चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काजोल तशिही खुप ओव्हररेटेड अ‍ॅक्टेर्स आहे, टिपिकल नेपो किड्स.सामान्य अभिनयक्षमता, लाउड नेचर, सगळीकडे किचाळून बोलण्, भसाभसा हसण. बरिचशी टॉमबॉइश...जराही सटलता नाही.
आता करण जोहर त्या आलिया-रणबिरला डोक्यावर घेवुन नाचतो तेव्हा काजोल-शाखाला घेवुन नाचायचा.

असामी, पोस्ट आवडली.

आती रहेगी बहारे पाहिलं. अमिताभ बच्चनची एक मुलाखत पाहिली होती, त्यात त्याने घरी कॉबोर्ड वर काही गाण्यांच्या चाली बसवल्या होत्या असं म्हटलं होतं. हे म्हणजे अमिताभ गायला लागला तेव्हांचं कि आधीपासूनच त्याला गाण्याचं अंग होतं हे माहिती नाही.

ऋषी कपूर च्या हातात वाद्यं शोभतं असं म्हणतात. पण काही गाण्यात त्याची बोटं कधी ठेका कधी सुरावट सोडून हलतात. तो फक्त आव भारी आणायचा.
या गाण्यात त्याने बर्‍यापैकी अचूक वाद्यं वाजवलंय. १०० पैकी ८५ गुण द्यावेत का ?

खर्‍या व्हायोलिन वादकाने वाजवलेला हाच पीस इथे बघा.

ऋषीचंच कर्जचं थीम म्युझिक (गिटार वादन) सुद्धा बर्‍यापैकी वठलं आहे. यातले सुरूवातीचे पीसेस त्याने अगदी हुबेहूब वठवले आहेत. नंतर कॅमेरा फिरला आहे.
https://www.youtube.com/watch?v=arDfeqPH_Y4&list=RDarDfeqPH_Y4&start_rad...
या थीम बद्दल ऋषीचा जाहीर खुलासा
https://www.youtube.com/watch?v=J8NY1_r_26o&list=RDJ8NY1_r_26o&start_rad...

सर्वात वाईट वादक म्हणून राजेश खन्नाचं नाव आघाडीवर असेल.
https://www.youtube.com/watch?v=eHxK5L_kvzg&list=RDeHxK5L_kvzg&start_rad...

धन्यवाद राभू - लिंक्स बघेन पण ऋषीबद्दल ऐकले होते हे. राज कपूर बद्द्लही. दिलीप कुमार ने मेहनत घेतली असेल पण कोणत्या गाण्यात ती सहज दिसते बघायला हवे. "आज की रात मेरे दिलकी सलामी ले ले" मधेतरी ढोबळ "मधल्या कोणत्याही कीज दाबल्यासारखे करा" स्कूल मधलेच वाटले.

थँक्स फारएण्ड. गाणे सुंदर आहे. अमिताभने पियानो नीट वाजवला आहे .

साधना पियानो फार सुंदर वाजवायची. कारण ती शाळेत शिकली होती बहुतेक. इथे बघा.

दुःखाला एक सांस्कृतिक अप्रुव्हल आहे, तसे आनंदाला नाही. तो अंडररेटेड ठेवायचा आहे.
>>>> अगदी अगदी

ऋषीला वाद्य वाजवता येत नसली तरी तो वाजवण्याची ऍक्टिंग उत्तम करायचा. त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे की गाण्याचे योग्य भाव चेहऱ्यावर दिसावेत म्हणून तो शूटिंग दरम्यान भसाड्या आवाजात गायचा देखील.

दर्द ए दिल मध्ये त्याने बो नीट पकडलेला नाही. पण किमान तो सरळ रेषेत फिरतोय आणि स्ट्रिंगवर बोटेही फिरताहेत.

सर्वात वाईट वादक म्हणून राजेश खन्नाचं नाव आघाडीवर असेल. >> यासाठी प्रचंड कॉम्पिटिशन आहे. पण माझ्या मते धर्मेंद्रला पोळ्या लाटताना कदाचित हेमानेही पाहिले नसेल.

