डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>जर इल्लीगल इमिग्रंटने गुन्हा केला असेल, तर त्यावर उपाय म्हणजे लीगल इमिग्रेशन रोखणे हा कसा असू शकतो?<<
टेंपररी पॉज आहे. सध्याच्या प्रोसेस मधे लूपहोल्स असल्याने प्रॉपर वेट्टिंग होत नाहि. त्या ड्रायवरला तर इंग्रजी बोलताहि येत न्हवतं अशी बातमी आहे. फ्रीवेज वर असणारे यु-टर्न्स फक्त फर्स्ट रिस्पाँडर्स करता असतात, याची त्याला अर्थात कल्पना न्हवती. इशु हा आहे...

१. >>माझ्या आकलना प्रमाणे ह्याचा अर्थ हा " ज्या व्यक्तीने हे केले ती त्यांच्यामधील एक नाही असे सिद्ध करण्याचा आणि त्यातून आपली पोळी भाजून घेण्याचा मागा आटोकाट प्रयत्न करत आहेत". असा होतो.<<

२. >>तो मागा होता असा अर्थ निघत नाहीये.<<

१ आणि २ मधे काहि विरोधाभास दिसतोय का? त्यांच्यामधील एक नसल्यास तसं सिद्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहि. तुम्हि तसं सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तो तुमच्यातलाच आहे - असा त्याचा थेट अर्थ निघतो. बेसिक डिडक्टिव रिझनिंग आहे ते.. असो...

जग कुठे चाल्लय आणि इकडे राजे साहेबांना विंड मिल आवडत नाहीत म्हणून हे अजून ७० - ८० च्या दशकात अडकून बसलेत.
रिपब्लिकन पार्टीकडून ह्या दशकात खुप अपेक्षा होत्या. ह्या मुर्खाच्या नादी लागून देशाला ५०- ६० वर्ष मागे ढकलतायेत. डेमोक्रॅट्स बरे म्हणण्याची वेळ आणली नालायकांनी एका फॅमिलीच्या मागे लागून. Angry

@ रेव्यु - या अश्या आवाजातले विडिओ हे बहुतकरून इकड तिकडचा माल एकत्र करून बनवलेले असतात. त्यात काही खरे, बरेच खोटे नाटे असते. हे काही विश्वासार्ह माहिती स्रोत नाहीत.

-- स्त्रोत टू स्रोत

माफ करा, चूक दाखविण्याचा हेतू नाही पण स्त्रोत की स्रोत? अवांतराबद्दल क्षमस्व.
>>>>-- स्त्रोत टू स्रोत
_/\_

नोबेल पुरस्कारांना सुरूवात झाली. शांततेचं नोबेल १० तारखेला जाहीर होणार ना ?

मुसोलिनी, स्टालीन आणि हिटलर यांनी जगात शांतता नांदावी म्हणून टोकाचे प्रयत्न केले. पण त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकला नाही. जर ट्रंप यांना मिळाला तर या तिघांनाही मिळाल्यासारखेच होईल. जर नाही मिळाला तर स्वीडनवर टेरीफ लादले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याला शांततेचं नोबेल देणं म्हणजे त्याच्या शांततेच्या कामाला प्रोत्साहन देण्यासारखंच आहे. तो दिला नाही तर खच्चीकरण होऊन शांतताभंग होऊ शकतो. इसकी सजा मिलेगी.

कारनी आणि ट्रम्प प्रेस कॉन्फरन्स इंटरेस्टिंग होती.

पहिल्या फेज मध्ये ५१ स्टेट करून झालं. ते फक्त फेल नाही तर अमेरिकेवर उलटलं. मग दुसऱ्या फेज मध्ये राईट आणि लेफ्ट टेरीफ लावून झाले. तरीही कॅनडा बधला नाही. अजून कॅनडाकडे कार्डस आहेत, आता अमेरिकेला डील ची गरज आहे असं एकूण तात्याच्या बॉडी लँग्वेज वरून वाटत होतं. डील का झालं नाही कारनी ला विचारलं तर तात्या डिफेंड करायला काय आला. तोंड भरून स्तुती काय केली, प्रेझन्स ऑफ माईंड दाखवत दोन चार जोक काय केले. मला पण कारनी सारखं ग्रेट बनायचं आहे काय बोलला.... क्षणभर समोर पुटीन किंवा किमजाँगऊन बसलेत का काय वाटलं. Lol
तर आता फेज वन टू टोटल फेल गेल्याने तात्या फेज थ्री मध्ये आलेला आहे. एपस्टीन फाईल पासून पळ काढायला एक बिग ब्युटिफुल डील लवकरच झालं तर नवल वाटू नये. Lol

अडॉप्ट करायची वेळच कशाला येणार आहे? हा विषय डिस्कस करायचाच नाही असं सांगितलं ना पॅमने!

पॅमची डिफ्लेक्ट करण्यासाठी दिलेली असंबद्ध उत्तरे नि सिनेटरने त्यावर शांतपणे 'माझा प्रश्न तो नसून हा डायरेक्ट आहे' हे म्हणणे महान करमणूक होते. एकंदर काय नग राज्य चालवत आहेत ते दिसतेय.

