Submitted by ललिता-प्रीति on 9 September, 2025 - 01:56
ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान बोस्टनवारीत तिथल्या माबोकरांना भेटण्याची इच्छा आहे.
(Marlborough मध्ये मैत्रिणीकडे माझा मुक्काम असणार आहे.)
१-२ नोव्हेंबरचा वीकांत मोकळा आहे.
कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा.
(गटगची चाचपणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा धागा काढायचा माहिती नाही. त्यामुळे 'लेखनाचा धागा'च सुरू केला आहे.)
फक्त बोस्टनमधलेच माबोकर असं काही नाही, आसपासचे कुणी येऊ शकणार असतील त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.
२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा - असं डोक्यात आहे.
तर, इथे कृपया सांगावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझाही पास प्रिती
माझाही पास प्रिती
एकट्याने एव्हडी गाडी (८००किमी वन वे) चालवणे एका वीकेंडसाठी अवघड आहे.
स्वातीला पत्ता कळवलाय.
स्वातीला पत्ता कळवलाय.
लंबूटांग, मैत्रेयी, विजय कुलकर्णी,
तुमच्यापैकी कोणी येतंय का?
तर संपर्कातून पत्ता कळवते.
गल्लेवाले येणार म्हणाले होते
गल्लेवाले येणार म्हणाले होते ना? बाकी बॉस्टनवाले लोकल कोणी नाहीत का येणार्यांत? आयुर्वेदिक अश्विनी वगैरे?
हो मला जमेल यायला.
हो मला जमेल यायला.
ओह गुड!
ओह गुड!

ललिताला भेटायची उत्सुकता आहेच, पण इतकं लांब यायचं तर मोअर द मेरिअर!
स्वातीला पत्ता कळवलाय. >>>
स्वातीला पत्ता कळवलाय. >>> गुड गुड. मला वाटले ३-४ लोक एअरपोर्टवर शेवटी विद्रोही गटग करून परत जाणार की काय
मला यायला आवडेल पण शनीवारी
मला यायला आवडेल पण शनीवारी माझी नाटकाची प्रॅक्टीस आहे १:३० वाजेपर्यंत. मार्लबरोला पोहोचेपर्यंत २:३० तरी होतील. तोपर्यंत तुमची निघायची वेळ होईल.

११ च्या ऐवजी थोडी उशीराची वेळ (१२/१२:३०) ठरली तर मी प्रयत्न करीन प्रॅक्टीसवरून लवकर निघण्याचा.
नाहीतर नुसते बाय करायला यावे लागेल.
मार्लबरोला पोहोचेपर्यंत २:३०
मार्लबरोला पोहोचेपर्यंत २:३० तरी होतील. तोपर्यंत तुमची निघायची वेळ होईल. Happy >> काय विश्वास आहे गटग वर अश्विनी हा !
हो, थोडी उशीराची वेळ चालेल.
हो, थोडी उशीराची वेळ चालेल.
काय विश्वास आहे गटग वर
काय विश्वास आहे गटग वर अश्विनी हा !
>> कुठला विश्वास विवादास्पद आहे, असाम्या? गटग सुरू होण्यावरचा, वेळेवर संपण्याचा की मूळात होण्याचाच?
प्रयत्न करून पाहिला. पण नाही
प्रयत्न करून पाहिला. पण नाही चेंज करता येत आहे नाटकाची वेळ.
अगदीच काही कारणाने शनिवार ऐवजी रविवार ठरला तर नक्की येईन.
नाहीतर भेटू पुढच्या वेळेस.
अरे! ११:०० 'पासून' म्हणतेय,
अरे! ११:०० 'पासून' म्हणतेय,
जमेल तसं थोडं उशीरा आलात तरी चालेल.
घरीच जमायचं आहे ना.
>गल्लेवाले येणार म्हणाले होते
>गल्लेवाले येणार म्हणाले होते ना?
