चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी शाळेत होते तेव्हा दु दवर रात्री उशिरा इंग्रजी चित्रपट दाखवायचे. एक कृष्णधवल चित्रपट होता ज्यात लहान मुलांच्या टोळीला एक एलियन सापडतो. त्याला ते गोठ्यात लपवतात. आणि मग पुढची धमाल. तिथल्या बिटवरच्या बॉबीसमोर नेहमी function at() {
[native code]
}अर्क्य घडते पण तो रिपोर्ट करायला जातो तर काहीच नसते व त्याची फसगत होत राहते. एलियनच्या डोक्यावर एंटेना असतो आणि मुले तो टोपीखाली लवपायचा function at() {
[native code]
}अशस्वी प्रयत्न करत राहतात वगैरे बराच मसाला आहे.

नेटवर शोधला तर ईटी दाखवतात. पण हा इटी नाही. हा कॉमेडी जास्त होता.

कोणाला आठवत असल्यास सांगा.

कोणाला आठवत असल्यास सांगा.
>>
राकेश रोशन ला विचार, कोई मिल गया कशा कशावरून ढापला...
त्यातला एक हा असणार

तिथल्या बिटवरच्या बॉबीसमोर नेहमी function at() {
[native code]
}अर्क्य घडते पण तो रिपोर्ट करायला जातो तर काहीच नसते
<<<<<
अगं, नीट पाहिलंस का? जॉनी लिव्हर असणार तो. Proud

अँकी +1.

नाइव्स आउट २ - ग्लास ओनियन बघितला. मस्तच आहे. खुप फास्ट आहे, त्यामुळे जास्त विचार न करता पाहिला जातो व उगीच ‘काय हे अ आणि अ‘ असले विचार डोक्यात न येता पाहिला जातो.

विकेड डर्टी लेटर्स आणि सेवन विमेन अँड अ मर्डर डालो करुन ठेवलेत. पाहिन आरामात. वि ड ले चा काळ जुना आहे बहुतेक, स्त्री पोलिसांना पुरुष सहपोलिस व आम जनता यांच्याकडुन कसली मानहानी झेलत बसावे लागत होते. सुरवात थोडी पाहिली. बाकी नंतर.

>>> कोण तुम्ही!!! काम ना धाम जीव द्या आणि खोटं ठरवणारे?
तसलं फिसकारून लिहिलं म्हणजेच स्वत: जिवंत असल्याची खात्री होत असेल त्यांची. उगी उगी हो रॉय!
थँकफुली भरतने मनावर घेतलेलं दिसत नाही, आणि घेऊ नयेच.

कालिया थोडा वेळ पाहिला. डॉन मुळं हा युट्यूबने दाखवला.
हिरो चुकीच्या मार्गावर जाऊ लागला कि एखाद्या महिला पात्राच्या शपथेने तो सगळे काळे धंदे सोडायचा हे त्या काळी कंपल्सरी होतं का ?
परवीन बाबी यात खूप सुंदर दिसतेय. परवीन बाबी आणि झीनत अमान सारख्याच वाटायच्या हे अनेकांच्या बाबतीत व्हायचं हे खुद्द झीनत अमानने सांगितलं होतं.

ऑम्लेट चा सीन अजरामर आहे. Happy

थँकफुली भरतने मनावर घेतलेलं दिसत नाही, आणि घेऊ नयेच. >>> ऑफ कोर्स, पण मला आधी वाटले एकमेकांना चांगले ओळखणार्‍या दोन जणांमधले बॅण्टर आहे.

स्वाती, अमित - "आता थांबायचं नाय" बघा. आणि का आवडला नाही ते लिहा लौकर Happy

>>>>हा चित्रपट खर्‍या व्यक्तीवर आधारित आहे. असे आणखी कोणते चित्रपट आहेत? लिओनार्डोचेच नव्हे , कोणाचेही.

