महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच दिवस झाले मायबोलीवर कविता नाही लिहिली.
मे गया दुपारी बाहर खेलने
और उडा आकाश मे
बैठा गरुड के उपर
और गया पंढरपूर मे
गरुड के पंख दुःख गये

अमित साटम मुंबई भाजपचा अध्यक्ष झाल्यापासून चेकाळला आहे. अर्णव खैरे नावाच्या मुलाला ट्रेनमध्ये मराठी बोलला नाही म्हणून मारहाण झाली आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे आहे. तर त्यावरून साटमाने शिवाजी पार्क मधे ठाकरे बंधु भाषेवरून द्वेष पसरवतात आणि त्यामुळे ही घटना घडली म्हणून धरणे धरले. सोशल मिडियावर साटमची धुलाई सुरू आहे

काल एका केंद्रीय मंत्र्याने आय आयटी बाँबेने आपले नाव बदलून अजून आय आयटी मुंबई केले नाही याबद्दल हायसे व्यक्त केले.
असा प्रस्ताव आम्ही पाठवतोय असे लगेच फडणवीसांचे वक्तव्य आले. फडणवीसांच्या शब्दांवर आता त्यांचा स्वतःचाही विश्वास नसावा.

# महाराष्ट्रद्वेषी भाजप

# महाराष्ट्रद्वेषी भाजप

ज्या पक्षाची मातृसंस्था महाराष्ट्रात आहे (नागपूर अजून तरी महाराष्ट्रात आहे, वेगळे विदर्भ राज्य निर्माण होत नाही तोवर तरी), त्या राज्याची एवढी असूया असण्याचे कारण काय?

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमच्या कार्यालयावरील फलक इंग्रजीमध्येच आहे

#महाराष्ट्रद्वेषी भाजप

मुंबई महापालिका शिवसेनेकडेच होती त्यामुळे शिंदेंचा उत्साह वाढून लागला आहे. तर इतर जिल्ह्यांतही भाजपविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. तिकडे कोकणात निलेश विरुद्ध नितिश राणे सामना जोरात सुरू. मज्जा येणार.
अजितराव थोडे पेचात पडले आणि काकांचा उत्साह वाढलाय.

एकनाथ शिंदेंसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोकणात राणे वि. राणे आणि हिंगोलीत तानाजी मुटकुळे वि. संतोष बंगार अशा कुस्त्या चाललात.

ठाण्यात तर शिंदे वि चव्हाण अशी मोठ्या रकमेची कुस्ती आहे.

ये तो होना ही था. अनेकांनी हे आधीच सांगितलं होतं की भाजप विरोधी पक्ष संपवतोय. शिवसेना फोडल्यावर शिंदे सेनेचा नंबर आहे. अजित पवारांचं काय करतात ते कळेलच.

हे फेसबुक पेज धमाल करतंय
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पोस्ट

मुंबईचा महापौर हिंदु होणार असा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला, आणि हिंदुत्वाची ॲलर्जी असलेल्या तमाम लांगूलचानवाद्यांच्या पोटात मळमळ सुटली… हिंदू, मराठी असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न मविआ कडून सुरू झाला…
मराठी माणूस हिंदू नाही?
मराठी माणसाला हिंदुत्वाबद्दल आस्था नाही?
कॉंग्रेसला तर हिंदुत्वाचं वावडंच आहे, पण उद्धव ठाकरेंनाही शेलार यांचा विचार झोंबला? मुंबईचा महापौर हिंदू हवा की नको हे उध्दव ठाकरे यांनी जाहिर करायलाच हवे!
मुंबईकर जनतेची भावना शेलार यांनी बोलून दाखवली आहे.

या पोस्टला ३००पेक्षा थोडे जास्त वर उचललेले अंगठे आहेत. ५५० पेक्षा अधिक हसले आहेत. आणि कमेंट्स १२०० आहेत.

यांच्या आणखी काही पोस्ट्स
भाजपाची शतकाने सुरुवात
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपाने विजयाची सुरूवात शतकाने केली आहे.
भाजपाचे ३ नगराध्यक्ष व १०० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
पुन्हा भाजपाच ठरणार नंबर १
ये तो एक झांकी है
जिप, महापालिका बाकी है!

ताजी पोस्ट - मविआ फुटणार.

त्यांना ममदानी आणि सादिक खान सुद्धा नकोत.
लंडनपाठोपाठ आता न्यूयॉर्कची वाट लागणार असं सगळे whats app uncle aunties म्हणताहेत

>> ताजी पोस्ट - मविआ फुटणार>> फुटत नाही पण घर्षण चालूच आहे. कालच्या भाऊ भाऊ भेटीने सिल्वर ओकवरच्या काकांनाही चिंता लागली आहेच. कोस्टल रोडवरचे ट्राफिक वाढले आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
पण महायुतीला तडे जाताहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे पडसाद जाताहेत दिल्लीपर्यंत. अगोदरच अजितदादा, पार्थने शहांची डोकेदुखी वाढवली आहे, त्यांना युतीत आणण्यात तेच पुढे होते. सोडवा आता तिढा.

