Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
माहेरचा सैय्यारा >>>
माहेरचा सैय्यारा >>>
फुफ्फुसात हवा भरुन घेऊन दम लागल्या सारखं गायलं की रोमँटिक वाटतं असा समज असलेला >>>
तो गायनप्रकार आता तर कमालीचा कंटाळवाणा वाटतो आहे. सगळेच दमेकरी एकजात. आणि गाण्यांच्या चाली पण सेम! नेमकं रोमँटिक काय वाटतं कोणाला त्यात? अजून मला तरी समजलं नाहीये.
रडुन काय उपयोग? पैसे थोडेच परत मिळणार आहेत?? >>>
मला तर ती रॉकस्टार गाणी फार
मला तर ती रॉकस्टार गाणी फार डोके उठवणारे संगीत वाटले. मी बायकोशी भांडण झाले की मुद्दाम ती गाणी मोठ्या आवाजात लावायचो जेणेकरून तिचेही डोके उठेल. ती बायको असून चक्क माफी मागायची.
पण त्या गाण्यामधील शब्द कमाल होते. त्यात पूर्ण चित्रपटाची थीम बसवली होती. त्या गाण्यातील शब्दातून चित्रपट पोहोचला. बाकी नसता बघितला तरी चालले असते.
अर्थात Kun Faya Kun हे गाणे मात्र सणसणीत अपवाद.. ऑल टाईम फेवरेट!
याच रॉकस्टार तुलनेत मला यांचाच तमाशा फार आवडतो.. थेट पोहोचतो.. थेट भिडतो.. पुन्हा पुन्हा बघायची गरज नाही. एकदाच बघितला तरी पुरतो.
गतिमान तारा म्हणजे चंकी पाडे.
गतिमान तारा म्हणजे चंकी पाडे.
>>
आहान पांडे हा चंकी च्या भावाचा (चिक्की पांडे चा) मुलगा आहे
मला रॉकस्टार फार आवडला गाणी,
मला रॉकस्टार फार आवडला गाणी, रणबीर सगळंच आवडलं, बारिंग बदकचोची नर्गिस. त्यातलं डायकॉटॉमी ऑफ फेम इन्स्ट्रुमेंटल तर माझं ऑटाफे आहे.
नर्गिस फाकरीला काहीच येत नाही
नर्गिस फाकरीला काहीच येत नाही. ना अभिनय ना नाच. देहबोली सुद्धा एकदम स्टिफ अमेरिकन वाटते. 'फटा पोस्टर निकला हिरोत' 'धटिंग नाच' गाण्यात शाहिद काय नाचला आहे आणि ही अमेरिकन आशा काळे सदृश 'यथा काष्ठं च काष्ठं च' अशी ओंडक्यासारखी हालतेय. एक "ठुमका टेस्ट" घेऊन ठुमका न मारता येणाऱ्या गौरांगनांना परत पाठवावे सरळ. ठुमका येणं एक मोठे अत्यावश्यक कौशल्य आहे हिंदी सिनेमात.
अमेरिकन आशा काळे >>> काहीही
अमेरिकन आशा काळे >>>
काहीही झालं तरी आका चा उल्लेख झालाच पाहिजे! नफा पेक्षा ती पण बरीच बरी आहे. घ्या आका चा नाच -
https://www.youtube.com/watch?v=6T2pzhJqOMw
ही अमेरिकन आशा काळे सदृश 'यथा
ही अमेरिकन आशा काळे सदृश 'यथा काष्ठं च काष्ठं च' अशी ओंडक्यासारखी हालतेय >>>
ठुमका टेस्टही लोल
Submitted by अँकी नं.१ on 25
Submitted by अँकी नं.१ on 25 July, 2025 - 00:12 >> ओह !
हे माहिती नव्हतं. थँक्स.
मला रॉक्स्टारची गाणीच आवडलेली
मला रॉक्स्टारची गाणीच आवडलेली फक्त. चित्रपट बघितल्यावर वाटले नुसता गाण्यांचा अल्बम काढला असता तरी चालले असते, दोन गाण्यांमध्ये ते रद्दड सिन्स कथा म्हणुन घातले त्याची काही गरज नव्हती. वाईट ह्याचेच वाटले की चित्रपट पुढे सरकतो तशी गाणी फक्त एक दोन ओळींची दाखवली. मुळ चित्रपटातच असे होते की आमच्या इथल्या थेटरवाल्यांनाही कंटाळा आल्यामुळे त्यांनी गाणी कापली माहित नाही.
