Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भूमी पेडणेकरने आता अभिनय करू
भूमी पेडणेकरने आता अभिनय करू नये या मताची मी झाली आहे . दम लगा के हैशा मध्ये ती जितकी भावली , तितकीच ती पुढे नावडती होत गेली . तिने आपली ऑडिशन्स घ्यावीत तेच काम शोभते तिला .
वर्षा, ती स्पूफ म्हणून बघ.
वर्षा, ती स्पूफ म्हणून बघ. मग त्या अतर्क्यपणात काही मजा वाटू लागते.
वर्षा, ती स्पूफ म्हणून बघ. मग
वर्षा, ती स्पूफ म्हणून बघ. मग त्या अतर्क्यपणात काही मजा वाटू लागते.>>+१
बऱ्याच चित्रपटांचे / सिरीज चे एकत्र स्पूफ आहे ही सिरीज.
वर्षा, ती स्पूफ म्हणून बघ. >
वर्षा, ती स्पूफ म्हणून बघ. >>> ही मालिका बघितली नाहीये. पण The woman in the window नावाचा सिनेमा बघितला होता - मेंदूला भंजाळून टाकणारा पण शेवटी फुसक्या बाराचे फिलींग देणारा सिनेमा वाटला होता तो. "स्पूफ तो बनता ही है इस पे" असे वाटले होते तो सिनेमा बघून.
कुणी 'The Wire' बघितली आहे
कुणी 'The Wire' बघितली आहे का. मी सध्या पहातेय. मस्त आहे. its a cult series. त्यातले कलाकार नन्तर इतर ठिकणी बरेच चमकले. त्यातल एक Harry Bosch चा partner
भूमी पेडणेकरबद्दल +++१११
भूमी पेडणेकरबद्दल +++१११ अज्जिबात बघवली गेली नाही ती मला ५ मिनिट सुद्धा. तोंड एकदमच विचित्र काहीतरी झालंय.
खौंफमधे त्या मुलाची व मुलींची मारामारी फार परिणामकारक झाली आहे. भिती वाटते.>>> ++११ असं मला एनएच -१० बघितल्यावर झालं होतं. फार अंगावर येणारे सीन आहेत त्यात पण.
दक्षिणा+१
दक्षिणा+१
मलाही आवडत नाही भूमी. उगाच आरडाओरडा करत असते. सुंदर/ आकर्षक/ गोड वाटत नाही. आक्रमक दिसते कायम. थोडा वेळ पाहिली ती 'द रॉयल्स'. उगाच वाटली. इशान खट्टर कुठल्याही ॲन्गलने 'रॉयल' वाटत नाही. कितीही भारीचे कपडे द्या किंवा दिलेले कपडे काढून घ्या तो फारतर ममव वाटतो.
The Four seasons ( Tina Fey, Steve Carell)
एक एपिसोड फक्त स्टीव फार आवडतो म्हणून पाहिली. संथ, कंटाळवाणी, लो एनर्जी आणि wit चे टाईमिंग हुकलेली/ धारदार नसलेली वाटली. बघू नका.
हो एनएच -१० मस्त होता. खूप
हो एनएच -१० मस्त होता. खूप सीन परिणामकारक आहेत.
खट्टर गोड आहे पण रॉयल दिसत नाही खरंय. त्यात तो बंगला पण रॉयल वाटत नाही. काहीच रॉयल वाटत नाही.
दक्षिणा +१
दक्षिणा +१
ममव वाटतो.>> ममव? :तोंड लपवणारी बाहुली:
कितीही भारीचे कपडे द्या किंवा दिलेले कपडे काढून घ्या>>> अस्मिता
खरं तर, शाहिद कपूर पण पोरगेलासाच होता आला तेंव्हा, वाटायचं ह्याला गंभीर भुमिका शोभणार नाहीत. पण समिकरंण बदललीत.
इशान चे ही तसे व्हावे. टेलेंट आहे.
तो गली बॉय मधला चिपळ्या डोळ्यांचा हीरो पण स्पार्क वाटला होता पण फारसा नाही चमकला. गेहेराईया चा हीरो.
मला अली जफर फार आवडतो, अभिनय, नाक डोळे सर्व. गुड्डू भैया
अलि फजल का?
अलि फजल का?
भुमिका च्या सगळ्या पोस्ट ना +१
रॉयल अगदी बघवली नाही. जेमतेम १ भाग बघितला.
मला पण भूमी आवडत नाही.
मला पण भूमी आवडत नाही.
पण फॅन क्लब असेल तर हल्ला होईल म्हणून सांगितलं नाही.