@भरत,

जॉय - सुंदर सि नेमा आहे.
ज्या स्त्रीने आत्ताचा फेमस, हंबल पण इफेक्टिव्ह मॉप (पोंछा) शोधला तिच्याबद्दलचा हा सिनेमा आहे. मला फार आवडला होता. किती आँत्रप्रिन्युअर स्पिरिट आहे तिच्यात बाप रे.

थँकफुली भरतने मनावर घेतलेलं दिसत नाही, आणि घेऊ नयेच.
>>>>
भरत यांनी दिलेलं उत्तर आवडलं. एकदम डिफ्लेक्ट करून टाकलं.

ऑफ कोर्स, पण मला आधी वाटले एकमेकांना चांगले ओळखणार्‍या दोन जणांमधले बॅण्टर आहे
>>>
मलाही आधी तसंच वाटलं.

मला आधी वाटले एकमेकांना चांगले ओळखणार्‍या दोन जणांमधले बॅण्टर आहे. >>> मलाही तसंच वाटलं.

विकेड डर्टी लेटर्स (नेफ्लि) पाहिला. १९१०-१५ चा काळ आहे. चित्रपटात दाखवले तसे इण्ग्लंडमधले एखादे लहानसे गाव त्याकाळी असावे. फ्री स्पिरिटेड स्त्रीला त्रास सहन करावा लागतो तसाच तो तोंड बंद ठेऊन वडिलधार्‍या व्यक्तीच्या प्रत्येक आज्ञेला मान तुकवणार्‍या स्त्रीलाही सहन करावा लागतो. तुम्ही कसेही वागा, त्रास काही चुकत नाही. तिनही स्त्री कलाकारांनी उत्तम काम केलेय.

परवीन बाबी यात खूप सुंदर दिसतेय>>>>

परवीन खुप खुप खुप सुंदर दिसायची. तिच्या चेहर्‍यात एक गोडवा होता जो पडद्यावरच्या वावरातही दिसायचा. अभिनेत्री म्हणुन कस दाखवणार्‍या भुमिका तिच्या वाट्याला आल्या नाहीत, शोभेची बाहुली म्हणुनच वापर झाला पण त्यातही ती सहज वावरायची. बहुतेक सगळ्या चित्रपटात तिने वेस्टर्न कपडे परिधान केले तरी रंगबिरंगी मध्ये अमोल पालेकरसोबत गृहिणी म्हणुन कॉटनच्या बिना इस्त्रीच्या साड्यांमध्येही ती खुप गोड दिसलीय.

तिची व झीनतची हेअरस्टाईल सेम होती. दोघींचे केस खुप सुंदर, सरळसोट होते, साधारण एकाच लाम्बीचे होते आणि
दोघीही नेहमी मोकळेच केस सोडायच्या. त्या हेअरस्टाईलमुळेच गोंधळ व्हायचा. पण झीनत खुप
कृत्रिम होती. चेहर्‍यावर दिसायचे. Happy

पद्मिनी कोल्हापुरेचे केसही खुप दाट, काळेभोर, लांबसडक होते.

हो. दीवार मधे ती फारशी आवडली नव्हती. बहुतेक रोल तसा असेल.
झीनत आणि परवीन मधे नाकाचा चांगलाच फरक होता.
झीनत आणि मुमताज या दोघी एकाच नाशिकच्या.

सैय्याराचा हिरो कमल सदानाचा पुनर्जन्म आहे असं वाटतंय.
हिरॉईन सुद्धा कुठल्या तरी ९० च्या हिरविनी सारखी आहे दिसायला.

Saiyaara हिरोईन बरीचशी मृणाल ठाकूर सारखी वाटते. फारच फ्रेश चेहरा शोधला आहे. नजीकच्या काळात या जोडीची क्रेझ वाढत जाईल हे नक्की. ती कॅश करायला हवी. पर्सनली मला सुद्धा यांचा अजून एक चित्रपट एकत्र आलेला आवडेल.

>>>माझा परवीन बाबी आणि झीनत अमान यांच्यामध्ये पूर्वी गोंधळ उडत असे.
सेम!
दोघी वेशभूषेत, मॉडर्न होत्या

Pages