एनी वेज, चिकवाची जुनी पाने रॉकस्टारला झोडपण्यात खर्ची पडलीत, आता मेलेल्याला अजुन काय मारायचे, जाउदेत.
सगळ्याच पोस्टी
सगळ्याच पोस्टी
रॉकस्टार आवडला होता. पुन्हा नव्याने बघायला आवडेल.
यथा काष्ठं च
यथा काष्ठं च
>>>
आका डान्स
>>>>
ते लहान मुलाला आंघोळ घालून दुपट्यात बांधून ठेवतात आणि ती मुलं हात सोडवण्यासाठी हालचाल करतात तसं कायतरी वाटतं आहे हा डान्स बघून.
ठुमका टेस्ट >> हो हो. कित्येक भारतिय ॲक्ट्रेसना पण येत नाही. काही तरी विचित्र जर्की मोशन असते त्यांची. शास्त्रीय नृत्याचा पार्श्वभुमी असेल किंवा इन्हिबिशन्स नसतील तरच जमतो.
काही दिवसांपूर्वी दिल एक
काही दिवसांपूर्वी दिल एक मंदीर पाहिला.
खूप जुना असल्याने काही लिहीलं नाही त्याबद्दल. गाणी माहिती होती पण अशी काही स्टोरी असेल याची पुसटशीही कल्पना नव्हती.
त्या काळात इमॅजिन करून पाहिल्याने खूप आवडला.
डॉक्टरची कर्तव्ये, दुर्धर आजार याबद्दल त्या काळात समाजात उत्सुकता, काही कल्पना असतील.
आनंद मधे पण दिसतं ते.
शेवट धक्कादायक. गाणी एक से एक सुंदर.
(सिनेमा न पाहताच कथा ऐकली असती तर हसू आलं असतं. आजच्या काळात असा बनला तर ट्रोल होईल).
दिल एक मंदिर सुरेख आहे.
दिल एक मंदिर सुरेख आहे. तेव्हाची मुल्ये तशी होती हे लक्षात ठेवले की अ आणि अ वाटत नाही. कंटाळा येत नाही. गाणी कसली सुरेख आहेत.. याद न जाये ऐकताना हमखास डोळे पाणावतात. दिन जो पखेरु होते, पिन्जडेमे मै रख लेता, पालता उन्को जतनसे…., काश…
साधना रॉकस्टार बाबत +786
साधना रॉकस्टार बाबत +786
मी सुद्धा वर तेच लिहिले होते. चित्रपट पोहोचायला गाण्यातील शब्द पुरेसे वाटले. सीन रटाळ.
त्यातली काही गाणी ज्यात लाऊड म्युजिक होते ते डोके उठवणारे वाटल्याने आवडले नाही, तरी नंतर विचार करता लक्षात आले की कदाचित तो माझा जॉनर नसावा म्हणून ते म्युजिक आवडले नाही. ज्यांना आवडते त्यांना आवडली. कदाचित हे चित्रपटाच्या कथेशी सुद्धा सुसंगत आहे म्हणू शकतो. त्यामुळे मला आवडली नाही तरी फसली म्हणू शकत नाही. कारण त्याचवेळी याच्या विरुद्ध टोकाचे संगीत असलेली गाणी कमालीची आवडली आहेत. Kun Faya Kun तर चित्रपटाचा आत्मा आहे.
मला ते आतिफच्या जादुई आणि पाक आवाजात सुद्धा आवडते.
नर्गिसबाबत सर्वांशी सहमत. हीरोइन सुंदर असल्यास तिला अभिनय नाही आला तरी चालतो पण अदा हव्यात. जी चांगली नृत्य करते तिच्यात त्या असतात. म्हणून या कॅटेगरीमधील नोराह फतेही आमच्याकडे आवडते.
