भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्या नाकाला काही लागलंय का?

तिकडे असे अ‍ॅनिमल शेल्टर वगैरे असतात का तिथे विचारून पाहता येईल किंवा कॅट कॅफे मधे? माझ्या बहिणीकडे पण एक माऊ आहे तिला सुद्धा अ‍ॅडॉप्शनला द्यायचे आहे. पण कोणी सापडत नाही.

https://www.bing.com/videos/riverview/relatedvideo?q=cat+cafe+in+pune&&m...

धनवन्ती तुमचे काम ग्रेटच आहे… सलाम तुम्हाला
त्या बाळाला लवकर नविन घर मिळू दे

आमच्याकडे fostering करणे शक्यच नाही, सिंबा आमच्या घरच्यांपैकी कुणालाच दुसऱ्या पेटला हात लावू देत नाही. त्यांनी लांबूनच आमच्याकडे पहायचे जवळ यायचे नाही. अगदी डॅाग पार्कला पण आमच्यावर लक्ष ठेऊन असतो.
स्वतः मात्र त्याला पटतील त्याच लोकांना हात लाऊ देतो, ज्यांना त्याला हात लावू नसेल द्यायचा त्यांच्या पासून लांब निघून जातो.
त्याचा माणसं निवडण्याचा काय फंडा आहे ते अजून समजले नाहीये.
किती तरी माणसं त्याला जवळ बोलावताय किंवा हात लावायचा प्रयत्न करतात पण हा काहीच लोकांना हात लावू देतो.

माउई पण फार चूजी आहे लोकांना जवळ येऊ देण्याबद्दल. बहुधा बायका मुली पसंत पडतात त्याला . माझ्या वयाच्या बायका बघून अगदी लाडातच येईल. पण मेन बद्दल फार संशय असतो मनात. जरा जास्त धट्टेकट्टे पुरुष ताबडतोब रीजेक्ट. दाढीवाले कुणी असतील तर रीजेक्ट. बिन दाढीचे जरा लहान चणाचे असतील तर संशयाने बघत बघत का होईना, थोड्या वेळाने हात लावू देतो. Happy

दाढीचा फारच धसका आहे वाटत माउईला

आमच्याकडे हुडी हा प्रकार अत्यंत नावडता आहे.. पुर्ण चेहरा दिसलाच पाहिजे हा कडक नियम आहे … तसचं बोलतांना आमच्याकडे जोरजोरात हातवारे करायचे नाहीत, सिंबा लगेच फुल अलर्ट मोडवर येतो

>>>>>आमच्याकडे जोरजोरात हातवारे करायचे नाहीत, सिंबा लगेच फुल अलर्ट मोडवर येतो
Lol Lol

सिम्बा smiley36_0.gif
माउइ लेडिज मॅन दिसतोय.smiley2.gif

धनवंती.. भारीच !
ओड्याचा किस्सा बरेच दिवसांनी वाचला. कोकोनट एकदम गोड, गुणी बाळ वाटतो Happy

त्याचा माणसं निवडण्याचा काय फंडा आहे ते अजून समजले नाहीये. >> सेफ झोन बघत असतील का ? जोरात हात वारे म्हणजे इमर्जन्सी वाटत असेल कदाचित.

अगदी डॅाग पार्कला पण आमच्यावर लक्ष ठेऊन असतो.>> Lol
सगळी बाळे फारच गोड आहेत इथली आणि किस्से ही तेवढेच आपुलकीचे.

आमच्याकडे हुडी हा प्रकार अत्यंत नावडता आहे..---- आमच्याकडे पण .
ऑरेंज कलर पण आवडत नाही . टेकडीवर जनरली लोक ग्रे काळे निळे पांढरे कपडे घालून असतात पण एक दोन वेळा एक माणूस भडक ऑरेंज कलर चा OVERSIZED Tshirt घालून आलेला तो अजिब्बात आवडला नव्हता .

धन्यवाद प्राजक्ता, मैत्रेयी, शरदजी, मृणाल, हरितात्या, niku Happy

अंजली, त्याला नाकाला जखम होती, खपली होती आणि धूळ पण. डॉक्टर म्हणाले होते की अंघोळ घालू नका, बॉडी temp कमी झालेले त्यामुळे धोका होता.

, सिंबा लगेच फुल अलर्ट मोडवर येतो......... अनुशासन राखणारे कोणीतरी हवे ना.

भडक ऑरेंज कलर चा OVERSIZED Tshirt घालून आलेला तो अजिब्बात आवडला ........ Lol
स्वतः कपडे घालायचे नाहीत,वर दुसऱ्यांच्या कपड्यांच्या बाबतीत नाराजी.मजेदारवाहे.

, सिंबा लगेच फुल अलर्ट मोडवर येतो......... अनुशासन राखणारे कोणीतरी हवे ना.

भडक ऑरेंज कलर चा OVERSIZED Tshirt घालून आलेला तो अजिब्बात आवडला ........ Lol
स्वतः कपडे घालायचे नाहीत,वर दुसऱ्यांच्या कपड्यांच्या बाबतीत नाराजी.मजेदार आहे .

Rambo after grooming Happy
He didn't like grooming at all. पण फर trim करणे जरूरी होत. It's too hot here.

❝ He didn't like grooming at all. ❞

ते दिसतंच आहे. मिशा फेंदारुन रागानं बघतोय तो. 😾

कॅस्पर दोन वर्षांचा झाला आता. पेपरवाल्याला प्रचंड घाबरतो आणि कचऱ्याची गाडी आली की धूम पळतो.

बाकी लोकांवर अटीट्यूड. शेजारच्या आजींवर विशेष राग आहे. त्या कितीही बोलायला आल्या तरी हे महाराज ढिम्म . सरळ डोळे मिटून घेतात.

कॅस्पर दोन वर्षांचा झाला आता. पेपरवाल्याला प्रचंड घाबरतो आणि कचऱ्याची गाडी आली की धूम पळतो.

बाकी लोकांवर अटीट्यूड. शेजारच्या आजींवर विशेष राग आहे. त्या कितीही बोलायला आल्या तरी हे महाराज ढिम्म . सरळ डोळे मिटून घेतात.

Pages