Submitted by ललिता-प्रीति on 9 September, 2025 - 01:56
ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान बोस्टनवारीत तिथल्या माबोकरांना भेटण्याची इच्छा आहे.
(Marlborough मध्ये मैत्रिणीकडे माझा मुक्काम असणार आहे.)
१-२ नोव्हेंबरचा वीकांत मोकळा आहे.
कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा.
(गटगची चाचपणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा धागा काढायचा माहिती नाही. त्यामुळे 'लेखनाचा धागा'च सुरू केला आहे.)
फक्त बोस्टनमधलेच माबोकर असं काही नाही, आसपासचे कुणी येऊ शकणार असतील त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.
२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा - असं डोक्यात आहे.
तर, इथे कृपया सांगावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोचले पोचले.
पोचले पोचले.
अपुर्या झोपेमुळे डोकं बधीर होतं.
आज जरा बरं आहे. पहिला विचार वृ लिहिण्याचाच आला. आज-उद्यात लिहिते.
बोस्टनला जाण्याचं नक्की
बोस्टनला जाण्याचं नक्की झाल्यावर डोक्यात पहिला विचार आला- गटग करता येईल का? १५-२० दिवस तो तसाच डोक्यात रेंगाळत राहिला. बोस्टन आणि आसपास कोण, कुठे राहतं, त्यांना आपल्याला भेटण्यात रस असेल का, गेला काही काळ माझा माबो अभ्यास कमी पडत असल्याने मी त्यांना भेटून नक्की काय करणार, वगैरे प्रश्न (उगीच) पडले होते.
मग एक दिवस हा धागा काढण्याची कल्पना सुचली. म्हटलं, विचारून बघू, गटग झालं तर बेस्टच, नाही तर नाही. तरी धागा काढण्याआधी कौवाला विचारलं. कारण पुन्हा तेच, कोण कुठे राहतं, बाहेर भेटायचं असेल तर ट्रान्स्पोर्ट इ. कसं काय, वगैरे माहिती नव्हतं. कौवाने उत्साहाने ग्रीन सिग्नल दिला, ड्रायव्हर ड्यूटीची तयारी दर्शवली. धाग्यावर अनपेक्षितपणे पटापट प्रतिसाद आले, आणि तिकडे कौवाने तिच्या घरी गटग करण्याचा प्रस्ताव दिला.
काय खरंच गटग घडणार होतं?
काय अमेरिका मला सुखद धक्का देणार होती?
पुढचे काही दिवस प्रवासाची तयारी करण्यात गेले. जमेल तसं धाग्याकडे नजर टाकत होते. निघायच्या आधी ३-४ दिवस स्वातीला फेसबुकवर मेसेज टाकला आणि माझा फोन नं कळवून ठेवला. तिच्याशी WhatsApp संपर्क झाला. Looking forward to वगैरे म्हणून झालं. पण इतर किती डोकी जमतील काही अंदाज येत नव्हता. बरेच दिवस वाटत होतं, फक्त स्वाती, लंबूटांग आणि अजय असे तिघंच येतील.
काय जास्त मेंबर्स येणार होते?
काय अमेरिका मला सुखद धक्का देणार होती?
पुढचे काही दिवस प्रवास करण्यात आणि “वा, वा, अमेरिका” करण्यात गेले. फोनवरून वेब ब्राऊजिंगचा माझा एकूणच आनंद असल्यामुळे गटगचा धागा पाहिला गेलाच नाही. शिवाय एव्हाना गटग संयोजनाची जबाबदारी बरीचशी कौवाच्या अंगावर ढकलून मी निवांत झाले होते. स्वातीने त्या निवांतपणातून मला बाहेर काढलं, तेव्हा मी शिकागोहून परत बोस्टनला निघाले होते. मग पोचल्यावर दुसऱ्या दिवशी तिला पत्ता वगैरे कळवला.
एकीकडे फोनवर हा धागा उघडला. तर तिथे अजयचा मोठा खोकला-मेसेज दिसला. म्हटलं, झालं, म्हणजे एक खात्रीचा मेंबर गळाला. आता उरला लंबूटांग. मग त्याला माबो संपर्कातून फोन नं कळवला. तो त्याच्या स्पॅममध्ये गेला. पण मी मनाच्या हजेरीने त्याला विपूत सांगून ठेवलं होतं. त्यामुळे त्याच्याशीही WhatsApp संपर्क झाला. ग-ट-ग या तीन अक्षरांशी प्रामाणिकपणा राखून मी, स्वाती, लंबूटांग असे तीन मेंबर्स तरी आता नक्की होते. तर स्वातीचा मेसेज आला, की वृंदाताई, एबाबा आणि अश्विनी सातव सुद्धा येत आहेत. पैकी अश्विनी कौवाच्या संपर्कात होतीच. वृंदाताईचा आयडी मागे कधीतरी पाहिल्याचा आठवत होता. एबाबा मात्र माहिती नव्हता. पण त्यामुळे माबो गटगची एक चेक-बॉक्स टिक होणार होती. ती म्हणजे नवीन ओळखी! त्यात सरप्राइज पे सरप्राइज म्हणजे सिंडरेला येतेय असं स्वातीकडून कळलं.
