरायचे नावच घेत नाहीये 😀 आज हे गाणं रिपीट मोडवर किमान १२-१५ वेळातरी ऐकले असेल!

रुपेरी वाळूत
https://youtu.be/nZaDmhlMBOE?si=lWz_mlr8T-lH-RF5 गायक-अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव

अभिजित चं नवं गाणं .छान आहे आणि याच पिच्चराइजेशनही खूप फ्रेश आणि सुंदर आहे. गौतमी पण आवडली या गाण्यात.

https://youtu.be/lM8h5Mm6ODo?si=lW7GEnHdr7UHy0XJ
आज रजनीकांत 75 वर्षांचा झाला (रजनीकांत किंवा कुठल्याही ऍक्टरला एकेरी नावाने संबोधतो आपण त्यात आदराची भावना आहेच पण आपण बोलतों ना मस्त ऍक्टिग केली अमिताभ ने तसंच लिहिलेय.) हे फक्त ऑफिशियल एज आहे . त्यामुळे त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy ❤️
#Happy birthday Thalaiva
#Rajanikant

हा डॅनी पंडित ते अजून एक कोणीतरी पंडित आहे यु ट्युबर जे रस्त्यावरच्या मिस मॅनेजमेंटची रिल्स बनवतात त्यांचा पुतण्या आहे .

>>>>अभिजित चं नवं गाणं .छान आहे आणि याच पिच्चराइजेशनही खूप फ्रेश आणि सुंदर आहे. गौतमी पण आवडली या गाण्यात.
आवडले.

https://youtu.be/X8t8axbZnH8?si=ovqMvoYDCx6MytdB
धुरंधर पाहिल्यापासून आणि थेटर मध्ये हे गाणं ऐकल्यापासून रिपीटवर आहे ऐकल्यासारखं वाटतंय म्हणून ओरिजनल शोधलं बघण्यालायक आहे की नाही ते तुमीच ठरवा शोधून Proud इथे मी ऑडीओ सोंग दिलंय.याचं म्युजिक मस्त आहे.धुरंदरच्या नव्या गाण्यापेक्षा जी जुनी गाणी वापरली आहेत ती जास्त आवडली.

50वर्षापूर्वी चं सुपरहिट गाणं.
https://youtu.be/Nl9-rpuwp3E?si=LzcmrFakRg6pAQG0 म्युजिक -आर डी बर्मन, लिरिक्स-आनंद बक्षी.
हे गाणं जर थेटर मध्ये कसं वाजतंय हे जर बघायचं असेल आणि लाईफटाईम एक्सपिरिइन्स घ्यायचा असेल तर नक्की बघा "शोले", न्यू साऊंड सहित.

संजय भावे >>> १००++. ‘इश्क जलाकर’ हे फ्युजन/रीमिक्स रणवीर सिंगचं इंट्रो म्हणून परफेक्ट बसलंय. जुन्या गाण्यापेक्षा या गाण्याची कॉंटेक्स्ट जास्त योग्य आहे.
हे ३१ डिसेंबर, न्यू इअर पार्टीजमध्ये तुफान चालणार आहे.

https://youtu.be/VUIFvEnWa-o?si=ccuUbUyvp6YJLh9u
"इश्क जलाकर" मला आधी वाटलेले ओरिजनल आहे पण रीक्रिएट पण चांगले केलेय "ना तो कारवां की तलाश है ,न हमसफर की तलाश है." डोक्यात वाजत राहातं नवीन वालं . पण या जुन्या गाण्यावरच्या कमेंट वाचल्या की लक्षात येत बऱ्याच लोकांना हे गाणं लक्षात होतं .वरती संजय यांनी लिहिल्यावर शोधलं ."धुरंधर" च्या निमित्ताने यंगस्टर या जुन्या गाण्यालाही आठवणीत ठेवतील.
मुळचं गाणं रोशन साहेबानी संगीतबद्ध केलंय (हृतिक रोशनचे आजोबा)
चित्रपट -बरसात की रात
गायक- आशा भोसले, मन्ना डे, मोहम्मद रफी एस डी सतीश सुधा मल्होत्रा
लिरिक्स- साहिर लुधीयानवी

तेलगू चित्रपटातील दोन गाणी कानात बसल्येत.

चंदामामा या चित्रपटातील रेगु मुलोल्ले: जबरदस्त catchy चाल आणि ठेका आहे. Traditional आणि Western दोन्हीचं मिश्रण आहे. चित्रीकरणही मस्त आहे.

सारिलेलू निकेवरु मधील डांग डांग: मस्त पार्टी साँग आहे. महेश बाबू आणि तमन्नाने मस्त डान्स केला आहे.

दोन्ही गाणी एकदम upbeat, catchy, mood-lifting आहेत. YouTube वर दोन्हीचे व्हिडिओ बघा.

>>>>>>>ना तो कारवां की तलाश है ,न हमसफर की तलाश है.
नवरा ते गाणे सारखे वाजवतोय Happy
आणि ते खुस खुस-ठुस ठुस याल्ला याला .... Happy

ना तो कारवां की तलाश है ,न हमसफर की तलाश है.
नवरा ते गाणे सारखे वाजवतोय Happy
आणि ते खुस खुस-ठुस ठुस याल्ला याला .... Happy
>>>>>>>

त्यांची आणि माझी आवड इथेही सेम आहे.
मी हेच लिहायला आलेलो. आलटून पालटून हीच दोन गाणी ऐकत आहे. स्टेटसला सुद्धा याचीच म्युजिक लावत आहे.

नवर्‍याने एकटे जाउन परत धुरंधर पाहीला. मी गेले नाही कारण २ दा सिनेमा मला शिक्षा वाटते. हां जिस देश मे गंगा बेहेती है, आन, नवरंग, आम्रपाली वगैरे वेगळे.

Pages