भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आइ ग !

दौलत आणि चंद्रिका... भारदस्त!!

होप सो तो जर्मन शेफर्ड डिप्रेशनमधून लवकर बाहेर येऊदे!

माझ्या घरी गेले १-२ आठवडे कार्पेट/ फ्लोरिंग च्या कामामुळे दिवसभर सतत आवाज, लेबरर्स ची येजा चालू आहे. त्यामुळे सॅमीची एकदम घाबरगुंडी उडाली आहे. बेल वाजली रे वाजली की जी दडी मारून बसते कुठेतरी बॉयलरच्या मागे, सोफ्याच्या कव्हरमधे वाट्टेल तिथे. एकदम रात्री सगळं शांत झालं की येते बाहेर. खाणंपिण, शी शू काहीही लागत नाही दिवसभर. हे नॉर्मल आहे का? इतका कसा कंट्रोल.

अंजली, हे नॉर्मल आहे.
माझी मोठी माऊ पण घरी कोणी आले की असेच करते...
अशी लपून बसते की मला पण सापडत नाही.
आणि तिला कळले की आपली ही जागा माणसांना कळाली तर पुन्हा जागा बदलते.
एक्स्ट्रीम लाजाळू माऊ आहे ती.

गोंडस दिसतोय दौलत.
जर्मन शेफर्ड डिप्रेशनमधून लवकर बाहेर येऊदे!...बिचार्याला त्रास किती त्रास झाला असेल . त्याचा सवंगडी असा गेल्याने . मला पण असं कोणाच्या डॉगी ची अशी बातमी ऐकली तरी फार भीती वाटते .

धनवन्ती ++१
अशी लपून बसते की मला पण सापडत नाही. >>> सेम

मंकी गेला तेव्हा सॅमी पण १ आठवडा बेचैन होती. होतं हळू हळू नॉर्मल. काय करणार.

आज तो मित्र शेवटी दोन दिवसाच्या ट्रीपवर त्याच्या GSD ला घेऊन गेला.. होप परत आल्यावर ते बाळ ठीकठाक असेल …

Hoping the same.
इथे नक्की सांगा.

ओडीन चा किस्सा
आम्ही पाऊस असल्याने ट्रॅक वर च फिरतो
आमच्या मड ट्रॅक वर जाणे शक्य होत नसल्याने
तर त्याला तिथं मी लिश लावलेलाच असतो, तर जाताना एक बाई फोनवर बोलत आम्हाला पास झाल्या
ओडिन तिच्या चेहऱ्याकडे बघत पुढे गेला आणि अचानक त्याला काय स्त्राईक झालं तो एकदम आनंदाने उड्या मारत बाईच्या मागे पळायला लागला
बाईंची एकदम तांतरली, त्या फोन टाकून पळण्याच्या बेतात
मी पटकन लिश खेचली आणि दोघांच्या मध्ये आडवा गेलो
म्हणलं काय ओड्या?
तर म्हणे अरे यांना मी ओळखतो काळू च्या आई, मला हाक मारतात नेहमी
मी म्हणलं, या त्या नाहीयेत
तर म्हणे मी खरच ओळखतो यांना
म्हणलं पण या नाही ओळखत तुला, सो बिहेव्ह
तर मग काय या माणसाचं करावं असं चेहरा करून वळून चालायला लागला

या बाळाचे फँडे काहीतरी अजबच असतात Happy

शुक्रवारी रात्री अजून एक माऊ चे पिल्लू ओटीत पडले.. सोसायटी पार्किंग मध्ये होते ते सात आठ दिवस. कोणी ना कोणी त्याला खाऊ घालत होते. परवा त्याला तोंडाला फेस आला आणि त्याने एकदम मान टाकली. अंग गार पडले. मला फोन आला एकीचा. मग जाऊन त्याला थोडे साफ करून मी आणि मुलगा vet डॉक्टर कडे घेऊन गेलो. माझ्याकडे cat बास्केट आहे, ती अशा वेळी खूपच उपयोगी पडते नेहमीच.
डॉक्टरांनी सांगितले की त्याला विषबाधा झाली आहे, काही तरी खाऊन....
मग त्यांनी इंजेक्शन दिले, औषध लिहून दिले, ग्लुकॉन डी द्यायला सांगितले आणि उबदार ठेवयाला सांगितले. अजून गार पडले असते तर जगले नसते म्हणाले.
मग रात्री त्याला बॉक्स मध्ये हॉट वॉटर बॅग ठेऊन त्यावर जुना मऊ टीशर्ट ठेऊन त्यात ठेवले. रात्री दर दोन तासांनी औषध ड्रॉप्स आणि ग्लूडो पावडर दिली. पाणी बदलून उब ठेवली.
आता ते बरं आहे. ते बघून मी जास्त बरी आहे..
आडोप्शन साठी घर शोधतेय, कारण माझ्याकडे आधीच दोन माऊ आहेत. त्याला चांगले घर मिळू देत...

धनवन्ती, सेवा-शुश्रुषा करून जीव वाचवलास अगदी.

कोकोनट पाऊस बघत बसतो उंबऱ्यावर बसून -
IMG-20250810-WA0003.jpg
कोकोनट आणि मी सकाळी बाहेर बसून (कॉफी पिताना)-
IMG-20250727-WA0003.jpg
घनःश्याम सुंदरा श्रीधरा म्हणजे आमचे सातसाडेसात.

धन्यवाद जाई, जाई, samo, अस्मिता, अंजली _/\_
तुमचे कौतुक म्हणजे माहेरचे कौतुक Happy
जमिनीवरचे घर असते तर अजून काही करता आले असते.
फ्लॅट मध्ये मर्यादा येतात.

फोटो द्यायचे प्रयत्न केला पण नाही अपलोड होत. Size पण कमी केला, तरी नाही..

सापडले तेव्हा...
IMG-20250810-WA0028.jpg

आता असे खाऊ मागते..

IMG-20250810-WA0029.jpg

ओडिन चा किस्सा Lol कोकोनट अगदी हक्काचा साथी वाटतो आहे. खूप गोड वाटते, सगळीकडे आपली सायलेन्ट सोबत करणं.
धनवन्ती. बेस्ट काम केलेस!! क्यूट आहे ते पिल्लू.

Pages