दोनच दिवसांपूर्वी कपिल शर्मा शो चा एक भाग युट्यूबवर समोर आला त्यात ती पण होती. कपिल शर्मा आताच फ्लर्ट करेल, मगच फ्लर्ट करेल म्हणून कसली डेस्परेट झालेली. शेवटी एकदाचं त्याने शो मधे गेस्ट म्हणून आलीच आहे तर (पाहुणचार म्हणून) फ्लर्ट केलं पाहिजे, एकटीलाच सोडून देणं बरं नाही दिसत म्हणून फ्लर्ट केलं तर कसला खुलला चेहरा!
रोहिणी हत्तंगडी आणि भूमी यांच्यात नातं आहे का? रूसका चेहरा आहे.
कितीही भारीचे कपडे द्या किंवा
कितीही भारीचे कपडे द्या किंवा दिलेले कपडे काढून घ्या तो फारतर ममव वाटतो. >>>
एकदम "अजूनी बरसात आहे" वगैरे सिरीज मधे दिसेल अशाने
की तेथेही तो त्यातील स्लीवलेसबाईचा बिनडोक बकरा असेल? शुभविवाह मधला आत्याचा एक मुलगा, लक्ष्मीच्या पावलांनी मधला दिवसभर कोचावर बसून व हातात मोबाईल घेऊन आजूबाजूच्या घटनांवर खत्रूट हसणार्या स्त्रीचा मुलगा, घरोघरी मातीच्या चुली मधल्या ऐश्वर्याचा नवरा असे बरेच रोल आहेत.
जेथे द वायर, पाताल लोक सारख्या सिरीज बद्दल चर्चा चालते तेथे ही वरची नावे आणणे जीवावर येते पण टेक्निकली याही सिरीज आहेत. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कप मधे यजमान देशाला खेळायला मिळतेच तसा बेनिफिट आहे
नेपोकिड्स हळुहळू मुरत जातात कारण घरचा व इण्डस्ट्रीचा सपोर्ट असतो व पुन्हा पुन्हा संधी मिळत जाते. इतरांना मुरेपर्यंत संधी मिळत नाही. यांचे म्हणजे मालकाचा उडाणटप्पू मुलगा गल्ल्यावर बसवला की हळुहळू सराईत होत जातो तसे आहे.
वर्षा, ती स्पूफ म्हणून बघ. >>
वर्षा, ती स्पूफ म्हणून बघ. >>>
लोल स्पूफ म्हणून बघायची होती का, मग ठीके तो शेवट :))
स्पूफ असेल असे अजिबात वाटले नाही बघताना इतक्या सिरीयसली बनवल्यासारखी वाटली वेबसिरीज, असो
सध्या MAID बघतेय नेफीवर, अजूनतरी आवडते आहे, चार भाग झाले बघून.
पोरीच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आणि कमालीचे कष्ट काय संपत नाहीयेत. शिक्षण नसल्यामुळे कॉर्पोरेट नोकरी मिळत नसावी पण मेडचे काम करण्यापेक्षा पेक्षा ती फूडचेन्स,/ग्रोसरी/शॉपिंग स्टोअर्समध्ये काम का करत नाही असे वाटले.
मालकाचा उडाणटप्पू मुलगा
मालकाचा उडाणटप्पू मुलगा गल्ल्यावर बसवला की हळुहळू सराईत होत जातो तसे आहे. >>>>
त्यामुळे टी-२० वर्ल्ड कप मधे यजमान देशाला खेळायला मिळतेच तसा बेनिफिट आहे >>>
ती लिंक धन्य आहे. महान आका नायिका म्हणतेय "मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा" - एकदम गौतम बुद्ध लेव्हल. 
घरोघरी मातीच्या चुली >>>
घरोघरी मातीच्या चुली >>> यातली नायिका नांदा सौख्यभरे सिरीअल मधे दुष्ट होती.
