
बऱ्याच दिवसांपासून पहायचा म्हणून नोंद करून ठेवलेल्या या अनुभूतीला आज मुहूर्त सापडला. उरकून टाकायच्या कामांच्या यादीत टाकण्यापेक्षा, निवांतपणे रसपरिपोष करायचा ठरवले त्याचे चीज झाले असे वाटले. मराठी चित्रपट या आपत्तीच्या मी सहसा वाटेस जात नाही कारण तेथे पाहिजे जातीचे! माझ्या या धारणेस मराठी सिनेजगताने फारच मनावर घेऊन मला माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सहसा भाग पाडले नाही. नाही म्हणायला जब्बार पटेल, अमोल पालेकर, निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी अशा काही मातब्बर मंडळींनी मला थेटरात खेचून नेले खरे, पण त्यांना अपवाद म्हणून जमेस धरून माझ्या मूलभूत धास्तीस फारसा फरक पडला नाही. शिवाय जगभरातील उत्तमोत्तम कलाकृती पाहता येणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलने वर्षानुवर्षे आमचे फिल्म रसास्वादन अधिकच समृद्ध केल्याने दिवसेंदिवस अधिकच सरधोपट, उथळ, बाष्कळ, बटबटीत, प्रचारकी आणि म्हणून असह्य होत चाललेल्या मराठी चित्रपटांकडून मला शून्य अपेक्षा असतांनां 'अमलताश'ने खूपच आनंदी (आय मीन सुखद!) धक्का दिला... अगदी सतीश राजवाडेच्या 'प्रेमाची गोष्ट' सारखा
तीन महत्वाच्या गोष्टी या निमित्ताने निदर्शनास आल्या - १. सोशल मीडियाने कितीही आव आणला तरी वृत्तपत्रांना निदान महाराष्ट्रात तरी पर्याय नाही. बहुतेकांनी लोकसत्ता मधला राहुलचा लेख वाचल्यामुळे युटूयबवर येऊन अमलताश बघितल्याच्या उल्लेख केलाय. २. नेहमीच्या(च) प्रथितयश(?) निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गायक, संगीतकार यांच्या युतीपेक्षा वेगळे जातिवंत, खानदानी कलाकार किती फ्रेश वाटू शकतात आणि कमाल करू शकतात याचा आनंद अवर्णनीय. चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक सुहास देसले हा आमच्या धुळ्याचा असल्याने वाढीव कौतुक आणि विशेष अभिमान. ३. कथा, कल्पना, निर्मिती, सादरीकरण आणि प्रदर्शन या सगळ्यांत केलेल्या अभिनव प्रयोगाने थिएटर, मल्टिप्लेक्स यांच्याबरोबरच ओटीटीची मुजोरी देखील मोडून काढता येऊ शकते आणि त्या निमित्ताने काही उत्तम, दर्जेदार, सकस, अर्थपूर्ण आणि म्हणून अभिजात असे काही करता येऊ शकते या शक्यतेने उमेद वाढून भविष्य खूपच आशादायक वाटते.
सगळ्यांनी हा तरल अनुभव निवांतपणे नक्कीच घ्यावा आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाच्या प्रमाणात, मल्टिप्लेक्समधल्या तिकीट आणि पार्किंग राहू दे, निव्वळ पाणी आणि पॉपकॉर्नच्या जीएसटीसह किमतीस स्मरून, यथाशक्ती योगदान करावे... तरच अशा प्रयोगांना बळ मिळेल आणि प्रेक्षकांना क्वालिटी कन्टेन्ट! सुहास, राहुल आणि संपूर्ण अमलताश टीमला मनापासून शुभेच्छा... निरंतर!
शुभम भवतु !
(१० महिन्यांपूर्वी अमलताशच्या युट्युब व्हिडीओवर प्रकाशित माझा अभिप्राय)
अमित, स्वाती ताईच्या
अमित, स्वाती ताईच्या पोस्ट्सला अनुमोदन ..
स्वाती
स्वाती
....औट घटकेचे नाते बहरते, फुलते, काळाची मर्यादा असतानाही आनंदाची देवाण-घेवाण होते आणि एक हळूवार आठवण घेवून तुम्ही पुढे वाटचाल करता....
हे म्हणजे "White Nights" झालं.
<<हळुवार आठवण वेगळी आणि
<<हळुवार आठवण वेगळी आणि प्रेमाची निशाणी वेगळी >>> – असे नसते!
हळुवार आठवण हा चौकोन असेल तर प्रेमाची निशाणी हा चौरस आहे.
प्रेमाची निशाणी ही सुद्धा एक प्रकारची हळूवार आठवण आहे.
एखाद्याने मनात एखाद्याची हळूवार आठवण जपायला समाजाला प्रॉब्लेम नाही. पण सोबत जिवंत निशाणी बाळगलेली नको आहे. हा समाजाचा दुटप्पीपणा झाला.
