Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीतिका, अभिनंदन अळूची देठीच
नीतिका, अभिनंदन अळूची देठीच आहे.
कोकणातून अळू आलं होतं. देठी खूप जाड, पांढरीशुभ्र आणि भरपूर होती त्यामुळे केली. देठी सोलून बारीक चिरून वाफवून घेतली मग त्यात हिंग मीठ मिरची चुरडून घातलं आणि दही घातलं . भारी झाली होती, अजिबात खाजत ही नव्हती.
भर पावसाळ्यात कुठलाही गाडी
भर पावसाळ्यात कुठलाही गाडी घोडा सोबत न घेता वाशीमधील गणपती बघत एकटाच फिरत होतो.
त्यामुळे मनासारखे हवे तेव्हा हवे तिथे थांबून खाता पिता आले.
.
.
आणि घरच्यांसाठीही पार्सल घेता
आणि घरच्यांसाठीही पार्सल घेता आले
देठीवरून आठवलं, आपल्याकडे
देठीवरून आठवलं, आपल्याकडे कोकणात जसे देठी बनवतात तसेच अळुच्या देठांची भाजी किंवा काहीतरी हिमाचली लोक पण बनवतात. काल आमच्या हिमाचली ड्रायव्हर काकांच्या पिशवीत मला अळुचे देठ दिसले. इसकी सब्जी बनती है असं सांगत होते. मी घाईत असल्याने त्यांना डिटेल्स विचारले नाहीत. उद्या विचारेन.
पंजाब - हिमाचल मध्ये सुद्धा अळुवडी बनवतात. त्यात बरेच जण कांदा आणि लसूण पण घालतात. यावर्षी मला इथे भाजीवाल्याकडे अळु दिसला नव्हता. पंजाबहून कुणाबरोबर तरी एक उंडा मिळाला होता. काल ड्रायव्हर काकांना म्हणलं बेठां बनाने के लिये पत्ते मिले आपके यहां तो मेरे लिये लाना, तर म्हणे पत्ते क्यों, मै कल बेठां बना के लाता हूं. बघू आता उद्या मिळते का अळुवडी.
@ ऋन्मेऽऽष, रवा मसाला डोसा
@ ऋन्मेऽऽष, रवा मसाला डोसा माझाही फेव्ह. मोठा ग्रूप एकत्र सौदेंडियन खायला गेला की ही ऑर्डर सर्वात शेवटी येते - रवा डोसा व्हायला सर्वात जास्त वेळ लागतो पण स्वाद में अव्वल रैता ये.
@ अल्पना,
पंजाबी अळुवडी = बेठां ? नवीन माहिती. मला हा खास exclusive महाराष्ट्रीय / गुजराती (पातरा) पदार्थ वाटायचा.
डोसा, सामोसा - कातिल आहे.
डोसा, सामोसा - कातिल आहे.
तो पट्टी सामोसा आहे ना?
तो पट्टी सामोसा आहे ना? तोंपासू. त्यात बटाटा नसतो ना.. पोहे की कांदा असं काही असतंय. श्या खावंसं वाटतय आता
आशु हो, पट्टी समोसा, कोबी
आशु हो, पट्टी समोसा, कोबी मिश्रित मसाला होता त्यात. पण या सगळ्यात तो प्रकारच मला जास्त आवडला.
समोसा २ प्रकारचे प्रत्येकी २ असल्याने ४ दिसत आहेत.
या सगळ्यात म्हणजे समजून येत नसले तरी त्यात टोटल १० नग आहेत पण ते ७ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत
वरचा खाऊ नवी मुंबईचा होता तर
वरचा खाऊ नवी मुंबईचा होता तर हा आमच्या मुंबईचा

यात गोंधळ नको म्हणून चारही प्रकार सुटे ठेवले आहेत
.
खूप दिवसांनी धागा वर आलाय.
खूप दिवसांनी धागा वर आलाय.

आमच्या मुलाने केलेली थाय ग्रीन करी आणि भात. छान लागत होती.
सतत पाऊस फार बोअर करतोय.
सतत पाऊस फार बोअर करतोय. उतारा म्हणून आंध्रा स्टाइल स्पायसी रसम.
