Submitted by ललिता-प्रीति on 9 September, 2025 - 01:56
ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान बोस्टनवारीत तिथल्या माबोकरांना भेटण्याची इच्छा आहे.
(Marlborough मध्ये मैत्रिणीकडे माझा मुक्काम असणार आहे.)
१-२ नोव्हेंबरचा वीकांत मोकळा आहे.
कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा.
(गटगची चाचपणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा धागा काढायचा माहिती नाही. त्यामुळे 'लेखनाचा धागा'च सुरू केला आहे.)
फक्त बोस्टनमधलेच माबोकर असं काही नाही, आसपासचे कुणी येऊ शकणार असतील त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.
२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा - असं डोक्यात आहे.
तर, इथे कृपया सांगावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नक्की दिवस/वेळ आणि व्हेन्यू
नक्की दिवस/वेळ आणि व्हेन्यू कळला तर त्यानुसार यायचं ठरवता येईल.
मी दहा वर्षांपूर्वी तिथून
मी दहा वर्षांपूर्वी तिथून बाहेर पडलो नाहितर मलाही यायला आवडले असते >>> तू एकदा एखादे ठिकाण सोडून दहा वर्षे झाली की परत तेथे जात नाहीस का?
नक्की दिवस/वेळ आणि व्हेन्यू
नक्की दिवस/वेळ आणि व्हेन्यू कळला तर त्यानुसार यायचं ठरवता येईल. >>>
)
येस!
शनिवार (१ नोव्हें) ठरवावा असं मला वाटतंय. लांबून येणार्यांना सोयीचं ठरावं (असं टवणे सरच्या पोस्टीवरून दिसतंय.)
मैत्रिणीशी बोलून सांगते.
व्हेन्यूही तिलाच विचारते. इथेही बोस्टनकरांनी व्हेन्यू सुचवा.
(१० वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्यांनी सुचवला तरी चालेल
तू एकदा एखादे ठिकाण सोडून दहा
तू एकदा एखादे ठिकाण सोडून दहा वर्षे झाली की परत तेथे जात नाहीस का? Happy >>
मलाही थंडी सहन होत नाही
इथेही बोस्टनकरांनी व्हेन्यू सुचवा. >> आधीचे सगळे समर मधे झाल्यामूळे क्विंसी मार्केटच्या आसपास केले होते. एकदाच कधी तरी ऑक्टोबरमधे न्यू हँपशायरम्धे गेलो होतो. तुला थंडी सोसत नसेल तर Marlborough खंडीअभर रेस्तॉरंटस आ हेत तिथे इनडोअर करू शकता. जर्सीवरून येणार्यांना पार बॉस्टन्पर्यंत यावे लागणार नाहि नि कॅनडावरून येणार्यांना ४९५ वरून येता येईल.
Venue कोणत्या प्रकारचा हवा
Venue कोणत्या प्रकारचा हवा आहे त्याप्रमाणे सुचवता येईल. Indian restaurants मधे फारसे जाणे होत नाही पण Northborough मधल्या Peppers मधे गेलो होतो एकदा ते चांगले वाटले होते.
Indian पेक्षा बार असलेल्या
Indian पेक्षा बार असलेल्या अमेरिकन मधे गेलाय तर अधिक वेळ बसता येते
कोटी अध्याॠत नाहिये 
बार असलेल्या अमेरिकन मधे
बार असलेल्या अमेरिकन मधे गेलाय तर अधिक वेळ बसता येते >>>
बार असलेल्या अमेरिकन मधे
बार असलेल्या अमेरिकन मधे गेलाय तर अधिक वेळ बसता येते >>>
मैत्रिणीशी बोलून सांगते.
मैत्रिणीशी बोलून सांगते.
>>>
मैत्रिणीच्या घरीच गटग करण्याचा तिने प्रस्ताव मांडला आहे. आरामात गप्पाटप्पा करत बसता येईल.
मैत्रीण माबोकर आहेच, (आयडी - कौवा) त्यामुळे तो देखील प्रश्न नाही.
१ नोव्हें शनिवारी तिथल्या महाराष्ट्र मंडळाचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि मैत्रीण कमिटीवर असल्याने तिला तिकडे जायचंय. पण आपण तिच्या घरी जमू शकतो.
१ नोव्हें, सकाळी ११:०० पासून - अशी गटगची वेळ ठरवावी म्हणते.
लांबून येणार्यांना चालेल का, सांगा.
(आयडी - कौवा) >> आले लक्षात
(आयडी - कौवा) >> आले लक्षात कोण ते, आमचा दंडवत सांगा
टोरोंटो ऑटवा मधून कोणी
टोरोंटो ऑटवा मधून कोणी ड्राइव्ह करत येणार का? कार पूल (ड्रायव्हिंग) करायला कोणी आहे?
>>> मैत्रिणीच्या घरीच गटग
>>> मैत्रिणीच्या घरीच गटग करण्याचा तिने प्रस्ताव मांडला आहे
)
मैत्रिणीच्या घरी बार आहे का? - असं असामी विचारेल!
(ग्लासात दगड टाकून ड्रिंक्सची पातळी वाढवावी लागेल का? कौवे तसं करतात असं ऐकून आहे.
टवणे सर, तुझी किंग्सटन वरून
टवणे सर, तुझी किंग्सटन वरून कारपूलची कल्पना फार आवडली होती, आणि यायचा विचार करत होतो. पण त्याच दिवशी इथल्या दिवाळी गटगला हो म्हणून बसलो आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर नाही शक्य होणार.
मैत्रिणीच्या घरी बार आहे का?
