निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
मला एव्हढेच म्हणायचे आहे की
मला एव्हढेच म्हणायचे आहे की ही सगळी राष्ट्रे अमेरिकेत माल विकतात पण अमेरीकन मालाला मात्र टॅरीफ लावतात. आपण रशिअन क्रूड पडत्या भावाने घेतो पण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला त्याचा काही फायदा नाही. नफा कोण कमावतो आहे? मग तात्याने टॅरीफ लावला तर त्याचे काय चुकले? आपण आपल्या देशाचे हित बघतो अगदी तसेच तो त्याच्या देशाचे हित बघतोय.
आत्ता त्याने फक्त आपल्यालाच का सिंगल आउट केले आहे हा प्रश्न अलाहिदा. ती त्याची मर्जी.
आपण आपल्या नी जर्क reaction मुळे पुन्हा मागे येणे दुरापास्त होणार आहे.
आज NTच्या बातमी मधे ( नॉर्थ
आज NTच्या बातमी मधे ( नॉर्थ कोरिया ) निरपराध मच्छीमारांची हत्या संबंधातली बातमी आहे. बिंग फुटू नये म्हणून सिलची कृती.
<< व्हेनेझुएला नामक उपद्रवी देशातून अमली पदार्थ भरून निघालेली बोट Trump सरकारच्या आदेशाने योग्य ती शस्त्रास्त्रे डागून बुडवून टाकली गेली. >>
----- अमली पदार्थ " भरुन " निघालेली बोट याला काही पुराव्याची जरुरी नाही.
बिंग फुटू नये म्हणून असा प्रकार झाला नाही असे पुढे कधीतरी वाचायला मिळू नये.
<< आपण रशिअन क्रूड पडत्या
<< आपण रशिअन क्रूड पडत्या भावाने घेतो पण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला त्याचा काही फायदा नाही. नफा कोण कमावतो आहे? >>
----- सामान्य भारतीयाला रशिया ऑईल खरेदीच्या व्यावहारांत काही फायदा झाला /होत नाही ( आंतरराष्ट्रिय बाजारांत कच्च्या तेलाचे भाव गडगडल्यावरही भारतात त्याचे भाव कमी होत नाही... फायदा कोण घेत असतो अगदी तसेच ) पण टेरिफचा फटका जरुर बसणार आहे.
थांबा थांबा. आजचा दिवस
थांबा थांबा. आजचा दिवस ट्रंप- मोदी प्रेमळ वार्तालापाचा आहे.
कुछ कुछ होता है मधला तो सीन
कुछ कुछ होता है मधला तो सीन आठवला. शाखाने काजलला जवळ घेऊन मागच्या बाजूने राणीचा हात पकडलाय.
अमेरिकेला टेरीफ लावायचा पूर्ण
अमेरिकेला टेरीफ लावायचा पूर्ण अधिकार आहे. १०० टक्के काय १००० टक्के लावा. त्यांचे नागरिक भरायला तयार आहेत तर आपलं काय जातंय!
त्यासाठी दिलेली कारणे कॅनडाच्या बाबत तरी अज्ञानातून आलेली आहेत. दुग्धजन्य पदार्थांवर कॅनडा २०० % कर लावतो, हो, पण कधी? खोलात कुणाला रस असेल तर लिहीन.
धरसोड प्रकाराने नुकसान दिसू लागले की मला फार आनंद होतो. कारण यांना म्हणे कुणाची गरज न्हवती. तिकडे Disneyland कॅनडाचे असाल तर तिकिटात भारी सूट देते आहे, अमेरिकेन लोकांपेक्षा कॅनडाच्या लोकांना तिकीट कमी करून बोलावते आहे. अशी आणखी उदाहरणे हवी असतील तरी विचारा. सांगतो. निघालेत ५१ वे राज्य करायला.
तर एपस्टीन फाईल्स चे काय झाले? ते सांगा आधी!
यावेळेस नायागरा ला अज्जिबात
यावेळेस नायागरा ला अज्जिबात गर्दी नव्हती लेबर डे ला असे ऐकले.
अमितव
अमितव
मी फक्त भारता बद्दक बोलतोय.
भारतावर लावलेला ५०% टेरीफ अनेरीकन देतील. हे लॉजिक समजले नाही. उलट ते बंगला देश विएतनाम कडे वळतील. त्यांच्यावर पूर्वीचाच टेरीफआहे. नुकसान आपलेच आहे.