तिने त्याला एखादी घट्ट मिठी मारून धाय मोकलून रडून आपली वर्जनिटी जपून वेगळे होताना दाखवले असते तर कोणाला काही प्रॉब्लेम नसता. पण जो जाणार आहे त्यासोबत आपले कौमार्य घालवले हा गुन्हा झाला असे वाटत आहे. ते ही लग्न न करता म्हणजे नाजायज रिश्ता वगैरे.
प्रेम आदिम भावना म्हणताच वर केशवकूल यांना सेक्स आठवला.
सेक्स हा प्रेमाचा भाग नाही का?
तसे नसते तर आपण आपल्या सेक्सुअल ओरिएंटेशन नुसारच प्रेमात का पडलो असतो?
लग्न होणे न होणे याने काय फरक पडतो हे मला अजूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाहीये. तो फक्त एक कागदाचा तुकडा आहे ज्यावर सह्या केल्या जातात. इथे आमच्या घरात सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये राहणाऱ्या जोड्या आहेत. तर लग्न करून घटस्फोट घेतलेले सुद्धा आहेत. ते देखील वर्षभराच्या आत. आणि हो, आमचे घर मराठी मध्यमवर्गीयच आहे. आणि जे लिव्ह इन राहतात ते कॅनडा काय कुठेही भारताच्या बाहेर गेले नाहीयेत. स्वतंत्र विचारसरणी कोणाची मक्तेदारी नाही. अमलताश हिरोईन कॅनडा मधील दाखवली नसती तरी मला काही फरक पडला नसता. किंबहुना माझ्या ते डोक्यातही आले नाही की अच्छा ही कॅनडाची होती म्हणून इतकी बिनधास्त वागली वगैरे..
आणि हो, एकट्याने मुलाचा सांभाळ करणे यात देखील काहीही दिव्य नसते. ना त्यात मुलाची काही आबाळ होत असते. दोघांनी मिळून सांभाळ करताना मध्येच एक जण गेले की भारी पडत असावे. पण जेव्हा सुरुवातीपासूनच कोणी एकटे सांभाळ करत असेल तर ते सहज जमून जाते.
सुष्मिता सेन दोन दत्तक मुलींची आई आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तिने २००० मध्ये पहिली मुलगी रेनी सेन हिला दत्तक घेतले तर २०१० मध्ये तिची दुसरी मुलगी अलिसा हिलाही दत्तक घेतले.
ती सिंगल पेरेंट असून दुसऱ्यांच्या दोन दोन मुलींना दत्तक घेऊ शकते. इथे हिने स्वतःचे एक मूळ जन्माला घातले तर हाहाकार उडावा?
आणि हो, आमच्या घरी सुष्मिता सेनचे देखील फार कौतुक आहे!
ह्यांना जिना दाखवा Lol मला
ह्यांना जिना दाखवा Lol मला हाच या सिनेम्याचं हायलाईट हायपॉईंट का वाटतोय काय कळत नाही. >> जिना इसिका नाम है असा एक महान संदेश तो माणूस देऊन जातो
जाऊ तेथे घाण करू
.
देवा!!! अरे इथे फिजिकल जवळीक
देवा!!! अरे इथे फिजिकल जवळीक साधण्यात काही म्हणायचं नाही आहे. त्यातून त्या परिस्थितीत अपत्य जन्म इतकेच मला म्हणायचे आहे. त्या परिस्थितीत हे सगळ्यात महत्त्वाचे. शारिरिक जवळीक करा की. ती तर केलीच पाहिजे.
मी वाचलं आहे त्याप्रमाणे स्टॅटिस्टिक तसे नाहीं. सुष्मिता सेन मला ही फार आवडते, पण ती आऊट लायर आहे. तिच्या मुलाखतीत ती काही फार वेगळं सांगत नाही. पण ती आता तुझ्या आजुबाजूच्या समाजात नॉर्म होत असेल तर उत्तमच आहे.... क्षण एक पुरे प्रेमाचा, टाइप प्रेम कवितांत ठीक आहे, तारुण्यात तरी मला ते झेपत नाही. मला नीना गुप्ता ही प्रचंड आवडते. तिच्या मुलाखतीत ती ही फार वेगळं सांगत नाही. पण बदल घडले तर उत्तमच आहे.
जो जाणार आहे त्यासोबत आपले
जो जाणार आहे त्यासोबत आपले कौमार्य घालवले हा गुन्हा झाला असे वाटत आहे. ते ही लग्न न करता म्हणजे नाजायज रिश्ता वगैरे.>> हा तुम्ही लावलेला अर्थ! असे काहीही मी म्हटलेले नाही. तिच्या कौमार्याचा प्रश्न येतो कुठे? मी सेक्स हा शब्द वापरला नाहीये, सभ्य भाषेत 'आनंदाची देवाण घेवाण' म्हटले कारण यात शारीरीक जवळीक आली आणि मानसिकही. मात्र इथे असे काही छानसे उमलत नाही, ते वाड्यात 'रात्री घडले' असे सुचवले आहे ते मला तरी 'यक्क! ' वाटले.