मालकाचा उडाणटप्पू मुलगा गल्ल्यावर बसवला की हळुहळू सराईत होत जातो >>>
अगदी अगदी
काल त्या रॉयल्सची सुरूवात पाहिली. भूमी पेडणेकर आक्रसली आहे असं वाटलं. म्हणजे चेहरा स्पेसिफिकली. इतका भारी मुलगा अश्या खत्रूड दिसणार्या आणि बोलणार्या मुलीच्या मागे लागतो हीच शोकांतिका आहे. पुढे पहायची इच्छा झाली नाही. धनि बघतोय. त्याला सांगून ठेवलंय, मिसो ची एंट्री झाली की सांग, मी दर्शनाला येते
इतका भारी मुलगा>>>> खट्टर फॅन
इतका भारी मुलगा>>>> खट्टर फॅन स्पॉटेड
मिसोची एंट्री झाली की सांग,
मिसोची एंट्री झाली की सांग, मी दर्शनाला येते >>>
त्यामुळे टी-२० वर्ल्ड कपमधे यजमान देशाला खेळायला मिळतेच तसा बेनिफिट आहे >>> हे भारी आहे
टिव्हिएफने अगदी सेम पन्चायत
टिव्हिएफने अगदी सेम पन्चायत प्लॉटवरच आधारित "ग्राम चिकित्सालय" आणलीये प्राइमवर..बघायला सुरवात केलिये पण अजुन तरी पन्चायत दुरच राहिल पण दुपैया इतकाही अपिल नाही हेच जाणवतय>>>>>>>>
पाहतेय. पंचायत किंवा दुपैया पाहिले नाही पण ग्रा चि आवडतेय. सुरवातीला वाटले नेहमीचा प्लॉट असेल पण वेगळी जातेय. लोकांचा बोलण्याचा लहेजा मस्त आहे. इंदु व तिच्या मुलाचा ट्रॅक छान घेतलाय. इन्दुने छान काम करतेय.
गाव व लाल जमिन, भात्शेती, डोंगर पाहुन महाराष्ट्राfunction at() {
[native code]
}अले खेडे वाटले होते पण झारखंड आहे म्हणे. गाड्यांचे नंबर प्ले ट झारखंडचे आहेत.
खट्टर फॅन स्पॉटेड >>> नॉट
खट्टर फॅन स्पॉटेड >>> नॉट रिअली
पण नेत्रसुख आहेच की! (निदान मिसो येईपर्यंत
)
मि सो आला का नाही.
मि सो आला का नाही.
मलाही आवडतो तो.
ग्राम चिकित्सालय नोटेड.
आला आला अगदी एक मिनिटासाठी
आला आला
अगदी एक मिनिटासाठी आला चौथ्या एपिसोड मधे
फक्त एक मिनिटं, बहोत
फक्त एक मिनिटं, बहोत नाईन्साफी.
हो ना यार! त्याच्यापेक्षा
हो ना यार! त्याच्यापेक्षा जास्त फुटेज दिनो मोरयाला आहे.
यंग शेल्डन
यंग शेल्डन
आताच फायनल सिझन संपवला. या पोस्ट मध्ये स्पॉयलर असू शकतात!
बिग बँग थियरी नंतर लगेचच यंग शेल्डन आली. शेल्डन लहान असताना तो त्याच्या टेक्सास मधल्या गावात कसा वाढला, त्याचे आई वडील, भाऊ बहीण, मिमो आणि इतर लोक यांची कथा आहे यात. त्या काळातले टेक्सास, तिथले हायस्कूल आणि कॉलेज, तिथले चर्च अशा बऱ्याच गमती जमती आहेत. शेल्डन लहान असल्याने थोडेसे निरागस विनोद आहेत. काही काही वेगळे विनोद सुद्धा आहेत. बिग बँग मध्ये सगळे मुख्य लोक हे शास्त्रज्ञ होते मात्र इथे साधी माणसे मुख्य आहेत. फक्त शेल्डनच एक स्पेशल कीड आहे. पण त्याला सुद्धा त्याच्या आई वडिलांनी पूर्ण सपोर्ट केलेला आहे.
मला स्वतःला बिग बँग पेक्षा ही जास्ती आवडली. इथे प्रत्येक सिझन मध्ये वेगवेगळे कथानक त्यांनी दाखवले. यातल्या लोकांमधले नातेसंबंध जास्ती चांगले दिसतात. त्याची देवभोळी आई आणि फुटबॉल कोच वडील ही दोन उल्लेखनीय माणसे फार भारी जमली आहेत. बिग बँग मध्ये त्याच्या आईचे काम केलेल्या अभिनेत्रीच्या मुलीनेच इथे त्याच्या आईचे काम केले आहे त्यामुळे ते अगदीच कनेक्ट झाले आहे.
बिग बँग मध्येच शेल्डनचे वडील त्याच्या लहानपणीच गेले हे सांगितलेले आहे. हे शेवटच्या सिझनच्या अखेरीस घडते. ते जाणार हे माहिती होते पण जेव्हा अचानकपणे हे घडते तेव्हा एक अपरिहार्य पण धक्कादायक असणारी गोष्ट डोळ्यासमोर येते. शेवटचे तीन एपिसोड्स तर खूप सुंदर झालेले आहेत. खूप कॉमेडी नसले तरी त्यांनी हृद्य एपिसोड्स बनवलेले आहेत.
