चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का माहित नाही
पण माझा अजून जॉय मुखर्जी अन् विश्वजीत मधे घोटाळा होतो

कदाचित दोघेही अनुल्लेख करण्यालायक असल्यानी असेल...

गुळगुळीत, ओशट चेहेरे.>>>

हाहा… बिश्वजीत तर हिरोइनपेक्षा कमसिन व नाजुक होता. नादान तर तो जन्मतःच होता. हिरोइनच्या चेहर्‍यावर खड्डे दिसतील पण विश्वजीतचा चेहरा अगदी गुळगुळीत. जॉय बरा त्याच्यापेक्षा.

जॉय मुखर्जी , विश्वजीत, राजेंद्र कुमार हे आमच्या आईला व तिच्या मैत्रीणींना जाम आवडायचे. 'जावई असावा तर जॉय मुखर्जी सारखा' हे एका मैत्रीणीचे वाक्य आठवते.

अक्षय कुमारचा सुद्धा >> Lol तसं तर त्याचा करिष्मा नि रेखा मधे पण गोंधळ झाला होता. Wink तब्बू पण होती का त्यात ?

'जावई असावा तर जॉय मुखर्जी सारखा' हे एका मैत्रीणीचे वाक्य आठवते. >> विकू तुम्ही उजव्या साईडने ३० डीग्रीमधे थेट जॉय मउजव्या, डाव्या बाजूने ३९ अंशांतून विश्वजीत नि पाठून खालून ५ अंशांमधे राजेंद्र कुमार सारखे दिसता असे तुम्ही गटग मधे का सांगितलेले ते आज कळले. Lol

साधना, झीनत कृत्रिम होती म्हणजे काय ?

अक्षय कुमारचा सुद्धा >> Lol

रच्याकने सैय्याराची हिरॉईन आदिती राव सारखी वाटते का ?
मार्केटिंगला विरोध नाही, पण अशा प्रकारे आपणच लोक रडताहेत म्हणून अफवा पसरवायच्या अशा मार्केटिंगमधे आपण मूर्खात निघतो.
म्हणून थेटरमधे नाही जाणार.

सरळ प्रमोशन करयचं किंवा उत्सुकता ताणण्यासाठी पीके सारखं पोस्टर रिलीज करायचं,
आशिकी च्या पोस्टरसारखं.
हे काय , माऊथ पब्लिसिटीने पिक्चर चालतोय असं दाखवायला माऊथ पब्लिसिटीचा स्टंट !

स्मृतीभ्रंश वरच्या जुन्या पिक्चरमधे आरजू आहे का ? राकुचाच आहे बहुतेक.
बरेच आहेत, नावं लक्षात नाहीत.

जॉय मुखर्जी , विश्वजीत, राजेंद्र कुमार हे आमच्या आईला व तिच्या मैत्रीणींना जाम आवडायचे. >> Happy
जॉय मुखर्जी देवानंद सारखा वाटतो असं ज्ये ना म्हणतात. पण पिक्चर शम्मी कपूरसारखे करायचा.
विश्वजीत चे दोन सिनेमे पाहिलेत.
एकात तो वर्षभर दंगा करायचा, हिर्विनीला छेडायचा, गाणी म्हणायचा, कव्वालीचा मुकाबला करायचा आणि परीक्षा आली टेबलवर मेनबत्ती लावून भराभर पानं उलटत अभ्यास करायचा आणि फर्स्ट क्लास फर्स्ट यायचा.

दुसरा ऋषिकेश मुखर्जींचा बीवी और मकान. मुकेश माचकरांनी लिहील्यावर पाहिला.
बनवाबनवीचा ओरिजिनल. यात सचिनचा रोल विश्वजीतने केलाय (कि उलटं ?)

Saiyaara हिरोईन बरीचशी मृणाल ठाकूर सारखी वाटते. + सैय्याराची हिरॉईन आदिती राव सारखी वाटते का = मृणाल ठाकूर आदिती राव सारखी वाटते . Wink

म कां ?
असामी ,लसावि आवडता विषय होता का शाळेत ? Proud

आदिती राव कोण ते सर्च करून आलो न आलो ते आता शापित हिरोईन कोण शोधायला जावे लागणार...
सुंदर चेहरे दिसतील या आशेने नाही सुद्धा म्हणता येत नाही.

