निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
आता १० बिलियन मिळणार आहेत!...
आता १० बिलियन मिळणार आहेत!... कटोरी घेऊन शांतपणे रांगेत उभे रहा बरं पब्लिक!
>>जर इल्लीगल इमिग्रंटने
>>जर इल्लीगल इमिग्रंटने गुन्हा केला असेल, तर त्यावर उपाय म्हणजे लीगल इमिग्रेशन रोखणे हा कसा असू शकतो?<<
टेंपररी पॉज आहे. सध्याच्या प्रोसेस मधे लूपहोल्स असल्याने प्रॉपर वेट्टिंग होत नाहि. त्या ड्रायवरला तर इंग्रजी बोलताहि येत न्हवतं अशी बातमी आहे. फ्रीवेज वर असणारे यु-टर्न्स फक्त फर्स्ट रिस्पाँडर्स करता असतात, याची त्याला अर्थात कल्पना न्हवती. इशु हा आहे...
१. >>माझ्या आकलना प्रमाणे
१. >>माझ्या आकलना प्रमाणे ह्याचा अर्थ हा " ज्या व्यक्तीने हे केले ती त्यांच्यामधील एक नाही असे सिद्ध करण्याचा आणि त्यातून आपली पोळी भाजून घेण्याचा मागा आटोकाट प्रयत्न करत आहेत". असा होतो.<<
२. >>तो मागा होता असा अर्थ निघत नाहीये.<<
१ आणि २ मधे काहि विरोधाभास दिसतोय का? त्यांच्यामधील एक नसल्यास तसं सिद्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहि. तुम्हि तसं सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तो तुमच्यातलाच आहे - असा त्याचा थेट अर्थ निघतो. बेसिक डिडक्टिव रिझनिंग आहे ते.. असो...
हे खरे आहे का? एवढ्यात आपल्या
हे खरे आहे का? एवढ्यात आपल्या परिचयातील कोणाला असा अनुभव आला आहे का?
https://www.youtube.com/watch?v=t46GMB-NmTE
जग कुठे चाल्लय आणि इकडे राजे
जग कुठे चाल्लय आणि इकडे राजे साहेबांना विंड मिल आवडत नाहीत म्हणून हे अजून ७० - ८० च्या दशकात अडकून बसलेत.
रिपब्लिकन पार्टीकडून ह्या दशकात खुप अपेक्षा होत्या. ह्या मुर्खाच्या नादी लागून देशाला ५०- ६० वर्ष मागे ढकलतायेत. डेमोक्रॅट्स बरे म्हणण्याची वेळ आणली नालायकांनी एका फॅमिलीच्या मागे लागून.
जग कुठे चाल्लय आणि इकडे राजे
.
हे खरे आहे का? एवढ्यात आपल्या
हे खरे आहे का? एवढ्यात आपल्या परिचयातील कोणाला असा अनुभव आला आहे का?
https://www.youtube.com/watch?v=t46GMB-NmTE
@ रेव्यु - या अश्या आवाजातले
@ रेव्यु - या अश्या आवाजातले विडिओ हे बहुतकरून इकड तिकडचा माल एकत्र करून बनवलेले असतात. त्यात काही खरे, बरेच खोटे नाटे असते. हे काही विश्वासार्ह माहिती स्रोत नाहीत.
-- स्त्रोत टू स्रोत
माफ करा, चूक दाखविण्याचह
माफ करा, चूक दाखविण्याचा हेतू नाही पण स्त्रोत की स्रोत? अवांतराबद्दल क्षमस्व.
>>>>-- स्त्रोत टू स्रोत
_/\_
नोबेल पुरस्कारांना सुरूवात
नोबेल पुरस्कारांना सुरूवात झाली. शांततेचं नोबेल १० तारखेला जाहीर होणार ना ?
मुसोलिनी, स्टालीन आणि हिटलर यांनी जगात शांतता नांदावी म्हणून टोकाचे प्रयत्न केले. पण त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकला नाही. जर ट्रंप यांना मिळाला तर या तिघांनाही मिळाल्यासारखेच होईल. जर नाही मिळाला तर स्वीडनवर टेरीफ लादले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याला शांततेचं नोबेल देणं म्हणजे त्याच्या शांततेच्या कामाला प्रोत्साहन देण्यासारखंच आहे. तो दिला नाही तर खच्चीकरण होऊन शांतताभंग होऊ शकतो. इसकी सजा मिलेगी.
>>>>> तो दिला नाही तर
>>>>> तो दिला नाही तर खच्चीकरण होऊन शांतताभंग होऊ शकतो.

कारनी आणि ट्रम्प प्रेस
कारनी आणि ट्रम्प प्रेस कॉन्फरन्स इंटरेस्टिंग होती.
पहिल्या फेज मध्ये ५१ स्टेट करून झालं. ते फक्त फेल नाही तर अमेरिकेवर उलटलं. मग दुसऱ्या फेज मध्ये राईट आणि लेफ्ट टेरीफ लावून झाले. तरीही कॅनडा बधला नाही. अजून कॅनडाकडे कार्डस आहेत, आता अमेरिकेला डील ची गरज आहे असं एकूण तात्याच्या बॉडी लँग्वेज वरून वाटत होतं. डील का झालं नाही कारनी ला विचारलं तर तात्या डिफेंड करायला काय आला. तोंड भरून स्तुती काय केली, प्रेझन्स ऑफ माईंड दाखवत दोन चार जोक काय केले. मला पण कारनी सारखं ग्रेट बनायचं आहे काय बोलला.... क्षणभर समोर पुटीन किंवा किमजाँगऊन बसलेत का काय वाटलं.

तर आता फेज वन टू टोटल फेल गेल्याने तात्या फेज थ्री मध्ये आलेला आहे. एपस्टीन फाईल पासून पळ काढायला एक बिग ब्युटिफुल डील लवकरच झालं तर नवल वाटू नये.
एपस्टीन फाईलला मागा लोक "अ
एपस्टीन फाईलला मागा लोक "अॅडॉप्ट" कसे करणार आहेत हे बघायला उत्सुक आहे.
Pages