Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
खूप जुन्या चित्रपटाबद्दल
खूप जुन्या चित्रपटाबद्दल लिहितोय. इन्स्टावर एक रील दिसली ( शाळेतला एक विद्यार्थीच आपल्याला त्रास देणार्या बुलीला धडा शिकवायला म्हणून चक्क बदली शिक्षक होऊन येतो ) कुतूहलजनक वाटली म्हणून शोधाशोध केली तर catch me if you can हा चित्रपट कळला. Leonardo DiCaprio चा एकही चित्रपट मी पाहिला नव्हता. टायटॅनिक पहावासा वाटला नव्हता. मग कॅच मी ... पाहिला. टॉम हँक्सच्या आतापर्यंत पाहिलेल्या भूमिकांपेक्षा यात तो किती वेगळा वाटला! इथेही मुख्य डिटेक्टिव्हचा घटस्फोट झालेला असला पाहिजे आणि त्याला एक मुलगी असली पाहिजे हा हॉलिवुडीय नियम पाळला आहे. आता Leonardo DiCaprio चे इतर चित्रपट पाहावे म्हटलं तर The wolf of wall street साठी आणखी पैसे भरायला लागतील, असं दिसतंय. पण पाहीन.
“ टायटॅनिक पहावासा वाटला
“ टायटॅनिक पहावासा वाटला नव्हता.” - हे सब्जेक्टीव्ह आहे हे माहित असूनही
भरत
भरत
तुम्ही आधी "Inception" पहा.
लाईफ एन मेट्रो १, २ नोटेड. (
लाईफ एन मेट्रो १, २ नोटेड.
केकू +१
केकू +१
इन्सेप्शन बघाच!!! चित्रपट बघून जी एक होलसम बधीर भावना आलेली आवडते, ती पुरेपूर येते यात. माझा ओटाफे आहे.
भरत, 'डिपार्टेड' पण बघा.
भरत, 'डिपार्टेड' पण बघा. आवडेल तुम्हाला.
चंद्रा बारोट यांच्याबद्दल
चंद्रा बारोट यांच्याबद्दल वाचलं आणि त्यांचा डॉन सुरू केलाय. वर्षभरापूर्वीच पाहिला होता पण तरीही एंगेजिंग आहे.
एक तद्दन मसालापट , पण कसली भारी भट्टी जमलीय. एकदा भट्टी जमली कि पैसा वसूल.
अमिताभ बच्चन ची स्टार पावर नसती तर हा पिक्चर कल्ट बनला असता का ?
त्या काळात ग्लॅमर, क्राईम आणि कॉमेडीचं भन्नाट मिश्रण असलेली फाईव्ह स्टार डिश आहे हा पिक्चर.
अमिताभ साठी बनवलेल्या पिक्चर मधे इतर अभिनेते असतात तेव्हां ते त्याच्या इमेजखाली अवघडलेले असतात. मेरी जंग मधे अनिल कपूर ने अँग्री यंग मॅनचं बेअरींग पकडण्याचा प्रयत्न केलाय. शाहरूखने त्याच्या सुरूवातीच्या पिक्चरमधे. त्यांना तो बेस वाला आवाज काढताना खूप प्रयास करावे लागतात. अमिताभ बच्चन , नाना पाटेकर , रझा मुराद, जॅकी श्रॉफ, अमरीश पुरी यांच्याकडे तो नैसर्गिक आहे. यातल्या अब, नाना आणि अपु यांनी त्याचा मस्त वापर केला.
दिल अपना और प्रीत पराई थोडासा पळवत ओव्हरऑल पाहिला. हा पिक्चर पाहिला तर त्याबद्दल धागाच काढावा लागेल म्हणून सध्या होल्ड वर आहे.
डिकॅप्रिओचा सर्वोत्तम चित्रपट
डिकॅप्रिओचा सर्वोत्तम चित्रपट म्हणजे शटर आयलंड!
Leonardo DiCaprio चा
Leonardo DiCaprio चा डिपार्टेड, शटर आयलंड,catch me if you caन, blood diamond,इन्सेप्शन रेन्ज छान आहे त्याची. मला blood diamond जास्त आवडला.
वाळवी बघितला, ठीक आहे, किती
वाळवी बघितला, ठीक आहे, किती घोळ, शेवट आवडला.
फँटॅस्टिक फोर - फर्स्ट
फँटॅस्टिक फोर - फर्स्ट स्टेप्स. सशक्त कथा. एकदम मनोरंजक. लहान मुलांना आवडेल असा. मला फार आवडला. तो गॅलॅक्टस अॅझटेक दिसतो अगदी. मस्त कथा आहे. टेलिपोर्टेशन, सु स्टॉर्मचे, बाळ पणाला लागणे.
हो हो! एकेक करून त्याचे
हो हो! एकेक करून त्याचे जमतील तेवढे चित्रपट पाहणार आहे. कॅच मी इफ यु कॅन हा चित्रपट खर्या व्यक्तीवर आधारित आहे. असे आणखी कोणते चित्रपट आहेत? लिओनार्डोचेच नव्हे , कोणाचेही.
भरत
भरत
तुम्ही।लिओ चे हे चित्रपट पहाच असे सांगत येत होतो
तोवर वरती लोकांनी।लिस्ट लिहिलेली दिसली
बघा हां
भारी आहेत लिस्ट मधील चित्रपट
भरत,
भरत,
ब्युटीफुल माईंड बघा
Dr जॉन नॅश ह्यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट
सैयारा पाहिला, नॉट बॅड.
सैयारा पाहिला, नॉट बॅड. आवडण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत
ऋ च्या धाग्यावर लिहिलेय.
आप जैसा कोई बघायचाय.