तब्बू पण होती का त्यात
>>
नाही, पूजा बात्रा होती सगळ्यात आधी (ती फर्ग्युसन ला होती त्या काळात)
मग (त्याच्या लग्नानंतर) प्रियांका, गुल पानाग वगैरे तोंडी लावायला

(कि उलटं ?)
>>
नाही, हेच बरोबर
सचिन नी छापला

साधना, झीनत कृत्रिम होती म्हणजे काय ?>>>

चेहरा कोरा ठेऊन वावरायची, अभिनय तर येत नव्हताच पण तो करायचा प्रयत्नही करत नसे. ती आधी मॉडेल होती, पडद्यावरही तशीच वावरली. बाकी तर जाउदेच. शोभेची बाहुली म्हणुन हिरोचे प्रेमपात्र म्हणुन काम करतानाही तिने कधी प्रेमाचे संवाद चेहर्‍यावर प्रेमाचे भाव आणुन बोलले नसावेत. तिच्या केसमध्ये हिरोच सगळे प्रेम देहबोलीत ओतप्रोत भरुन तिच्याकडे बघायचा आणि ती मख्खासारखी त्याच्याकडे बघत राहायची, आविर्भाव असा की ‘डायरेक्टर बोलतोय म्हणुन मी तुझ्या प्रेमात पडल्यासारखे दाखवतेय, नैतर काय….’ परवीन बरीच लाईवली होती तिच्यापेक्षा.

“नाही, पूजा बात्रा होती सगळ्यात आधी” - करेक्ट. मग त्यावरचा उतारा म्हणून शिल्पा शेट्टी. एकंदरीत लूक-अलाईकचा प्रॉब्लेम होता (आहे?) अकु चा. Happy

लग्न मात्र सासर्याकडे पाहून केलं म्हणतात.

तिच्या केसमध्ये हिरोच सगळे प्रेम देहबोलीत ओतप्रोत भरुन तिच्याकडे बघायचा >> आता तिची देहबोलीच एव्हढी प्रभावी होती कि बापडा हिरो तरी काय करणार त्याला Lol झीनतला अभिनयासाठी नसावे घेत असे वाटते (मनोरंजनमधेही रोल कि डीमांड वगैरे काय तरी होते म्हणे)

परवीन बाबी सुंदर होती. झीनत अमान हॉट होती. परवीन बाबी हॉटही होतीच. पण 'पन्ना की तमन्ना है के हिरा मुझे मिल जाए' गाण्यात झीनत बिकीनीत आहे. तिची फिगर आदर्श होती बिकीनीसाठी. बेस्ट बॉडी, शिवाय एकदम ग्रेसफुल. तिची चेहरेपट्टी मात्र भारतीय सौंदर्यात अपारंपारिक वाटायची. भारतीय वेशभूषा तिला तितक्या सूट व्हायच्या नाहीत. बाकी अभिनयात ती फारशी आवडली नाही.

परवीनच आवडायची. परवीनमधे एक खट्याळ गोडवा होता. चेहरा व डोळे बोलके होता. डम्ब लूक नव्हता. तिचे व शशी कपूरचे आणि तिचे व अमिताभचे रोमॅन्टिक कॉमेडी सीन्स फार आवडायचे. उदा. काला पत्थर, दो और दो पांच, अमर अकबर अँथनी, नमक हलाल, शान.

अमिताभ काही तरी थाप ठोकतोय आणि तिचा काही विश्वास बसत नाहीये आणि मग थाप वाढवत न्यावी लागतेय. शशीचे तिच्या सौंदर्याने आणि हजरजबाबीपणाने smitten by झालेले सीन्स व गमतीजमती सुद्धा धमाल वाटायच्या. अमिताभ आणि शशी प्रेमात जेव्हा मुग्ध- लुब्ध दिसायचे ते खरोखरच मुग्ध झालेत असे वाटायचे मग हिरोईन कोणीही असो. तरीही ही केमिस्ट्री जास्त खुलायची. सत्तेपेसत्ता सिनेमात एकीकडे हेमा व दुसरीकडे रंजिता आहे, परीक्षाच मोठी पण अमिताभला जमलेच. हेमा सुंदर पण प्रचंड रिझर्व्ह्ड आणि रंजिता मख्ख. हेमा मालिनी फक्त धर्मेंद्र सोबतच रिलॅक्स्ड वाटायची. बाकी सगळीकडे रोमॅन्टिक सीन्स मधे ती रिझर्व्हड किंवा थोडी ऑकवर्ड दिसायची. त्रिशूल मधे हेमामालिनी सोबत हेच बरोबर शशीलाही जमले आहे म्हणून दोघांचीही स्तुती एकदाच केली. Happy

