नोव्हेंबरमध्ये बोस्टन गटग

Submitted by ललिता-प्रीति on 9 September, 2025 - 01:56

ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान बोस्टनवारीत तिथल्या माबोकरांना भेटण्याची इच्छा आहे.
(Marlborough मध्ये मैत्रिणीकडे माझा मुक्काम असणार आहे.)

१-२ नोव्हेंबरचा वीकांत मोकळा आहे.

कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा.
(गटगची चाचपणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा धागा काढायचा माहिती नाही. त्यामुळे 'लेखनाचा धागा'च सुरू केला आहे.)
फक्त बोस्टनमधलेच माबोकर असं काही नाही, आसपासचे कुणी येऊ शकणार असतील त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.
२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा - असं डोक्यात आहे.

तर, इथे कृपया सांगावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दहा वर्षांपूर्वी तिथून बाहेर पडलो नाहितर मलाही यायला आवडले असते >>> तू एकदा एखादे ठिकाण सोडून दहा वर्षे झाली की परत तेथे जात नाहीस का? Happy

नक्की दिवस/वेळ आणि व्हेन्यू कळला तर त्यानुसार यायचं ठरवता येईल. >>>
येस!
शनिवार (१ नोव्हें) ठरवावा असं मला वाटतंय. लांबून येणार्‍यांना सोयीचं ठरावं (असं टवणे सरच्या पोस्टीवरून दिसतंय.)
मैत्रिणीशी बोलून सांगते.
व्हेन्यूही तिलाच विचारते. इथेही बोस्टनकरांनी व्हेन्यू सुचवा.
(१० वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्यांनी सुचवला तरी चालेल Proud Light 1 )

तू एकदा एखादे ठिकाण सोडून दहा वर्षे झाली की परत तेथे जात नाहीस का? Happy >> Lol मलाही थंडी सहन होत नाही Wink

इथेही बोस्टनकरांनी व्हेन्यू सुचवा. >> आधीचे सगळे समर मधे झाल्यामूळे क्विंसी मार्केटच्या आसपास केले होते. एकदाच कधी तरी ऑक्टोबरमधे न्यू हँपशायरम्धे गेलो होतो. तुला थंडी सोसत नसेल तर Marlborough खंडीअभर रेस्तॉरंटस आ हेत तिथे इनडोअर करू शकता. जर्सीवरून येणार्‍यांना पार बॉस्टन्पर्यंत यावे लागणार नाहि नि कॅनडावरून येणार्‍यांना ४९५ वरून येता येईल.

Venue कोणत्या प्रकारचा हवा आहे त्याप्रमाणे सुचवता येईल. Indian restaurants मधे फारसे जाणे होत नाही पण Northborough मधल्या Peppers मधे गेलो होतो एकदा ते चांगले वाटले होते.

मैत्रिणीशी बोलून सांगते.
>>>
मैत्रिणीच्या घरीच गटग करण्याचा तिने प्रस्ताव मांडला आहे. आरामात गप्पाटप्पा करत बसता येईल.
मैत्रीण माबोकर आहेच, (आयडी - कौवा) त्यामुळे तो देखील प्रश्न नाही.
१ नोव्हें शनिवारी तिथल्या महाराष्ट्र मंडळाचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि मैत्रीण कमिटीवर असल्याने तिला तिकडे जायचंय. पण आपण तिच्या घरी जमू शकतो.
१ नोव्हें, सकाळी ११:०० पासून - अशी गटगची वेळ ठरवावी म्हणते.
लांबून येणार्‍यांना चालेल का, सांगा.

टोरोंटो ऑटवा मधून कोणी ड्राइव्ह करत येणार का? कार पूल (ड्रायव्हिंग) करायला कोणी आहे?

>>> मैत्रिणीच्या घरीच गटग करण्याचा तिने प्रस्ताव मांडला आहे
मैत्रिणीच्या घरी बार आहे का? - असं असामी विचारेल! Proud
(ग्लासात दगड टाकून ड्रिंक्सची पातळी वाढवावी लागेल का? कौवे तसं करतात असं ऐकून आहे. Proud )

टवणे सर, तुझी किंग्सटन वरून कारपूलची कल्पना फार आवडली होती, आणि यायचा विचार करत होतो. पण त्याच दिवशी इथल्या दिवाळी गटगला हो म्हणून बसलो आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर नाही शक्य होणार. Sad

ग्लासात दगड टाकून ड्रिंक्सची पातळी वाढवावी लागेल का? कौवे तसं करतात असं ऐकून आहे. >>> Biggrin

अमितव, लापि वाजवू काय?