>>पण जेव्हा सुरुवातीपासूनच कोणी एकटे सांभाळ करत असेल तर ते सहज जमून जाते.>> काहीही! उगा मुद्दा रेटायचाच म्हणून इतके बेजबाबदार विधान? अशी किती लग्नाशिवायची सामान्य एकटी स्त्रीपालकत्व बघितली आहेत? सुष्मितासेन ही सेलिब्रेटी आहे , तिला उपलब्ध असलेल्या रिसोर्सेसची तुलना सामान्य स्त्री सोबत करणे चुकीचे. आणि तिने समजून उमजून दत्तक पालकत्व स्विकारले आहे. मात्र होणार्या बाळाचा बाबा सोबत नसताना प्रेग्नंसी निभावणे आणि बायॉलॉजिकली मूल जन्माला घालणे म्हणजे काय दिव्य असते ते इथे अनेक वेळा बघितले आहे.
मला लिव इन बद्दल आक्षेप नाही आणि घटस्फोटाबद्दल तर त्याहून नाही. मात्र लिव इन मधेही मूल झाल्यावर को पॅरेंटिंग प्रकरण किती बेक्कार वळणावर जावू शकते आणि मुल कसे होरपळते ते बघता तिथेही मी मूल नको हाच स्टँड घेइन.
>>एखाद्याने मनात एखाद्याची हळूवार आठवण जपायला समाजाला प्रॉब्लेम नाही. पण सोबत जिवंत निशाणी बाळगलेली नको आहे. हा समाजाचा दुटप्पीपणा झाला.>> मला समाज काय म्हणेल वगैरेचे काहीही पडलेले नाही पण ती जिवंत निशाणी हे एक मूल आहे. मी त्या मुलाच्या बाजुने विचार करत आहे. स्वतंत्र विचारसरणी आणि बेजबाबदार यडचॅपपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यात गल्लत नको.
माणसे आपल्या आदिम अर्ज
माणसे आपल्या आदिम अर्ज उर्मी प्रमाणे वागतात आणि मग स्वतः ची अपराधी पणाची भावना लपवण्यासाठी काव्यात्मक उदात्त रुपडे पांघरतात, नथिंग मोर.
कदाचीत अमलतश इतका नसेल पण
कदाचीत अमलताश इतका नसेल पण माझ्या मर्यादित दृष्टीने रिग्रेसीव्ह नसलेला/दोन पावले पुढे गेलेला सिनेमा!
मी सेक्स हा शब्द वापरला
मी सेक्स हा शब्द वापरला नाहीये, सभ्य भाषेत 'आनंदाची देवाण घेवाण' म्हटले कारण यात शारीरीक जवळीक आली आणि मानसिकही. मात्र इथे असे काही छानसे उमलत नाही, ते वाड्यात 'रात्री घडले' असे सुचवले आहे ते मला तरी 'यक्क! ' वाटले.
>>>>>
तुम्ही आनंदाची देवाणघेवाण असे शब्द वापरता त्यात शारीरिक जवळीक सुद्धा आली हे आम्ही कसे ओळखायचे
मला सेक्स किंवा शारीरिक संबंध हे असभ्य शब्द वाटत नाही.
जे असभ्य वाटते त्यावर मात्र मी आधीही आवाज उठवला आहे. तेव्हा मात्र आश्चर्यकारकरित्या बहुतांश उलटेच प्रतिसाद आलेले. तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही नका बघू वगैरे.
India's got latent - चला निषेध नोंदवूया.
https://www.maayboli.com/node/86266
ते असो,
पण आताही तुम्ही म्हटले की वाड्यात रात्री घडले ते यक्क वाटले वगैरे. प्रेमात शरीरसंबंध प्रस्थापित होणे यात मला तरी काही यक्क वाटत नाही. कुठलाही बीभत्स सीन किंवा संवाद न दाखवता त्यांनी हे दाखवले हे विशेष. सेक्स ही पर्सनल गोष्ट आहे. कोणी त्याचे दारात प्रदर्शन न मांडता घरात करत असेल तर त्यात यक्क का वाटावे?
.
@ एकल पालक,
मी दोन पालक असताना सुद्धा मुलांचे हाल बघितले आहेत,
१) जेव्हा दोघे आपले करिअरमध्ये गुंतलेले असतात आणि मुले प्रायोरिटी नसतात.
२) एखाद्याला दारूचे जबरदस्त व्यसन असते.
३) घराला गरीबी नावाचा शाप असतो.
४) नवरा बायकोचे म्हणजे मुलांच्या आईवडिलांचे आपसात पटत नसते आणि घरात रोजची भांडणे असतात.
५) मुलांचा सांभाळ कसा करावा याची दोघांनाही अक्कल नसते.
एकट्याने मूल सांभाळणे म्हणजे काहीतरी फार क्लिष्ट अवघड गोष्ट आहे ज्यात मुलाची आबाळ होते हे गृहितकच चुकीचे वाटते. आणि त्या आधारे ज्यांनी हे स्वखुशीने स्वीकारले ते आता मुलाची आबाळ करणार हे पूर्वग्रह दूषित मत वाटते.