छान पोस्ट धनि. मागच्या
छान पोस्ट धनि. मागच्या उन्हाळ्यात बिंज करून संपवली होती. फारच आवडली होती. चर्च मधले सीन फारच अभ्यासपूर्ण आहेत. त्याने मुद्देसूद वाद घालण्यासाठी जे संवाद दिले आहेत, त्यामागे सखोल अभ्यास केला आहे. विनोद दर्जेदार आणि विचार करायला भाग पाडणारा आहे. नातेसंबंधांनाला मम म्हणेन. मिमॉ, तिचे मित्र - ते फिजिक्स PhD असतात. मिमॉला काही निषिद्ध नसणं आणि मेरी कूपरला मात्र फट म्हणता ब्रह्महत्या इतकं धार्मिक दाखवणं अफाट होतं. बहिण- भाऊ सुद्धा मस्त. बहिण तर फटाकडी होती अगदी. भावाला बाळ होते वगैरे सुद्धा धमाल होते. शेवटचे तीन एपिसोड मी मुद्दाम पाहिले नाहीत. त्या सगळ्या पात्रांचा लळा लागला होता अक्षरशः, त्यामुळे बघवले नाही.
शेवटचे तीन एपिसोड मी मुद्दाम
शेवटचे तीन एपिसोड मी मुद्दाम पाहिले नाहीत. >> शेवटचे तीन एपिसोड्स तर हायलाइट्स वाटले. म्हणजे सध्या बघितलेल्या सिरीज मध्ये इतक्या साध्या साध्या गोष्टींमधून इतके इमोशनल वातावरण करणे कुठे पहिले नव्हते. मला फारच परिणामकारक वाटले ते. नक्की बघ. थोडे वॉटरवर्क होईल कदाचित पण त्यांचे बोलणे, चर्च मधले भाषण, प्रत्येकजण दुःख कसे वेगळे प्रोसेस करतो आणि नेहमीप्रमाणे शेल्डनचा यावरचा टेक.
त्याच्या वडिलांचा तर खरंच खूप लळा लागला होता. घरी येऊन , फ्रीजमधून लोन स्टार बियर घेऊन मस्त रिक्लेनर वर बसणारे प्रेमळ वडील एकदम कुठल्याही टेक्सन, मिडवेस्टर्न घरात सापडतील.
तुला तर एकदम टेक्सास मधले फ्रायडे नाईट लाइट्स चे वातावरण जवळचे वाटले असेल ना? फुटबॉल गेम्स, ब्रिस्किट , BBQ वगैरे
हो, टेक्सास मधले लोक थोडे
हो, टेक्सास मधले लोक थोडे देवभोळे किंवा धार्मिक आहेत. इथे चर्च मधे जाणाऱ्यांनाच काम मिळते, खास करून कॉन्ट्रॅक्ट वगैरे असणारे. तेथेच ओळखी होतात. मैत्री - लग्न वगैरेही जुळतात. त्यामुळे सर्वांना वेगवेगळे चर्च असाईन केलेलं असतं. आधी मला वाटायचं कुठल्याही चर्च मधे जाऊन का प्रार्थना करत नाहीत. मी काही ख्रिसमस कॅरोल्स पाहण्यासाठी आमंत्रण दिले असताना आवर्जून गेलेली आहे. वेगळेच वातावरण असते. त्यामुळे जे फारसे धार्मिक नाहीत ते थोडे फार एलियनेट होतात.
खाण्यापिण्याचेही अती करणं आहेच. शिवाय सदर्न हेल काढून बोलणं वगैरे सुद्धा.
आम्ही सगळ्यांनीच फार एन्जॉय केली सिरीज. हल्ली सगळ्यांनी एकत्र बसून बघता येईल व मोठ्यांना कंटाळा येणार नाही, मुलांना बोअर होणार नाही, शिवाय "क्लेव्हर ह्यूमर" म्हणू असं काही नसतंच. त्यामुळे ही फार वेगळी वाटली. माझा फुल रेको सर्वांना.
जे फारसे धार्मिक नाहीत >>
जे फारसे धार्मिक नाहीत >> धार्मिक असायचीही गरज नाही. मला वाटते की चर्च मध्ये जाणे हे कम्युनिटी बिल्डिंग सारखे असावे. मला खरं तर ख्रिसमस ईव्ह ची सर्व्हिस आवडते. काही ठिकाणी ते अंधार करून मेणबत्त्या लावतात आणि जे एक वातावरण तयार होते ते भारी वाटते. आता इतकेच लिहितो. वेगळ्या विषयावरची चर्चा इथे नको. ते येतील बरं
तू पण सिरीज चा रेको दिलास त्याबद्दल धन्यवाद
Pages