माझं येणे सध्यातरी अशक्य आहे (येत्या १ दिवसात काही चमत्कार झाला तर येईन)
मी गेले १० दिवस एका विचित्र आजाराने ग्रस्त आहे. बोलणे अचानक बंदच झाले आहे. घशातून आवाज फुट्त नाही. दिवसातला बहुतेक वेळ ठणठणीत असतो. पण अचानक इतकी मोठी खोकल्याची ढास येते की श्वास अडकतो आणि फुफ्फुस परत यायला काचकूच करतेय. आपल्याला आता श्वास घ्यायचाय पण फुफ्फुस मी काही हलणारच नाही असे म्हणते, आणि ते आपल्याला कळते, तेंव्हा सगळं ब्रम्हांड दिसतं. खोकल्याचा आवाज इतका घाणेरडा आहे की चारचौघात तोंड दाखवाय्ची सोय नाही.
दोन रात्री ९११ ला कॉल करता करता थांबलो. ५ दिवस अँटीबायोटीक चालू आहे पण फरक नाही म्हणून उद्या दुसरे सुरु करण्याची शक्यता आहे. रात्री खोकल्याच्या आवाजाने माझ्यासकट घरातल्या सगळ्यांच्या झोपा उडालेल्या आहेत आणि चिडचिडे झालो आहोत. डॉ कडे दोनदा जाऊन आलो . आणखी काही चाचण्या सांगितल्या आहेत. घशात नळी घालून, पाहून झाले आहे. कोव्हीड किंवा फ्लू नाही हे चाचण्यांवरून सिद्ध झाले आहे.
पण २-३ मिनिटात सगळे सुरळीत होते आणि माझ्या कडे बघून हे असे काही आत्ताच झाले यावर विश्वास बसणार नाही. आवाज मात्र बंद आहे तो बंदच राह्तोय.
गटग जोरात होऊन जाऊ दे., म्हणजे मला लवकर बरं वाटेल.
ता.क. आता हे सगळं वाचल्यावर उगीच गंभीर वगैरे होऊ नका. तुम्ही इतकं वाचलंच आहेत तर मी माझी एक रिक्षा फिरवून घेतो. खरा कॉमेडीयन कुठल्याही परिस्थितीत विनोदाची साथ सोडत नाही म्हणे. माझी आणि अमेरिकेन वैद्यकीय व्यवस्थेची लडाई खूप जूनी आहे. आणि ती इतक्या थराला गेली की माझ्या नावावर एका वैद्यकीय विश्वविक्रमाची नोंद आहे.
https://www.youtube.com/watch?v=zgQpm5ucdmw
लय भारी! म्हणजे तुमचा विक्रम
लय भारी! म्हणजे तुमचा विक्रम आणि व्हीड्यू!
तुम्ही जॉब वगैरे शोधत असाल तर डायव्हरसिटी हायर म्हणून उत्तम स्कोप आहे. संगणक तंत्रज्ञ, मराठी साईटचा वेमा, आणि प्रायव्हेट पार्ट दाखवून पैसे कमावणारा हे रेझ्युमेत वाचून लोक चक्कर येऊन पडतील. इतकी डायव्हरसिटी कुठे मिळणार! तरी बरं तुमचं लग्न झालेलं आहे! लग्नाच्या बाजारात.... असो!
तर लवकर बरे व्हा आणि यातून आणखी दोन चार सेटचे मटेरियल तुम्हाला मिळो या शुभेच्छा!
अरे बापरे अजय, तुम्हाला लवकर
अरे बापरे अजय, तुम्हाला लवकर बरं वाटो.
भावना येतील ना पण?
तेवढीच त्यांची सुटका...खोकल्यावरच्या (म्हणजे खोकल्याबद्दलच्या, खोकून झाल्यानंतरच्या नव्हेत) एकदोन कविता त्यांच्याबरोबर पाठवू का?
व्हीडिओ बघते जराशाने.
व्हिडिओ भारी आहे! _/\_
व्हिडिओ भारी आहे!
_/\_
अजय
अजय
अजय, feel better soon! या
अजय, feel better soon! या लढाईचा दांडगा अनुभव आहे. Video is hilarious.