त्यातही माझा मुद्दा – एक पार्टनर गेल्याने नाईलाजाने अंगावर आलेले एकल पालकत्व आणि स्वतः विचार करून स्वीकारलेले एकल पालकत्व यात फार मोठा फरक आहे. म्हणून मी सुश्मिता सेनचे उदाहरण दिले. कारण ती फेमस असल्याने समजेल. ती सेलिब्रिटी असल्याने सोपे असेल तर कथेतील नायिका सुद्धा काही दोन वेळच्या जेवणाची आबाळ असलेली नव्हती.
आता तुम्ही नेमका काय विचार लादत आहात ते बघा.
समजा एक मुलगी आहे. लग्नानंतर वर्ष दोन वर्षभरात तिचा नवरा गेला. पण अजून त्यांनी मूल प्लान केले नव्हते. आता त्या मुलीला नवीन आयुष्य सुरू करायचे आहे पण नवा जोडीदार नको आहे. मूल मात्र हवे आहे ज्याची तिला लग्नानंतर आस होती. आता तुम्ही तिला ते मूल नाकारत आहात. कारण सांगत आहात की मुलाची आबाळ करशील तू.
प्रत्यक्षात ती आजूबाजूला इतकी मुले बघत असेल ज्यांची आबाळ होत असेल आणि तिला विश्वास असेल की त्या सर्वांपेक्षा छान जपेल ती आपल्या मुलाला पण तुमचे गृहितक ते मान्य करत नाहीये. मुलाची एवढीच आवड आहे तर लग्न कर आणि मग होऊ दे हवी तितकी मुले असे सांगत आहात तुम्ही तिला. सॉरी, बिलकुल पटत नाहीये हा स्टँड.
यात मी अजून एक जोडतो,
दोघांमधील एक शारीरिक दृष्ट्या अपंग असेल. कदाचित तोच आपल्या जोडीदारावर अवलंबून असेल किंवा स्वतः मुलाची जबाबदारी घेण्यास सक्षम नसेल तिथेही एकल पालकत्व अशीच केस झाली. त्यांनाही तुमचे गृहितक मूल नाकारत आहे.
(No subject)
>>प्रेमात शरीरसंबंध
>>प्रेमात शरीरसंबंध प्रस्थापित होणे यात मला तरी काही यक्क वाटत नाही. >> मलाही नाही पण ते कुठे घडते त्यानुसार ते यक्क वाटणे आहे. कदाचित माझ्या मिडवेस्ट वॅल्यूजमुळे असेल, जिथे प्रेमात शरीरसंबंध ही नॉर्मल बाब आहे मात्र ते कुठे याचे काही रुल्स आहेत. नायक वाड्यात एकत्र कुटुंबात रहातोय, ती पाहूणी आहे अशा वेळी मला ते 'यक्क' लेवलचे डिसरिस्पेक्टफुल वाटले, तरल वाटले नाही. बाकीच्या मम सुसंस्कृत चौकटीत ते विसंगत होते. कथेच्या थीमशी सुसंगत असेल तर - काही धरबंध नसलेली फॅमिली - तर मग चालले असते. एक होता विदुषक मधे ते मूल बाहेर काकडत बसून आहे आणि आई आत 'आश्रयदात्या' सोबत. तिथे तो सीन अंगावर येतो, पण 'यक्क' वाटत नाही.
सेक्स किंवा शारीरिक संबंध हे असभ्य शब्द वाटत नाही.>> मलाही नाही पण had sex आणि made love यात फरक आहे. made love याला मराठीत काय लिहावे हे मला सुचले नाही ती माझ्या मराठीची मर्यादा.
आता एकल पालकत्वाबद्दल -
तुम्ही कधी ७-८ वर्षाच्या मुलाचे I hope mom's new boy friend will become my dad म्हणताना आशेने चमकणारे डोळे बघितलेत? मी बघितलेत. दोन वेळच्या अन्नापलिकडची ती आस आणि तुटल्यानंतरचे ते पाय ओढत चालणे, थॅक्स फॉर द राईड म्हणत नजर चुकवत खांदे पाडून मागच्या सीटवर बसणे मी अनुभवले आहे.
१. मूल अॅडॉप्ट करणे
२. मुलाची आस आहे पण पुन्हा लग्न नको म्हणून जोडीदाराच्या फ्रोजन स्पर्म पासून किंवा स्पर्म डोनरपासून मूल जन्माला घालणे
३. अनप्रोटेक्टेड शरीरसंबंधातून विवाहात अनप्लॅन्ड प्रेग्नंसी
४. अनप्रोटेक्टेड शरीरसंबंधातून विवाहबाह्य प्रेग्नंसी
हे सगळे वेगवेगळे. पहिल्या दोन प्रकारात आली लहर असे होत नाही, बरेच काही साधक-बाधक तपासून मग निर्णय होतो. बरेच काही लिगलीही करावे लागते. शेवटी प्रश्न एका जीवाचा आहे. मूल म्हणजे खेळणे नव्हे तर मला हवे म्हणून हट्ट करायला. क्लोज्ड अॅडॉप्शन असताना सज्ञान झाल्यावर बर्थ पॅरेंटचा शोध घेणार्या मुलांना कसली आस असते?
