महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा त्या मुद्द्याला सपोर्ट आहे. सुंदर म्हणजे गोरी हे समीकरण जेथे बहुतांश लोक गोरे नाहीत तेथे जितक्या लौकर बाद होईल तितके चांगले. माझा विरोध फक्त त्यावरून एखाद्याला ते गाणे सादरच करू न देण्याबद्दल आहे.

गोरी गोरी पान तसेच विंदांच्या काही रेसिस्ट कविता गाणी पूर्ण बाद करायला पाहिजेत.

तसेच लहान मुलांच्या गाण्यात देव घुसवण्याची जी खोड लागली आहे ती देखील बाद करायला पाहिजे.

उदा. देवा तुझे किती सुंदर आकाश वगैरे.

एखादी गोष्ट कळत नसेल तर ती सरळ देवाच्या नावावर का फाडतात?

बम बम बोले गाणे घ्या. इतके चांगले गाणे पण त्यातही देव आणून माती केली.

फारेन्द,

या गाण्याचे ट्रान्सलेशन करून अमेरिकेत सादर करा हे गाणे. बघा सादर करण्याला आक्षेप घेतात का नाही.

सटल लेव्हलला डेरोगेटरी, रेसिस्ट, डिस्क्रिमिनेटरी असलेली शेकडो गाणी असतात. अनेक वर्षं त्यांचा अर्थही ध्यानात न घेता गात ऐकत आलो. आता पटकन आठवलं ते 'किसीका तो देना होगा, दे दो मेरा साथ'..

देव अल्ला खुदा भगवान डिलीट करायचे झाले तर हजारो गाणी टाकावी लागतील

टाकायलाच पाहिजेत विशेषतः मुलांची गाणी.

म्हणजे त्यात एक असते : जगातील निसर्गातील अनेक आश्चर्ये सांगायची. मग च्यायला हे देवा तू कसे केलेस असा प्रश्न विचारायचा. किंवा हे कुणीतरी केले आहे असा दावाच करायचा. म्हणजे उदा.

संदीप खरेची देते कोण हे गाणे पहा.

कशाला हवे कोण देते? आणि कुणी द्यायलाच पाहिजे का? Randomly का नाही होऊ शकत या गोष्टी. त्यांचा जसाच्या तसा स्वीकार का करता येत नाही?

का हे लहान मुलांच्या मनावर सतत बिंबवत राहायचे की हे सगळे इंटेलिजन्ट design आहे. का उद्या काही वाईट झाले तरी त्यानेच केले असे म्हणता यावे याची ही पूर्व तयारी असते?

जाऊ दे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय आहे. अवांतर नको.

देवापेक्षा देवा भाऊच्या करणी वर बोलू

आता एकीला वाटत असेल की आपल्या भावाची होणारी बायको गोरी असावी तर त्यात काय बिघडलं? तिच्या मताचा पण आदर करा ना.त्या गाण्यात ती पुढे बोलले काय की काळी बायको नको करू ती चांगली नसते दिसायला. उगीच काय पण जिलेब्या पाडत बसायच्या.

पान खाईके गाणं कसं वाईट आहे. कारण पान खाणारे लोक पान खात नाहीत ते चघळून सार्वजनिक ठिकाणी थुंकून लाल करतात. रेल्वे यांची आवडती जागा. प्रत्येक स्टेशनला दर पंधरा दिवसांनी हे लाल डाग काढण्यासाठी लोक ठेवले आहेत. पाणी मारून कोपरे कोपरे ब्रशने घासून लाल डाग काढावे लागतात.

हा धागा वाचला जातोय, हे यानिमित्ताने कळलं Wink
आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळू.
नितीशकुमार यांच्या जनता दलाच्या नेत्याने एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय.

सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणूक लढवली जाणार असल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निकालानंतर एनडीएचे आमदार एकत्र बसून मुख्यमंत्र्यांची निवड करणार असल्याचे सांगितले, त्यामुळे नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अमित शाह यांनी केलेल्या विधानाला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्याची पार्श्वभूमी आहे.नितीश कुमार यांचे निकटवर्तीय तथा जेडीयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी नुकतीच दी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना एक सूचक विधान केले. “महाराष्ट्रात जे घडले ते बिहारमध्ये अजिबात घडणार नाही. नितीश कुमार यांचा शिंदे होणारच नाही”,

अमित शहांच्या भाजपला कुबड्यांची गरज नाही या विधानावर लोकसत्तेचा अग्रलेख
त्यावरची वाचकपत्रे

त्यातले एक
भाजप कुबड्यांवर नव्हे, स्वबळावर’ ही बातमी आणि ‘कुबडी’ माझी सांडली गं… हे संपादकीय (२८ आणि २९ ऑक्टोबर) वाचले. अमित शहा यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरांतून टीका होणे साहजिकच आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा पत्रकारांसमोर समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणतात ‘‘ठाकरेंना कुबड्यांचा अर्थ कळत नाही, अर्थ कळला असता तर त्यांची अशी अवस्था झाली नसती. मित्र म्हणजे कुबड्या नसतात’’. खरे म्हणजे त्यांनी कुबड्या म्हणजे मित्र नसतात असे म्हणायला हवे होते! एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष जर भाजपसाठी कुबड्या नसतील तर अमित शहा कुणाला उद्देशून कुबड्या म्हणाले हे फडणवीसांनी सांगावे. शहांना कुबड्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि निवडणूक आयोग तर अभिप्रेत नाहीत? कारण या कुबड्या नसत्या तर लोकसभेच्या निवडणुकीतील सार्वत्रिक वाताहतीनंतर विधानसभा निवडणुकीत एवढे देदीप्यमान यश मिळाले असते का?

डॉ संपदा मुंडे प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताहेत एका गरीब बिचार्‍या भगिनीच्या मृत्यूचं भांडवल विरोधक का करत आहेत? त्यांचं हे वक्तव्य ऐकून स्वर्गातून सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन , पूजा चव्हाण, पालघरमध्ये मुलं पळवणारे असल्याच्या संशयावरून मारले गेलेले दोन साधू यांनी फडणवीसांवर पुष्पवृष्टी केली.

शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे - मैं कहना चाहता हूं, मराठी मेरी मातृभूमी मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है. एक बार माँ मर गयी तो चलेगा लेकिन मौसी मरना नहीं चाहिए क्यों कि मौसी ज्यादा प्यार करती है.

यांना शेवटी पुतना मावशीच आवडायची.

अनवधानाने बोलून गेलो असं त्यांनी दुसर्‍या दिवशी म्हटलं. महाराष्ट्र संपवण्यासाठीच शिंदेंनी शिवसेना फोडली याची अशी कबुली त्यांनी दिली.

दुबार मतदार राज्यांतून निवडून आलेले सहा दाखले राजसाहेबांनी दाखवले त्यात चार उबाठाचे उमेदवार. मग फायदा कुणाचा झाला? कुणाची बाजू घेताहेत?

तरीसुद्धा त्या मतदारसंघात ठाकरे सेनेचे उमेदवार निवडून आले. म्हणजे दुबार मतदार ईप्सित साध्य करण्यात कमी पडले. आता आशिष शेलारांनी सुद्धा दुबार मतदार आहेत, हे मान्य केलं. राहुलच्या पत्रकार परिषदेनंतर गोली मारो ठाकुरनी सुद्धा राहुलच्या सदोष मतदार याद्यांच्या आरोपाला दुजोरा दिला होता. तसंच हे.

दुबार मतदार राज्यांतून निवडून आलेले सहा दाखले राजसाहेबांनी दाखवले त्यात चार उबाठाचे उमेदवार. मग फायदा कुणाचा झाला? कुणाची बाजू घेताहेत?पण त्यांनी कोणाच्या पारड्यात वजन टाकलं हे असं कळतं?
Wink

चला दुबारी आहेत हे मान्य केलं नेत्यांनी, आयोगाने.
.. पण त्यांनी कोणाच्या पारड्यात वजन टाकलं हे असं कळतं?

छान! आता दुबार नाव असलेला मतदाराला दोनपैकी कुठल्या मतदारसंघात मतदान करता येईल?