एन्जॉय गटग लोक्स. खा, प्या मजा करा. आमची आठवण काढा. वृत्तांत लिहा.
गटग झालं.
गटग झालं.
मस्त झालं.
खूप बडबड, गप्पा, खाणंपिणं.
उपस्थित सदस्य -
वृंदा ताई, एबाबा, लंबूटांग, स्वाती, सिंडरेला, अजय, अश्विनी.
वृत्तांत येतीलच.
वृंदा ताईने बरेच फोटो काढलेत.
बघा. व्ही ताई अशा सुमडी में
बघा. व्ही ताई अशा सुमडी में कोंबडी आहेत. एकदम उपस्थितच.
मायबोलीचं गटग कुठेही आणि
मायबोलीचं गटग कुठेही आणि कोणाहीसोबत झालं तरी मायबोलीचं गटगच असतं. पोटभर खाणं, मनभर गप्पा आणि पिशवीभर वानोळा हे जणू काही अलिखित नियम असल्यासारखे कसोशीने पाळले जातात!
(नियम लिखित असते तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. असो.)
तर हे गटगही त्याला अपवाद नव्हतं. मी शुक्रवारी हाफ डे टाकून कनेटिकटमध्ये सिंडरेलाकडे दुपारीच पोचले. त्या दिवशी हॅलोवीन असल्यामुळे दुपारनंतर लहानमोठ्या भुतांच्या झुंडी ट्रिक ऑर ट्रीटिंगला निघतात, त्याआधी मला सुखरूप पोचायचं होतं.
'व्हॉट हॅपन्स इन कनेटिकट स्टेज इन कनेटिकट' ही प्रसिद्ध म्हण तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे तिथे गप्पा काय मारल्या ते लिहीत नाही, पण संध्याकाळी 'मुंबई कट्टा' नावाच्या उपाहारगृहात गेलो हे लिहायलाच हवं.
जगाच्या पाठीवर कुठेकुठे देशी, त्यातही मराठी पदार्थ जगात भारी मिळतात हे न शोधता काहीतरी लोकल पदार्थ खाऊन कौतुकं सांगणार्यांबद्दल त्याशिवाय तुच्छता कशी व्यक्त करणार?! मुळात ते पदार्थ चवीला कसे लागणं अपेक्षित आहे हे आपल्याला माहीत नसतं - म्हणजे आपण जे खाऊन आपलं आहारक्षितिज किती विस्तारलं या कल्पनेने हुरळून आपला स्नॉबिश कोशन्ट वाढवत बसलो आहोत, ते लोकल पब्लिकच्या मते ते बेकार असूच शकतं की नाही!
आम्ही घेतलेला बटाटवडा आणि चहा मात्र अस्सल चवीचा होता. त्या बोचर्या थंडीत खवळलेल्या भुकेला त्याने जो स्वर्ग दाखवला, की ज्याचं नाव ते! यजमानीणबाई मूळच्या मालवणी आहेत हे कळल्यावर मालवणी फिश करी घेणं आलं. तीही अर्थातच सुंदर होती. शिवाय त्या अगदी जातीने हवं-नको बघून गेल्या.
तिथून जवळच्या लोकल कॉमेडी क्लबमधला कार्यक्रम बघायला गेलो. तिथे एखादं तरी ड्रिंक घेणं मस्ट असतं असं कळलं. लोक त्यामुळे विनोदांना अधिक मनमोकळी दाद देतात म्हणे. हे ऐकून माझा स्नॉबिश कोशन्ट मी मनातल्या मनात वाढवून घेतला - खोटं कशाला बोला! टीपापाकरांच्या विनोदांना मिळणारी दाद अनुकूल असो वा प्रतिकूल, पण मनमोकळी नसते असं कोण म्हणेल!
माझा प्रत्यक्ष स्टॅन्डअप कॉमेडी बघायचा हा पहिलाच अनुभव. मजा आली. नेग्रोनी भारी मिक्स केली होती - पोट भरलं होतं तरी मन मोकळं होण्याइतकी!