चौथ्या प्रकारातही मला बाळाला प्रेमळ, उबदार घर द्यायचे आहे, त्याच्यावरच्या प्रेमापोटी मी त्याला दत्तक देवू इच्छिते म्हणणार्या स्त्रीया ही बघितल्यात आणि या बाळामुळे तरी बाळाचे बाबा आमच्या आयुष्यात कायमचे परत येतील असे म्हणणार्या स्त्रीया ही बघितल्यात.
घटस्फोटित असल्याने एकल पालक किंवा को पॅरेंटिंग हे वेगळे. काळाचा घाव पडला, जोडीदार गमावला म्हणून असलेले एकल पालकत्व वेगळे. मेंटरिंग करताना अशा वेगवेगळ्या परीस्थितीतल्या मुलांना जवळून अनुभवलयं, काही काळ त्यांचा हात धरुन चाललेय. अन्न-वस्त्र-निवार्याचा अभावही बघितलाय आणि त्या बेसीक गरजा पूर्ण + आजी आजोबा असूनही असलेली 'ती रिकामी जागा' ही बघितलेय.
मला कुणी मागास म्हटले तरी चालेल पण स्वतःच्या मुलासाठी जबाबदारीने वागण्याचे धडे देताना कायम प्रोटेक्टेड सेक्स, विवाहबंधनाशिवाय नैसर्गिक संतती हे बेजबाबदार वागणे असे म्हणायचे आणि इतरांसाठी फुकाचा लिबरल आव हा दुटप्पीपणा माझ्याकडून होणार नाही.
स्वाती२, उत्तम पोस्ट!
स्वाती२, उत्तम पोस्ट!
स्वाती २, खूप विचारपूर्वक
स्वाती २, खूप विचारपूर्वक लिहिलेली उत्तम पोस्ट.

फक्त मला शेवटचा परिच्छेद नीटसा कळला नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, ते कळत नाही.
स्वाती, सगळ्याच पोस्ट्स छान
स्वाती, सगळ्याच पोस्ट्स छान आर्टिक्युलेटेड आहेत.
नायक वाड्यात एकत्र कुटुंबात
नायक वाड्यात एकत्र कुटुंबात रहातोय, ती पाहूणी आहे अशा वेळी मला ते 'यक्क' लेवलचे डिसरिस्पेक्टफुल वाटले, तरल वाटले नाही.
>>>>>>>>>>>
हे तुमचे वैयक्तिक मत आहे. त्याचा आदर आहे. कारण ते तुम्ही ज्या समाजात वाढला त्यामुळे तयार झालेले आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास, आजही आमच्या सोसायटीमध्ये अशी कुटुंबे आहेत, ज्यात सासरा समोर असताना सुनेने डोक्यावर पदर घेतला नाही तर ते डिसरिस्पेक्टफुल समजले जाते. मी त्यांचे मत खोडायच्या भानगडीत कधी पडलो नाही. तुमचेही खोडणार नाही. यात प्रत्येकाचे बेंच मार्क आणि निकष वेगवेगळे असतात. हे वर्षानुवर्ष घट्ट झालेले समज असतात.
पण सर्वासाठी ते यक्क होत नाही. मला तरी वाटले नाही. ते नायकाचे घर आहे. तेच त्याने बाहेर लॉज वर जाऊन केले असते तर त्यात अचानक रिस्पेक्ट आला असता असे मला वाटत नाही. मुळात सेक्स ही काहीतरी घाणेरडी गोष्ट आहे, भौतिक सुखाची लालसा वासना वगैरे, यातूनच हे सगळे समज तयार झाले आहेत असे मला वाटते.
ती पाहुणी असली तरी नंतर त्याची प्रेयसी झाली आहे आणि हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो ऐयाशी करायला मुली घरी घेऊन यायचा अश्या लेव्हलला त्यांचे प्रेम नेऊ नका प्लीज इतकेच म्हणणे आहे.
.
@ एकल पालकत्वात दत्तक घेणारे विचार करून घेतात आणि यांनी मात्र उथळपणे निर्णय घेतला, तुमच्या भाषेत आली लहर यातला प्रकार केला हे पुन्हा तुमचेच गृहितक आहे. त्यांनीही विचारपूर्वकच निर्णय घेतला असेल हे जणू तुम्हाला मान्यच करायचे नाहीये.
मराठी दुनियादारी चित्रपटात सुद्धा सेम असाच सीन दाखवला होता. फक्त फरक इतका होता की त्यात सई आणि स्वप्निलचे लग्न दाखवले होते. त्यामुळे तो चित्रपट बघताना हा मुद्दा कोणाच्याच लक्षात आला नाही. कारण लग्न झाले म्हणजे पवित्र झाले हा साधारण समज असतो.
बाकी शेवटचा परिच्छेद मलाही कळला नाही.
स्वाती, सार्या पोष्टींना मम.
स्वाती, सार्या पोष्टींना मम. विशेषतः शेवटच्या.