लापि नाही वाबॅ म्हणजे वास्तवाचा बॅंड -
काय पडलंय त्या गटगत अमित. आपण देशी कपडे घालून अवघडणार, पोरं उपकार केल्यासारखी यायला तयार होणार, त्यांना 'चला रे, चला रे' करून तोंडाला फेस येणार, तरीही चिडचिड दाबून It सारखे हसतमुख दाखवत राहणार, जॅकेट व स्नोशूज घालून बर्फात उभं राहून दोन फुलबाज्या उडवणार, मग थंड समोसा, पनीरची भाजी व नानचे तुकडे खात पॉलिटिक्स किंवा स्टॉक्स बद्द्ल तेच तेच बोलणार, पुन्हा पोरांना गाडीत घालून घरी. हॅपी दिवाली, हॅपी दिवाली - उगी आप्लं! Lol

दिवाळी गटगचे वास्तव मांडले आहे, म्हणजे तिकडे न जाता त्याने ह्या माबोच्या गटगला जावे. मी कुठेच जात नाहीये पण मला आयडिया खूप येतात. Proud

तुमच्या राज्यातली दिवाळी गटग अशी असतात तर! Proud

'मुलं आईबापाचं कुठलंच सांगणं फेस व्हॅल्यूला घेत नाहीत' अशी एक यक् कोटी सुचली - अमितला आवडेल. Lol

ग्लासात दगड टाकून ड्रिंक्सची पातळी वाढवावी लागेल का? कौवे तसं करतात असं ऐकून आहे >>> Lol

जॅकेट व स्नोशूज घालून बर्फात उभं राहून दोन फुलबाज्या उडवणार >>> Lol

मग थंड समोसा, पनीरची भाजी व नानचे तुकडे खात पॉलिटिक्स किंवा स्टॉक्स बद्द्ल तेच तेच बोलणार >>> यातला "थंड" वाला भाग सोडला तर सर्व देशी गटगचे सार (पदार्थ नव्हे) यात आले. गरम केलेला समोसा तोंडापर्यंत येईपर्यंत गार होत असेल या सीझनला कॅनडात तर माहीत नाही. होठोंपे आते आते हाथोंसे सागर छूट जाता है ची नॉन-गजल अरसिक व्हर्जन.

अमितला आवडेल >>> Lol

'मुलं आईबापाचं कुठलंच सांगणं फेस व्हॅल्यूला घेत नाहीत' अशी एक यक् कोटी सुचली - अमितला आवडेल. >> Lol
फेस इट! आय एम पनि! Proud

अस्मिता, दिवाळी गटग बद्दल जाम हसलो. जॅकेट घालून फुलबाज्या आणि जुलमाचा रामराम पोरं.
बघतो.

अरे वा! ललिताप्रीती, कौवा आयडी का? त्यांचा सामाजिक विषयावरच्या चर्चेतला एक उपरोध पटकन कळणार नाही असा प्रतिसाद आणि त्यामुळे ते नाव लक्षात होतं. पुढे तुमच्याच दिवाळी अंकात त्यांचा अमेरिकन राजकारणावरचा लेख वाचून त्याबद्दल मी अभिप्राय दिला होता आणि तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवला होता.
मायबोलीवर लिहीत का नाही किंवा पुन्हा लिहा, असं काही म्हणणार नाही. पण त्यांनी लिहिलं तर वाचायला आवडेल. ( कसलं घोळदार लिहिलंय मी हे !)

हो, भरत, तीच ती कौवा.
पण गेला काही काळ ती सो.मि.पासून दूर आहे.
मायबोलीवर तरी येत जा असं मी तिला नेहमी म्हणत असते.

१ नोव्हेंबर नक्की ना?
कोणकोण येतंय मग शेवटी?
पत्ता कळवण्याचे करावे. Happy

>>>>>>>>>फोटो काढा. वृत्तांत लिहा.
+१ आणि फोटोत कोण - कोण आहेत हे प्लीज नीट लिहा. Happy गेल्या एका गटगत ना कोणी फोटोखाली, लिहीले होते ना विचारले असता, कोणी सांगीतले. Happy

Pages