निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

0792485c-11f9-4136-9e0a-5c1a58b00781.jpeg

# My Random Clicks
# जपाकुसुम
# जास्वंद

सुप्रभात मंडळी.
१ मे हा दिवस साताऱ्यात गुलमोहर डे म्हणून साजरा केला जातो. जपानच्या साकुरसारखा. कवितावाचन, चित्रप्रदर्शन, नृत्य यासारखे उपक्रम असतात.
गुलमोहर हे परदेशी झाड आहे. पण त्याचा रंग अगदी भडक. त्याचा प्रत्येक झाडाच्या फुलांच्या छटांचा रंग वेगवेगळा. भगव्याच्या विविध छटा.
एक पांढरा गुलमोहर पण होता म्हणे आधी महालक्ष्मी रेसकोर्स जवळ. आता नाही.
असाच एक random click.
Screenshot_20250503_080607_Gallery.jpg

अनिंद्य
कांचन मस्त आहे. तजेलदार रंग.
जास्वंद सुद्धा मस्त ..रंग सुंदर.
सिमतनान ए सफेदपोश>>>>> सुंदर शब्द...याचा अर्थ?

थँक्यू

माझ्या बागेत असतांना काही विष देत नव्हतो पण सारखे रडू रडू असलेले हे पांढरे जास्वंद आता मात्र भरपूर फुले देत आहे.

मग काय ? . दिल्या घरी तू सुखी रहा म्हणतो 😄

होय सातारला असतो एक मी गुलमोहर दिवस... तो रस्ता ही खूप छान आहे, दोन्हीकडे गुलमोहोर असलेला... फोटो सातारचा आहे की असाच एखादा ?

सुप्रभात
फोटो साताऱ्यातील आहे पण गुलमोहर रोडचा नाही.
.

Heliconia = 👌

ऋतुराज , फोटो सुंदर , लाल झुंबरे लटकत आहेत असे वाटतेय.
Heliconia ला झब्बू... वानवडी येथील शिंदे छत्री च्या इथे फुललेला...
IMG_20250504_145523.jpg

फोटो साताऱ्यातील आहे पण गुलमोहर रोडचा नाही. >> ओके ऋतुराज
सुपारी सायकल आणि हेलिकोनिया दोन्ही सुंदर... सुपारीचा मोहोर छान दिसतोय. कोकणात आमच्याकडे खूप आहेत पोफळी पण घर एक मजली आणि पोफळी इतक्या उंच की ही शोभा दिसणे अशक्य.

Heliconia झब्बू मस्त.
सुपारीचे झाड, जीवनाच्या ४ अवस्था चे दर्शन .....भारीच.
भेरली माडाच्या (शिवजटा) देखील अशा अवस्था असतात.

किट्टु, अगदी मस्त आहे गुलमोहर.

मी KEM मध्ये असताना तिथे एका माळ्यावरिल तीन खोल्यांना गेस्ट रूम बनवल्या होत्या. त्या प्रत्येक रूमच्या खिडकीतून तीन वेगवेगळी बहरलेली झाडे दिसत. सीता अशोक, बहावा आणि गुलमोहर. मग तीच नावं त्या खोल्यांना दिली.

बहावा मस्तच .
गुलमोहोर , सुपारीचे झाड , लाल तोरण , जास्वंद खूपच छान .
आजचे बहार :
IMG-20250505-WA0018.jpg

इकडे २ दिवस पाऊस पडल्यावर फुललेली रेन लिली
IMG-20250505-WA0000.jpg

गुलमोहोर फार्फार आवडता. बाकी फुलंही सुंदर.

या गुलाबी लिलीला रेन लिली म्हणतात माहिती नव्हतं. माझ्या माहेरी फुलली असेल आता. आईला विचारायला हवं.

गुलमोहोर बद्दल एक सांगायचे आहे.
या झाडाखाली कधीही आसरा घेऊ नका किंवा गाडी पार्क करू नका . खूप बेभरवशी झाड आहे . याच्या मोठ्या मोठ्या फांद्या कधीही अचानक , विनाकारण ( वादळ, वारे, पाऊस वगैरे नसतानाही ) पडू शकतात . मी स्वतः २ -३ वेळा डोळ्यासमोर पाहिले आहे . तेव्हा प्लिज लक्षात ठेवा.

सुरंगीचे वळेसर? Happy

पाम ट्रीच्या फुलांचा गुच्छ

सुप्रभात.
सुरंगीचे वळेसर>>>>> खरच की.

Pages