हा विषय कसा सुरु झाला मला काही समजले नाही पण चालत्या गाडीत उडी मारायची सवय झाली आहे. Lol

क्याँ देखते हो? सुरत तुम्हारी >> बघ ना ! नि तरीही ती ह्या सिनेमामधे त्याच्याबरोबरच जाते विनोद खन्नाला सोडून Wink

हा विषय कसा सुरु झाला मला काही समजले नाही >> विषयाचे जाऊ दे, पोस्ट पण कुठून सुरू होऊन कुठे संपले आहे ते बघ आधी Wink

विषयाचे जाऊ दे, पोस्ट पण कुठून सुरू होऊन कुठे संपले आहे ते बघ आधी >>>> Lol

बेअर ग्रिल्सच्या शो मधे त्याला हेलिकॉप्टरमधून जंगलात कुठेही लांब नेऊन सोडतात पण तो आपापल्या जागी परत येतो तसं समज. दोन चार ओळी लिहिल्याशिवाय पाजळल्याचे समाधान मिळत नाही हे खरे कारण. Lol

असह्यारा >>> Rofl हे जबरी आहे.

राभू - तुम्ही डॉन पाहिला नव्ह्ता? तुमचा बाकी व्यासंग पाहता टोटली अविश्वसनीय आहे Happy

'जावई असावा तर जॉय मुखर्जी सारखा' हे एका मैत्रीणीचे वाक्य आठवते. >>>
विकू तुम्ही उजव्या साईडने ३० डीग्रीमधे थेट जॉय मउजव्या, डाव्या बाजूने ३९ अंशांतून विश्वजीत नि पाठून खालून ५ अंशांमधे राजेंद्र कुमार सारखे दिसता असे तुम्ही गटग मधे का सांगितलेले ते आज कळले >>> Lol त्यावेळेस विकु आपले नावही विजॉय सांगत असावेत Happy

झीनत बॉण्ड गर्ल टाइप रोल मधे परफेक्ट होती. त्यामुळेच डॉन मधे एकदम चपखल बसली. ग्रेसफुल बद्दल सहमत. तिला अभिनय जमत नसे असे म्हणणे जरा जास्त होईल, पण रेंज फार नव्हती. पण ती अगदी अभिनय सम्राज्ञी म्हणवलेल्या सर्वांचीच होती असे नाही. आता बॉब कट का काय म्हणतात ते करून जंगली बिल्ली झालेली शबाना आपल्याला चालली असती का? Happy

जावई असावा तर जॉय मुखर्जी सारखा' हे एका मैत्रीणीचे वाक्य आठवते. >>> Lol
असे तुम्ही गटग मधे का सांगितलेले ते आज कळले >>>> Lol

राकु, डॉन नाही पाहिलेला. खरंच ? दिल अपना और प्रीत परायी वरच्या लेखाचं काय झालं. Happy

एकात तो वर्षभर दंगा करायचा, हिर्विनीला छेडायचा, गाणी म्हणायचा, कव्वालीचा मुकाबला करायचा आणि परीक्षा आली टेबलवर मेनबत्ती लावून भराभर पानं उलटत अभ्यास करायचा आणि फर्स्ट क्लास फर्स्ट यायचा. >>>> Lol

“ त्यावेळेस विकु आपले नावही विजॉय सांगत असावेत” Lol

“बॉब कट का काय म्हणतात ते करून जंगली बिल्ली झालेली शबाना” - एका दमात कन्व्हिक्शनने हे वाक्य म्हणून दाखव बघू Happy

आता तिची देहबोलीच एव्हढी प्रभावी होती कि बापडा हिरो तरी काय करणार त्याला
Lol

क्या देखते हो सुरत तुम्हारी सारखं खोटं उत्तर नसेल.

