
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
बालहट्टामुळे मलई बर्फी पुन्हा
बालहट्टामुळे मलई बर्फी पुन्हा एकदा…

प्लेटमधला चूरा हा चूरा नसून बालकलाकाराने केलेली सजावट आहे.
आमच्याकडे पुढच्या आठवड्यात
आमच्याकडे पुढच्या आठवड्यात होणार आहे. मुलीने डिमांड केली आहे.
सायो, खूप काळानंतर पुन्हा
सायो, खूप काळानंतर पुन्हा एकदा केली बर्फी आणि तितकीच चांगली झाली.

यावेळी मुलीने केली आणि मी फक्त देखरेख केली
अरे वा मिलिंदा, मस्त रंग आला
अरे वा मिलिंदा, मस्त रंग आला आहे.
वर्षानुवर्षे ही बर्फी करतेय,
वर्षानुवर्षे ही बर्फी करतेय, म्हंटलं आज फोटो टाकावा. मैत्रिणीकडे पूजेला जाताना रोझ फ्लेवरची मलई बर्फी करून नेली, जाताना आठवलं म्हणून फोटो काढला. वरून गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या घातल्या आहेत.

वा छान दिसतायत बर्फ्या.
वा छान दिसतायत बर्फ्या.
ही रेसिपी वर आली की ‘ आता कोण करतंय बर्फ्या’ असं मी मनात म्हणतेच म्हणते.
‘ आता कोण करतंय बर्फ्या’ असं
‘ आता कोण करतंय बर्फ्या’ असं मी मनात म्हणतेच म्हणते.
>>>> अरे!!! या बर्फीमुळे आमच्यासारखी बर्फीच्या वाटेला न जाणारी माणसं पण बर्फ्या करायला लागली. आमच्या घरी हिट्ट आहे ही. मलई बर्फी घरी बनवणाऱ्या माणसांकडे लोक फार आदरयुक्त नजरेने बघतात. सुगरण असल्याचा जबरदस्त फील येतो.
तसं नव्हे माझेमन. आता कोण
तसं नव्हे माझेमन. आता कोण करतंय म्हणजे सणासुदीचा सीझन संपला जेव्हा केली जाण्याची शक्यता जास्त असते.
संपदा सहीच.
संपदा सहीच.
आधीचे सर्व बर्फी फोटोही सॉलिड मस्त.
मी ही बर्फी करुन पाहिली पण
मी ही बर्फी करुन पाहिली पण माझी रवाळ झाली.
@मिलिंदा यांनी वरती केलेली बर्फी कशी केली ? तशा पोताची बर्फी होण्यासाठी काय साहित्य/कृती वापरले (भारतात)?
ही जरा रवाळ होणेच अपेक्षित
ही जरा रवाळ होणेच अपेक्षित असते.
मी १७व्या पानावर मंजूडीने दिलेले खालील प्रमाण वापरते.
एक कप मिल्क पावडर
पाव कप कन्डेन्स्ड मिल्क
अर्धा कप दूध
दोन टेबलस्पून पातळ केलेले तूप
माझेमन, हेच प्रमाण वापरु
माझेमन, हेच प्रमाण वापरु केलेली बर्फी .. झाली छानच होती.. पण रवाळ...दुकानात मिळते तशी साधारण.. बारीक बारीक मलाई गोळे असलेली झालेली.. पण वरती मिलिंदा यांनी टाकलेला फोटो बघुन असं वाटलं की त्यांनी काहीतरी वेगळं प्रमाणं वापरलं असावं.. मस्त गुळगुळीत बदामी रंगाची दिसतेय ती बर्फी.. म्हणुन आवर्जुन विचारलं की काही वेगळं प्रमाण आहे का
स्मिता, माझेमन तुम्ही बर्फी
स्मिता, माझेमन तुम्ही बर्फी मावेत केलीत की गॅसवर?
अनया, मी मावे मधे केली
अनया, मी मावे मधे केली
गॅसवर केली.
गॅसवर केली.
माझी पण रवाळ झालेली. मावेत
माझी पण रवाळ झालेली. मावेत केलेली.
मला वाटतं मावेत पाण्याचे प्रमाण कमी होत गेलं की फॅट वितळत नसेल आणि कोऍग्युलेट होऊ लागत असेल. गॅसवर उष्णता मिळत राहिल्याने ते शेवटी झालंच तरी प्रमाण कमी आणि एकजीव जास्त होत असेल. कारण वारंवार ढवळणे शक्य आहे.
माझीही रवाळच होते जनरली. मी
माझीही रवाळच होते जनरली. मी नेहमी मायक्रोवेव्ह मध्येच करते. कदाचित कोणती पावडर वापरता ह्याने फरक पडत असावा. जर मिल्क पावडर वापरली तर मऊ आणि मावा पावडर वापरली तर रवाळ.
मी आता एकदा हिंमत करून गॅसवर
मी आता एकदा हिंमत करून गॅसवर करून बघते.
मेथी लाडू करता अळीव आणले आहे
मेथी लाडू करता अळीव आणले आहे त्याची चव कडवट लागतेय असेच असते का लवकर सांगा प्लिज आणि तुपात तळून घेतले तरी कडसर लागले
पिहू, विचारायची जागा चुकली
पिहू, विचारायची जागा चुकली आहे.
Pihu, अळीव / हळीव कडूच असते..
Pihu, अळीव / हळीव कडूच असते...
आणि ते भिजले की फुगते.
त्यामुळे थोडेच वापरावे, जसे की एक दोन चमचे.
लवकर उत्तर हवे तुला म्हणून इथे सांगितले.
आता sayo म्हणते तसे दुसऱ्या धाग्यावर लिही.
Pages