मैत्रिणीच्या घरी बार आहे का? >>
बार गाडणारे बरेच जण असतील तिथे असे दिसतेय 
ग्लासात दगड टाकून ड्रिंक्सची
ग्लासात दगड टाकून ड्रिंक्सची पातळी वाढवावी लागेल का? कौवे तसं करतात असं ऐकून आहे. >>>
अमितव, लापि वाजवू काय?
लापि नाही वाबॅ म्हणजे
लापि नाही वाबॅ म्हणजे वास्तवाचा बॅंड -
काय पडलंय त्या गटगत अमित. आपण देशी कपडे घालून अवघडणार, पोरं उपकार केल्यासारखी यायला तयार होणार, त्यांना 'चला रे, चला रे' करून तोंडाला फेस येणार, तरीही चिडचिड दाबून It सारखे हसतमुख दाखवत राहणार, जॅकेट व स्नोशूज घालून बर्फात उभं राहून दोन फुलबाज्या उडवणार, मग थंड समोसा, पनीरची भाजी व नानचे तुकडे खात पॉलिटिक्स किंवा स्टॉक्स बद्द्ल तेच तेच बोलणार, पुन्हा पोरांना गाडीत घालून घरी. हॅपी दिवाली, हॅपी दिवाली - उगी आप्लं!
अस्मिता करेक्ट चित्र उभं
अस्मिता
करेक्ट चित्र उभं राहिलं.
अमित, सांग बरं, पिपाणी हवी का बँड?
अस्मिता नक्की अमितला जा
अस्मिता नक्की अमितला जा सांगतेय कि नको तेच कळेनासे झालय आता
दिवाळी गटगचे वास्तव मांडले
दिवाळी गटगचे वास्तव मांडले आहे, म्हणजे तिकडे न जाता त्याने ह्या माबोच्या गटगला जावे. मी कुठेच जात नाहीये पण मला आयडिया खूप येतात.
तुमच्या राज्यातली दिवाळी गटग
तुमच्या राज्यातली दिवाळी गटग अशी असतात तर!
'मुलं आईबापाचं कुठलंच सांगणं फेस व्हॅल्यूला घेत नाहीत' अशी एक यक् कोटी सुचली - अमितला आवडेल.
ग्लासात दगड टाकून ड्रिंक्सची
ग्लासात दगड टाकून ड्रिंक्सची पातळी वाढवावी लागेल का? कौवे तसं करतात असं ऐकून आहे >>>
जॅकेट व स्नोशूज घालून बर्फात उभं राहून दोन फुलबाज्या उडवणार >>>
मग थंड समोसा, पनीरची भाजी व नानचे तुकडे खात पॉलिटिक्स किंवा स्टॉक्स बद्द्ल तेच तेच बोलणार >>> यातला "थंड" वाला भाग सोडला तर सर्व देशी गटगचे सार (पदार्थ नव्हे) यात आले. गरम केलेला समोसा तोंडापर्यंत येईपर्यंत गार होत असेल या सीझनला कॅनडात तर माहीत नाही. होठोंपे आते आते हाथोंसे सागर छूट जाता है ची नॉन-गजल अरसिक व्हर्जन.
अमितला आवडेल >>>
'मुलं आईबापाचं कुठलंच सांगणं
'मुलं आईबापाचं कुठलंच सांगणं फेस व्हॅल्यूला घेत नाहीत' अशी एक यक् कोटी सुचली - अमितला आवडेल. >>
फेस इट! आय एम पनि!
अस्मिता, दिवाळी गटग बद्दल जाम हसलो. जॅकेट घालून फुलबाज्या आणि जुलमाचा रामराम पोरं.
बघतो.
इट्स मोअर ऑफ अ सोशल गॅदरिंग
इट्स मोअर ऑफ अ सोशल गॅदरिंग दॅन अ फेस्टिव्हिटी ...
अरे वा! ललिताप्रीती, कौवा
अरे वा! ललिताप्रीती, कौवा आयडी का? त्यांचा सामाजिक विषयावरच्या चर्चेतला एक उपरोध पटकन कळणार नाही असा प्रतिसाद आणि त्यामुळे ते नाव लक्षात होतं. पुढे तुमच्याच दिवाळी अंकात त्यांचा अमेरिकन राजकारणावरचा लेख वाचून त्याबद्दल मी अभिप्राय दिला होता आणि तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवला होता.
मायबोलीवर लिहीत का नाही किंवा पुन्हा लिहा, असं काही म्हणणार नाही. पण त्यांनी लिहिलं तर वाचायला आवडेल. ( कसलं घोळदार लिहिलंय मी हे !)
हो, भरत, तीच ती कौवा.
हो, भरत, तीच ती कौवा.
पण गेला काही काळ ती सो.मि.पासून दूर आहे.
मायबोलीवर तरी येत जा असं मी तिला नेहमी म्हणत असते.
१ नोव्हेंबर नक्की ना?
१ नोव्हेंबर नक्की ना?
कोणकोण येतंय मग शेवटी?
पत्ता कळवण्याचे करावे.
मला नाही जमणारे. मजा करा,
मला नाही जमणारे. मजा करा, फोटो काढा. वृत्तांत लिहा.
बाई, तुम्ही २ ला आनंद भाटे
बाई, तुम्ही २ ला आनंद भाटे कार्यक्रमाला जाताय का?
नाही, आमची दिवाळी पहाट प्रे
नाही, आमची दिवाळी पहाट प्रे.मा.कडे झाली.

>>>>>>>>>फोटो काढा. वृत्तांत
>>>>>>>>>फोटो काढा. वृत्तांत लिहा.
गेल्या एका गटगत ना कोणी फोटोखाली, लिहीले होते ना विचारले असता, कोणी सांगीतले. 
+१ आणि फोटोत कोण - कोण आहेत हे प्लीज नीट लिहा.
Pages