म्हणजे त्यांनीच निर्णय फिरवला असं समजायचं. बोटाची शाई बेमालूम पुसण्याचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले आहे हे मान्य करावे लागेल.
पुढचा शोध घ्यावा लागेल .....
एकाच मतदार संघात काही मतदारांची नावे दोनदा आली आहेत म्हणजे दुबार, फक्त ती एकाच केंद्रावर ( polling booth) नसून दोन वेगवेगळ्या केंद्रावर आहेत. मतदान करायला गेल्यावर तिथे आयोगाच्या तीन चार कर्मचाऱ्यांशिवाय मागच्या रांगेत काही पक्षांचेही स्वयंसेवक याद्यांवर खुणा करतात. त्या नंतर तपासून काही दुबार मतदारांनी मतदान केलेले दिसते का पाहिले आहे का? आणि ते आयोगाला दाखवून तेवढी मते नियमाने बाद करवून घेतली पाहिजेत.
( हे मी त्रयस्थपणे लिहीत आहे. कुणा पक्षाच्या बाजूने नव्हे. )

विरोधी पक्ष इतके दिवस मतदार यादीतील घोळ उघडकीस आणत होते तेव्हा मुख्य निवडणूक आयोग शपथपत्र मागत होते, न दिल्यास माफी मागावी लागेल अशी धमकी देत होते. आज निवडणूक आयोगाने दुबार नावे असल्याचे कबूल केले आहे. आत माफी मागण्याची पाळी त्यांच्यावर आली. सगळीच कामे विरोधी पक्षांनी करायची असेल तर निवडणूक आयोग हवेच कशाला?
सध्या भुईमूग काढायची कामे चालू आहे. भुईमूग काढताना पावसामुळे निंदनी करता न आल्याने उगवलेला काँग्रेसही काढून टाकत आहे. वेळ लागतोय पण शेत साफ होतंय. निवडणूक आयोगाला सुद्धा मतदार याद्या अशा स्वच्छ करता आल्या असत्या. आता बसले द्रविडी प्राणायाम करत दुबार मतदार शोधत.

महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांची मुलाखत पाहून डोळे पाणावले. असल्या माठ लोकांना फडव्याने कोणत्या आधारावर त्या जागी बसवले असेल ते समजायला जास्त डोके लागत नाही.
सगळ्यात भारी म्हणजे आयुक्तांच्या बरळण्यावर टीका करणार्‍या ट्वीटखाली भक्तांचा रिस्पॉन्स : 'ओबीसी पुढे गेलेले तुम्हाला पहावत नाहीत'

अन हो.
महाराष्ट्राशी संबंध नाही, पण ममदानी जिंकला.

>>>मतदार यादीतील घोळ>>
म्हणजे मतदार त्या पत्त्यावर असून यादीत नाव नसणे. किंवा पत्ता चुकीचा असणे आणि यादीतून नाव रद्द केलेले असणे , एकाच पत्त्यावर बरेच मतदारांची नावे असणे आणि त्यांनी नवा पत्ता दिलेला नसणे.
मी दुबारची तपासणी यांबद्दल लिहिलं आहे.

निवडणूक आयोगाच्या गंमतीजंमतींबद्दल वेगळा धागा आहे.
https://www.maayboli.com/node/63835

मी त्या संपूर्ण मुलाखतीची लिंक शोधतोय. मला तुकड्यातुकड्यांत दिसली.

देवाभाऊ बिहारात प्रचार करताहेत.

मी मुंबईहून आलो आहे आणि इथे यायच्या आधी मी चौपाटीवर तीन लाख बिहारी लोकांसोबत छट पूजा केली.
पुढल्या पाच वर्षांत हा बिहार बद ललेला दिसेल. त्याचा समावेश आगास* राज्यांत होईल.
मोदीजींचं सगळ्या राज्यांवर प्रेम आहे. महाराष्ट्रावर आहे. पण सगळ्यात जास्त प्रेम बिहारवर आहे.

* देवाभाऊंनी पिछडाचा विरुद्धार्थी शब्द म्हणून अगडा वापरला. मग मी पण मागासचं आगास केलं. #भाषासमृद्धी

आज पुणेकरांचा पुन्हा एकदा हेवा वाटतोय. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन ३०० कोटींना खरेदी केली. बाजारभावानुसार जमीन १८०० कोटींची आहे. तिथे आयटी पार्क काढायचाय असं सांगत ५०० रुपये स्टँप ड्युटीत भागवलं.
या कंपनीचं पेड अप कॅपिटल तब्बल १ लाख रुपये आहे . उत्पन्न काही नाही.
कंपनीची ९९% मालकी पार्थ पवारांची आहे. पण या प्रकरणाच्या एफ आय आर मध्ये नाव मात्र १% शेअर होल्डर दिग्विजय पाटील यांचं आहे.
आत्याबाईंनी सुद्धा भाच्याची पाठराखण केली आहे.

Pages