मी हा चित्रपट पाहिला नाही पण
मी हा चित्रपट पाहिला नाही पण माझ्या मामेबहिणीने नुकताच पाहिला. कालच तिच्याशी बोलताना याचा विषय निघाला.
'अमलताश कसा वाटला?' या माझ्या प्रश्नाला तिने 'अंमळ त्रास वाटला!' असं उत्तर दिलं.
मी पाहायचा की नाही ते ठरवत आहे
त्यात काय ठरवायचं? पाहून टाका
त्यात काय ठरवायचं? पाहून टाका
माबो वरील अमलताश चित्रपटावरील
माबो वरील अमलताश चित्रपटावरील (सर्व धाग्यावरील) प्रतिसाद वाचायला जेव्हढा वेळ लागेल तेव्हढ्यात तुमचा चित्रपट बघून त्यावर प्रतिसादही लिहून होईल
चित्रपट बघणे आणि त्यावर चर्चा
चित्रपट बघणे आणि त्यावर चर्चा करणे या दोन्हीतील आनंद वेगवेगळा आहे. एक दुसऱ्याला रिप्लेस करू शकत नाही.
येथील चर्चेच्या निमित्ताने माझा एक धागा आठवला, जो आता सापडत नाहीये.
त्याचा आशय असा होता की, कोणी किती मुलांना जन्म द्यावा याचे लिमिट त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार ठरवले जावे का?
म्हणजे जसे एखाद्याचे वार्षिक उत्पन्न बघून त्याला किती लोन द्यावे हे बँक ठरवते तसे एखाद्याची आर्थिक परिस्थिती बघून तो किती मुलांना जन्म देऊ शकतो हे सरकारने ठरवावे का जेणेकरून मुलांची आबाळ होऊ नये.
चीकू,
चीकू,
अंमळ त्रास कोटी छान आहे. कदाचित ती सुचली म्हणून तसे मत व्यक्त केले असण्याची शक्यता आहे. अन्यथा कोटी वापरता आली नसती. असा विचार करून बघाच तुम्ही.
वरूण धवनचा ऑक्टोबर चित्रपट
वरूण धवनचा ऑक्टोबर चित्रपट आठवला. त्यात नायिकेने रंगविलेल्या पात्राचं नाव शिवली आहे. शिवली हे एका झाडाचं नाव आहे. सोनाली कुलकर्णी (थोरली) हिचा चेलवी नावाचा एक चित्रपट आहे त्यात ती झाड बनते आणि मरते.
झाडाचं नाव आणि मृत्यु हा योगायोग असावा की आणखी काही?
शिउली म्हणजे पारिजातक.
शिउली म्हणजे पारिजातक.
>>मुळात सेक्स ही काहीतरी
>>मुळात सेक्स ही काहीतरी घाणेरडी गोष्ट आहे, भौतिक सुखाची लालसा वासना वगैरे, यातूनच हे सगळे समज तयार झाले आहेत असे मला वाटते.
ती पाहुणी असली तरी नंतर त्याची प्रेयसी झाली आहे आणि हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो ऐयाशी करायला मुली घरी घेऊन यायचा अश्या लेव्हलला त्यांचे प्रेम नेऊ नका प्लीज इतकेच म्हणणे आहे.>>
सेक्स म्हणजे काहीतरी घाणेर्डे असे मला अजिबात वाटत नाही मात्र काही गोष्टी या 'अॅडल्ट ओन्ली' प्रकारात येतात आणि त्यामुळे कुठे - कधी वगैरे संकेतही त्यासोबत येतात. ऐयाशी वगैरे एक टोक झाले त्याचा इथे काय संबंध? मला बांधणीतले जे कच्चे दुवे दिसले ते मांडले. पेठेतल्या मम घरातला जो इतर वावर दाखवला आहे, मामा-भाची, बहिण-भाऊ-मेव्हणा यांचे जे नाते दाखवले आहे त्या पार्श्वभूमीवर ते सुसंगत वाटत नाही आणि मग अयोग्यच वाटते. मी दुसर्या धाग्यावरील चर्चेत फ्रेंड्स मधल्या लाल स्वेटर बद्दल लिहिले आहे ते वाचले असेल तर मला काय म्हणायचे आहे ते कदाचित स्पष्ट होईल. माझा चित्रपट-सिरीयल यात हॉट बेड सीन, विवाहबाह्य संबंध - त्यातून संतती दाखवणे वगैरे कशालाच आक्षेप नाही मात्र ते कथानकात ओघाने येणे, सुसंगत असणे अपेक्षित आहे. रादेचा अमलताश म्हणून अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, अपेक्षाभंग झाला तो मांडला.
