भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिमरन हे वाचा - Tabby cats are also known for their strong personalities, often described as social, playful, affectionate, and intelligent, making them popular and excellent companions.

ऑश्कुची आरती.. जयदेव जयदेव Lol मस्त एकदम
दौलतराव! जोरदार रुबाब हाय! Wink दृष्ट काढली हे बरं केलंत!

सध्या घरातले सगळे कारपेट काढल्यामुळे सॅमीला कुरतडायला काही राहिले नाहीये त्यामुळे हा हताश लुक!

IMG_0758.jpg

मग एक असंच तिला लोळायला टाईमपास कार्पेट टाकलं तर लगेच कब्जा!

https://youtube.com/shorts/oRRvgKlpfOo?feature=share

लेडी रामदेव!

IMG_8872.jpg

मुलासाठी नवीन बेडींग आणलं पण पहिला मान हिचाच

IMG_0371.jpg

लेडी रामदेव! >> Lol वरचा हताश लूक आणि मग शेवटच्या फोटोत एकदम एन्टायटल्ड लूक - धिस बेड इज माइन नाउ! Happy

धिस बेड इज माइन नाउ! Happy>>>>>> Lol हो बघ ना.. नवीन काहीही आलं घरात की पहिलं इन्स्पेक्शन अँड टेस्टींग बाय सॅमी Happy

थँक्यू धनवन्ती... हो घरात बरीच कामं चालू होती त्यामुळे सॅमी बाहेरच येत नव्हती अजिबात. दिवस दिवस भर बेसमेंटच्या एक कोपच्यामधेच बसून असायची आणि मजा म्हणजे कधीही बघायला गेलं की तोच एक स्टेअर लुक आणि एकदम स्थिर... जणू काही समाधीच Happy कॅट्स आर फनी

Hi varsha त्याआधी आलेल्या स्त्री मांजरीचा नाव चंद्रिका आहे ना म्हनून ह्यचा नाव दौलत ठेवला आता ५ माहीने १५ दिवसांचा झाला

सॅमीतर्फे तिच्या सगळ्या सवंगड्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा!! ताईंनी चक्क फोटो काढून घेतले यावेळी.

IMG_1196.jpgIMG_1195 (1).jpg

नंतरच्या फोटोत तर चक्क लाजली आहे वाटतं... क्यूट :डोळ्यात बदाम:
सगळ्या बाळांना आणि आईबाबांना दिवाळीच्या शुभेच्छा! मज्जा करा!

वा कसला देखणा फोटो आला आहे! सर्व पेट पेरेन्ट्स ना दिवाळीच्या शुभेच्छा !! यावेळी काल आमच्याकडे मोठी ३०-३२ लोकांची पार्टी होती. बरेच लोक कम्फर्टेबल नव्हते म्हणून माउईला जेवू खाऊ घालून आधीच वरच्या मजल्यावर दादाच्या सोबतीने ठेवले , खाली येऊ दिले नाही ते अजिबात आवडले नाही. अधे मधे भॉ भॉ नाहीतर गुर्गुर चालू होती. एकदाचे संध्याकाळी पार्टी झाल्यावर खाली यायला मिळाले तेव्हा आधी घर भर धावून भुंका भुंक केली Happy बहुधा आमच्यावरच ओरडत होता, एवढं कळत नाही का, इतक्या अनोळखी लोकांना घरात घेतलेत कसे? Lol

सर्व पेट लव्हर्स करता: नेटफ्लीक्सवरचा कॅरॅमेलो सिनेमा नक्की पहा. भूभूचे उपद्व्याप आणि त्याचे प्रेम दोन्ही खूप सुंदर दाखवले आहे.

कॅरमेलो ला सुखरुप ठेवलेय की मारले आहे >>> शेवटाचा अर्थ आपण लावायचा आहे. कॅरमेलोला एक्स्प्लीसीटली मारलेले नाही.

सुटा शेवट बघितला तर एक अर्थ सुखान्त आणि दुसरा दु:खान्त असू शकतो. पण शेवट आणि सुरुवात एकत्र करून अर्थ काढला तर निघणारे दोन्ही अर्थ सुखान्तच होतात.

कोकोनटला घेऊन बघेन. >>> तुझ्या जबाबदारीवर बघ Wink कॅरमेलो शेजारी कोकोनट बसवला, वाण नाही पण गुण लागला असं झालं तर? भारी वाभ्रट आहे कॅरमेलो Proud

Pages