अभिजात

अमलताश

Submitted by अमुक on 21 November, 2025 - 06:04

बऱ्याच दिवसांपासून पहायचा म्हणून नोंद करून ठेवलेल्या या अनुभूतीला आज मुहूर्त सापडला. उरकून टाकायच्या कामांच्या यादीत टाकण्यापेक्षा, निवांतपणे रसपरिपोष करायचा ठरवले त्याचे चीज झाले असे वाटले. मराठी चित्रपट या आपत्तीच्या मी सहसा वाटेस जात नाही कारण तेथे पाहिजे जातीचे! माझ्या या धारणेस मराठी सिनेजगताने फारच मनावर घेऊन मला माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सहसा भाग पाडले नाही. नाही म्हणायला जब्बार पटेल, अमोल पालेकर, निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी अशा काही मातब्बर मंडळींनी मला थेटरात खेचून नेले खरे, पण त्यांना अपवाद म्हणून जमेस धरून माझ्या मूलभूत धास्तीस फारसा फरक पडला नाही.

Subscribe to RSS - अभिजात