विष्णुपंत पागनीसांनी यावरून इन्स्पिरेशन घेतल्याची दंतकथा आहे >>> याला कंप्लीट फुटलेच Rofl

मीनाकुमारी कधी आवडली नाही >>> +१

'आती रहेंगी बहारे' गाणं फारच आवडतं आणि गुणगुण यादीतलं आहे. अशी कुठलेही सेलेब्रेशेन, कारण नसताना सिनेमात असलेली आनंदी गाणी विरळाच. >>> +१

पिक्चरमधल्या गाण्यांमधे वाद्ये वाजवताना कलाकारांनी हुबेहूब वाजवल्यासारखे केले आहे अशी अजून उदाहरणे आवडतील वाचायला
>>> कर्ज मधला ऋषी. रानभुलीने ऑलरेडी लिहिलंय त्याबद्दल Happy

धर्मेंद्रला पोळ्या लाटताना >>> Rofl माझेमन सुटलीये आज!

पिक्चरमधला राजकुमारचा 'मेरा दिल अब तेरा ओ साजना' वरचा डान्स बघ. विष्णुपंत पागनीसांनी यावरून इन्स्पिरेशन घेतल्याची दंतकथा आहे. >>> सिरीयसली वाचलं होतं हे Lol . आत्ता ते गाणं पाहिलं आणि शंका आलीच Proud

पोळ्या लाटताना Rofl

माझे मन च्या कमेंटस धमाल असतात.
माझ्याकडून बरेचदा त्या त्या वेळी (मोबाईलवरून वाचलेलं असलं कि) दाद द्यायची राहिली कि राहतेच. Sad

वाद्य चर्चा भारी आहे.
रुषि कपुर स्पॉट ऑन
माझ्या मते धर्मेंद्रला पोळ्या लाटताना कदाचित हेमानेही पाहिले नसेल.>>smiley36_0.gif
विष्णुपंत पागनीसांनी यावरून इन्स्पिरेशन घेतल्याची दंतकथा आहे>>smiley36_0.gif

धर्मेंद्रच्या पोळ्या Lol Lol Lol

ऑने सिरेयस नोट,
डीडीएलजे मध्ये शाहरुखचा पियानो सीन भारी होता.
आधीचा फनी पार्ट सुद्धा आणि नंतरचा जेन्युइन वाजवतो ते सुद्धा...

काजोल तशिही खुप ओव्हररेटेड अ‍ॅक्टेर्स आहे, टिपिकल नेपो किड्स.सामान्य अभिनयक्षमता, लाउड नेचर, सगळीकडे किचाळून बोलण्, भसाभसा हसण. बरिचशी टॉमबॉइश...जराही सटलता नाही.
आता करण जोहर त्या आलिया-रणबिरला डोक्यावर घेवुन नाचतो तेव्हा काजोल-शाखाला घेवुन नाचायचा.>>>>>

काजोलचा पहिला चित्रपट रिलिज व्हायच्या आधीपासुनच ती अती ग्रेट अभिनेत्री आहे याचे ढोल वाजत होते आणि ते आजही वाजताहेत.

काजोल, जुही, अजय, आमिर यांच्या इश्क मधल्या एका गाण्यात दोन म्हशी आणि एक रेडा नाचतोय असे मला गाणे बघताना वाटत राहते.

https://youtu.be/KYUcnSOwjxE?feature=shared

माझे मन च्या कमेंटस धमाल असतात.>>>>

सहमत. मोबाईलवरुन कॉपी पेस्ट बेक्कार कटकटीचे आहे. त्यामुळे वाक्ये कोट करता येत नाहीत.

राभु, दिल अपना…. नक्की बघ. पिक्चर इतका संस्कारी की शेवटी नर्सचा फ्रॉक घालुन पाण्यात पडलेली मिकु पाण्यातच साडी नेसते, मग राकु तिला उचलुन बाहेर आणतो. दु द वर पाहताना आम्ही शेवटी ओरडत होतो त्याला की अरे बाबा तुझी बायकोपण तिथेच आजुबाजुला पडलीये बघ, तिला आधी वाचव. पण हाय रे दैवा..