मोहोळांनी तर काही केलंच नाही ना? Wink

मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर निलेश राणेंबद्दल बोलेन - रवींद्र चव्हाण

मुंबईचा महापौर ठरवणार दक्षिण मुंबईतील आणि उत्तर भारतीय मतदार.
आणि त्यानंतर " मराठी तरुणांना नोकरी" च्या सभा घेतल्या जाणार .

हमाम मै सब नंगे होते है, असा टोमणा नितेश राणेंनी निलेश राणेंना लगावला होता. यावर बोलताना हे उर्दू आहे, असं त्यांनी (नीलेशनी) म्हटलं. :हाहा :

हे दोघे भाऊ लोकांना येडे बनवत आहेत. नीलेश ने नितेशच्या आणि त्यांच्या बाबांच्या बेडरूममध्ये पाहिलं तर नोटांचे ढिगारे सापडतील

कुठल्याही पक्षात असोत, राणे फॅमिलीला फुटेज हवं असतं आणि मिळतं. मला तर भाऊ दोघे फार्स करतायेत वाटतं. त्यात मोठा भाऊ काय म्हणतो ते नीट समजतं तरी, धाकट्याचं बरेचदा समजत नाही, तोंडातल्या तोंडात बोलतो. डोंबिवलीत आत्तापर्यंत पालीका निवडणूकीत एकमेका विरोधात वाटेल ते बोलतात आणि नंतर युती करतात असं दिसून यायचं. यावेळी बघुया काय होतं. निवडून येणारे सगळेच भाजपत जातायेत.

https://www.instagram.com/reel/DRg2OQBDlVO/

२० तारखेला आमदारकीचं मतदान होतं. १८ ला लई लक्ष्मी फिरली. दारोदार फिरली.
आता १ तारखेला पण तुम्ही बाहेर खाटा टाकून झोपा. लक्ष्मी येणार आहे.

गुलाबराव पाटील - जलसंपदा मंत्री - शिंदेसेना.

https://www.facebook.com/reel/1550506149608173
बुलढाण्यात बोगस मतदार पकडताच शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल याने उपस्थित पोलिसाला शिवीगाळ व दमदाटी करून बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केली.

महाराष्ट्र भाजपचा पोस्टर बॉय
nitesh rane.jpg

इंग्लिश बोलू शकणारा देशपातळीवरचा असाच पोस्टर बॉय तेजस्वी सूर्या.

# लाकुडतोड्या देवाभाऊ.

मुद्रांक महानिरीक्षकांच्या निर्णयाविरूद्ध थेट उच्च न्यायालयातच अपील करण्याची तरतूद मुद्रांक अधिनियमात होती. पण आता त्यांच्या आदेशाविरूद्ध राज्य शासनाकडे म्हणजे महसूल मंत्र्यांकडे अपील करता येईल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मुद्रांक अधिनियमात दुरूस्ती करणारे विधेयक शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आले होते व ते मंजूर झाले आहे. या निर्णयाचा लाभ पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला होणार आहे.

यासंदर्भात विचारले असता पवार म्हणाले, सहकार कायद्यातही निबंधकांच्या आदेशाविरोधात शासनाकडे अपीलाची तरतूद आहे. त्याधर्तीवर मुद्रांक विभागाच्या निर्णयाबाबतही शासनाकडे अपीलाची तरतूद करावी, अशी मागणी होती. आपल्याकडे लोकशाही आहे, २३२ आमदारांचे पाठबळ महायुतीकडे आहे. त्यामुळे आम्हाला योग्य वाटणारा निर्णय घेतला

भाजप समर्थकांनो, आता तुम्हीच चक्की पिसायला जा. चक्कीत तुमची उरलीसुरली लाज, सदसद्विवेकबुद्धी, कधीच नसलेली देशभक्ती, भ्रष्टाचाराबद्दलचा आणि घराणेशाहीबद्दलचा राग अशा गोष्टी नेस्तनाबूत करून टाका

समजा ती जमीन वतनातली नसती आणि पार्थ पवार आणि कंपनीने या व्यवहार कायद्यानुरूप केला असे धरून चालले, तरी ज्या अमेडिया कंपनीचे स्वतःचे काहीच उत्मन्न नाही ती कंपनी जमीन खरेदी करायला ३० की ३०० कोटी रुपये (मला exact आकडा लक्षात नाही) कुठून आणणार होते हा प्रश्न कोणी विचारला आहे का?

अजित पवारांच्या मुलाचे बहारिनमधे लग्न आहे काही दिवसांत त्यामुळे त्यांना अशा फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसावा.

Pages