Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
सैयारा बद्दल १ शबुद नाही इथे?
सैयारा बद्दल १ शबुद नाही इथे? तिकडे सोमि वर आगी लागल्यात.
आप जैसा बघणार आहे. मालिक & सैयारा नाही बघायचाय.
सैयाराचा ट्रेलर पाहून 'ए
सैयाराचा ट्रेलर पाहून 'ए स्टार इज बॉर्न' या चित्रपटाच्या तोडीस तोड चित्रपट असेल असे वाटले. आवर्जून पाहायला हवा.
स्टूडंट ऑफ द यिअर पेक्षा मेजर अपग्रेड वाटतो यशराजचा तरीही यशराजचा चित्रपट आहे हे लपून राहत नाही.
सैयारा इथे कोणी पाहिला नाही
सैयारा इथे कोणी पाहिला नाही का?
लोकं रडत आहेत चित्रपट बघून अशी चर्चा आहे...
लोकं रडत आहेत चित्रपट बघून
लोकं रडत आहेत चित्रपट बघून अशी चर्चा आहे>>>>
म्हणुन रिव्ह्यु वाचुन चित्रपट बघायला जायचे. नंतर रडुन काय उपयोग? पैसे थोडेच परत मिळणार आहेत??
(No subject)
लोकांनी ढसा ढ्सा रडणे , शुद्ध
लोकांनी ढसा ढ्सा रडणे , शुद्ध हरपणे .. हा नवीन पी आर स्टंट आहे .
सैय्यारा ? कुठला पिक्चर आहे
सैय्यारा ? कुठला पिक्चर आहे हा ?
म्हणुन रिव्ह्यु वाचुन चित्रपट
म्हणुन रिव्ह्यु वाचुन चित्रपट बघायला जायचे. नंतर रडुन काय उपयोग? पैसे थोडेच परत मिळणार आहेत??

>>>>
सैयारा इथे कोणी पाहिला नाही
सैयारा इथे कोणी पाहिला नाही का?
लोकं रडत आहेत चित्रपट बघून अशी चर्चा आहे...> एवढा वाईट आहे ???
माहेरचा सैय्यारा
माहेरचा सैय्यारा
सैयारा चे मार्केटिंग हिट झाले
सैयारा चे मार्केटिंग हिट झाले
माबोवर देखील चर्चा
साधना
साधना

सैयारा मी येता जाता आणि शेवट
सैयारा मी येता जाता आणि शेवट बघितला.
मॅड (यडपट, चक्रम या अर्थी) रोमँटिक चित्रपट आहे. मोहित सुरीचे जसे सिनेमे असतात तसाच आहे.
गाणी ऐकायची सवय झाली की बरी वाटतात. अरीजीत नाही पण फुफ्फुसात हवा भरुन घेऊन दम लागल्या सारखं गायलं की रोमँटिक वाटतं असा समज असलेला आणि कोणी दुसरा आहे.
मला सैयारा मै सैयारा एक था टायगरचं गाणं वापरतील वाटलेलं पण तसं काही केलेलं नाही.
सैयारा म्हणजे काय मुळात?
सैयारा म्हणजे काय मुळात?
सियार = कोल्हा
सियार = कोल्हा
अय्यार = बहुरूपी
सैंया = सैंया
सैया ची सुपरलेटिव्ह डिग्री
सैया ची सुपरलेटिव्ह डिग्री असावी ना?
गतिमान तारा म्हणे!
गतिमान तारा म्हणे!
सैर करनेवाला तो सैयारा. भटक्या?
भरतच्या पोस्टीतली दोन्ही नावं
भरतच्या पोस्टीतली दोन्ही नावं वाचून गे लव्हस्टोरी वाटली. असेल बुवा म्हणून गप बसले.
सैयारा - यात्रेकरू, भटका, दरवेशी असं काहीतरी आंतरजाल सांगतेय. धुमकेतू सारखा फिरणारा ग्रह/ तारा ई सुद्धा.
रडुन काय उपयोग? पैसे थोडेच
रडुन काय उपयोग? पैसे थोडेच परत मिळणार आहेत??
>>>>
साधना
रॉकस्टार चित्रपटाच्या वाईब आहेत असे ऐकले.
पण मला रॉकस्टार तितका आवडला नव्हता. नैराश्य यावे असा चित्रपट होता तो.. तसे नाही पाहिजे.. रडायला आले तरी डोळे साफ झाल्याचे समाधान मिळायला हवे.
