भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेजारच्या GSD चे अपडेट — २-३ दिवस बाहेर नेले असतांना सगळ्या घराची प्रोफेशनल कंपनी कडून स्वच्छता करून घेतली लॅबचा वास कमी व्हावा म्हणून …. त्या लॅबची सगळी खेळणी, जून्या वस्तू फेकल्या.
आता तो जरा बरा आहे, खाणं पिणं सुरू झालं आहे, सिंबा बरोबर थोडाफार खेळायला लागला आहे .. अजून काही दिवसात तो पुर्ण ठीक असेल अशी आशा आहे

आम्ही ओड्याच्या गळ्यात घंटा बांधली आरती साठी, आधी भुंकुन निषेध केला पण नंतर चालवून घेतलं पण त्याचा उत्साह इतका आणि इतक्या उड्या की त्या घंटीच्या आवाजात आमच्या आरत्यांचा ताल चुकायला लागला
शेवटी काढून घेतली मग Happy

आशुचँप — मांजराच्या गळ्यात घंटा ऐकलं होतं आता ओड्याच्या गळ्यात घंटा म्हणाव लागेलं
आमच्याकडे चला पुजेला म्हटलं की सिंबा पहिला त्या खोलीत असतो. पुर्ण पुजा आरती होई पर्यंत शांत बसून असतो. प्रसाद मात्र द्यावाच लागतो… मग तो पेढा असो की शिरा

माऊई, सुपरक्यूट! Happy
आजचे फोटो सेशन, हिरो असल्याने अधूनमधून करणं भाग आहे.
आराम, तसा चोवीस तासच आरामच असतो. आजकाल उशीही लागते. माणूस होत आहे कोकोनट.
१. IMG-20250916-WA0004.jpg

२. IMG-20250917-WA0010.jpg

नदीकाठी वॉक आणि आम्हाला घुबड दिसले ते पाहताना. कोकोनटला पाहून दूरच्या फांदीवर जाऊन बसले, तरीही बराच वेळ होते.
३.IMG-20250912-WA0009.jpg
४.IMG-20250912-WA0001(1).jpg
५.IMG-20250917-WA0008.jpg
हा आजचा. हल्ली उत्साहाने गाडीत उडी मारतो, आवडते त्यालाही नदीकाठी. Happy

सुपर सुपर क्यूट...
I लव कोकोनट...
आणि ओडीन
आणि सिंबा
आणि ऑस्कर
आणि माऊइ
आणि सॅमी
आणि मनवा..
आणि..... सगळेच फर वाले आणि शेपटीवाले लाडोबा...

ओडिन चा घंटीचा किस्सा आत्ता वाचला! आरत्यांचा ताल चुकायला लागला Lol
कोकोनट चे नविन फोटो क्यूट! माउईला पण उशी लागतेच!

आरती वरून आठवलं, ऑस्करची आरती तयार केली आहे मी Biggrin
( पांडुरंगाच्या आरतीच्या चालीवर म्हणा, रखमाई वल्लभा राइच्या वल्लभा पावे जिवलगा)

C9D5A384-A78D-4EBA-B258-7A5951F89200.jpeg

जय देव जय देव जय ऑस्कर बाळा
डॅडीचा लाडोबा, मम्माचा लाडोबा
सगळ्यांचा लाडोबा, ऑस्कार ऑस्कर ||

सकाळी ऑस्कर चालायला जातो
वाटेत ससे आणि खारी तो शोधतो
*होलफुड्स जवळ आल्यावर पॉटी तो करतो
पॉटी झाल्यावर यु टर्न तो घेतो,
ऑस्कर ऑस्कर ||

घरी आल्यावर जेवायला बसतो
जेवण झाल्यावर चीज मागतो,
चीज खाऊनी ट्रिट्स तो मागतो
ट्रिट्स खाऊनी तृप्तं तो होतो,
ऑस्कर ऑस्कर ||

दुपारी ऑस्कर झोपा काढतो
झोपून झाल्यावर खेळायला जातो
खेळून झाल्यावर डिनर तो करतो
डिनर झाल्यावर पार्कमधे जातो
ऑस्कर ऑस्कर ||

रात्री ऑस्कर लवकर झोपतो
मध्यरात्री उठोनी रॅकुन्स वर भुंकतो
भुंकून झाल्यावर दमून तो जातो
दमून झाल्यावर गाढ झोपतो
ऑस्कर ऑस्कर ||

जय देव जय देव जय ऑस्कर बाळा
डॅडीचा लाडोबा, मम्माचा लाडोबा
सगळ्यांचा लाडोबा, ऑस्कार ऑस्कर ||

(**होलफुड्स इथले सुपरमार्केट आहे, तिथल्या लॉनमधे पॉटी करणे हे ऑस्कर्॑चे रुटिन आहे Proud )

आरती फार विनोदी झालेली आहे Happy
>>>>>रात्री ऑस्कर लवकर झोपतो
मध्यरात्री उठोनी रॅकुन्स वर भुंकतो
हाहाहा
------------------------------------------------------------
दौलत मोठा राजबिंडा आहे की.

अमरिता, दौलत टॅबी कॅट आहे.
.
A tabby cat is characterized by a specific fur pattern of stripes, swirls, and spots, which is not a breed or color but rather a genetic trait. The pattern is defined by the agouti gene, which creates bands of color on each hair strand.

^^^^किती सुंदर आहे ना माझा दौलत आज एक आई म्हाणुन खुप चांगला वाटातय
Submitted by अमरिता^^^
दृष्ट काढ त्याची...

Hi samo हाय समो आताच तुझी कमेंट वाचली टब्बी मांजर चि वेगली काळजी घ्यावी लागते का?

होय समो तुमची मैत्रिण खर बोलते दौलत ला दरवाजा ची कडी उघडता येते,त्याला भुक लागली की तो त्यचा खन्याचा भांड वाजवतो

Pages