निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
दोन वेगवेगळे संदर्भ? ते
दोन वेगवेगळे संदर्भ? ते प्रतिसाद एका फ्लो मध्ये आहेत. मध्ये इतर कोणाचे प्रतिसाद नसते, तर एकाखाली एक आले असते. केविलवाणं कोण आहे ते सगळ्यांना दिसतंय.
सी यू इन वलहाला! यावर फार
सी यू इन वलहाला!
यावर फार विनोदी कमेंट वाचली.
ना तू सर्व केलंय ना त्या चार्ली ने. आता हे जीवनच लढा आहे प्रकार नको.

“The Hindu FBI director tells a deceased Protestant he’ll meet him in pagan paradise with a Mormon Governor watching on,”
कॅश पटेल उगा कूल बनायला जातो. कुठे काय बोलायचं पाचपोच नाही!
मार्वल चालले तर त्या मुव्हीज वर टाकोने कर लावले तर काय घ्या! कॅश घाबरून थॉर ची मॅरेथॉन करतोय बहुतेक
इंग्रजीत सगळेच प्रोनाउन
इंग्रजीत सगळेच प्रोनाउन वापरतात हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा काय करेल बिचारा!
इकॉनॉमी सुधारण्याचा टाको वे!
इकॉनॉमी सुधारण्याचा टाको वे! 'कोंबडं झाकलं की तांबडं फुटायचं राहतं.'
कंपन्यांनी तिमाही रिपोर्ट करण्याऐवजी दर सहा महिन्यांनी रिपोर्ट करायचं. म्हणजे झाकली मूठ सहा महिने मार्केटला समजणार नाही.
<<
<<

टॅरीफ लागु झाल्यापासुन किंमती वाढल्याची उदाहरणं मिळण्याची वाट बघतोय...
>>
१०% टेरिफ चार्ज
आता सगळी इंडीयन ग्रोसरी स्टोर्स एक्स्टींक्ट होतील कोडॅक सारखी.
ABC Suspends ‘Jimmy Kimmel
ABC Suspends ‘Jimmy Kimmel Live!’ “Indefinitely” Over Charlie Kirk Comments
वॉवच! आता फेलन आणि सेथचा नंबर
वॉवच! आता फेलन आणि सेथचा नंबर ना?
कोणाला अजुन वाटतंय अमेरिका बनाना रिपब्लिक नाही?
वाईट जॉब्ज रिपोर्ट दिल्यावरून
वाईट जॉब्ज रिपोर्ट दिल्यावरून बीएलएस कमिशनर फायर होऊ शकते तर कोल्बेर आणि किमेल किस झाड की पत्ती आहेत!
इट इज इलिगल टू क्रीटिसाईझ
इट इज इलिगल टू क्रीटिसाईझ टाको.
हे लिटरल आयतुल्ला डोलान ट्रम्प यांचे शब्द आहेत, काहीही अतिशयोक्ती नाही. बाकी अफगाणिस्तान युद्ध परत चालू करतोय म्हणे.
किमेल डिस्नीवर बिलियन डॉलरला चा खटला भरतोय. त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये 'ते' ७ शब्द सोडून पॉलिटिकल साटायर करण्याबद्दल काहीही नाही. किमेल जसा गेला तसे पुढच्या डेमोक्रॅटिक प्रेसिडेन्सी मध्ये सगळे राईट विंगर्स फायर होतील. याला अंत नाही. फर्स्ट अमेंडमेंटला इतके पायदळी इथले मागा लोक पण तुडवतात का?
Pages