आता काय-बिय कुछ नही, गटग खरंच होणार होतं!
आणि १ नोव्हेंबर उजाडला. पहिली एंट्री वृंदाताई आणि एबाबा. आम्ही हाय, हॅलो करून अशा काही गप्पा छाटायला सुरुवात केली की पहिल्यांदाच भेटतोय हे कुणाला सांगूनही खरं वाटलं नसतं. माबो गटगची आणखी एक चेकबॉक्स टिक!
जरा वेळाने स्वाती आणि सिंडरेला पोचल्या. मी सिंडरेलाला याआधी एकदा भेटले होते. भेटून किती काळ लोटला याचं सिंडरेलाने सांगितलेलं एक परिमाण फारच आवडलं - तू कशी दिसतेस ते विसरायला झालंय. या परिमाणानुसार आम्ही भेटून बराच काळ झाला होता इतकं नक्की. कारण मी सिंडरेलाला खरंच ओळखलं नसतं.
स्वातीला पहिल्यांदाच भेटले. पण फेसबुकवर फोटो पाहिले असल्याने ओळखता आलं. आणि पुन्हा तेच, आम्ही हाय, हॅलो करून अशा काही गप्पा छाटायला सुरुवात केली की वाटावं, वर्षानुवर्षं एकमेकींना ओळखतोय. एकीकडे खाऊवाटप सुरू होतं. आल्याच्या वड्या, cranberry सॉस, दुबई चॉकलेट्स, पेढे, बर्फी, बोस्टनच्या स्थानिक बेकरीतल्या पीकन (उच्चार?) कुकीज/केक्स? (त्याला नेमकं काय म्हणायचं ते मला शेवटपर्यंत कळलं नाही, पण चव पहिल्या पाच मिनिटांत कळली आणि आवडली.) शिवाय स्वातीने मला दोन पुस्तकं भेट दिली. जोडीला क्रोशाचे बुकमार्क्स. उत्साहाला _/\_
मग लंबूटांग आला. १४-१५ वर्षं जुन्या आयडीमागची व्यक्ती किती तरूण असू शकते त्याचं उत्तम उदाहरण. दिवा घे रे. जरा वेळाने कौवा सर्वांना हाय-हॅलो करून बाहेर पडली. एकीकडे रानोमाळ गप्पा सुरू झाल्या होत्या. लहान मुलांचं संगोपन, माबो गॉसिप, कॉर्पोरेट कंपन्यांमधलं राजकारण, अनिश्चितता, माबो गॉसिप, पुस्तकं, गाणी ऐकणे, लता-आशा, माबो गॉसिप, आवडी-निवडी, जनरेशन गॅप, माबो गॉसिप, छापील पुस्तकं आणि ऑडिओ बुक्स, माबो गॉसिप... गप्पांच्या अधेमध्ये जेवणं झाली.
उपस्थितांची जेवणं होताहोता अजय आला. त्याचा हॅलोवीन-स्पेशल मास्क भारी होता. त्याचं जेवण होईतोवर अश्विनी आली. मागे कधीतरी आठवत होतं की मायबोलीवर बऱ्याच अश्विनी असल्यामुळे मी हिला बोस्टनची अश्विनी म्हणूनच लक्षात ठेवलं होतं. पण ‘लक्षात ठेवलं होतं’ म्हणायला तिच्याशी कधी बोलणं झाल्याचं मात्र आठवत नव्हतं. पण त्याने काही फरक पडला नाही. आ. अ. का. ग. छा. सु. के. की....
लंबूटांग सर्वात तरुण संसारी पुरुष असल्याने लवकर निघाला. बाकीचे मध्यमवयीन पुढे गप्पा छाटत बसले. चार साडेचारला मात्र सगळे उठले. स्वातीला सर्वात लांब जायचं होतं.
काय गटग खरंच पार पडलं होतं?
काय अमेरिकेने मला सुखद धक्का दिला होता?
तर, हो!
तेव्हा, thank you, लोकहो.... तुमचा बहुमूल्य विकांत खर्च करून आलात, मला खूप भारी वाटलं. आयडीमागच्या आणखी काही नव्या चेहऱ्यांशी ओळख झाली. इथून पुढे त्यांच्या पोस्टी ‘ऐकू’ही येतील.
