Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बटाट्याचे कटलेट मस्तच !! मला
बटाट्याचे कटलेट मस्तच !! मला आधी shallow fry इडली वाटली.
वामन राव , गोड घारगे रेसिपी - लाल भोपळा किसून घेणे. थोडे तेल घालून पॅन मध्ये थोडा शिजवून घेणे. भोपळा शिजला की त्यात थोडे मीठ , भोपळ्याचा रंग , गोडी कसा आहे त्याप्रमाणात थोडी हळद , गुळ , वेलदोडा पूड घालून अजून शिजवणे .मी पाच वाटी किसासाठी तीन वाट्या चिरलेला गुळ घेतला होता. हे सगळे गार झाल्यावर त्यात मावेल तितके गव्हाचे पीठ आणि थोडे तांदळाचे पीठ घालून पुरी साठी भिजवतो तसे घट्ट भिजवणे. अर्ध्या पाऊण तासाने घारगे करून तळणे.
आज मी मायबोलीकर अनया च्या शेतातला लाल भोपळा आणला . खूप सुंदर केशरी रंग आणि गोडवा !!!
आजचा बेत .
आजचा बेत


.
वाह! पा पु पार्टी
वाह! पा पु पार्टी
जुई , मस्त !! बघूनच तोंडाला
जुई , मस्त !! बघूनच तोंडाला पाणी सुटले
गोड घारगे रेसिपी
गोड घारगे रेसिपी
>>> @ अश्विनी११ , धन्यवाद, करून पाहीन.
@ jui.k , पा पु पा मस्त!
पाणी पुरी, शेव पुरी जबरी
पाणी पुरी, शेव पुरी जबरी दिसतायेत
घारगे चर्चा मस्त.
जुई, तिखट घारगे मस्तच.
गोड घारगे नाही आवडत.
त्या बबड्याच्या सिरियल मधे घारगे फेमस झाले होते ना?
बबड्या ची सिरीयल
बबड्या ची सिरीयल
जुई, शेवपुरी मी घेतो
जुई, शेवपुरी मी घेतो 🤤
Droolworthy !
धन्यवाद सगळ्यांना...
धन्यवाद सगळ्यांना...


इतका पेशंस नसतो
दहिवडा, मेदुवडा सांबार, चटणी
आणि हा माझा आवडता पालक राईस, ताक, कैरीचं लोणचं
माझे फोटो काही इतके aesthetic येत नाहीत
जुई जबरी मेनू आहे सगळं आवडीच.
जुई
जबरी मेनू आहे
सगळं आवडीच.
जबरी मेनू आहे
जबरी मेनू आहे
>>> +१०८
चटणी पुदिना-कोथिंबीरीची आहे का?
जबरी मेनू आहे .+3
जबरी मेनू आहे .+3
मी माझे फेवरेट वडे घेते .कसले तोंपासू दिसतायत.फोटो अँस्थेटिक नसुद्या ओ पण तोंपासू पाहिजेत.
खोबर्याच्या वड्या ,या घरी बनवलेल्या नाहीयेत बन्सीलालच्या आहेत प्रसादासाठी आणलेल्या.

थँक्यू ऋतुराज. सिमरन
थँक्यू ऋतुराज. सिमरन
वामन राव ओला नारळ कोथिंबिरीची चटणी आहे..
वाह जुई...
वाह जुई...
चारही फोटो मस्त,
aesthetic नसतांना ही बघूनच मन तृप्त करणारे फोटो असतात तुमचे!
खाण्याचे फोटो फार aesthetic
खाण्याचे फोटो फार aesthetic सुद्धा नसावेत की कृत्रिम वाटावेत.. त्यापेक्षा क्लिअर दिसणे पुरेसे.
मला तर मेदूवड्याचा आकार बघूनच पटकन तुकडा तोडून खावासा वाटतो
परवा आमच्याकडे नागदिवे होते.
परवा आमच्याकडे नागदिवे होते. नागदिव्याला दिवशी नागपंचमीप्रमाणेच चिरणे, तळणे, भाजणे वगैरे कामे करत नाहीत. म्हणून दरवर्षीचा ठरलेला मेनू मेथीची डाळभाजी, भरडा वडे, पुरणाची फळे वगैरे पदार्थ असतात. (फोटोतील शंकरपाळे एक दिवस आधीचे केलेले आहेत)
ज्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक असतो त्यादिवशी पुरण दिवे, मुटकुळे यांची आरती असते -
सर्वांचे दिवे -
- वामन राव
आज मार्गशीर्ष पहिला गुरुवार
आज मार्गशीर्ष पहिला गुरुवार होता.. त्यानिमित्ताने बनवलेला नैवेद्य..

वरण भात, पुरणपोळी, कटाची आमटी, मटकीची भाजी, लाल माठाची भाजी, शिरा, अळूवडी
चिऊकाऊ, ऋन्मेऽऽष थँक्यू
चिऊकाऊ, ऋन्मेऽऽष थँक्यू
वामनराव, खाउचे दिवे मस्तच.
वामनराव, खाउचे दिवे मस्तच. नैवेद्यातले भरडावडे तळत नाहीत का?
ते वडे शिजवलेले असतात,
ते वडे शिजवलेले असतात, नागदिव्याला दिवशी नागपंचमीप्रमाणेच चिरणे, तळणे, भाजणे वगैरे कामे करत नाहीत.
नागदिवे कालनिर्णयात नाही दिसत
नागदिवे कालनिर्णयात नाही दिसत. चंपाषष्ठी वगैरे दिसतेय.
जुइ मस्त फोटो आहेत. मेदुवडे मस्त… मला आवडतात.
गुरवारचा प्रसाद मस्त. गावात घरी गेले तेव्हा आठवले गुरवार. मी काल बासुण्दी केली होती उगीचच. तीच घेऊन गेले असते प्रसाद म्हणुन.
कितीही प्रयत्न केले तरी बाहेर मिळते त्या चवीची हिरवी चटणी बनतच नाही माझ्या हातुन
थोडा नैवेद्य आमच्याकडून..
थोडा नैवेद्य आमच्याकडून..
आप्पे मस्त दिसतायत.
आप्पे मस्त दिसतायत.

हा आमचा नैवेद्य
वॉव अगदी लालगाळू दिसत आहे.
वॉव अगदी लालगाळू दिसत आहे.
Pages