खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना. रेसीपी लिहायचा प्रयत्न करेन.
त्याच्याबरोबर मलबार पराठा घेतला होता. तो साऊथ इंडियन स्टाईल असतो तो. तो काय घरी केला नाही. फक्त भाजला नीट.

वामनराव ताट भारी आहे. साज ची मासे थाळी पण मस्त.

ऋ >> ते गतहारी बहुतेक तरी what's app forward आहे. गटारी ला नंतर शब्द शोधून लिहिलेले वाटते. Lol

धनी आणी रमड कडे मशरुम फेवरेट दिसतायत...छान आलाय फोटो.
मासे थाळी मस्त.
वामन रावानी किती निगुतिने ताट वाढलय.
कोशिबिर रेसिपित सुद्धा पडवळ, मिरच्या अगदी एकसारख्या कापल्यात.

धनी ते मोठमोठ्या मराठी वृत्तपत्रांनी बातमी म्हणून दिले आहे. सतराशे साठ लिंक मध्ये ते बघून मग मी इथे टाकले.
मागे एकदा गटारांची म्हणजेच सांडपाण्याचा निचरा व्यवस्थेची पूजा आदर करणारा दिवस असेही वाचले होते.
पण ते दारू पिऊन गटारात लोळणे म्हणून गटारी असे तर बिलकुल नसावे.

जाऊ दे,
तसेही मी गटारी पाळत नाही तर का लोड घेतोय Happy

प्राजक्ता धन्यवाद Happy मश्रुम आवडते आहेत दोघांचेही.

मी गटारी पाळत नाही >> Lol Lol

तसेही आपल्याकडे या दिवसाला दिव्यांची अमावस्या म्हणतात. गटारी हे नंतर निर्माण झालेले आहे Wink
बहुतेक आता बरीच मराठी वृत्तपत्रे पण आजकाल AI वापरून आणि फेसबुक इंस्टाग्राम बघून बातम्या लिहितात असे वाटते. दर्जा फार खालावलेला आहे. जाऊ दे ही चर्चा इथे नको Lol

वामनराव कोशिंबिर्बरेसिपीबद्दल आभार.

चिनी बायांच्या विडिओत त्या कोशिंबिरी एकत्र करुन त्यात ग्लासभर उकळते तेल घालताना नेहमी दाखवतात. आपल्याकडे वरुन फोडणी घालायची असेलच तर ती मापात आणि थंड करुन घालतात. उगीच ग्लासभर उकळते तेल ओतत नाहीत. आता इन्स्टावर कित्येक जण असे उकळते तेल पदार्थांवर ओतताना दिसतात.

त्यांना एकच सांगावेसे वाटते की बाबांनो त्या व्हिडिओतल्या चिनी बाया तेल ओतुन झाले की तो पदार्थ चॉपस्टिकने उचलुन खातात, पदार्थ खाल्ला जातो तेल भांड्यातच राहते. तुम्ही भारतीय पद्धतीने हे ग्लासभर तेल ओतलेले पदार्थ खाल तर तुमची रिळं बाजुला राहतील आणि वजन आटोक्यात कसे आणावे ही रिळं बघण्यात तुम्हाला जन्म घालवावा लागेल. Happy

ताट गच्च भरलेलं आवडत नाही >>> +१

कधी भाजी केलीच , तर घरी फार असंतोष होतो >>> Lol

वामन राव , सगळीच ताटं सुरेख दिसत आहेत. भूक लागली आता Proud

नैवेद्यावर तुळस ठेवतात. >>> घरी पाहिली आहे असं वाटतं.

अनिंद्य, सूप छान दिसतंय. पण त्यापेक्षा त्या पापड रोल मधे मला जास्त इंटरेस्ट आहे Lol बाकी मत्स्यप्रकार काय असतील याचा विचार करते आहे.

आज लेमनग्रासवाला व्हेज ब्रॉथ वापरून डंपलिंग सूप केलं. भरपूर पालक, थोडे मशरूम, स्वीटकॉर्न, गाजर आणि बीन्स घालून.
veg dumpling soop.jpg

सोबत व्हेज डंपलिंग्स / मोमोज आणि ताजा बनवलेला हॉट शेजवान सॉस.
veg momos with szhezwan sauce.jpghot sauce.jpg

आणि थोडे व्हिएतनामीज राईस पेपर रोल्स + पीनट बटर वाला सॉस
rice paper rolls.jpg

चला! येतेच तुझ्याकडे जेवायला , अल्पना>> घासफुस खायला कशाला येतेस, चांगलं खाटखुट काहीतरी बनवते कि तू येणार असशील तर.

थॅंक्यू.

चला! येतेच तुझ्याकडे जेवायला , अल्पना>> घासफुस खायला कशाला येतेस, चांगलं खाटखुट काहीतरी बनवते कि तू येणार असशील तर>
असे असेल तर मी पण येते Happy

+5040 झाले वाटते

हो ना, सेलर पार्किंग मध्ये होतो; तिथं मोबाईल नेटवर्क म्हणजे एकदम आटोरिक्षा!

@ अल्पना

.. ताजा बनवलेला हॉट शेजवान सॉस…. Excellento !
रंग बघूनच रंगत आली. 🤤

सूप असेच थोडे thin & spicy आवडते, फार क्रीमी नसलेले. wanton फारसे नाही आवडत स्लायमी टेक्शरमुळे म्हणून नुसते सूप द्या मला.

व्हिएतनामीज रोल्स = 👌
भौत पसंद मेरेकू.

राईस पेपर रोल्स रेडीमेड होते का? मग काम थोडे सोपे होते. Pairing आणि plating दोन्ही मस्त.

Happy
ते व्हिएतनामी रोल्स पाहून मला मलायका अरोरा ( किंवा तत्सम नटीच्या) पेहरावाची आठवण आली...
तसेच पारदर्शक!
तसेच टेम्पटिंग

+5040 झाले वाटते>> Lol

असे असेल तर मी पण येते>> मायबोलीकरांना कधीही दिल्लीत आले कि घरी येण्याचे आमंत्रण आहे.
राईस पेपर रोल्स रेडीमेड होते का? >> पेपर विकतचेच होते, रोल घरी केले. डम्पलिंग कमी होतील असा अंदाज आल्यावर घाईघाईत केलेत. त्यामूळे फार देखणे नाहीत.

आजचे जेवण, लाईट मशरूम - स्वीट कॉर्न सूप, सलाड (कालचे दोन्ही सॉस / डिपिंग एकत्र करून ड्रेसिंग केलं), सनी साइड अप आणि ताजा सावरडो ब्रेड.
sweet corn mashroom soup, peanut butter sauce dressing.jpg

Pages