एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय एस आय साठी काम करणार्‍या भारतीयांमध्ये मुस्लिमांपेक्षा हिंदू अधिक आहेत. मुस्लिम २० % पेक्षा कमी आहेत, असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचं एक वक्तव्य सध्या गाजतंय. मी असं म्हटलंच नाही, तो व्हिडियो ए आय जनरेटेड आहे, असं दोवाल म्हणालेत.

हे वक्तव्य मार्च २०१४ मधल्या (म्हणजे मोदीपूर्व काळातील) ज्या कार्यक्रमातलं असल्याचं सांगितलं जातंय त्याचा व्हिडियो - मी अजून संपूर्ण पाहिला नाही. पण भारतीय मुस्लिमांनी दहशत वादाकडे वळू नये म्हणून काय करायला हवं याबद्दलचे त्यांचे विचार ऐकले. ते मननीय आहेत आणि भाजप व त्यांच्या समर्थकांना अजिबात पटणार नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=q6YUffwT7R4

मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी राजा राम मोहन रॉय यांना ब्रिटिशांचा एजंट म्हटलं. महात्मा फुल्यांबद्दलही नेटभगवे असंच बोलत असतात.

या आधी त्यांनी वास्को द गामाला भारताकडे यायचा मार्ग एका भारतीयानेच दाखवला आणि अमेरिकेचा शोध एका भारतीयाने लावला होता, असंही सांगितलं आहे. पुढे अर्थातच आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला .

लवकर लवकर पाठ्यपुस्तके बदलून टाका.

The National Capital Region Transport Corporation (NCRTC) has opened its Namo Bharat trains and stations to celebrate personal milestones, offering options for birthday events, pre-wedding shoots and other private occasions, an official statement said on Saturday.

Under the new policy, individuals, event organisers and photography or media companies can book static or running Namo Bharat coaches, the statement said.

Pages