महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

पर्यावरणाचे महत्व समजल्यामुळे आम्ही बिगरी पासून बीई पर्यंत शाळेत / कॉलेजात चालत चालत चालत जात होतो.

सध्या मंगलप्रभात लोढा सुद्धा चर्चेत आहेत.

साहित्य संघ मंदिराचे सदस्यत्व. कबुतरखाना. दादरचा कबुतरखाना बंद झाल्यावर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन केले. शिवाय प्रत्येक विभागार एकेक कबुतरखाना उघडावा अशी इच्छाही व्यक्त केली आहे. आता महायुती इतक्या प्रचंड मतांनी Wink आणि जागांनी निवडून आली आहे. तर त्यांना हवे ते निर्णय घ्यायचा हक्क आपण दिलाच आहे. आता पुढल्या निवड णुकांपर्यंत बोलायचं नाही. यालाच लोकशाही म्हणतात. पण ठाकरे गटाच्या नतद्रष्ट शिवसैनिकांनी हा नवा कबुतरखाना उद्ध्वस्त केला. यांना नव्या जनसुरक्षा कायद्याखाली आत टाकायला हवं आणि त्यांचे प्रमुख म्हणून उद्धव व आदित्य यांनाही आत टाकावं.

लोकवस्तीपासून ५०० मीटर अंतरावर कबुतरखाने तयार करता येतात का याची चाचपणी मुंबई मनपा करीत आहे. अशा जागा विभागस्तरावर शोधल्या जात आहेत. - लोकसत्ता बातमी.
मुंबई मनपाची निवडणूक या मुद्द्यावर लढली जाईल की काय?

आयटीसे लच्या निनावी ट्रोलपासून देवाभाऊंच्या लाड क्या आमदारापर्यंत सगळ्यांची विचारसरणी कशी एकसारखीच!

जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का?"

भाजपचे कर्नाटकमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या तोंडीही हीच भाषा होती. ते शाखेत जायचे. पडळकर जायचे का माहीत नाही.

नव्याने कबुतर खाना जिकडे करतील तिकडे 1 किमी परिघात ससाणा खाना उघडले तर शहर वासियांच्या प्रकृति स्वास्थसाठी त्रासदायक ठरलेल्या कबुतराची ब्याद आपोआप निघुन जाईल.

मुंबई मनपाची निवडणूक या मुद्द्यावर लढली जाईल की काय? >>> त्यासाठी अमित साटमने हिरवी मुंबई, मुस्लिम महापौर हा मुद्दा घेतला आहे की .

नव्याने कबुतर खाना जिकडे करतील तिकडे 1 किमी परिघात ससाणा खाना उघडले तर शहर वासियांच्या प्रकृति स्वास्थसाठी त्रासदायक ठरलेल्या कबुतराची ब्याद आपोआप निघुन जाईल.>>> ससाणाखाना नाही, ससाणा शेल्टर उघडायचा फक्त. ससाणे कबुतरखान्याला ससाणाखाना बनवतीलच आपसूक Biggrin

ससाणे खाना यशस्वी होणार नाहीत कारण
१. ससाणे यांचा लंच टाईम दुपारी अडीचला असतो आणि एक कबुतरं पुरते.
२.दोन ससाणे एकाच एरियात राहू शकत नाहीत. चार चौरस किमीटरांत एकच राहू शकतो.
३. फारसा फरक होणार नाही. पक्ष्यांचे ह़ृदय फुफ्फुस खाऊन बाकीचं कलेवर तो टाकून देतो. मग मांजरं वाढतील.

मंगल प्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. हजारो कोटींची त्यांची मालमत्ता आहे. साहजिकच त्यांच्या कुटूंबियांचे आलिशान बंगले असणार त्यामुळे कबुतरांचा उपद्रव त्यांना अजिबातच जाणवणार नाही.

नवीन Submitted by Srd on 19 September, 2025 - 15:46>>>
@Grok please verify point 1 & point 3 Biggrin

असो, लहानपणी एक कोडे सर्रास विचारले जायचे, अचानक आठवले.

एका तारेवर ५ पक्षी बसलेले असतात, एक शिकारी बंदूकीने नेम धरतो नी बार टाकतो. एका पक्षाला गोळी लागते. आता तारेवर किती पक्षी उरले??

https://x.com/Dev_Fadnavis/status/1318591924568084480
मला गावकऱ्यांनी सांगितले की, श्री उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होण्यापूर्वी याच गावात आले होते. बियाणे देऊ म्हणाले, पण जे दिले ते उगवले नाही. २५,००० रुपये हेक्टरी मदतीबाबत बोलले, पण मा. राज्यपालांनी दिलेले ८००० रुपये तेवढे मिळाले.
#ओला_दुष्काळ #MaharashtraRains

कालची बातमी
Briefing the media after today’s Cabinet meeting, he said over 31 lakh farmers have been sanctioned financial aid of 2,215 crore rupees, . २२१५ कोटी भागिले ३१ लाख = ७१४५ रुपये. आता ही प्रति शेतकरी मदत झाली. जर शेतकर्‍याची जमीनधारणा सरासरी १ हेक्टरपेक्षा जास्त असेल तर हेक्टरी मदत सात हजाराच्याही खाली जाईल.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले.

शेतकऱ्यांना मदतीचे किट पाठविले, त्यावर शिंदें आणि प्रताप सरनाईक चे फोटो छापलेले. वर शिंदे म्हणतो, मदत बघा, फोटो बघू नका

Pages