काय इथे वृत्तांताचा शेवट होणार?
हो, तो सुद्धा एका आवडत्या वाक्याने - “मायबोली रॉक्स!’’
ता. क. : श्रीयुत कौवाने नंतर एका वाक्यात सारांश ऐकवला - “सगळी गँग छान होती, प्रत्येकजण स्मार्ट-विटेड.’’ त्याला म्हणावंसं वाटलं - या एकदा, दाखवीन मजा!
झकास वृत्तांत!
झकास वृत्तांत!
चुकल्याची हळहळ! पुढच्यावेळी नक्की. नॉर्थ ईस्ट लोक ठरवा आता!
>>> लहान मुलांचं संगोपन, माबो
>>> लहान मुलांचं संगोपन, माबो गॉसिप, कॉर्पोरेट कंपन्यांमधलं राजकारण, अनिश्चितता, माबो गॉसिप, पुस्तकं, गाणी ऐकणे, लता-आशा, माबो गॉसिप, आवडी-निवडी, जनरेशन गॅप, माबो गॉसिप, छापील पुस्तकं आणि ऑडिओ बुक्स, माबो गॉसिप..

मस्त वृत्तांत.

एकच करेक्शन - लंबूटांग आमच्या आधी आला होता.
पेढे आणि बर्फी कोणी आणली आणि कुठे लपवली होती?
>>>
काय गटग खरंच पार पडलं होतं?
काय अमेरिकेने मला सुखद धक्का दिला होता?
<<<
हे नवीन मराठी दिसतंय - इकडे पोचलेलं नाही अजून.
फा मराठी सीरियल्समधून आयात करायचा प्रयत्न करत असतो, पण आम्ही दाद दिलेली नाही.छान आहे वृत्तांत. मिस केलं हे
छान आहे वृत्तांत. मिस केलं हे गटग. पुढच्या वेळी नक्की!
>>> चार साडेचारला मात्र सगळे
>>> चार साडेचारला मात्र सगळे उठले.
म्हणजे २-३ तास(च) गप्पा असं तुम्ही हेडरमध्येच लिहिलं होतं, ताई.
जोक्स अपार्ट, लांबून येणार म्हणून मला ललिता - आणि तिच्यामार्फत कौवा, अश्विनी, सगळ्यांनीच आदल्या आणि/किंवा गटगच्या रात्री त्यांच्याकडे मुक्कामाला राहायचा अगदी प्रेमाने आग्रह केला होता.
मायबोली रॉक्स हेच अंतिम सत्य!
नाहीतर सिंडरेला/व्हीताई-एबाबा नेहमीचे आहेत, पण ललिताला भेटायला बॉस्टनपर्यंत जावं असं आम्हाला उत्स्फूर्तपणे वाटतं काय, ओळखदेख नसताना कौवा घरी बोलावून साग्रसंगीत आतिथ्य करते काय, एका फोनवर घरी निघालेली अश्विनी गाडी वळवून हजर होते काय, असे ऋणानुबंध एका ऑनलाइन फोरमवरच्या कॅज्युअल गप्पांमधून जुळतात हे कोणाला सांगून खरं वाटणार नाही! ❤️
फा मराठी सीरियल्समधून आयात
फा मराठी सीरियल्समधून आयात करायचा प्रयत्न करत असतो, पण आम्ही दाद दिलेली नाही >>>
मस्त वृ ल-प्रि!
उपस्थितांची जेवणं होताहोता अजय आला. त्याचा हॅलोवीन-स्पेशल मास्क भारी होता >>> त्याचा फोटो नाही काढला? अनलेस ते काळे गोल त्यावरूनच इन्स्पायर्ड होते
ललिताला भेटायला बॉस्टनपर्यंत जावं असं आम्हाला उत्स्फूर्तपणे वाटतं काय, ओळखदेख नसताना कौवा घरी बोलावून साग्रसंगीत आतिथ्य करते काय, एका फोनवर घरी निघालेली अश्विनी गाडी वळवून हजर होते काय >>> हे मी या टोन मधे वाचले.
पण सिरीयसली, त्या बदाम वाल्या वाक्याशी पूर्ण सहमत. मी ही तो अनुभव घेतलेला आहे किमान २-३ शहरांत.
>> काय गटग खरंच पार पडलं होतं
>> काय गटग खरंच पार पडलं होतं?
काय अमेरिकेने मला सुखद धक्का दिला होता?>> हे मला हिंदी सिरीयल्स सारखं ऐकू आलं. कोणाच्या तरी चेहर्यावर मागे पुढे करत झूम आणि तेच वाक्य दोन तीनदा म्हणायचं.