>>मग तात्याने टॅरीफ लावला तर
>>मग तात्याने टॅरीफ लावला तर त्याचे काय चुकले? आपण आपल्या देशाचे हित बघतो अगदी तसेच तो त्याच्या देशाचे हित बघतोय.<<
बिंगो! टॅरीफ मागची कूटनिती तुम्हाला समजायला लागली याचा आनंद आहे. भारता सारखीच परिस्थिती योरपची होती (अमेरिकन मालावर त्यांच्या देशात टॅरीफ पण अमेरिकेत त्यांच्या मालावर नाहि), आता आले लाइनीवर..
सध्या मार्क कार्नीची काय बातमी? अमेरिकन मालावरचे टॅरीफ काढले म्हणे, अमेरिकेने कनेडियन मालावरचे टॅरीफ काढलेले नसुनहि. गो फिगर...
“भारतावर लावलेला ५०% टेरीफ
“भारतावर लावलेला ५०% टेरीफ अनेरीकन देतील. हे लॉजिक समजले नाही.” - भारतातून आयात केलेल्या गोष्टींवर - कच्च्या मालावर लावलेला अतिरिक्त टॅक्स/टॅरिफ हा त्या मालाची किंमत वाढवतो. ती किंमत ग्राहक भरतो - जो, ती वस्तू किंवा त्या कच्च्या मालापासून तयार झालेलं प्रॉडक्ट अमेरिकेत विकत घेतो. हा टॅरिफचा भाग विक्रेता नाही, खरेदी करणारा भरतो.
<< “भारतावर लावलेला ५०% टेरीफ
<< “भारतावर लावलेला ५०% टेरीफ अनेरीकन देतील. हे लॉजिक समजले नाही.” - भारतातून आयात केलेल्या गोष्टींवर - कच्च्या मालावर लावलेला अतिरिक्त टॅक्स/टॅरिफ हा त्या मालाची किंमत वाढवतो. ती किंमत ग्राहक भरतो - जो, ती वस्तू किंवा त्या कच्च्या मालापासून तयार झालेलं प्रॉडक्ट अमेरिकेत विकत घेतो. हा टॅरिफचा भाग विक्रेता नाही, खरेदी करणारा भरतो. >>
---- फेरफटका सहमत.
अमेरिकन ग्राहक एखाद्या वस्तूसाठी आज $ १०० किंमत देत आहे. त्यावर ५० % म्हणजे किंमत $ १५० होणार. हे वाढलेले $५० कोण देणार ?
सर्व ग्राहक सारखे नसतात. अमेरिकन ग्राहक तर राजांचा राजा आहे. वस्तूची किंमत $१०० वर ठेवण्यासाठी मूळ वस्तूची किंमत $ ६६ एव्हढी कमी करावी लागेल. म्हणजे ३४% कमी नफा. भारतातून अमेरिकेत निर्यात होणार्या विविध वस्तू , साहित्य, औषधी, हिरे, माणिक, मोती, सोने, चांदी... या व्यापारामधे नफ्याचे प्रमाण किती आहे? अनेक गोष्टींमधे एव्हढा मोठा नफा नसावा. तोटा सहन करुन कोण व्यापार करणार?
शेवटी ग्राहकाच्या माथ्यावर हे वाढिव दर मारावे लागतील. किंवा तिकडे नफा कमी इकडे पण किंमती वाढतील आणि दोघांनाही थोडा-थोडा ट्रम्प टेरिफचा फटका.
हा टॅरिफचा भाग विक्रेता नाही,
हा टॅरिफचा भाग विक्रेता नाही, खरेदी करणारा भरतो. >>>> हे , मला समजत नाही काय? मी काय म्हणतोय की ग्राहक स्वस्तातला माल खरेदी करेल. हे पहा आपले नीश PRODUCT कुठले आहेत. तर हापूस आंबे आणि बासमती. ते दुसरा देश देऊ शकणार नाहीत. पण बाकी इतर माल काय कुणीही बनवेल. आत्ताच तयार कपड्याच्या उद्योगांनी रडायला सुरवात केली आहे. की आम्हाला सबसिडाइज्ड करा म्हणून. ते का ?