शशीसमोर हेमा मालिनी ऑकवर्ड वाटली नाही. कारण शशीने दगडाशीही फ्लर्ट केले तरी दगड फ्लॅटर होईल अशी त्याची ख्याती होती. वर फ्लर्ट करतानाही त्याने मर्यादा सोडली नाही.

झीनत भारतिय वेशभुषेत चांगली दिसायची नाही, परवीन दिसायची.

बॉब कट का काय म्हणतात ते करून जंगली बिल्ली झालेली शबाना >>> कायतरीच काय!! बॉब कट केलेली शबाना फक्त जगातील कामगारांनो एक व्हा म्हणताना शोभेल.

क्या देखते हो सुरत तुम्हारी सारखं खोटं उत्तर नसेल>>>>

काल हेच सतत आठवत होते आणि शेवटी यट्युबवर पाहिलेच. त्या दोघांनाही या खोटारडेपणाचे हसु येतेय हे दिसते इतका बेक्कार अभिनय गाण्यात आहे. शेवटी उतारा म्हणुन जो तुमको हो पसंद.. पाहिले. हे गाणे पुर्णपणे फिरोझ खानचे आहे. कॅमेरा त्याच्यावरच रेंगाळत राहतो, शर्मिलाकडे क्वचित जातो. कसला देखणा दिसतो तो.

शशीने दगडाशीही फ्लर्ट केले तरी दगड फ्लॅटर होईल अशी त्याची ख्याती होती. वर फ्लर्ट करतानाही त्याने मर्यादा सोडली नाही>>>>>>>+ १०००००० माझा लाडका शशीबाबा Happy

राभू - तुम्ही डॉन पाहिला नव्ह्ता? तुमचा बाकी व्यासंग पाहता टोटली अविश्वसनीय आहे >> Happy
व्यासंग कसला आलाय. युट्यूबचं व्यसन आहे. त्यावर पूर्ण पिक्चर न बघताही क्लिप्स मिळतात बघायला, ज्या बघून अंदाज येतो. वल कालिया मधला ऑम्प्लेट बनवायचा सीन दिलाय. मी अजून कुली, मर्द, गंगा जमना सरस्वती, तुफान, जादूगर हे पण नाहीत पाहिलेले.
मायबोलीवर यायच्या आधी एव्हढे सिनेमे नव्हते पाहिलेले. इथे एखादा पिक्चर पाहिलेला नाही असं सांगायला नको म्हणून बरेचसे अशा पद्धतीने पाहिले Proud
नाहीतर पीएसपीओ केस झाली असती.

अस्मिता, दिल अपना और प्रीत पराईचं ते संत तुकाराम नृत्य बघून हा असा घाईत उरकायचा टास्क नाही हे लक्षात आलं. डॉन पाहिला त्या ऐवजी. डॉनबद्दल एव्हढे वाचले, ऐकले आहे कि बघावाच लागला.

क्या देखते हो सुरत तुम्हारी सारखं खोटं उत्तर नसेल. >> Lol

जंगली बिल्ली झालेली शबाना >>> या टर्म वरती तरी विश्वास बसतो का रे तुझा? एकत्र वाचायलाच कसं तरी वाटतंय >> Lol
शबाना म्हटलं कि एका डोळ्यात अश्रू आणि ओठांत अस्फुटसं हसू हेच डोळ्यासमोर येतं. हिंदीतली आशा काळे.

आविर्भाव असा की ‘डायरेक्टर बोलतोय म्हणुन मी तुझ्या प्रेमात पडल्यासारखे दाखवतेय, नैतर काय… >>> Lol
पण तिने मनावर घेतलं असतं तरी चेहर्‍याने साथ दिली असती का ?

हेमा मालिनी फक्त धर्मेंद्र सोबतच रिलॅक्स्ड वाटायची. >>> Lol तिथे अभिनय करावा लागत नसेल. Happy

विश्वजीतचे दोन पिक्चर बघितलेत हे चुकीचं लिहीलंय वर. मै सुंदर हुं पाहिला होता, पण त्यात विश्वजीत आहे हे लक्षात राहिले नाही. सबकुछ मेहमूद.

त्यावेळेस विकु आपले नावही विजॉय सांगत असावेत
<<<<<< Lol

बॉब कट का काय म्हणतात ते करून जंगली बिल्ली झालेली शबाना
<<<<<< Lol

Pages