माझा शेवटचा पॅरा हा माझी प्रेग्नंसीबाबत जी भूमिका आहे तिचे स्पष्टीकरण आहे. बरेचदा वैयक्तिक आयुष्यात एक व्हॅल्यू सिस्टिम आणि सोशल मेडिया-नेटावर पोस्टी टाकताना दुसरी वॅल्यू सिस्टिम असल्याचा आव असे बघायला मिळते. मी तसे करणार नाही. मी एक तीस वर्षाच्या मुलाची आई आहे. गेली १६ वर्षे मी त्याच्यावर जबाबदार कामजीवनाबाबत संस्कार करताना विवाहबाह्य नैसर्गिक संतती हे अयोग्य - बाळासाठी किती झाले तरी अन्यायाचे असे सांगत आले आहे, ती माझ्या कुटुंबाची वॅल्यू सिस्टिम आहे. इथल्या एकतीस वर्षाच्या आयुष्यात एकल पालकत्वातून उद्भवणारे प्रश्न जवळून बघितलेत, वेगवेगळ्या आधारगटामार्फत मुलांसोबत, त्यांच्या पालकांसोबत काम केले- करते. त्यामुळे 'वी' नसताना 'वी आर प्रेग्नंट' हे मी लाईटली घेवूच शकत नाही.
अवांतर - केवळ प्रेग्नंसीच नाही आर्थिक साक्षरतेबाबत बोलतानाही 'वी' नसताना 'वी आर' म्हणत आर्थिक व्यवहार एकत्र करु नका असा माझा कायमचा सल्ला असतो.
पेठेतल्या मम घरातला जो इतर
पेठेतल्या मम घरातला जो इतर वावर दाखवला आहे, मामा-भाची, बहिण-भाऊ-मेव्हणा यांचे जे नाते दाखवले आहे त्या पार्श्वभूमीवर ते सुसंगत वाटत नाही आणि मग अयोग्यच वाटते.
>>>>>
ओके, कदाचित पेठेतील मराठी मध्यमवर्गीय घर हा मुद्दा असेल. तुम्ही कदाचित तिथल्या असाल किंवा तुमच्या जवळच्या ओळखीचे तिथले असतील त्यामुळे ते आणखी रुचले नसेल. विसंगती प्रकर्षाने जाणवली असेल. स्वतः तिथल्या असाल तर आमच्या बद्दल असे दाखवलेच कसे असेही झाले असेल. असे होण्यात काही गैर नाही. हे स्वाभाविक आहे. तो मानवी स्वभाव आहे.
तसेही या मुद्द्यावर मी वर सासरे समोर येताच डोक्यावर पदर घेणाऱ्या सुनेचे उदाहरण दिले आहे. एखादे कथानक अश्या एखाद्या घरात घडणारे दाखवले असते तर इतरांना साध्या वाटणाऱ्या गोष्टीही त्या समाजातील प्रेक्षकांना रुचल्या नसत्या. पण याचा अर्थ त्या समाजातील कुठल्याच घरात त्या समाजाला न पटणाऱ्या गोष्टी होत नाहीत असे नसते. वेगळा विचार करणारे सगळ्या समाजात असतातच. पण तुम्हाला पेठेतील प्रातिनिधिक घर अपेक्षित होते ते दिसले नाही इतकेच. आणि मी कधीच पेठ पाहिली नसल्याने मला त्यात काही वावगे वाटले नाही इतकेच.
.
<<<< इथल्या एकतीस वर्षाच्या आयुष्यात एकल पालकत्वातून उद्भवणारे प्रश्न जवळून बघितलेत
>>>>
इथल्या म्हणजे अमेरिकेतील का? तिथले आणि इथले प्रॉब्लेम वेगळे असू शकतातच. आता मीन असतीलच. कारण तिथले कल्चर वेगळे आहे आणि सपोर्ट सिस्टीम समजली जाणारी कुटुंबसंस्था वेगळी आहे. अर्थात मला फरकाची नेमकी कल्पना नसल्याने मी काही तुलना करू शकत नाही.
आणि ते प्रॉब्लेम नाहीयेत असेही मी म्हणत नाहीये, ना तुमच्या हेतू बद्दल शंका आहे, ना कळकळीबद्दल....
पण तरीही याच नाही तर कुठल्याही केसमध्ये, म्हणजे एकल पालक असो, कोणाची आर्थिक परिस्थिती नसो, कोणामध्ये एक जोडीदार व्यसनी असो, किंवा शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या अपंग असो, मुलाला जन्म द्यायचा की नाही आणि किती मुलांना जन्म द्यायचा ही ज्याची त्याची पर्सनल गोष्ट आहे. आणि या सगळ्या केसमध्ये जन्माला येणाऱ्या मुलाला चॉईस नसतोच. हा तर निसर्गाचाच नियम आहे.
तसेच पुढे जाऊन कोण आपल्या मुलाचा सांभाळ कसा करणार हे माहीत नसताना आपण जज तर बिलकुल करू शकत नाही. मग आपले विचार नेक आहेत की नाही याचा इथे काही संबंध नाही. आपण पुढे जाऊन असे होण्याची शक्यता आहे म्हणत एखाद्याला मूल जन्माला घालायचा अधिकार नाकारू शकत नाही किंवा त्यावर टीका सुद्धा करू शकत नाही.
अगदी मुलगा सज्ञान झाल्यावर त्याच्या हितचिंतक आईवडिलांना सुद्धा त्याने लग्न कोणाशी करावे हे ठरवायचा अधिकार नसतो.
