मायबोलीकर यूट्युबर्स - पुस्तक दर्पण (प्राचीन)

Submitted by प्राचीन on 7 June, 2022 - 06:56

नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की Happy Happy मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw

रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.

एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर शैलीत सांगतेस प्राचि. उत्तम ओळख. जेवणाच्या शेवटचे 'गोडधोड' याबद्दल छान मुद्दा आला आहे.
अति सर्वत्र वर्जयेत!
विरुद्ध आहार - सात्म्य विरुद्ध आहार म्हणजे आपल्या पिंडाविरुद्ध घेतलेला आहार. खरं गं मला मटन खाल्ले ना की दुसर्‍या दिवशी चिडचिड होते आणि आईसक्रीम खाल्ले की डिप्रेशन येते. Sad ...... हे फार वेळा नोट केलेले आहे. मनोवृत्तीशी विपरीत आहार.

दही-भात अति प्रिय. शिकरण म्हणाजे स्वर्ग Happy

प्राची , आहारमंत्र पुस्तकाचे विवेचन मस्त शैलीत केलेयं तुम्ही.. विडियो काल पाहिला होता.. पण प्रतिसाद द्यायचा राहिला होता. ऐकताना विडियो संपू नये असच वाटत होते. आहारमंत्र पुस्तकाचे परीक्षण ऐकायला घेतले आणि गंमत म्हणजे मी रात्री स्वयंपाकाला तांदळाची भाकरी बनवणार होते तर रात्री जड आहार नको ( मी स्वतः शक्यतो रात्री जेवायचं टाळते ) म्हणून सरळ खिचडी बनवून टाकली. .
खूप शुभेच्छा तुम्हांला.. छान उपक्रम आहे...!

सामो आणि रुपाली, मनमोकळ्या कौतुकाबद्दल धन्सं. मला स्वतःला देखील या पुस्तकात दिल्याप्रमाणे आहारमंत्र नेहमीच पाळता येतो असे नाही.
आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं,संत मुक्ताबाई ची गोष्ट..
https://youtube.com/shorts/VxoYEcVO8N4?feature=share
https://youtu.be/KjSbZ2mZHk4

प्राचीन पुस्तक दर्पण कडे तुम्हीच एकदा पहा.2022 पासून तीन वर्षात जो उत्तम प्रकल्प तयार झालाय तो आपणच केलाय का अशी शंका यावी इतक्या निरिच्छ पणे पहाण्याची अनुभूती येईल. वाचकांसमोर पाटीभर फुलांचे गुंजभर अत्तर ठेवलय. शुभेच्छा!

प्रघा, अगदी विस्तृतपणे अभिप्राय व कौतुक केलंत. . अशा पाठिंब्यावर तर चॅनेल वाट चालत आहे. धन्यवाद.
(अलिप्तपणे असा आशय आहे ना निरिच्छ मधे?)

.2022 पासून तीन वर्षात जो उत्तम प्रकल्प तयार झालाय >>>मलाही तसच वाटलं.. अर्थात तुमचे सातत्य, मेहनत आणि हातोटी यामुळेच शक्य झाले असेल. कौतुक वाटलं:)

धन्यवाद sparkle. आणखीन बरेच व्हिडिओ पुस्तक दर्पण वर आहेत. आपण पाहिलेत का.
लोकमान्य टिळकांच्या आठवणींचा पूर्णविराम.
https://youtu.be/_ePairbna5s

Submitted by प्राचीन on 11 August, 2025 - 20:02 <<<<<

हो. चॅनल सबस्क्राईब केलं आहे. नवे व्हिडिओ येतील तसे पाहिले आहेत. लेटेस्ट व्हिडिओ ही छान.

Pages