रात्री जागून गप्पा झाल्या. दुसर्या दिवशी पटापट आवरून चहा घेऊन बाहेर पडलो. ललिताने अकरा वाजता या म्हटलं होतं, आम्ही अकरा म्हणजे बरोब्बर बाराला पोचलो! वाटेत घरून डब्यात भरून नेलेली साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती. (लोकल पदार्थ खाऊन कौतुकं सांगणार्यांबद्दल त्याशिवाय...)
कौवाकडे पोचलो तेव्हा ललिता सस्मित स्वागताला पुढे आली. वृंदाताई आणि एबाबा अगोदरच तिथे पोचलेले होते, त्यांच्याशी गप्पा मारत एक अनोळखी गृहस्थ बसले होते. ते उभे राहिल्याबरोबर ते लंबूटांग असल्याचं आम्ही ओळखलं. मायबोलीवरचा सर्वात रिअलिस्टिक आयडी घेतल्याबद्दल यांना पारितोषिक मिळायला हरकत नाही.
कौवा आणि ललिताने मायबोलीच्या लौकिकाला साजेशी खाण्यापिण्याची सोय करून ठेवली होती. गेल्यागेल्या समोर फराळाच्या पदार्थांचा 'टॉवर' वाट पाहात होता. खिचडीने पोट भरलेलं असूनही त्यांना मान न देणं अशक्य होतं! कौवाला त्यांच्या मराठी मंडळाच्या कुठल्याशा कार्यक्रमाचं निवेदन करायला जायचं होतं, पण तिची आमची निदान ओझरती भेट झाली. ती, ललिता, लंबू या सगळ्यांना आपण प्रथमच भेटतो आहोत हे खरंच वाटत नव्हतं इतक्या सहज गप्पा त्यांच्याशी झाल्या. कौवाचे यजमानही अतीशय अगत्यशील आहेत. ते आमच्या गप्पांच्या आड न येता आमच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष पुरवत होते. अजय गल्लेवाले जरा उशीराने येणार आहेत असं कळलं म्हणून आम्ही जेवायला बसलो. खिचडी, कढी, मुगाची उसळ, कोबीची भाजी, फरसबीची भाजी, पोळ्या असा 'होलसम' बेत होता. दिवाळी पार्ट्यांतल्या मसालेदार आणि यंव पनीर/त्यंव सूखा वगैरे साच्यातल्या मेनूंना विटलेल्या जिभेला हे मराठमोळे घरगुती चवदार पदार्थ भलतेच सुखावणारे होते. (अणि लोकल पदार्थ खाऊन कौतुकं सांगणार्यांबद्दल त्याशिवाय...)
यथावकाश अजय आले, आयुर्वेदाचार्य अश्विनी (आम्ही जुन्या मायबोलीत हिरव्या शाईत लिहायची म्हणून हिला 'हिरवी अश्विनी' म्हणत असू) नाटकाची प्रॅक्टिस आटोपून वाट वाकडी करून आली. गप्पांचं सत्र सुरूच होतं, वृंदाताईंनी आठवणीने काढले म्हणून काही फोटो निघाले, नाहीतर त्याबद्दल विसरायलाच झालं होतं.
अजयचा आवाज अजूनही जरा घोगराच वाटत होता, पण निदान त्यांना खोकल्याचा फार त्रास न होता गप्पा मारता आल्या. 'तूही स्टॅन्डअप कॉमेडी करायला हरकत नाही' असं त्यांनी मला बसल्याबसल्या सुचवलं.
मराठी साहित्य, वाचनाची सवय, ललिताचे संपादनाचे अनुभव, अजयचे स्टॅन्डअप कॉमेडीचे अनुभव, मराठी नाटकं, इथपासून ते बालसंगोपन, सध्याचं जॉब मार्केट, सिंडरेलाचे व्यवस्थापनातले अनुभव, झालंच तर मायबोलीवरच्या काही जुन्या तर काही ताज्या घडामोडी असे सगळे विषय जवळपास एकाच वेळी डिस्कस होत होते. वाहत्या पानांवर चारपाच निरनिराळी चॅनल्स एकाच वेळी लागलेली असतात तसेच!
