चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चाललीये चर्चा.
सुरत तुम्हारी खोटं उत्तर Lol
झीनत चा अभिनय खरच अगदी नकली कृत्रिम होता. म्हणुनच मला ती सुंदर वाटली नाही कधी.. फिगर मात्र बाँबशेल.

परवीन अगदी गोड चेहरा, अभिनय पण बरा. सायरा बानू पण गोड चेहरा.
मिना कुमारी, माला सिंहा, गेला बाजार नंदा, नंतरच्या काळातल्या वैजयंती माला मला २ मुलांच्या आया वाटत. माबुदोस.

मिना कुमारी, माला सिंहा, गेला बाजार नंदा, नंतरच्या काळातल्या वैजयंती माला मला २ मुलांच्या आया वाटत.
>>>>
सुरुवातीची मीनाकुमारी, नंदा गोड आणि खात्यापित्या घरातली वाटायची. पण नंतर त्या प्रौढ प्रेम आणि विवाह अभियानाच्या ऍम्बेसेडर असल्यासारख्या वाटायला लागल्या. त्यातही नंदाचा चेहरा तरी गोडच राहिला. मिकू मात्र सुजवट झाली. पद्मिनी आणि आशा पारेख तर आजन्म चाळिशीच्याच वाटत आल्यात.

त्यातही नंदाचा चेहरा तरी गोडच राहिला. > नंदा म्हणजे हम दोनो मधली ना ? तिचे डोळे मला कधी कधी दोन पेग मारल्यासारखे वाटतात. नशिले डोळे यालाच म्हणतात का माहित नाही . माबुदो Happy

शशीने दगडाशीही फ्लर्ट केले तरी दगड फ्लॅटर होईल अशी त्याची ख्याती होती. वर फ्लर्ट करतानाही त्याने मर्यादा सोडली नाही>>>>>>> विमी नावाचा दगड बधला नाही पण Happy वचन, पतंगा मधे शशीबरोबर होती ती.

विम्मीचा चेहरा खूप तेजःपुंज होता. राजघराण्यातली होती. शेवट फार वाईट झाला तिचा. Sad

शशी कपूर सज्जन होता. त्याच्या बद्दल वाचलं होतं कि एका इंग्लीश पिक्चर मधे सिम्मी ( कि सिमी) सोबत त्याचा बोल्ड सीन होता. तिला काही वर्षांनी विचारलं कि शशीने कसं रिअ‍ॅक्ट केलं होतं ? तर ती म्हणाली कि त्याने डोळे मिटून हात जोडले होते .

हमराजच्या आधीच नवी फाईंड म्हणून विमीची खूप हवा झाली होती, त्यामुळे वचन आणि पतंगा हे चित्रपट तिला लगेच मिळाले. हमराज हिट झाला आणि मग विमीने नवीन चित्रपटात सुनील दत्त किंवा राजकुमार मला हवेत असा हट्ट धरला होता त्यामुळे शशी वैतागला होता. हे दोन चित्रपट यथातथाच होते, गाणी बरी होती. विमी नेहमीप्रमाणे ठोकळा होती. झूमके गा यु आज मेरे दिल हे त्यातील एक मस्त गाणं. शशीने अभिनय फार छान केला आहे. विमी एक कृत्रिम हसू आणून दगडासारखी पियानोसमोर उभी आहे.

शशी सज्जन होता. सत्यम शिवम सुंदरम मधलं शीतल, कोमल देवी गाण्याच्या वेळी तो झीनतसमोर अवघडलेला वाटतो. झीनतचा जो काय वेष आहे तो 'शीतल, कोमल देवी' अशा शब्दांना अजिबात सूट होत नाहीये Happy शशीने म्हणे राजकपूरला आडपडद्याने झीनतच्या त्या चित्रपटातील वेषभूषेविषयी सूचना करायचा प्रयत्न केला होता. अर्थात राजकपूर त्याचं ऐकणं शक्य नव्हतंच!

विम्मीचा चेहरा खूप तेजःपुंज होता. राजघराण्यातली होती>>>>

काय????राजघराण्यातली हे पहिल्यांद्या वाचले.