दिन जो पखेरु होते, पिन्जडेमे
दिन जो पखेरु होते, पिन्जडेमे मै रख लेता, पालता उन्को जतनसे…., काश… >>> साधना, तुमच्या गेल्या काही दिवसातल्या मायबोलीवरच्या सर्व धाग्यांवरच्या पोस्टी मस्त आहेत. सांगायचं राहून जातंय.
रूकजा रात ठहर जाये चंदा हे गाणं अजून कानात वाजतंय... कसला आवाज आहे.
दिल एक मंदीर >>> शेवट मला खूप
दिल एक मंदीर >>> शेवट मला खूप मेलोड्रॅमॅटिक वाटला. पण ओव्हरऑल चित्रपट आवडतो. याद न जाए, हम तेरे प्यार में, रुक जा रात, जूही की कली गाणी उत्तम. शंकर जयकिशन, लता, रफी, सुमन कल्याणपुर सर्वच अगदी प्राईममध्ये आहेत. या पिक्चरमधला राजकुमार व्हल्नरेबल भूमिकेत सुसह्य वाटतो.
याद ना जाए खरंच कसलं सुंदर
याद ना जाए खरंच कसलं सुंदर आहे . पण रूक जा रातचा हॉण्टिंग इफेक्ट आहे.
आता दिल अपना और प्रीत पराई वीकेण्डला बघायचाय.
बायको सोडून गफ्रेला पाण्यात बुडण्यापासून वाचवतो म्हणून चाललेला ना ?
बायको सोडून गफ्रेला पाण्यात
बायको सोडून गफ्रेला पाण्यात बुडण्यापासून वाचवतो म्हणून चाललेला ना
>>>> मीनाकुमारी की नादिरा ऑप्शन असेल तर माणूस कोणाला वाचवेल? त्यातून मीनाकुमारी नावाप्रमाणे करुणामयी वगैरे असेल तर आणि नादिरा श्रीमंत माणसाची (त्यामुळे हिं चि नियमाप्रमाणे वाईट) मुलगी असेल तर?
बाकी काही नाही बघितलंस तर त्या पिक्चरमधला राजकुमारचा 'मेरा दिल अब तेरा ओ साजना' वरचा डान्स बघ. विष्णुपंत पागनीसांनी यावरून इन्स्पिरेशन घेतल्याची दंतकथा आहे.
अमेरिकन आशा काळे सदृश 'यथा
अमेरिकन आशा काळे सदृश 'यथा काष्ठं च काष्ठं च' अशी ओंडक्यासारखी हालतेय. >>
हम तेरे प्यार में सारा आलम
'हम तेरे प्यार में सारा आलम'मध्ये मीनाकुमारीच्या गाण्याला सतारीची साथ दिली आहे. २ कडव्यांच्या गॅपमध्येच ती सतार वाजवते. पण जेव्हा ती गात असते तेव्हा ती उजव्या हाताने फक्त तारा छेडत असते. जेव्हा ती अतिशय विमनस्क होते तेव्हाही तिच्या तर्जनीने तिने कायम सूर धरलेलाच असतो. तिला सतार वाजवता येत होती की नाही हे माहित नाही. पण कुठल्याही स्ट्रिंग वादकाचं बेअरिंग, अंगात मुरलेली लय तिने नेमकी पकडली आहे. दोन्ही हाताची नखं व्यवस्थित कापलेली आहेत. हे अटेन्शन टू डीटेल नव्या अभिनेत्यांनी शिकण्यासारखं आहे.
रडुन काय उपयोग? पैसे थोडेच
रडुन काय उपयोग? पैसे थोडेच परत मिळणार आहेत?>> साधना
अस्मिता.
यथा काष्ठं च आका डान्स <>>>
बोहेमियन स्पिरीट...हे काय पचनी नाय पडलं गं, जरा सोलून सांग.
मला रॉकस्टार नाही आवडला..गाणी १ नम्बर.