हित काय त्याच्यात. टेरिफ,
हित काय त्याच्यात. टेरिफ, म्हणजेच इंपोर्ट टॅक्स, हा अमेरिकन आयातदारालाच भरावा लागतो. ते किती दिवस तो टॅक्स भोगाणार? ते ति कॉस्ट, खरेदी करण्याऱ्या अमेरिकन कंज्युमर्स ना पास ऑन करायला सुरुवात झालेली आहे. वॉलमार्ट ( व इतर सर्व स्टोर च्या ) सी इ ओ नी कॉस्टस प्रत्येक आठवड्याला वाढतायेत हे ऑन रेकॉर्ड सांगितलंय.
पण मूर्ख तात्या आणि त्याचे मूर्ख समर्थक (आणि इथले स्वयंघोषीत बिंगो… सॉरी मूर्ख “अर्थतज्ज्ञ “ सुद्धा :फिदी:) हे धरून चालतायेत की टेरिफ (इंपोर्ट टैक्स) हे ते ते देश पे करतात. परवा तात्या म्हणाला १७ ट्रिलियन (विथ ए टी) इन्वेस्टमेंट आणली म्हणे… म्हणजे अमेरिकेच्या सद्ध्याच्या जीडीपी च्या निम्मी… आणि त्याच्या मागे उभे असलेले सगळे कैबिनेट मेंबर्स आणि त्याच्या समर्थकांनी (इन्क्लुडिन्ग मा बो वरच्या) ही तात्याची शाब्दिक उलटी चाटून विथ स्माईल खाल्ली.
<<भारतावर लावलेला ५०% टेरीफ अनेरीकन देतील. हे लॉजिक समजले नाही>> के कु, ह्यात न समजण्या सारखं काय आहे. टेरिफ हे अमेरिकन निर्यातदाराला अमेरिकेन सरकार कडे भरावा लागणारा टैक्स आहे. जो खर्च तो निर्यातदार खरेदी करण्यावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली , आज ना उद्या पास ऑन करतो.
<<उलट ते बंगला देश विएतनाम कडे वळतील. त्यांच्यावर पूर्वीचाच टेरीफआहे>>
सप्लाय चेन बदलणं म्हणजे चड्डी बदलण्या एवढं सोपं वाटलं काय? सोप्या गोष्टींबाबत शक्या होईलही पण अनेक कंपन्या अनेक कॉम्प्लिकेटेड पार्ट्स आयात करतात. त्यांच्या सप्लाय चेन चेंज करणं, तेही टाको एडमिन च्या धर सोड धोरणामुळे तर आणखी अवघड आहे. हे मि स्वतच्या कानानी ऐकलेल आहे, आमच्या कम्पनिच्या सि इ ओ कडून.
आलरेडी कित्येक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी हे डिक्लेयर केलयं की टेरिफ मुळे बॉटमलाइन अफेक्ट होतीय.
आणि ट्रेड डेफिसिटचं म्हणाल तर , कंस्यूमर गुड्स च्या बाबतीत अमेरिकेचा भारता बरोबर डेफिसिट असेलही पण सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर्स आणि हाय टेक्नोलॉजी प्रॉडक्ट मधे अमेरिकेचा अप्पर हैंड आहे.
हे म्हणजे असं झालं की समोरच्या चहावाल्या कडून मी रोज चहा विकत घेतो पण तो माझ्या कडून काहीच घेत नाही म्हणून मी माझ्यावरच चहा टॅक्स ( इंपोर्ट ड्यूटी/टेरिफ) लावणार.
पण एवढा विचार ना तात्याला झेपत ना त्याच्या बिंगो समर्थकाना झेपत!!
आणि एखादं उत्पादन समजा भारत
एखादं उत्पादन समजा भारत आणि पाकिस्तान हे दोन देश १०० रुपयाला अमेरिकेला विकत आहेत. अमेरिकेने, नोबेल शांतता पुरस्काराला भारत पाठिंबा देत नाही म्हणून भारतावर ५०% कर लावले. आता भारताचे ते उत्पादन अमेरिकेत १५० ला तर पाकिस्तानचे १०० ला मिळू लागेल. अमेरिकन आयातदार अर्थात पाकिस्तानकडून माल खरेदी करतील. पण... हे इथे थांबत नाही! आता पाकिस्तान भांडवलशाही व्यवस्थेत ते उत्पादन १०० का विकेल? पाकिस्तान ते उत्पादन १४९ रुपयांना विकू लागेल.