ती एका श्रीमंताची बायको होती, मुलांसकट संसार करत होती, दिसायला सुंदर होती. एका पार्टीत तिची बहुतेक बि आर चोप्राशी भेट झाली. तिचे सौंदर्य पाहुन त्यांनी तिला फिल्ममध्ये काम करायची ऑफर दिली. ती येडी लगेच घर संसारावर लाथ मारुन मुंबईत आली. बोलल्याप्रमाणे चोप्रांनी तिला हमराझ मध्ये हिरोइन केले आणि कपाळबडवंती करुन घेतली. कारण ती सुंदर होती पण अभिनयात दगड होती. (उत्सुकांनी नुसती हमराजची गाणी पाहिली तरी कल्पना येईल. सुदैवाने पिक्चर अर्धा झाल्यावर तिला मारुन टाकुन रोल संपवला त्यामुळे उरलेला चित्रपट निवांत पाहता येतो) त्यात तिला खास चोप्राकडुन आमंत्रण मिळाल्याची खुप घमेंड होती. त्या आटिट्युडमुळे तिला हमराजनंतर जे दोन चार चित्रपट मिळाले ते पुर्ण झाल्यावर काम मिळणे बंद झाले. घरी परतीचे दोर तिने स्वतःच कापुन टाकल्यामुळे तिला जो आसरा देईल त्याच्यावर अवलंबुन राहावे लागले आणि तो जे करायला लावेल ते करावे लागले. शेवटी वाईट अवस्थेत मृत्यु आला आणि ती सुटली त्रासातुन.

चित्रसृष्टीत हिरोइन म्हणुन नाव काढायला आलेल्या पण कुणीही गॉडफादर नसलेल्या बहुतेक मुलींच्या नशिबी विमीसारखेच नशिब येते. विमीला एक हिट चित्रपट मिळाल्यामुळे तिचे नाव स्मरणात तरी राहिले.

सत्यं शिवम … साठी राज कपुरने कपड्यांचे बजेट ठेवलेच नव्हते. गावच्या पोरी बिचार्‍या तुटपुंजे कपडे घालत होत्या, मोळी डोक्यावर ठेवायला गेल्या की चोळी वर गेलीच इतकी कापडटंचाई. ते बघुन शशीबाबाने स्वतःचेच घरचे सुट वापरले.

चंचल शितल निर्मल कोमल…. कवी आनंद बक्शींनी लिहिलेले जबरदस्त हिंदी काव्य आहे. आणि पडद्यावर दोघेही अवघडलेले. तिचा डोळ्याचा अ‍ॅक्सिडेंट तेव्हाच झालेला बहुतेक.

>>>>कारण शशीने दगडाशीही फ्लर्ट केले तरी दगड फ्लॅटर होईल अशी त्याची ख्याती होती.
क्या बात क्या बात!! सत्य.

शशी कपुर खरेच् सज्जन व बायकोशी निष्ठावान होता. पण शबानाबरोबर एकदा अडकला, जेनीफर रागाने घर सोडुन गेल्यावर तो सावरला आणि परतला असे तेव्हा वाचले होते.

“ एका पार्टीत तिची बहुतेक बि आर चोप्राशी भेट झाली.” - बहुदा संगीतकार रवी होता तो. (बोनस पॉइंटसाठी अधिक माहिती: रवी म्हणजे तोच ज्याला त्याचा मुलगा आणि सून - वर्षा उसगावकरने त्याच्या म्हातारपणी पैश्यासाठी छळलं).

बी आर चोप्रा हुशार होता. नीले गगन के तलें मधे राकु आणि विम्मीचे लाँग शॉट्स घेऊन बराचसा फोकस निसर्गावर ठेवलाय.

>>>>>“बॉब कट का काय म्हणतात ते करून जंगली बिल्ली झालेली शबाना”
कोणत्या दिग्दर्शकाची आयडिया ही? जंगली बिल्लीज ही जीव देउन एक्स्टिन्क्ट होतील Lol

“बॉब कट का काय म्हणतात ते करून जंगली बिल्ली झालेली शबाना”
कोणत्या दिग्दर्शकाची आयडिया ही?