शेवटी चार - साडेचारला सिंडरेलाचं चुकून घड्याळाकडे लक्ष गेलं आणि निघायला हवं हे एकदम जाणवलं. परतीच्या वाटेत तिच्याकडे पोहोचेतो अडीच-तीन तास आणि तिथून मला पुढे दीडेक तास असा प्रवास व्हायचा होता.
मी नेलेल्या आल्याच्या वड्या आणि जगप्रसिद्ध क्रॅनबेरी सॉसचे नमुने, वृंदाताईंनी बॉस्टनच्या कुठल्याशा बेकरीतून आणलेली जिंजर बिस्कॉटी आणि अशक्य सिनफुल आणि अफलातून चवीच्या पिकान कुकीज असा वानोळा दिला-घेतला. ललितासाठी नेलेली पुस्तकं तिच्याकडे सोपवली. 'मसाला लॅब'चा इतका प्रसार करत असल्याबद्दल क्रिश अशोककडून मी आता कमिशन मागावं म्हणते.
आम्ही इतक्या लांबून आल्याबद्दल ललिता पुन:पुन्हा आभार मानत होती, पण त्या आभाराची खरी मानकरी सिंडरेला आहे. कारण तिला येऊनजाऊन पाचसहा तासांचं ड्रायविंग झालं, आणि ती सोबत येते म्हणाली म्हणूनच माझ्या प्लॅनला बळ आलं! तिच्याकडे माहेरपण झालं ते निराळंच! त्याबद्दल प्रेमाने वगैरे बोलले तर ती मला डिसओन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण येताना उशीर झाला होता तरी तिने आठवणीने दोडके पिशवीत भरून दिले इतकं तरी लिहायलाच हवं.
सोबत ग्रूप फोटो देते आहे, त्यात काळा स्वेटर घातलेली ती मी आहे. मायबोलीवर फोटो टाकायला सर्व उपस्थितांची परवानगी घेतलेली नाही. ती त्यांनी दिली तर त्यांचीही ओळख परेड करू.
LOL....उतरा आता त्या लोकलच्या
LOL....उतरा आता त्या लोकलच्या झाडावरून!

पुढच्या वेळेस डिरेक्टली माझ्याकडे ये. तुला लोकल फूड खायला घालते(च).
मजा आली. स्वाती, सिंडीला भेटून य वर्ष लोटली होती.

सिंडीमध्ये खूप बदल जाणवला. (स्वातीमध्ये काही नाही. )
सिंडी आहे हे चटकन् लक्षात न येण्याचे कारण माझी स्मरणशक्ती हे नसून तिच्यात झालेला बदल हे असावे.
लंबूटांग, वृंदाताई, एबाबा आणि ललिताशी खूप छान गप्पा झाल्या. पहिल्यांदा भेटतोय असे वाटलेच नाही अजिबात.
अजय (लोकल असूनही) बर्याच वर्षांनी भेटला.
वृंदाताईंनी दिलेली जिंजर बिस्कॉटी अशक्य सुंदर होती. दुसर्या कुकीज अजून ट्राय केल्या नाहीत.
स्वातीच्या जगप्रसिद्ध आल्याच्या वड्या आणि त्याहून अधिक जगप्रसिद्ध क्रॅनबेरी सॉस अतिशय चविष्ट होते.
मी मूळात जायचे कॅन्सल केल्यामूळे, आणि शेवटच्या मिनीटाला (लोक अजून तिथेच आहेत हे समजल्यामुळे) गाडी फिरवल्याने काहीच नेले नव्हते (ह्याचे मला अतोनात दु:ख झाले.)
कौमुदीशी भेट मिस झाली. पण तीही (लोकल असल्याने) पुन्हा भेटेलच.
मस्त वृत्तांत स्वाती आणि
मस्त वृत्तांत स्वाती आणि अश्विनी!
बाकी के, ११, ९९, सशल, आशूडी इ. इ. आयडींचा आद्य आयडी!
तू ओरिजनल अश्विनी आहेस तर.