मीनाकुमारी की नादिरा ऑप्शन
मीनाकुमारी की नादिरा ऑप्शन असेल तर माणूस कोणाला वाचवेल? >>>
'हम तेरे प्यार में सारा आलम'मध्ये मीनाकुमारीच्या गाण्याला सतारीची साथ दिली आहे. २ कडव्यांच्या गॅपमध्येच ती सतार वाजवते. पण जेव्हा ती गात असते तेव्हा ती उजव्या हाताने फक्त तारा छेडत असते. जेव्हा ती अतिशय विमनस्क होते तेव्हाही तिच्या तर्जनीने तिने कायम सूर धरलेलाच असतो. तिला सतार वाजवता येत होती की नाही हे माहित नाही. पण कुठल्याही स्ट्रिंग वादकाचं बेअरिंग, अंगात मुरलेली लय तिने नेमकी पकडली आहे. >> क्या बात है. नेटकं निरीक्षण.
याद ना जाये आता मुद्दामून ऐकलं. लताचं गारूड ओसरल्यावर. कसलं किलर गाणं आहे. आवाज असा लागलाय कि सगळं दु:ख व्यक्त व्हावं पण हाय नोडस काय सहज आहेत. वरती साधनाताईंनी दिलेल्या ओळी वाचल्या तेव्हां शैलेंद्र गीतकार असेल अशी शंका आलेली. खरी ठरली. गाईड मधे पण असंच एक गाणं शैलेंद्र ने लिहीलंय त्याला फिल्मफेअर मिळालं होतंं.
बारिंग बदकचोची नर्गिस
बारिंग बदकचोची नर्गिस
>>
इम्तियाज ची ओरिजनल चॉईस डायना पेंटी होती
पण निर्मात्याच्या आग्रहामुळे नर्गिस ची वर्णी लागली
मग पुढे इम्तियाज च्या कथेवर कॉकटेल बनत होता तेव्हा त्यानी तिला रेकमेंड केलं अन् तिचा डेब्यू झाला
मला रॉकस्टार मधलं जो भी मैं,
मला रॉकस्टार मधलं जो भी मैं, कुन फाया कुन अन् हव्वा हव्वा आवडतात.
कुन फाया कुन रॉकस्टार पेक्षा रेहमान बर्कले ला गेला असताना त्या स्टूडंट्स नी गायलेलं जास्त आवडतं (त्यांनी त्यावेळी गायलेली सगळीच गाणी कमाल आहेत)
हव्वा हव्वा हे एक कमाल बॅलड आहे. या प्रकारातली गाणी फार नाही बनत, पण जी बनतात ती छान असतात...
पण कुठल्याही स्ट्रिंग वादकाचं
पण कुठल्याही स्ट्रिंग वादकाचं बेअरिंग, अंगात मुरलेली लय तिने नेमकी पकडली आहे. दोन्ही हाताची नखं व्यवस्थित कापलेली आहेत. हे अटेन्शन टू डीटेल नव्या अभिनेत्यांनी शिकण्यासारखं आहे. >>> सही! पिक्चरमधल्या गाण्यांमधे वाद्ये वाजवताना कलाकारांनी हुबेहूब वाजवल्यासारखे केले आहे अशी अजून उदाहरणे आवडतील वाचायला. मुळात त्यातले फार गम्य नसल्याने अचूकता लक्षात येत नाही. असे कोणी उलगडून दाखवले तर मस्तच.
नाहीतर अनेक पियानो वाल्या गाण्यात लोक एक ढोबळ मार्गाने हात फिरवताना दिसतात. गाण्याची चाल, संगीत काहीही असो.
इथे अमिताभने बरोबर केले आहे असे वाटते. पण पूर्ण गाण्याचे माहीत नाही. (गाणे मात्र सुंदर आहे)
राखी किती तरुण आहे. नेहमी
राखी किती तरुण आहे. नेहमी आधुनिक दिसते ती. गांव की गोरी तिला नाही शोभणार असे वाटते. फा, बरोबर, गाणे सुंदर आहेच.
मधुबन में राधिका नाचे रे
मधुबन में राधिका नाचे रे
या गाण्यासाठी दिलीपकुमार सतार शिकला.
माझेमन मस्तच निरीक्षण. दिल एक
आशु, @ रॉकस्टार bohemian spirit - जिप्सी, समाजाच्या चौकटी मोडणारे, वल्ली, कलाकार असलेले कॅरेक्टर आहे रणबीरचे त्यात. ते पोचायला थोडा त्या कलाने पाहिला तर कदाचित आवडेलही.