तात्यांचं नो नोबेल प्रेम नेक्स्ट लेव्हल आहे. ओबामांना मिळालं तर मला का नको असं मीडीया सांगतोय ती function at() { [native code] }इशयोक्ती नाही तर.
कतार गाजा पट्टीत अनेक वर्षे समझोत्यासाठी प्रयत्नशील आहे. तात्यांना कतारला श्रेय द्यायचं नाही म्हणून (असं म्हणतात ) इस्त्राएलने कतारवर हल्ला केला. लगेचच तात्यांनी इस्त्राएलने मोठी चूक केली असं म्हटलं आणि कतारसहीत अरब देश आणि इस्त्राएलला बोलावून तोच तोडगा नव्याने मांडला. आता इस्त्राएलचे ३२ आणि पॅलेस्टिनचे २००० बंधक सोडून दिले जातील. हे घडल्याबरोबर ट्रंप यांना शुभेच्छांचा वर्षाव चालू झाल आहे. हे कधी तर उद्या नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होणार असताना. आता बिचारे नोबेल पुरस्कार समितीचे लोक टेन्शन मधे असतील. त्यांच्या नियमाप्रमाणे शांततेचं काम खूप आधीपासून सुरू असल्याचं दिसायला पाहीजे. तात्यांचा अर्ज या वर्षीच्या जानेवारीमधे आला आहे. अर्ज आल्यानंतरच ते शांततेची भाषा बोलू लागले आहेत.

जर नाही मिळालं नोबेल तर स्वीडनचं काही खरं नाही. तात्या समितीवर पण बरसतील यात शंका नाही. जर त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवली तर मग हार्ट अ‍ॅटॅकच्या प्रमाणात अचानक वाढ झालेली दिसेल.

अशी करमणूक असणारा अमेरिका सोडून अन्य एकच देश आहे.
Why should Americans have all the fun ?

आणि आता लेफ एरिक्सन डे ची घोषणा करताना दोनदा स्वीडन स्वीडन च्या लोकांसाठी केले म्हणून सांगितले.. दंड, साम करून झाले आता जनतेच्या पैशाने दाम पण देण्यात येईल. रिपब्लिचन काँग्रेस ते लगेच पास करेलच.
पण नोबेल पाहिजे!!

आता बाकीच्या देश्यांसमोर एकच मार्ग आहे - प्रचंड आर्थिक तोटा सोसून अमेरिकेशी संबंध तोडायचे.
भारताने खरोखर औषधे पाठवणे बंद केले पाहिजे, पण एव्हढा तोटा भारताला झेपेल का? शिवाय भारतात पप्पू लगेच म्हणेल - बिचार्‍या अमेरिकन रोग्यांची भारताने निर्दयपणे पंचाईत केली!

हे आज दिसलं

During testimony before the Senate homeland security committee,Homeland Security Secretary Kristi Noem defined habeas corpus as “a constitutional right that the president has to be able to remove people from this country.

अहो आता सगळी घटनाच (constitution) बदलून टाकायची आहे हळूहळू.
असे काहीबाही ती बाई आणि इतर लोक बरळतात, मूर्ख लोक तेच खरे मानतात, मग म्हणायचे की लोकांचीच इच्छा आहे की घटना बदलायची, मग हवी तशी घटना लिहायची. त्यात लिहायचे की घटनेचा अर्थ प्रेसिडेंट लावेल तसा.

मी मागेच लिहिले होते की येती चार वर्षे तरी, काँग्रेस, सुप्रिम कोर्ट, पोलिस इ. सर्वांना काढून टाकावे, खूप खूप पैसे वाचतील, इतके की त्यातले काही कुणि चोरले तरी लक्षात येणार नाही.

पण तात्याला कुठे माहित आहे ते?
त्याचे काय झाले, सगळी नॉमिनेशन्स ३१ जानेवारीच्या आधी यायला पाहिजेत, म्हणून यंदाचे पीस पारितोषिक चुकले.
आता आणखी काही काही युद्धे होण्याआधीच त्याने थांबवली - जसे इंग्लंड नि कॅनडा,, कॅनडा नि न्यू झिलंड - वगैरे की पुढच्या वर्षीचे नोबेल नक्कीच.
तसेहि अमेरिकन राष्त्राध्य्क्षला नोबेल पीस प्राईझ पाहिजेच - कार्टर ल दिले ओबामा ला दिले मग तात्यालाच का नको?

आता आणखी काही काही युद्धे होण्याआधीच त्याने थांबवली >> तुम्हाला कळले नाही. तात्याने प्रत्येक देशावर मोठा टॅरीफ लावायचे जाहीर केले म्हणजे ते देश खवळतील नि युद्धखोर बनतील. मग तात्या मोठ्या मनाने टॅरीफ पुढे ढकलणार नि युद्ध टळणार. किती देश आहेत जगात मोजा म्हणजे किती युद्धे टळली बघा. नोबेल जातेय कुठे ? पुढची तीन वर्षे तरी नोबेल उचलले जाणार हे नक्की.

ओबामांना २००९ चे शांततेचे नोबेल ९ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांच्या "extraordinary efforts to strengthen international diplomacy and cooperation between peoples" साठी दिले गेले. ओबामांचा शपथविधी २० जानेवारी २००९ रोजी झाला. नोबेलसाठी अर्ज करण्याची डेडलाईन ३१ जानेवारी २००९ होती. ह्या अकरा दिवसांत ओबामा साहेबांनी जागतिक शांततेसाठी असे काय केले की त्यांचे नाव नोबेलसाठी पाठवले गेले हे माहित नाही. त्याआधी चार वर्षे सिनेटर आणि सात वर्षे इलिनॉय राज्याचा सिनेटर ह्या भूमिकांमध्ये जागतिक शांततेवर प्रभाव पडेल असे त्यांनी काही केल्याचे ऐकिवात नाही.
हे माझ्यासाठी एक कोडे आहे. ट्रम्प साहेबांचे नोबेल बिड हा एक वेगळाच विषय आहे.

Pages