थोडक्यात अमेरिकन लोकांच्या खिशातून पैसे काढायचे धंदे आहेत. ते लोक काय स्मोक करतात ते गो फिगर करतील तो सुदिन!
भारतावर टेरीफ लावला, सगळ्या मित्र देशाशी संबंध बिघडवले, चीन जपान वर कर लावले. जे देश अक्षरशः अमेरिकेची अर्थव्यवस्था अमेरिकेला कर्ज देऊन चालवतात त्यांच्याशी संबंध बिघडवले. युरोपने रॉयली सुसरबाई तुझी पाठ मऊ करून पाने पुसली आहेत. कॅनडा ही तेच करते आहे. आता पैसे घ्यायची वेळ येईल तेव्हा काय ते समजेल. अजून एक दीड -दोन वर्ष धीर धरा.
<<पण बाकी इतर माल काय कुणीही
<<पण बाकी इतर माल काय कुणीही बनवेल. >>
भारत काय फक्त कपड्यांसारखे सोप्पे प्रॉडक्ट्स फक्त अमेरिकेला निर्यात करतो का?
गेल्या २ दशकात भारताने अनेक हाइली टेक्निकल इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स निर्यात करायला सुरुवात केली आहे. ( मी मोदी भक्त नाही. हे फक्त मोदींमुळे झाले असे माझे अजिबात म्हणणे नाही)
माझ्या स्वतः च्या कंपनीत कित्येक काम्प्लेक्स पार्टस हे भारतातून येतात. आणि त्या पार्ट्ससाठी आम्ही इतर कुठेही जाऊ शकत नाही ( इतर अनेक कारणांमुळे) . त्यामुळे सध्यातरी त्या पार्टस वरचा इंपोर्ट कर आमची कंपनीच सोसतीये जे लाँग टर्म मधे शक्य नाही. कारण भारतातला सप्लायर आणखी कॉस्ट कमी करू शकत नाही.
पण तात्याचे मूर्ख समर्थक आईदर कीबोर्ड वॉरियर असतात किंवा कुलेड प्यालेले असतात त्यामुळे एवढा लॉजिकल विचार करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकत नाही.
https://www.msn.com/en-us
https://www.msn.com/en-us/money/other/how-trumps-tariffs-on-india-could-...
मी काय म्हणतो आहे ते इथे वाचा.
<भारतावर लावलेला ५०% टेरीफ अनेरीकन देतील. हे लॉजिक समजले नाही>> के कु, ह्यात न समजण्या सारखं काय आहे. टेरिफ हे अमेरिकन निर्यातदाराला अमेरिकेन सरकार कडे भरावा लागणारा टैक्स आहे. जो खर्च तो निर्यातदार खरेदी करण्यावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली , आज ना उद्या पास ऑन करतो. >>>> हे इतके सिम्पल असेल तर मग प्रोबलेम काय आहे. देतील अमेरीकन. मी काय म्हणतो आहे की ग्राहक वाढलेला कर देणार नाहीत तर ते दुसऱ्या देशाकडे वळतील. हे माझे म्हणणे आहे. बाकी चालुद्या.
<<मी काय म्हणतो आहे की ग्राहक
<<मी काय म्हणतो आहे की ग्राहक वाढलेला कर देणार नाहीत तर ते दुसऱ्या देशाकडे वळतील. हे माझे म्हणणे आहे. बाकी चालुद्या.>>
मी काय म्हणतोय की, हे (दुसऱ्या देशाकडे वळणे) ही गोष्ट इतकी सोपी नाहीये. ते ही सरकारची धोरणांच्या बाबतीत धरसोड चालू असताना. सप्लाय चेन मूव्ह करणे इज़ ए डाँटिंग टास्क. बाकी चालू द्या.
बरर्र .
बरर्र .
>>मी काय म्हणतो आहे की ग्राहक
>>मी काय म्हणतो आहे की ग्राहक वाढलेला कर देणार नाहीत तर ते दुसऱ्या देशाकडे वळतील. हे माझे म्हणणे आहे.<<
अरे कोणाला स्पष्टिकरण देत बसताय. या स्लोलर्नसंना ते बाप जन्मात कळणार नाहि..