रिव्ह्यू वाचून चित्रपट बघायला जावे हे खरे आहे. पण कुठल्या वर विश्वास ठेवावा हे समजत नाही. आपल्या ओळखीच्या लोकांनी बघेपर्यंत थांबावे लागते. पण असे सगळेच थांबले तर बघणार कोण...
अरीजीत नाही पण फुफ्फुसात हवा
अरीजीत नाही पण फुफ्फुसात हवा भरुन घेऊन दम लागल्या सारखं गायलं की रोमँटिक वाटतं असा समज असलेला आणि कोणी दुसरा आहे. >>>
सैयारा मी येता जाता आणि शेवट
सैयारा मी येता जाता आणि शेवट बघितला.
>>>>>
ओटीटी वर आला का हा?
थिएटरमध्येच आहे ना?
IMDB rating 7.7 आहे
पिक्चर उथळ नसणार. डीप असणार. असा आजवरचा या रेटिंगचा अनुभव.
गतिमान तारा म्हणजे चंकी पाडे.
गतिमान तारा म्हणजे चंकी पाडे.
त्याचा पुत्र तो सैयारा.
“ फुफ्फुसात हवा भरुन घेऊन दम
“ फुफ्फुसात हवा भरुन घेऊन दम लागल्या सारखं गायलं की रोमँटिक वाटतं असा समज असलेला”
रॉकस्टार चित्रपटाच्या वाईब
रॉकस्टार चित्रपटाच्या वाईब आहेत असे ऐकले.
पण मला रॉकस्टार तितका आवडला नव्हता.>>>>>
रॉकस्टार बघायला गेलो होतो तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मला थेटरात चित्रपट सुरु असताना झोप लागली इतका एन्गेजिंग होता तो.
म्हणुन रिव्ह्यु वाचुन चित्रपट
म्हणुन रिव्ह्यु वाचुन चित्रपट बघायला जायचे. नंतर रडुन काय उपयोग? पैसे थोडेच परत मिळणार आहेत?? >>
रडुन काय उपयोग? पैसे थोडेच
रडुन काय उपयोग? पैसे थोडेच परत मिळणार आहेत??
एक नबर कॉमेन्ट आहे साधनाची.
>>>>
मला ट्रेलरच पुर्ण बघवला नाही.
रॉकस्टार बघायला गेलो होतो
रॉकस्टार बघायला गेलो होतो तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मला थेटरात चित्रपट सुरु असताना झोप लागली इतका एन्गेजिंग होता तो. >>>
मला केविन कोस्टनरचा "नो वे आउट" बघायला मित्रांनी आग्रह करून नेले होते. तेव्हा इंग्रजी पिक्चर ओ की ठो न कळण्याचे दिवस होते. मी गाढ झोपलो होतो. शेवटी कोणीतरी कोणालातरी गोळी घालतात तेव्हा जागा झालो. तो एक रनिंग जोक झाला होता आमच्या ग्रूप मधे. नंतर अनेक वर्षांनी मग पुन्हा बघितला, यावेळेस न झोपता. चांगला ड्रामा आहे. पण तेव्हा डोक्यावरून गेला त्यात काही आश्चर्य नाही.
नुकताच झोपलो होतो तो "मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी" पाहायला गेलो तेव्हा.
कभी खुशी कभी गम बघताना मात्र घरीसुद्धा डुलक्या मारल्या होत्या. त्याआधी अमिताभच्या पिक्चरला डुलक्या मारल्याचे लक्षात नाही.
कभी खुशी कभी गम अमिताभचा
कभी खुशी कभी गम अमिताभचा नाहीये
माझा अनेक सिनेमात डोळा
माझा अनेक सिनेमात डोळा लागलेला आहे.
रॉकस्टार इम्तिआझ अली आणि रणवीर कपुरचा ना? मी पूर्वी बघितला असला तरी आता काही आठवत नाही. त्याच्याबद्दल अॅनॅलिसिस वगैरे, त्यातल्या गाण्यांचा फ्रेम बाय फ्रेम अर्थ, इम्तिआझ अली ची मुलाखत वगैरे ऐकुन मला तो परत बघायची फार इच्छा आहे.
गाणी तर एक नंबर आहेतच.
माझा अतिशय आवडता सिनेमा आहे
माझा अतिशय आवडता सिनेमा आहे रॉकस्टार. गाणी, अभिनय, कथा, मांडणी सगळं पॅकेजच उत्कृष्ट वाटलं होतं. तो सिनेमा समजायला थोडं bohemian spirit हवं. मग बरोब्बर पोचतो. अर्थात असे फार कमी जण असतात म्हणून यश मिळत नसेल. असो.
Pages