या एकल पालक केसमध्ये आई सांभाळेल सुद्धा मुलाला छान. पण ज्या केसमध्ये पुरुषाला दारूचे व्यसन असेल त्याला मग कोण समजावणार की आधी व्यसन सोड मगच मुले जन्माला घाल. अन्यथा उद्या तुझे व्यसन वाढले तर मुलांचे काय होईल..
आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, मायबोलीवर धागा निघतो की "दारू कशी प्यावी?" मला ते दारूचे उदात्तीकरण वाटते. दारू पिण्यास उद्युक्त करणारा धागा वाटतो. उद्या त्यामुळे कोणी निर्व्यसनी मनुष्याने दारू प्यायला सुरुवात केली किंवा जो पित आहे त्याचे प्रमाण वाढले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
मी उठसूठ एकटा जाऊन तिथे विरोध नोंदवायचो कारण बाप बेवडा असेल तर मुलांचे काय हाल होतात हे मी सुद्धा फार जवळून पाहिले आहे. शेजारी पाजारी पाहिले आहे. आमच्याच कुटुंबात पाहिले आहे.
पण मुले जन्माला घालण्याआधी कोणाला आपण अशी चेकलिस्ट देऊ शकत नाही याचीही मला कल्पना आहे.
गोष्टीत नियतीचा वापर सोय
गोष्टीत नियतीचा वापर सोय म्हणून झाला, की मला अंमळ त्रास होतो.
उदाहरणार्थ, गाभ्रीचा पाऊस. यातला शेवट हा निव्वळ नियतिशरण आहे.
अमलताशमध्येही शेवट नियतिशरण आहे, जो मला आवडला नाही.
शेंगदाणा लाडू, नायिकेचा सतत बदलता अॅक्सेंट या बाबीही खटकल्या.
मी थेटरात सिनेमा पाहिला तेव्हा काही फ्रेम्स गायब होत्या. कथानकातल्या न पटणार्या बाबी वेगळ्या. पण मिसिंग फ्रेम्स दिग्दर्शक - छायालेखक - कलरिस्ट यांना दिसल्या नसाव्यात का?
अमलताशमध्ये पुणं आणि पुणेरी जीवन यांना स्थान आहे. तसं ते क्रांती कानडे यांच्या सीआरडीमध्येही आहे. त्यात पुरुषोत्तम करंडक आहे. असे चित्रपट पुण्याबाहेरचे प्रेक्षक कसे बघतात, याबद्दल मला कुतुहल आहे. सीआरडीमध्ये पुरुषोत्त्तम करंडक स्पर्धेत बक्षीस मिळवलेले लोक येऊन बोलू लागतात, तेव्हा मी फार म्हणजे फार वैतागलो होतो. अमलताशमध्ये तसं काही नसलं, तरी आपण ज्या गावी राहतो आणि काही प्रमाणात त्या गावातल्या विशिष्ट वागणुकीला नावं ठेवतो, तेच चित्रपटात, अगदी थोड्या प्रमाणात का होईना, ग्लोरिपाय होऊन आलं की वैताग येतो.
आणि गोष्टीतल्या काही गोष्टी
आणि गोष्टीतल्या काही गोष्टी डिस्काऊंट देऊन कधी तरी सोडूनही देता येतात, जेव्हा स्टोरीटेलिंगची पद्धत जबरदस्त असते. किती कन्व्हिंन्सिंगली तुम्ही सांगताय त्यावर किती अवलंबून असतं. आपल्याच इथले काही मल्याळी सिनेमे म्हणजे मास्टरक्लास आहेत.
नियतीशरण शेवट -
नियतीशरण शेवट -
गाईड
थोडासा रुमानी हो जाएं
>>> गोष्टीतल्या काही गोष्टी
>>> गोष्टीतल्या काही गोष्टी डिस्काऊंट देऊन कधी तरी सोडूनही देता येतात, जेव्हा स्टोरीटेलिंगची पद्धत जबरदस्त असते. किती कन्व्हिंन्सिंगली तुम्ही सांगताय त्यावर किती अवलंबून असतं
१००%!
प्रत्येक कॅरेक्टरला एक काही ग्राफ असावा, त्या ग्राफला एक स्वतःचा असा ओघ असावा (त्याने अचानक आणि/किंवा अकारण 'आउट ऑफ कॅरेक्टर' वागू नये), त्या पात्राने कथेला आणि कथेने त्याला (दाण्याच्या लाडवांव्यतिरिक्त) काहीतरी देऊ करावं, किमान एका पात्राच्या संवेदनांशी/थॉट प्रोसेसशी प्रेक्षकांना तरलतलमपलीकडे खोलवर रेझोनेट करता यावं, त्याची सुखदु:खं, आशानिराशा, स्वप्नं वगैरेंबद्दल आत्मीयता वाटावी, त्याचा अवकाश (म्हणजे प्रभात रोड नव्हे - त्याच्या जाणीवेतला अवकाश) आपल्या डोळ्यांनी बघता यावा, एकाहून अधिक पात्रांच्या बाबतीत हे होऊ शकलं तर फारच उत्तम - या फार मोठ्या अपेक्षा आहेत का?
Pages