एक गोष्ट लक्षात घ्या. अमेरिका इज दि बिग्गेस्ट मार्केट. ट्रंप इज आस्किंग वेंडर्स टु इटप द कॉस्ट. ग्राहकाकडे कॉस्ट पास केल्यावर किंमती आवाक्यात राहिल्या तर ठिक, नाहितर किंमती वाढल्याने तो माल विकला जाणार नाहि, आल्टरनेटिव्ज शोधल्या जातील. मालाला उठाव मिळाला नाहि तर नुकसान कोणाचं? वी आर टॉकिंग अबौट बिल्यन डॉलर्स लॉस इन रेवेन्यु. इयर-ओवर-इयर इतका लॉस झेलण्याची कपॅसिटि आहे या देशांची? योरप आणि कॅनडाने माघार घेतली, भारत त्याच वाटेवर आहे..
टॅरीफ लागु झाल्यापासुन किंमती वाढल्याची उदाहरणं मिळण्याची वाट बघतोय...
राज
राज
आभार. मी वर msn ची लिंक दिली आहे. ती वाचलीत तर कुठले देश कुठले product देऊ शकतील त्याची यादी दिली आहे. आपल्या मालाला असे काही सोने लागलेले नाही की दुसरे देश तो देऊ शकणार नाही.
आता उद्या भेटू.
१
मी वर लिहिलय, पण परत सांगतो. वॉलमार्ट सीईओ ने एनालिस्ट कॉल मधे स्वतः सांगितलंय की प्राईसेस विक ऑन विक वाढतायेत. तो हे सुद्धा म्हणाला की सद्ध्या आम्ही ह्यातली बरीच कॉस्ट अबसॉर्ब करतोय पण लाँग टर्म मधे हे वायेबल नाही.
डोक्यात शिरत नाहीये की शिरवून घ्यायचं नाहीये?
आपल्याला सगळ्या गोष्टीतलं सगळं कळतं अश्या टिपिकल ट्रम्प सिंड्रोम मुळे आमच्या सारख्या डे इन एंड डे आउट सप्लाय चेन शी झगडणाऱ्या लोकांना शिकवायला जातायेत. स्टॉप एम्बॅरसींग युरसेल्फ.
तात्याच्या जुना प्रेजिडेंट असलेल्या मस्कच्या ग्रॉक ला कंज्युमर प्राईसेस बद्दल विचारलं तर हे दिसतय. हे वाचून तरी जरा डोळे उघडून बघा.
आतातरी डोक्यात शिरतय की शिरवून घ्यायचंच नाहीये?
आमच्या सीईओ (जो स्वतः प्रो ट्रम्प आहे)नी स्वतः सांगितलंय की टेरिफमुळे कंपनीची बॉटमलाईन अफेक्ट होतेय, पुढच्या वर्षी बोनस एक्सपेक्ट करू नका. ह्या पेक्षा अधिक ढळढळीत आणि प्रतक्ष्य उदाहरण काय असू शकतं. का आता जे कानांनी ऐकलय त्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका म्हणताय?
टॅरिफ मुळे ट्रेड डेफिसिट कमी झालाय, किंवा अमेरिकन कंज्युमर ला प्राईसेस कमी झाल्यात, किंवा जॉब्स परत आलेत ह्याची उदाहरणे द्या… वाट बघतोय.
टेरिफ हा आयातीवर लावलेला कर
टेरिफ हा आयातीवर लावलेला कर आहे तो शेवटी कन्झ्युमरच देतो, व टेरिफ मुळे अमेरिकेचेच नुकसान होणार आहे हे खरे तर Economics 101 आहे. पण हे MAGA लोकांना समजावून कसे सांगणार ? एकाला तर असे वाटलेले की चीन वर ३०% टेरिफ म्हणजे आता १००$ ची चिनी वस्तू मला ७०$ ला मिळणार व ३०$ चीन देणार !
स्टील आल्युमिनियम सारख्या मालावर टेरिफ लावले तर अमेरिकन कार बनवणार्या कंपन्यांच्या कच्च्या मालाचा किमतीत वाढ होणार, ते थोडेफार नुकसान सोसून उरलेली किंमत कार ची किंमत वाढवून वसूल करणार, परिणामी अमेरिकेत तयार झालेल्या कार महाग होणार.