घरात पुरेसे बोल असले तरी उकळते गरम रसम स्टीलच्याच भांड्यात प्यावे - त्याने जीभेला जो चटका बसतो तो जास्त मजा आणतो. 😋
@ ऋन्मेऽऽष>>>> अगदी तोंडाला
@ ऋन्मेऽऽष>>>> अगदी तोंडाला पाणी सुटले
थाय ग्रीन करी आणि भात मस्तच दिसतेय.
अनिंद्य, स्पायसी रसम मस्त दिसत आहे.
गरमागरम रस्सम प्यायला खूप मस्त वाटते
ममो थाय करीत, बेबी कॉर्न
थाय करीत, बेबी कॉर्न घातलेत का ममो? फारच डिलिशिअस दिसते आहे.
ऋन्मेष नेहमीप्रमाणे धाग्याची छळछावणी करुन टाकलीत.
रस्सम आवडले.
>>>>>>कोकणातून अळू आलं होतं.
>>>>>>कोकणातून अळू आलं होतं. देठी खूप जाड, पांढरीशुभ्र आणि भरपूर होती त्यामुळे केली. देठी सोलून बारीक चिरून वाफवून घेतली मग त्यात हिंग मीठ मिरची चुरडून घातलं आणि दही घातलं . भारी झाली होती, अजिबात खाजत ही नव्हती.
वाह!!
थाय करीत, बेबी कॉर्न घातलेत
थाय करीत, बेबी कॉर्न घातलेत का ममो? >> होय सामो,
छान लागत होती. कारण सगळे मसाले , भाज्या आमच्याकडे गोदरेज नेचर बास्केट म्हणून दुकान आहे तिथे मिळाल्या. तसेच सगळा मसाला त्याने खलबत्त्यात कुटला होता त्यामुळे ही चवीत फरक पडतो. नाराळाचं दूध मात्र रेडीमेड आणलं होतं.
देठी साठी ही धन्यवाद सामो
मला नारळाचे दूध आवडते. . सहसा
मला नारळाचे दूध आवडते. . सहसा मी मासे करताना, नारळाचे दूध घालते. क्वचित नारळाचीच चव ओव्हरपॉवरिंग होते. पण जर व्यवस्थित प्रमाणात घातले तर, नारळाचे दूध + लाल मिर्ची + लसूण्+आमसूल वगैरे चव भन्नाट लागते.
मी कोळंबी पुलाव करताना
मी कोळंबी पुलाव करताना नारळाचे दूध घालते. हिट आयटम आहे घरी.
थाय करी आणि रस्सम मस्त दिसते आहे. आत्ता हवं असं वाटतं आहे.
अरे मस्त मी नारळाचे दूध घालून
अरे मस्त मी नारळाचे दूध घालून, कोळंबी पुलाव करुन बघेन.
नारळाचे दूध घालून, कोळंबी
नारळाचे दूध घालून, कोळंबी पुलाव
>>>>
इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन वाटत आहे.
कोळंबी वेगळ्या फॉरमॅट मध्ये आवडते. तिचा पुलाव माझा फार फेवरेट नसल्याने खात नाही फारसा. पण असे वाचूनही पाणी सुटते
मी, अळू घेते तेव्हा
मी, अळू घेते तेव्हा भाजीवाल्याकडून जास्तीची देठे मागून घेते . मस्त सुकी भाजी बनवता येते वाल नाहीतर चण्याची डाळ टाकून . एका इन्स्टा चॅनेल वर अळूच्या देठाची व्हेज बोंबील फ्राय अशी डिश दाखवली होती . अळूची जाड देठे बोट भर कापून घेऊन ताची साल काढून जरा वाफवून घेतली मग त्या वाफवलेल्या देठांना आपला माश्याना मॅरीनेट करतो तसे करून रवा व तांदळाच्या पिठात घोळवून शॅलो फ्राय करावे.
इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन वाटत
इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन वाटत आहे.
>>> सौम्य तरी एकदम फ्लेवरफूल असतो ऋन्मेष आणि मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे करायलाही सोप्पा.
गरमागरम सुकट भाकरी
गरमागरम सुकट भाकरी!
