एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदरणीय प्रधानमंत्री की लंबी आयु और स्वास्थ्य के लिए , जरूर वहाँ पर उनकी तसवीर माँ के चरणों के पास लगा कर उनको आशीर्वाद जरूर दिलाइए - आदरणीय दिल्लीच्या आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय रेखा गुप्ताजी दुर्गा पूजा मंडळांना
<<
दुर्गेच्या चरणांखाली महिषासुर असतो.
पर्फेक्ट प्लेस फॉर अवर राक्शस.

या अभ्यासाचा नक्की उपयोग काय आहे? २०१२-२०१४ मधील आंदोलनाचा पण अभ्यास होणार का? नेहेमीप्रमाणे गाळीव अभ्यास बाहेर येईल काही काळाने.

वरच्या लिंकमधून -
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरात होणाऱ्या आंदोलनांसंदर्भात मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) कडे हे काम सोपवण्यात आलं असून त्यासाठी स्वातंत्र्यापासून, विशेषत: १९७४ सालापासून झालेल्या आंदोलनांचा अभ्यास करण्याचेही निर्देश अमित शाह यांनी दिले आहेत
या काळात झालेल्या सर्व आंदोलनांची कारणं, निश्चित पद्धती आणि परिणाम यांचा अभ्यास करण्याचे आदेश BPR&D ला देण्यात आले आहेत. विशेषत: या आंदोलनांच्या मागे नेमक्या कोणत्या शक्ती काम करत होत्या, हेदेखील तपासण्यास सांगितलं आहे”, अशी माहिती सरकारमधील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली. “भविष्यात विशिष्ट अंतस्थ हेतूंसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांना आळा बसावा म्हणून या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

Vantara in strict compliance with laws; do not tarnish it: Supreme Court after opening SIT report

हे अगदी अपेक्षित होतं. SIT ने सील्ड रिपोर्ट दिला होता.

मी एक पी आर एजन्सी नेमणार आहे. माझ्या वाढदिवसासाठी ती शुभेच्छापत्रे बनवून ती एजन्सी माझ्या परिचितांना नेऊन देईल. ते लोक त्या शुभेच्छापत्रावर सही करून त्या एजन्सीच्या माणसालाच देतील. मग मी त्या शुभेच्छापत्रांचं प्रदर्शन माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर मांडेन.

भरतजी तुम्हीही अभिनंदनाचा व्हिडिओ बनवा पाहू पटकन. Be Safe.
ED ने तुम्हाला आत टाकलं तर रोज डबा कोण आणून देणार ?

मराठीवाल्यांनी बनवलेल्यापेक्षा कमी (अर्थातच! आम्ही कमी कसे?) दर्जाच्या, पन एक्स्ट्रॉ २एबीचं पारायण असल्याने धाग्याला साजेलश्या वाढदिवस शुभेच्छा :
https://youtu.be/TmyJQqXjb-I?si=l3ufHNHLSqYFTEeP

वरुण ग्रोव्हर बरोबर म्हणला होता. पहले मरेगा तो कामराही साला. Proud

उद्घाटनजीवी पंतप्रधानासाठी मराठीवाल्यांनी बरोबर व्हिडिओ बनवला आहे. ज्या गोष्टी इंग्रजांच्या काळापासून निव्वळ पियर प्रेशरने होत आहेत (आणि आता देवेगौडा वगैरे पीएम असते तरी ज्या झाल्या असत्या (पुलवामा-पहलगाम कदाचित झाले नसते, पण मग भक्तांना दु:ख झालं असतं!))- रस्ते-पूल-रेल्वे-धरणे-डिजिटल क्रांती अँड व्हॉट नॉट- त्यासाठी फक्त "एक" माणूस क्रेडिटदार???? त्या माणसाला लाज वाटत नाही, मराठीवाल्यांनाही वाटत नाही, पण सामान्य माणूस आणि उप्भोक्ता म्हणून सामान्य माणसाला?

मला आज भारत पेट्रोलियमचा आज फोन आला. म्हणे- आमच्या पुण्यातल्या ८० पंपांचं गुगल रेटिंग ३.६ आहे, ते ४.७ पर्यत न्यायचं आहे. शिवाय ८० टक्के रिव्ह्युज निगेटिव्ह आहेत, त्यासाठी डिजिटल एजन्सी म्हणून तुम्ही काय करू शकता? धंदा विसरून, 'त्या सार्‍या पंपांवर महादू पाटलांचा भल्या मोठ्या होर्डिंगवर दात काढत लावलेला फोटो आहे की नाही'- हे विचारणार होतो, कंट्रोल केलं.

करोडो रुपये खर्चून पुण्यात मुरलीधर मोहोळांनी पांग फेडण्याचा थोडा प्रयत्न केला. एसपी कॉलेजच्या मैदानात शेकडो ड्रोन्स आकाशात सोडून मदर हिराबा आणि सन महादू यांचा फोटो तयार करून दाखवला. हिराबा अर्थातच पैलवानापेक्षा लहान, कमी उंचीवर दाखवलेली होती, हे सांगायला नकोच.

१. चाबाहार बंदरा च्या वापरासाठी बंधने घालण्यात आलीत.
२. ५०% टेरिफ लावण्यात आले.
३.एच्१बी व्हिसा गेल्यात जमा आहे आता. १००,००० डॉलर फी लावली आहे त्यावर.