तात्याला रिपोर्टरने इंडीया
<<टेरिफ हा आयातीवर लावलेला कर आहे तो शेवटी कन्झ्युमरच देतो, व टेरिफ मुळे अमेरिकेचेच नुकसान होणार आहे हे खरे तर Economics 101 आहे. >>
अरे कोणाला स्पष्टिकरण देत बसताय. ह्या याहू अर्थतज्ज्ञांना काय कळणारे....
असो.
तात्याला रिपोर्टरने इंडीया बद्दल प्रश्न विचारला....तात्याने सुरुवात ठिक केली, पण तो मधेच व्हा. हा. च्या रोज गार्डन बद्दल बोलायला लागला.
https://www.reddit.com/r/ShareMarketupdates/comments/1n9rjmt/trump_who_d...
क्वेस्चन बेमालुमपणे डिफ्लेक्ट करायची पण एक पद्धत असते.
धिस गाय (एन्ड हिज सपोर्टर्स) इज सच अ क्लाउन. दे डोन्ट स्टॉप एम्बॅरसींग देमसेल्व्ज.
तात्याच्या इथल्या समर्थकांची आणि इन जनरल ऑफिस मधे वगैरे असलेल्या समर्थकान्ची टेरीफ ला जस्टीफाय करताना होणारी फरफट खुपच मजेशीर असते. कारण डिप डाउन दे नो आपला माणूस ही भंपक चाल खेळतोय, पण अक्कल आणि लाज, दोन्ही विकलेली असल्या मुळे समर्थन करत बसावे लागते
<<ते ही सरकारची धोरणांच्या
<<ते ही सरकारची धोरणांच्या बाबतीत धरसोड चालू असताना. सप्लाय चेन मूव्ह करणे इज़ ए डाँटिंग टास्क. बाकी चालू द्या.>>
हे त्रंप नि लूट्निकला काय माहित? त्यांनी कधी या गोष्टी ऐकल्या पण नसतील.
तरी पण टॅरिफ आणखी वाढवून ५० वर्षे चालू ठेवली तर दोन फायदे -
एकतर माल विकणारे देश कंटाळून किंमती कमी करतील,किंवा दुसरीकडून स्वस्तात माल विकत घेणे जमेल.
दुसरा फायदा की अपोआपच अमेरिकन लोक स्वतःच्याच देशात सगळा माल स्वस्तात तयार करू शकतील, रोबॉट वापरून, नवी तंत्रज्ञान वापरून वगैरे. अशी ही दूर दृष्टीची पॉलिसी आहे.
१० १५ वर्षे कळ काढा, मग सगळे व्यवस्थित होईल.
पण त्यासाठी मागा वाल्यांनाच निवड्न द्या.
ते बाहेरच्या लोकांना अमेरिकेत येऊ देणार नाहीत. फक्त बेकायदेशीर ड्रग्स अणणार्यांना येऊ देतील किंवा ते टॅरिफ न लावता आयात करू शकतील, हे आवश्यक आहे कारण अमेरिकनांना ड्रग्स पाहिजेतच.
वेल्फेअर, मेडिकेअर वगैरे सारख्या गोष्टी बंद करतील नि वाचलेल्या पैशातून मस्कसारख्या लोकांना सबसिडी देऊन उद्योगधंदे वाढवतील. मग trickle down मुळे थोडेसे पैसे इतरांनाहि मिळतील.
एव्हढी दूरदृष्टी कुणा इतर राष्ट्राध्यक्षाने दाखवली होती का?
म्हणून जगला वाचला तर त्रंपलाच पुनः राष्ट्राध्यक्ष करा.
माझे काय जाते असले लिहायला?
माझे काय जाते असले लिहायला? मी काही अजून तीन चार वर्षेसुद्धा जगणार नाहीये. मग तुमचे तुम्ही पाहून घ्या.
तुम्ही लोक एक गोष्ट ध्यानात
तुम्ही लोक एक गोष्ट ध्यानात घेत नाहोयेत फक्त भारतीय मालावरच ५० टक्के ड्युटी आहे. मात्र बाकीच्या देशांवर नाही. तेव्हा country of ओरिजिन स्वीच करणे हा साधा उपाय आहे, त्यामुळे नुकसान भारताचे आहे, त्या दृष्टीने मी म्हणत होतो की वाढीव टॅक्स ग्राहक देणार नाहीयेत,
हे समजले तर समजून घ्या. दया करा आणि कस्टम ड्युटी ग्राहक देतो इत्यादि मला शिकवू नका. वर मी दिलेली msn ची लिंक जरूर वाचा. त्यात सगळे पर्याय दिलेले आहेत.