दिल अपना.. व चिराग कहा रोशनी कहा यामध्ये सेमच प्लॉट आहे असे मला वाटते. दोन्हीत सिग्नेचर पांढरी कॉटन नाहीतर नायलॉन साडी व कोपरा पर्यंत बाह्यांचा पांढरा ब्लाऊज असलेली मीकु माझ्या डोक्याचे भजे करतात. नादीराही दोन्हीत आहे की काय देव जाणे. बघायला हवेत दोन्ही.

मला आवडते काजोल, पूर्वीची जास्त आवडायची, सावळी आणि फार मेकअप न करणारी, अभिनय आवडायचा तिचा. खूप वर्षात कुठलाही पिक्चर बघितला नाहीये.

पिक्चर इतका संस्कारी की शेवटी नर्सचा फ्रॉक घालुन पाण्यात पडलेली मिकु पाण्यातच साडी नेसते, >>> Lol
अरे बाबा तुझी बायकोपण तिथेच आजुबाजुला पडलीये बघ, तिला आधी वाचव. >> Proud

काजोल, रेडा,म्हैस Rofl

इथे वेगवेगळी स्टेशन्स लागली आहेत त्यामुळं अस्सा फील येतोय. Lol

माझेमन - मस्त निरिक्षण.

फारएण्डने विचारलंय त्याचं आणखी एक उदाहरण -
हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा - या गाण्यात राजकपूरचा अकॉर्डियन वाजवण्याचा अभिनय सहीसही वाटतो.
पदार्थाची चव आपल्याला समजते ती केवळ चव नव्हे तर त्याचा गंधही त्यात मिसळलेला असतो, असं सायन्स सांगतं. तसंच हे वाद्यांचं आहे. पडद्यावर ते वाजवणार्‍या व्यक्तीची देहबोलीही महत्वाची.

पण माझ्या मते धर्मेंद्रला पोळ्या लाटताना कदाचित हेमानेही पाहिले नसेल. <<< Biggrin मस्तच..
म्हणून तर त्या दोघी बहिणी म्हणत होत्या... ह्योच नवरा पाहिजे..

थॅंक यू, राभु, साधना, रमड

पाण्यात साडी नेसते? नदीत पाण्यासोबत साड्याही वहायच्या की काय? बघितला पाहिजे हा पिक्चर.

पण मला मीकुच्या पांढऱ्या साड्या आवडायच्या. ‘जुही की कली’ गाण्यात मिनीमल जर/एम्ब्रॉयडरी असलेली पांढरी साडी कालच नोटिस केली, लिस्टमध्ये टाकलीही. साधनाच्या, वैजयंती मालाच्या पांढऱ्या साड्या आवडतात.

ह्योच नवरा पाहिजे.
>>>> Lol

धर्मेंद्रला पोळ्या लाटताना कदाचित हेमानेही पाहिले नसेल.
>>
याला आम्ही पियानो खाजवणे म्हणायचो
ऑन स्क्रीन पियानो बहाद्दर काही वेळा दोन्ही हात बाहेरून आत अन् आतून बाहेर हलवत रहायचे.

रच्याकने, हल्ली सिनेमात पियानो वगैरे नसतो फारसा
एजंट विनोद मधलं राबता आठवतंय नंतर कुठलं नाही...

रच्याकने, हल्ली सिनेमात पियानो वगैरे नसतो फारसा
एजंट विनोद मधलं राबता आठवतंय नंतर कुठलं नाही...
<<<<< अंधाधुन आहे ना! तोही श्रीराम राघवनचाच मूव्ही आहे. (कदाचित राघवनला स्वतःला पियानो वाजवता येत असावा. Proud )

अंधाधुन हा एक interesting पिक्चर होता. त्यात पुण्याचे शूटिंग आहे. म्हणून जास्त लक्षात राहिला.