मस्त वृत्तान्त! हे गटग मिस
मस्त वृत्तान्त! हे गटग मिस झाल्याची हळहळ वाटली!
माझी पहिलीच वेळ माबोकरांना
माझी पहिलीच वेळ माबोकरांना भेटण्याची. वर लिहील्याप्रमाणे आपण एकटेच कोणाला ओळखत नाही म्हणून धाकधूक होतीच थोडी. पण प्रत्यक्षात भेटल्यावर अजिबातच तसे काही वाटले नाही.
खाणे तर अप्रतिम होते.
स्वाती यांनी दिलेले Cranberry Sauce खूपच मस्त. Instant पॉट मध्ये बनवण्याच्या गोष्टींच्या यादीत अजून एक भर.
आता मायबोलीवर regular येत जाईन
"वा वा झाले का गटग? आता वृ
"वा वा झाले का गटग? आता वृ लिहा" असे थोड्या वेळापूर्वी लिहायला आलो तेव्हा अजयची क्लिप दिसली. थोड्या वेळाने ती पाहून आलो तर वृ ही आला
धमाल लिहीले आहेस स्वाती
अश्विनीची अॅडिशनही मस्त.
"लोकल पदार्थ खाउन..." हे धृपद सहेतुक आहे हे उघड आहे पण त्याला बहुधा मतला म्हणायला हवे
गेल्यागेल्या समोर फराळाच्या पदार्थांचा 'टॉवर' वाट पाहात होता >>>> फूड पिरॅमिड सारखे त्यात होते का? सर्वात खाली कितीही खा वाले पदार्थ व सर्वात वरती मोजकेच खा वाले? ( हे वर्गीकरण आरोग्याच्या संदर्भाने. आदरातिथ्याच्या नव्हे
)
परवानगी दिलीत तर फोटो दाखवू. नाहीतर तोंडाला काळे फासू. ही आयडिया भारी आहे.
अजय - गटगला आलात म्हणजे
अजय - गटगला आलात म्हणजे सुधारणा आहे असे दिसते पण गेट इव्हन बेटर सून. क्लिप एकदम लोल. बिझिनेस, बिहाइण्ड ई कोट्या जमून गेल्या आहेत
आमच्या भागात कधी शोज?
आता मायबोलीवर regular येत
आता मायबोलीवर regular येत जाईन >>> हे आंबोळे बाईंचे लेटेस्ट recruit
बाईंनी स्ट्रॅटेजिकली सॉस, वड्या अशी करन्सी आणली होती सोबत. या दोघांनी मिळून मला आयपी घेण्यास कन्विन्स केलं आहे.
सिंडीमध्ये खूप बदल जाणवला >>> तरी माझा चष्म्याचा नंबर अजून आहे तोच आहे.
मस्त गटग आणि मस्त वृत्तांत. ललिता, अश्विनी आणि व्हीताईंना सुद्धा किती दिवसांनी भेटले, खूप मस्त वाटलं. कौवा, लंबुटांग यांना पहिल्यांदाच भेटतोय असं वाटलंच नाही. आता लवकरच बॉस्टनकर, शिट्टीकर आणि बाराकर यांचं एक मोठं गटग (म्हाराजांच्या काळी होत असत तशी गटग) “मध्यवर्ती” ठिकाणी करायचं ठरलं आहे.
मस्त वृत्तांत. पुढच्या वेळी
मस्त वृत्तांत. पुढच्या वेळी ‘मध्यवर्ती’ ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न नक्की करेन.
मस्त वृ.
मस्त वृ.
सहज डोक्यात आलं म्हणून मी गटगची चाचपणी केली काय आणि गटग झालं सुद्धा.
ऑफिसवाली मंडळी त्यांचा बहुमूल्य विकएंड खर्ची करून आली, मला खूप भारी वाटलं.
मलाही सविस्तर वृ लिहायचाय, पण फोनवर टाईप करायला जड जातं.
घरी परतल्यावर लिहिते.
फोटोत माझा चेहरा उघड केलेला मला चालेल. (माझं डावीकडून दुसरं डोकं)
Pages