हा हापूस आंबे खायचे असतील तर मग पर्याय नाही. SO SAD. पण आम्हाला पण इकडे चांगल्या प्रतीची फळे उदा. सफरचंद नाही खायला मिळत.
गोष्टींच्या बाबतीत हे ईज़ी
के कु पुन्हा एकदा प्रयत्न करतोय.
तुम्ही दिलेली लिंक मी पाहिलीय. पर्याय उपलब्ध असणे आणि एक्चुअली सप्लाय चेन मूव करणे ह्यात फरक आहे.
त्यात तात्याने जगातल्या प्रत्येक देशावर टेरिफ लावलेत. त्यामुळे ५०% टेरिफ असलेल्या भारता पेक्षा २०% टेरिफ असलेला एखादा देश हा कागदोपत्री चांगला पर्याय वाटत असला तरी त्यात अनेक बारकावे असू शकतात. सोप्या गोष्टींच्या बाबतीत हे ईज़ी असू शकेलही पण बहुतांश प्रॉडक्ट्स च्या बाबतीत हे अत्यंत अवघड असते कारण त्यात सिग्नीफिकेंट इन्वेस्टमेंट लागू शकते. परत नवीन लोकांना ट्रेनिंग द्यावे लागते.
बरं परत उद्या परत टाको ने नेहमीप्रमाणे नांगी टाकली आणि भारतावरचे टेरिफ मागे घेतले तर काय अशे अनेक मुद्दे आहेत.
तेव्हा कागदोपत्री काय ऑप्शन्स उपलब्ध आहेत हे दाखवून आमच्यासारख्या टेरिफची प्रत्यक्ष झळ सहन करणाऱ्या लोकांच्या जखमांवर मीठ चोळू नका.
भारतीय मालावरच नाही तर इतर
भारतीय मालावरच नाही तर इतर देशांच्या वस्तूंवरही अमेरिकेने आयातशुल्क (ड्युटी) लावली आहे. मात्र भारतावरील शुल्क तुलनेने अधिक असण्याची शक्यता आहे. आपण रशियन तेल घेतो, हे कारण देत ट्रम्प भारतावर अतिरिक्त २५% शुल्क लावत असल्याचं सांगतात.
आपण प्रामुख्याने दागिने, औषधे, आयटी सेवा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी उत्पादने अमेरिकेत निर्यात करतो. सध्या तरी आयटी सेवा आणि औषधांवर शुल्क नाही. पण उर्वरित वस्तू अमेरिकेला इतर देशांतून घ्याव्या लागल्या, तर त्या अधिक महाग मिळतील आणि त्यासाठी अतिरिक्त वेळही लागेल. परिणामी महागाई वाढेल आणि त्याचा थेट परिणाम अमेरिकेतील निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.
आपला अमेरिकेबरोबरचा व्यापार आपल्या फायद्यात आहे म्हणून अमेरिका ड्युटी लावत आहे, असे म्हणलं तर काही देशांबरोबर अमेरिकेला व्यापारात नफा असतानाही ट्रम्प यांनी त्यांच्यावर शुल्क लावलेले आहे. भारतीय वस्तू जी शंभर रुपयांना मिळत होती तीच इतर देशकडून शंभर रुपयांनाच मिळेल ह्याची शक्यता नाही.
“Anything one man can imagine
“Anything one man can imagine other men can make real.” —Jules Verne
“Anything Trump can imagine other men can make it real.” — ????
टॅरीफ लागु झाल्यापासुन किंमती
टॅरीफ लागु झाल्यापासुन किंमती वाढल्याची उदाहरणं मिळण्याची वाट बघतोय... >>>>
राज,
माझ्या व्यवसायातल्या रॉ मटेरीअलवरच्या किमतींवर टॅरीफमुळे फरक पडलेला आहे. मी रोज मार्केटमधे बघते आहे. जवळपास ३०% किंमती वाढल्या आहेत. आमच्या गावातल्या जवळपास सगळ्या इंडीअन ग्रोसरी स्टोअर्सनी किंमती वाढवायला सुरूवात केली आहे.
Pages