सध्या रंगीन सीरीज बघत आहे प्राईम वर.. ईंटरेस्टींग वाटतेय. ह्यात ती सेक्रेड गेम्स वाली नावज ची बायको झालेली बाई आहे. हिरो पण नवा फेस आहे, पाहिल्याचे आठवत नाही.
भरत, जीव द्या.
भरत, जीव द्या.
कोणाला?
कोणाला?
ब्युटीफुल माईंड बघा
ब्युटीफुल माईंड बघा
Dr जॉन नॅश ह्यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट >>> हो, हा फार सुरेख आहे. रसेल क्रोने काय काम केलंय, त्याच्या को अॅक्ट्रेसनेही फार छान काम केलंय. हृदयस्पर्शी आहे.
पुर्वी खूप चांगले इंग्रजी चित्रपट बघितलेत, स्टार मुविज आणि एच बी ओ वर. हल्ली अजिबात बघणं होत नाही, नवरा साय फाय वगैरे लावतो तेच येता जाता बघितले तर.
रसेल क्रो आणि मेग रायनचा एक बघितलेला, त्यात रसेल क्रो नेगोशिएटर असतो. मेग रायनच्या नव-याला किडनॅप केलेलं असतं, हा सोडवून आणतो. थरारक आहे. नाव आठवत नाहीये.
अच्छा रसेल क्रो आहे का? माझी
अच्छा रसेल क्रो आहे का? माझी हिंमत न झाल्याने अजुन पाहीला नाहीये.
भरत ह्या सर्वांपेक्षा तुम्ही
भरत ह्या सर्वांपेक्षा तुम्ही 'गुंडा' बघा.
अरे व्वा, मीच भरतना सुचवायची
अरे व्वा, मीच भरतना सुचवायची राहिले. "डोन्ट लूक अप" पाहा. नेटफ्लिक्सवर आहे. धुमकेतू येऊन आदळणार असतो पृथ्वीवर पण लिओचे बोलणे कुणीही सिरियसली घेत नाही. चांगला आहे सिनेमा. लिहिले होते आधी त्यावर. शिवाय "कॅच मी इफ यू कॅन" वरही लिहिले होते. हो, ती कथा सत्यघटनेवर आधारित/ प्रेरित आहे.
वरच्या पोस्टींतले शटर आयलंड, डिपार्टेड मीही पाहिलेले नाहीत. ते रेको मीही घेतेय. बाकी रेको पोस्टींना+१
डिकॅप्रिओचा 'किलर ऑफ द फ्लॉवर
डिकॅप्रिओचा 'किलर ऑफ द फ्लॉवर मून' मला बघायचा आहे. खूप ऐकलं आहे. ओक्लाहोमा मध्ये फर्स्ट नेशनच्या रिझ वर ऑईल सापडते आणि राजकारणी त्यातून पैसे कमवायला येतात.
हा ही सत्य घटनेवर आधारित आहे. गेल्यावर्षी १० एक ऑस्करला नॉमिनेटेड होता.
'किलर ऑफ द फ्लॉवर मून ' भयंकर
'किलर ऑफ द फ्लॉवर मून ' भयंकर स्लो आहे. पुस्तकापासून बराच गडबडलेला वाटला. एक एक कंगोरा पकडण्यामधे सिनेमा सरकतच नाही असे वाटयला लागते. गिकु आठवेल मधे तुला
मी अर्धा पाहिला आहे. बरेच
मी अर्धा पाहिला आहे. बरेच दिवस झाले. अजून पुढे आवर्जून पाहावासा वाटलेला नाही.
वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, बॉयलर रूम, आणि वॉल स्ट्रीट - तिन्हीमधे मूळ धागा सेमच वाटतो मला. यशाची चटक लागणे व त्याकरता कायद्यातील पळवाटा ते ब्लेण्टंट फसवणूक. किंवा यश हे मुळात बेकायदा गोष्टींच्या पायावरच मिळवणे.
"डोन्ट लूक अप" पाहा >>> +१ .
"डोन्ट लूक अप" पाहा >>> +१ . मला आवडला हा पिक्चर.
वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट पण छान होता.
नाईव्स आऊट (नेफ्लि) पाहिला.
नाईव्स आऊट (नेफ्लि) पाहिला. आजच्या युगात घडत असलेली शेरलॉक होम्स किंवा अगाथा ख्रिस्तीची कादंबरी पडद्यावर पाहिल्याचा आनंद मिळतो. अगाथा ख्रिस्तीच्या प्लॉट्सच्या जास्त जवळ आहे. ‘जेम्स बाँड‘ डॅनियल क्रेग डिटेक्टिव आहे. त्याचे डोळे कसले गर्द निळे आहेत. घटना कशी घडली हे फार लवकर कळले तरी त्यातला ट्विस्ट शेवटी कळतो. तोवर चित्रपट उत्सुकता टिकवुन ठेवण्यात यशस्वी होतो. हिरोइन खुपच सुंदर दिसते, मनाचा निर्मळपणा चेहर्यावर प्रतिबिंबीत होतो. खोटे बोलली की उलटी यायची बिमारी तिला असते
नाईव्स आऊट >> भारी आहे. आम्ही
नाईव्स आऊट >> भारी आहे. आम्ही थिएटर मध्येच पाहिलेला. त्यांचा दुसरा भाग नेफी वर आलाय तो पण मस्त आहे.
धन्यवाद धनी. तोही डालो करुन
धन्यवाद धनी. तोही डालो करुन ठेवते.
नाईव्स आऊट >> नोटेड
नाईव्स आऊट >> नोटेड
माझा पण आवडता सिनेमा व नायिका
माझा पण आवडता सिनेमा व नायिका.
भरत, टायटॅनिक पहा. मोठ्या पडद्यावर पाहिला असता तर फारच परिणामकारक वाटला असता.
Pages