धूमधडाका
धूमधडाका
या एकदा, दाखवीन मजा! >>>>
या एकदा, दाखवीन मजा! >>>>
मस्त वृत्तांत ललिता !
एका ऑनलाइन फोरमवरच्या कॅज्युअल गप्पांमधून जुळतात हे कोणाला सांगून खरं वाटणार नाही! >>>> ह्याला अनुमोदन !
धूमधडाका
धूमधडाका
सायो, ते तसंच आहे
आधी तुकड्या-तुकड्यात वृ लिहिणार होते. पण म्हटलं लिहायला आधीच उशीर झालाय, पूर्ण करून टाकू.
मुक्तपीठ टाइप लिहिण्याचाही विचार केला होता. (पहिल्यांदाच अमेरिकेला गेले... मला मुलगी नसल्याने अमेरिकेत जावई नव्हते... पण त्या प्रेमाची भरपाई माबो गटगने केली , वगैरे)
फा मराठी सीरियल्समधून आयात करायचा प्रयत्न करत असतो, >>> गटगला येऊ न शकल्याने त्याला वाईट वाटू नये म्हणून ती वाक्यं टाकली आहेत... आणि शेवटी पु.ल. चेक बॉक्स टिक केलीय ती सुद्धा त्यासाठीच
(त्याने मला विपू करून वाईट वाटल्याचं कळवलं होतं.)
स्वाती, बदाम वाक्याला +१००. 'भारी वाटलं' असं म्हणाले तिथे मला असंच सगळं अभिप्रेत होतं.
पेढे आणि बर्फी कोणी आणली >>> शप्पथ! कुणी आणली मला आठवत नाही. बहुतेक अश्विनीने का?
छान झालेलं दिसतंय गटग. अगदी
छान झालेलं दिसतंय गटग. अगदी माबो गटगं व्हावं तसंच. सगळ्यांचे वृत्तान्त
आवडले.
लंबूटांग इतके मागे उभे आहेत की ते प्रत्यक्ष नसून त्यांचा फोटो आहे, असं वाटतंय.
वृंदाताई आणि एबाबा यांची नावं याआधीही गटगच्या वृत्तान्तांतच वाचली आहेत. म्हणजे माबोवर हल्ली न येणारी मंडळी गटगला येण्याची परंपराही पाळली.
काय ने सुरू होणारी वाक्ये हा हिंदी जाहिरातींच्या शब्दशः मराठी भाषांतराचा परिणाम. क्या आपके टूथपेस्ट में नमक है? काय...
रिक्षा - मायबोली गणेशोत्सव स्पर्धेसाठी मी लिहिलेली जाहिरात
>> पेढे आणि बर्फी कोणी आणली
>> पेढे आणि बर्फी कोणी आणली
मी येता येता Indian store मधून घेऊन आलो होतो.
बाकी गटग भारी झाल हो. अमेरिका
बाकी गटग भारी झाल हो. अमेरिका भेटीचा व्रृतांत केव्हा लिहीणार (मुक्तपीठ नाही ललिता स्टाईल)
ल-प्रि
ल-प्रि
लहान मुलांचं संगोपन, माबो गॉसिप, कॉर्पोरेट कंपन्यांमधलं राजकारण, अनिश्चितता, माबो गॉसिप, पुस्तकं, गाणी ऐकणे, लता-आशा, माबो गॉसिप, आवडी-निवडी, जनरेशन गॅप, माबो गॉसिप, छापील पुस्तकं आणि ऑडिओ बुक्स, माबो गॉसिप.. >>>
यातली खोच पुन्हा वाचताना कळाली 
मी येता येता Indian store
मी येता येता Indian store मधून घेऊन आलो होतो. >>>
अच्छा... सॉरी हां, माय मिस्टेक!
स्वातीने बघ कसं आल्या-आल्या आल्याच्या वड्यांचं वाटप सुरू केलं, तसं केलं असतंस तर पक्कं लक्षात राहिलं असतं
त्याचा फोटो नाही काढला? अनलेस
त्याचा फोटो नाही काढला? अनलेस ते काळे गोल त्यावरूनच इन्स्पायर्ड होते
>>>
नाही ना, राहिलाच... त्याला यायला जरा उशीर झाला होता, पण येणार हे त्याने कौवाला फोन करून कळवून ठेवलं होतं.
आल्या-आल्या त्याला आम्ही आग्रहाने लगेच जेवायला बसवलं. तेव्हा त्याने मास्क कुठे दडवून ठेवला तो नंतर बाहेर निघालाच नाही.
आणि काळे गोल फारच साधे म्हणायचे, त्या मास्कवरून इन्स्पायर्ड आर्ट अवघड होतंं
(No subject)
स्वातीने गिफ्ट दिलेली पुस्तकं आणि बुकमार्क्स
Pages