शशी कपुर खरेच् सज्जन व बायकोशी निष्ठावान होता. पण शबानाबरोबर एकदा अडकला

>>
आयडिया शशी कपूर ची असू शकेल...

किसी पथ्थर की मूरत से' हे हमराज मधले गाणे चपखल होते. >> Lol

विमी आईची फेवरिट म्हणून माझी पण. दगड म्हणजे भावना दुखावल्या. Lol

बॉबकट जंगली बिल्ली शबाना वरच्या कॉमेण्ट्स धमाल आहेत. जगातील कामगारांनो ला टोटल फुटलो.

मनमोहन देसाईने मात्र तिला एकदा चोर व एकदा पाकिटमार केले Happy

जगातील कामगार>>>> माझेमन Lol
ती पंजा मारत नाही, आंदोलन करते. पंजा मारला तर दोन मिनिटात सगळे होते पण पूर्ण दोन अडीच तास घ्यायचे.

काहीही पाहावे - हाकानाका या अनावश्यक उपक्रमांतर्गत 'भूतनी' नावाचा बंडल सिनेमा पाहिला. त्यात कॉलेजच्या आवारात व्हॅलेंटाईन डे ला सगळे व्हर्जिन्स वडाच्या झाडाची पूजा करतात,( वरgin tree) पण त्यावर एक भुतीण असते. तेथे फोटो, पॅरिस का कुठल्यातरी ब्रीज सारखी कुलूपं, हार्ट शेप फुगे काही बाही ठेवण्यासाठी सगळे येडे पूजाकी थाली व नारळ घेऊन येत असतात.

मौनी रॉय भूत असून बघत असते. तिचं नाव मोहब्बत असतं असं ती 'झाड' धरल्यावर सांगत असते. सच्ची मोहब्बतचे कुणाला काही पडलेलं नसतं, सगळे व्हर्जिन्स फक्त एका ध्येयाने प्रेरित असतात. त्यामुळे तिचं असं झालेलं असतं. त्याचा राग ती कॉलेजकुमारांवर काढत असते. तिच्यामुळे तीन आठवड्यात प्रेमभंग झालेले वीर लूजर्स कुठूनही उड्या घेतात. नंतर कॉलेजमधले कुणीतरी संजूबाबा या मांत्रिक बाबाला बोलावते. त्याला एन्ट्रीला बाबा ब्लॅक शीप गाणं दिलं आहे. नंतर काही बंडल गोष्टी व गाणी होऊन तिला कळतं बाबाच तिची सच्ची मोहब्बत आहे आणि ती संजूबाबा सोबत थोड्या वेळ उडून मुक्त होते. तोपर्यंत सीग्रेड घोस्ट बस्टरी गोष्टी घडतात. प्रेमाची नाटकं होतात. शेवटी महादेव, भगवद्गीता, काली, होळी, व्हॅलेंटाईन, डिस्को सगळं थोडं थोडं झाले की ती आणि आपणही मुक्त होतो.

तर कॉलेजमधले कुणीतरी संजूबाबा या मांत्रिक बाबाला बोलावते. त्याला एन्ट्रीला बाबा ब्लॅक शीप गाणं दिलं आहे. >> Lol

उद्या सिटी प्राईड कोथरूडला सन ऑफ सरदार २ ला जास्तीत जास्त (८) शोज आहेत. सऑस १ बंडल होता.
त्या खालोखाल सैय्यारा आणि महावतार नरसिंहा आणि धडक २ ला प्रत्येकी सहा शोज.
मग गेल्या आठवड्यात आलेले सुपरमॅन, जुरासिक आणि फँ फो, ने ग यांना २ त ३
कुठलाच बघावासा न वाटणारा आहे. फार तर सैय्यारा.

या गर्दीत मराठी परिणती आणि मुंबई लोकल ला प्रत्येकी एक शो.
मुंबई लोकलचं पोस्टर सुद्धा रटाळ आहे. ज्यांनी बनवलाय त्यांना सुद्धा तिकीट काढून बघायची इच्छा होणार नाही.

१ ऑगस्टला आमीर खान युट्यूबवर आमीर खान टॉकीज सुरू करणार आहे. सितारे जमीन पर शंभर रूपयात बघता येणार आहे. हा पण ऑप्शन आहे.

Pages