मी काल वाळवी बघायला घेतला, पहील्या सोळा मिनिटांपर्यंत तरी मर्डर कसा करायचा आणि परफेक्शन कसं हवं हेच सुरु होतं. मला सलग बघायचा होता, पण थांबवला. दोन तीन दिवसांत उरलेला बघेन. इतका वेळ मर्डर (आत्महत्येस प्रवृत्त) कसं करायचं प्लॅनिंग का दाखवतायेत. त्यापेक्षा तिने आत्महत्या केल्यावर आम्ही कसं हुशारीने सर्व केलं दाखवायचं की.

काजोलने 'उधार की जिंदगी' या चित्रपटात सुरेख काम केलं आहे. पण तो चित्रपट पडला. नंतर तिचा तो 'पंजाबी कुडी' टाईप अभिनय डोक्यात गेला. दुश्मनमधेही ती आवडली होती.

पांढर्‍या साडीवरून आठवलं. संगममधे वैजयंतीमालाच्या सर्व साड्या पांढर्‍या आहेत. फक्त लग्नाच्या वेळी लाल शालू आहे. राज कपूर् ला तो रंग फार आवडायचा म्हणे. आपल्या पत्नीलाही तो सक्ती करत असे की त्याच्याबरोबर बाहेर कुठे यायचं असेल तर पांढरी साडीच नेसली पाहिजे.

हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा - या गाण्यात राजकपूरचा अकॉर्डियन वाजवण्याचा अभिनय सहीसही वाटतो. >>> हो आठवले!

दु द वर पाहताना आम्ही शेवटी ओरडत होतो त्याला की अरे बाबा तुझी बायकोपण तिथेच आजुबाजुला पडलीये बघ, तिला आधी वाचव >>> Lol

धरमचे पोळ्या लाटणे पाहिले Lol

अंधाधुन आहे ना! तोही श्रीराम राघवनचाच मूव्ही आहे. (कदाचित राघवनला स्वतःला पियानो वाजवता येत असावा. )
>>
पॉसिबल

धर्मेंद्रचे पोळ्या लाटणे Rofl
अरे बाबा तुझी बायकोपण तिथेच आजुबाजुला पडलीये बघ, तिला आधी वाचव > Lol
पिक्चर इतका संस्कारी की शेवटी नर्सचा फ्रॉक घालुन पाण्यात पडलेली मिकु पाण्यातच साडी नेसते, > Lol

ॲन्की, मी पाहिलेले आहे बर्कलेचे रहमानचे व्हिडिओ. मलाही आवडले होते.

अंधाधुन अफाट आहे. आयुष्मानला पियानो उत्तम वाजवता येतो. त्याने दिडशे ट्यून वाजवल्या आहेत असे कुठे तरी वाचलेय. रोचक कोहली, अपारशक्ती व तो कॉलेज पासून पथनाट्य करणं, गाणं, पियानो यात सराईत होते. त्यामुळे आयुष्मान हरफनमौला आहे. अर्थात श्रीराम राघवनने हे गुण हेरून मगच त्याला अंधाधुन साठी घेतले असेल.

काल ३ डी, ज्युरॅसिक पार्क पाहीला. झोप आली मला. किती आदळापट पण कोणालाही खरचटतही नाही. आज एफ १ ला जातोय.

एफ वन एकदम आवडला म्हणजे मिशन इम्पॉसिबल अजिबात आवडला नव्हता. त्यापेक्षा तर आवडलाच पण स्टँड अलोन पाहीला तरी एक उत्तम एन्टरटेनमेन्ट आहे. ब्रॅड पिट वयानुसार अधिक छान दिसतो आता. कथा, दिग्दर्शन सरस आहेच पण पार्श्वसंगीताला वाजणारे ट्रॅक्स खूप आवडले. रेस कार्स - वेग वेग नुसता - टीम वर्क- लोणच्याइतका रोमॅन्स. जरुर पहा.

Pages