'आती रहेंगी बहारे' गाणं फारच आवडतं आणि गुणगुण यादीतलं आहे. अशी कुठलेही सेलेब्रेशेन, कारण नसताना सिनेमात असलेली आनंदी गाणी विरळाच. आनंदासाठी आनंद. आपल्याकडे कारणाशिवाय उदास होऊ शकतील पण आनंदी नाही. दुःखाला एक सांस्कृतिक अप्रुव्हल आहे, तसे आनंदाला नाही. तो अंडररेटेड ठेवायचा आहे.
गप्पा आवडल्या.
मी आले होते भुतं घेऊन. काजोलचा 'मा' पाहिला. जारणची चांगली प्रिंट मिळत नव्हती व भुताचे डोहाळे लागले होते. हा दिसला एवढंच कारण आहे. बरा आहे. भूत नसून दैत्य आहे. जे थोडे मुंजातल्या झाडासारखे दिसते. आजकाल जंगलतोड इतकी झाली आहे की भुतांना सुद्धा अधिवास राहिला नसेल. मग ते असे खिडकीतून पारंब्या वगैरे सोडतात. खूप चांगला नाही, पण एंगेजिंग आहे. काजोल आपल्या मुलीला वाचवण्यासाठी दैत्याशी लढते. छोरी २ यापेक्षा चांगला होता. इथे बंगाली पार्श्वभूमी, हवेली, कालीपूजा, तान्ह्या अर्भकांचे बळी वगैरे आहेत. काजोलच्या अंगात काली येते त्यामुळे इझी वाटते. माणूस म्हणून लढायला हवं होतं, सुपरपावर्स नसताना लढलेलं दाखवणं जास्त इंप्रेसिव्ह वाटलं असतं. काही गोष्टी अ आणि अ आहेत. काही गोष्टींचा संदर्भ लागत नाही, किंवा ओढूनताणून वाटतो. तरी फारच हॉरर बघावा वाटत असेल तर बघा.
हो मीही एका हातभट्टी
हो मीही एका हातभट्टी टेम्प्टेशन मधे "मा" पाहिला! मलाही ओढून ताणून काजोल ला सुपर माँ दाखवायचा प्रयत्न वाटला. बोअर आहे.
मला मीनाकुमारी कधी आवडली नाही. ते बहु बेगम, दिल एक मंदिर हे सिनेमे पण अजिबात आवडत नाहीत. गाणी चांगली आहेत पण अॅक्टिंग आणि स्टोरी दोन्ही फार मेलोड्रामॅटिक वाटतात. जुन्या पिढीच्या लोकांसमोर या सिनेमांना आणि मीनाकुमारीला नावे ठेवणे अलाउड नव्हते
पिक्चरमधल्या गाण्यांमधे
पिक्चरमधल्या गाण्यांमधे वाद्ये वाजवताना कलाकारांनी हुबेहूब वाजवल्यासारखे केले आहे अशी अजून उदाहरणे आवडतील वाचायला. >> राज कपूर शिकायचा वाद्य बेसिक वाजवायला असे वाचलेले. अर्थात त्याला संगीताचा कान होता त्यामूळे ते नॅचरल असेल. दिलिप कुमारने पण कुठल्या तरी गाण्यासाठी सतार वाजवणे शिकले होते असे वाचलेले राजू भारतनच्या केस मधे . ऋह्षी कपूरने डफलीवाले साठी काही तरी केले होते पण एकंदर त्या गाण्यामधे नाचणे नि डफलीचे स्वर एकाच वेळी येत असल्यामूळे ते ठीक उतरलेले वाटत नाही.
दिल अपना नि दिल एक मंदीर दोन्हींची गाणी इतकी जबरदस्त असूनही शंकर जयकिशन च्या मास्टरपीसेस मधे त्यांना कसली जबरदस्त स्पर्धा आहे. त्यातल्या एकालाच फिलम्फेयर मिळाले होते म्हणजे त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतरांचे काम पण कसले भारदस्त होते हे जाणवते. फिल्मी संगीतासाठी खरा सुवर्णकाळ !
Pages