आपला मेडिया :
डोलांडने 'नरेंद्र' म्हटलं. कित्ती प्रेम नै!

<< .एच्१बी व्हिसा गेल्यात जमा आहे आता. १००,००० डॉलर फी लावली आहे त्यावर.>>

------ वर्षाला १००,००० $ आहे. Happy
" $300,000 up front or $100,000 a year for the three years."

<< व्हिसा फी सगळ्यांना का फक्त भारतातून गेलेल्या लोकांना? >>

------- H1 B व्हिसा शुल्क सर्वांनाच सारखे असायला हवे. H1B धारकांमधे ७० % लोक भारतीय आहेत त्यामुळे तुलनेने भारताला मोठी झळ बसेल. दर वर्षाला हा १ लाख $ आकार असेल असे कालचे लुटनिकचे वक्तव्य होते. आज त्यात बदल झाला आहे, केवळ एक वेळाच असेल.

आताच अमेरिकेचे शिष्टमंडळ दिल्ली मधे चर्चा करण्यासाठी आले होते. दबाव वाढविण्यासाठी नाक दाबण्याचे प्रकार सुरु आहेत. आता पियूष गोयल अमेरिकेचा दौरा करणार आहेत.

Amitabh Kant
@amitabhk87
Donald Trump’s 100,000 H-1B fee will choke U.S. innovation, and turbocharge India’s. By slamming the door on global talent, America pushes the next wave of labs, patents, innovation and startups to Bangalore and Hyderabad, Pune and Gurgaon . India’s finest Doctors, engineers, scientists, innovators have an opportunity to contribute to India’s growth & progress towards #ViksitBharat. America’s loss will be India’s gain.

आज संध्याकाळी ५ वाजता नॉनबायॉलॉजिकल महोदय टीव्हीवर दिसतील. अ‍ॅड्रेस टु द नेशन.

मी अर्थातच आदर्णीय मोदीजींचं राष्ट्राला उद्देशून भाषण ऐकलं पाहिलं नाही.
चंद्राबाबू नायडूंनी त्यांचं अभिनंदन केलं त्यात GST Bachat Utsav असा शब्दप्रयोग केला आहे.

डिस्काउंट है सेल है

यासाठी तात्यांचे आभार मानले तर चालेल का? राहुल केव्हापासून ओरडून ओरडून याला गब्बर सिंग टॅक्स म्हणतोय. पण त्याला काय कळतंय?

<< सगळ्यांनी भारतात परत या. इथे वर्षाला 2 करोड नोकऱ्या निर्माण होत आहेत. आयटी नाही तर आयटी सेल आहेच की! >>

------ असे नाखुषीने परतणे आवडत नाही किंवा फार कमी पणाचे वाटते म्हणून इतर पर्यायांचा ( म्हणजे कॅनडा , ऑस्ट्रेलिया) पण विचार होतो. Happy
परिस्थिती निवळल्यावर पुन्हा ( अमेरिकेत ) उडी टाकता येते पण भारतात परतल्यावर बाहेर पडणे कठिण बनते.

अर्थात कुठेही ( भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया) असले तरी अज्ञानावर आधारलेला भक्तीरस आळवण्यांत आयुष्य सार्थकी लागते.
वसुधैव कुटुम्बकम् म्हणायचे.

नॉर्थ कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या सभेमधे हजारो लोक एका शिस्तीमधे टाळ्या वाजवितांनाचे अनेक व्हिडीओ आहेत. मला या शिस्तीचे कौतूक वाटते. टाळीचा ठेका चुकल्यास काही शिक्षा असेल तर माहित नाही.

अशीच शिस्तबद्धता आपल्याकडे आली आहे. सराव सत्रांचे आयोजन होत आहे. सेलेब्रिटीज / प्रसिद्ध खेळाडू यांनी काय मेसेज केव्हा fwd करायचा याचा टास्क आखून दिला जातो. भितीपोटी किंवा नेत्याच्या प्रेमापोटी ते हे सर्वकाही निमूटपणे करत असतात.

राजाची ती घोषणा ऐकताच सभेने जयघोष केला. देवतांनी प्रसन्न होऊन आकाशातुन पुष्प वर्षाव केला. गंधर्वांनी सुरेल आवाजात गायन केले. हर्षोल्हसित प्रजाजनांनी नगरी सजवुन एक मास आनंदोत्सव साजरा केला.

-------

राजाने घोषणा केली आणि अनेक दिवस वाट पाहिली. निदान प्रजाजनांनी तरी आनंदोत्सव का बरे साजरा केला नसेल या चिंतेने त्याला ग्रासले. कदाचित आपलीच घोषणा करण्यात काही चूक झाली असावी असा विचार करुन त्याने येणाऱ्या सणाचे औचित्य साधुन जनसभा आयोजित केली आणि प्रजाजनांना आनंदोत्सव साजरा करण्याची सूचना केली.

खरंय. पानभर जाहिरा ती देऊन, कंपन्यांना जाहिरात करायला सांगून उपयोग झाला नाही. आधीचे जास्त जी एस टी रेट नेहरूंनी लावले होते , हे लोकांना माहीतच नाही.

Pages