थेट तव्यावरून ताटात
ताटातून पोटात
व्हाया फोटो मार्गे..
ऋन्मेष ताट मस्त दिसतय.
ऋन्मेष ताट मस्त दिसतय. भाकरीबरोबर झुणका घेईन. .
घरी दूध आटवून केलेली बासुंदी... आमच्याकडे एक रोज वापरात असणारी पितळी परात आहे . इतके वर्ष मी त्यातच दूध आटवत होते पण आज विनोद च्या स्टील पॅन मध्ये केली. छान झाली, खाली लागली वगैरे नाही.
अरे रामा!!! उठा ले बाबा.
अरे रामा!!! उठा ले बाबा.
बिचार्या विनोदचं स्टील पॅन
बिचार्या विनोदचं स्टील पॅन आणलंत. आता विनोदला बासुंदी करायची असली, तर तो काय करेल!!
हेमाताई, दिवे घ्या हं.
बासुंदी एकदम फर्मास दिसते आहे. दसर्याला करायचा विचार आहे. तेव्हा इथे झब्बू देईन.
>>>>तर तो काय करेल!! हाहाहा
>>>>तर तो काय करेल!!
हाहाहा
अनया
अनया
)
बासुंदी टेम्प्टिंग...
मी नेटवर हल्लीच्या बर्याच रेसिप्यांमधे कॅरॅमलाईज्ड बासुंदी, मग त्यावर शोभून दिसतात म्हणून गुलाबाच्या पाकळ्या असं काय काय बघितलं. पण व्यक्तिश: मला आपली साधीच, फिकट पिवळसर रंगाची (मोठ्या आंचेवर दणादण आटवलं तर दूधाचा रंग जास्त पालटत नाही) आणि घरीच सुकामेवा भरडून आणि वेलचीपूड घातलेली बासुंदी आवडते.
(मोदकपण पांढरेशुभ्रच. केशरकाडी देखणी दिसली तरी सोज्वळ नाही दिसत.
>>>>केशरकाडी देखणी दिसली तरी
>>>>केशरकाडी देखणी दिसली तरी सोज्वळ नाही दिसत. Lol
बरोबर केशर ते राजसिकच.
हेमा बासुंदी मस्त दिसतेय गं….
हेमा बासुंदी मस्त दिसतेय गं….
मला ते मोदकांवर केशरकाडीचे काही कळत नाही. एकतर हे गेल्या पाच दहा वर्षातले फॅड आहे. आणि एक ग्रॅमच्या डबीत साधारण ५०-६० केशर काड्या असतील. त्यातली एकेक काडी वर लावायची तर मोदक कितीला पडतील??

बासुंदी धन्यवाद सर्वांना.
बासुंदी धन्यवाद सर्वांना.
अनया , आता विनोद काय करेल ? हाहाहा.. भारीच सुचलं तुला.
दसऱ्याला नक्की करा.आणि तुझ्याकडे घरचं दुध असेल तर अप्रतिम चव येईल. ठाण्यात आमच्याकडे गोकुळ दुधाच दही असतं ते ही घट्ट आणि छान होतं पण नाडण ला घरच्या दुधाच दही, ताक , अगदी चहा ची ही चव काही वेगळीच लागते.
प्रद्न्या, गुलाबाच्या पाकळ्या सध्या फारच इन आहेत. सगळ्यांवर गुलाब पाकळ्या. मिठाई खीर श्रीखंड काही सोडत नाहीत. मला ही ट्रॅडिशनल बासुंदीच आवडते. काजू पावडर दूध पावडर, मिल्क मेड खवा घालून शॉर्ट कट नको.
साधना , मोदकावर केशर काडी कॉस्ट चा मुद्दा माझ्या ही नेहमीच येतो मनात. ते दिसतात ही छान पण पांढरेशुभ्र ही तितकेच सुंदर दिसतात. दोन चार वेळा केशर लावलं होतं हल्ली नाहीच लावत.
सारणात ही सगळ्या प्रकारचा सुखामेवा भरमसाठ घातलेला असतो . पण खरी गेम चेंजर आहे फक्त थोडीशी खसखस. सुका मेवा न घालता खसखस घालून बघा अप्रतिम लागते.
Pages