चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढुढूक ढुढूक ढुढूक ढुढूक.. <<<<< Lol

नेटफ्लिक्स चित्रपट तसे चांगले असतात. पण साच्यातले वाटतात हे खरे आहे. पडद्यामागील कलाकारांची साधारण एकच टीम असेल तर असे होणे स्वाभाविक आहे. म्हणून तो आमीर खान वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायचा, रिपीटेशन टाळायचा.

नेटफ्लिक्सचं टेंप्लेट असतं बरेचदा. मी ज्वेल थीफ टाळला. अधूनमधून येताजाता जो काही नजरेला पडला तो पण इतका बकवास होता की मी पुस्तक वाचत बसले टिव्हीसमोर Proud
मला तो राजकुमार रावचा 'टोस्टर' येतोय त्यात मात्र इंटरेस्ट आहे. तो बघेन.

शुद्ध हिंदी बोलणारा चिनी डॉन बघून टडोपाच झाले का तो भारतीय होता काय माहीत.
<<<<<<< Lol अगं पुढे तर त्याने अडकित्त्याने सुपारीची खांडं केली आणि जयदीपला पण ऑफर केली. जुन्या डॉन सिनेमात खऱ्या डॉनच्या जागी गंगाकिनारेवाला बनारसी पान खाणारा डॉन येतो. इथेही तसंच काहीसं झालं असेल.

हो, हो. अडकित्त्याने खांडं करताना पाहिले मी. फक्त चंचीच तेवढी नव्हती. यडेचेत. जेवेल थीफ - जर वाढेल पोलिस. Proud

नेटफ्लिक्स जागतिक स्तरावरील बालाजी टेलिफिल्म्सच आहे. ऐका माझं जरा. Happy इस उमरमें एक नजरमें पता चल जाता है के लडका और लडकीके बिचमें क्या चल रहा है..! त्यांच्या सिरीज जरा बऱ्या असतात पण सिनेमे फॅक्टरीजन्यच होतात.

ज्यांना 'ढुढूक ढुढूक' कळाले नाही त्यांच्यासाठी - बालाजीच्या मालिका सुरू होण्याआधीचे म्युझिक आहे ते. मग बालाजी उडत येतो व 'सास बहू और कारस्थानं' सुरू होतात.

'ढुढूक' मुळे हातातले काम सोडून आले आहे. Happy

Happy धन्यवाद भरत. मी तुकड्यातुकड्यांत पाहिला होता. मैयाळागन जाऊ द्या आता..! Happy
तेव्हा बापाची काही रिअ‍ॅक्शन आठवत नाही. त्याची पुरती उतरली नसावी. >>>> Lol

स्वस्ति Happy

'मैं खिलाडी तू अनाडी'तला सैफ जपानी बोलताना आठवत नाहीये पण ह्या सिनेमातल्या सारखेच तोही अक्षयच्या घरीच रहायला येतो. हे 'अतिथी देवो भव' काय आहे कळत नाही. त्यांच्या त्यांच्या घरी राहून रक्षण/ पाळत वगैरे करता/ ठेवता का येत नाही. एवढे बॉडीगार्ड काय कामाचे..! जयदीपचे डोळे हिरवट पिंगट केले आहेत, जे क्लोज अप मधे दाखवलेत. आणि पिक्चर संपला की सर्वांचा नाच आहे. पोलिस, डॉन आणि चोर व नकली वाणी - सर्वकॅरेक्टर समभाव. Happy

'मैं खिलाडी तू अनाडी'तला सैफ जपानी बोलताना आठवत नाहीये
>>
गावठी (विजय) शिल्पा शेट्टी ला मॉडर्न अवतारात (डॉन) शक्ती कपूर (नारंग) कडे घेऊन येतो तेंव्हा आहे, किमोनो घातलेला सैफ

'मैं खिलाडी तू अनाडी'तला सैफ जपानी बोलताना आठवत नाहीये >> कारण तो जपानी बोलत नाही आणि त्याने कपडेही जपानी नाही तर चायनीज घातले आहेत. तो फक्त एवढंच सांगतो "आय अ‍ॅम डॉक्टर फू मांचू फ्रॉम चिंचपोकली".

ज्यांना 'ढुढूक ढुढूक' कळाले नाही त्यांच्यासाठी - बालाजीच्या मालिका सुरू होण्याआधीचे म्युझिक आहे ते. >> Happy Happy धन्यवाद!

आणि पिक्चर संपला की सर्वांचा नाच आहे. पोलिस, डॉन आणि चोर व नकली वाणी - सर्वकॅरेक्टर समभाव >>> Lol

मै खिलाडी तू अनाडी पाहिला आहे पण हे वरचे लक्षात नाही.

पिक्चर संपला की सर्वांचा नाच आहे. पोलिस, डॉन आणि चोर व नकली वाणी - सर्वकॅरेक्टर समभाव.
>>>>>>
Proud
असा नाच सक्तीचा करायला हवे खरे तर.. छावा चित्रपट अखेरीस अक्षय खन्ना आणि जुवेकर यांचा ठेवला असता तर मनमिलाप झाला असता त्यांचा Proud

शादी का गोलमाल (हिंदी डब)
जियो हॉटस्टार

स्टोरी अतिशय युनिक अतिशय आगळीवेगळी अशी बिलकुलच नाही.

हिरो आणि हिरोईन दोघांच्या घरून लग्नाची घाई, स्थळे बघणे चालू, अश्यात दोघे वर्षभरानंतर डिव्होर्स घ्यायचे ठरवून लग्न करतात. वर्षभर दुसऱ्या शहरात वेगळेवेगळे राहायचा प्लॅन असतो पण काही कारणाने एकत्र राहावे लागते आणि प्रेम जुळते.

पण चित्रपट छान आहे. रिपीट व्हॅल्यू आहे. अजून एकदा कोणासोबत तरी मी नक्कीच बघेन.

झी 5वर बाबील खान चा "लॉगआऊट" पाहिला सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर चं आयुष्य लाइक्स आणि सबस्क्राईब वर अवलंबून असतं त्यासाठी तो काय काय करतो याचं रिअलिस्टिक आणि तितकंच चिंता करण्यासारखं वास्तव चित्रपटात दाखवलंय . त्यातच ज्या मोबाईल वर हे सगळं अवलंबून असतो तोच जर का चोरीला गेला तर आणि ज्याप्रमाणे हल्लीच्या पिढीचं सगळं आयुष्य त्या मोबाईल शी कनेक्टेड असतं अगदी बँक पेमेंट,शॉपिंग पासून ते पर्सनल चॅट फोटोज व्हिडिओ पर्यंत सर्वच .त्याचा वापर करून कोणी ब्लॅकमेल करून स्वतःच्या मनाप्रमाणे गोष्टी करायला भाग पाडत असेल तर काय होते हे पाहायचे असेल तर चित्रपट पाहा . पिच्चरची सुरुवात उत्कंठावर्धक वाटली तरी शेवटी थोडं फुस्स व्हायला होतं कारण आपल्या अपेक्षा वेबसीरीज बघून भराऱ्या मारून आलेलं असतं त्यामुळे, तरीही चित्रपट बर्यापैकी गुंतवून ठेवतो . बाबील खान मधे इरफान ची झलक दिसते त्याने कामही चांगले केलेय.चित्रपटात लूपहोल्स आहेत तरीही चित्रपट पाहिल्या नंतर इंटरनेट ,मोबाईल इतर अलेक्सा सारखे कनेक्टेड गॅजेट्स, सोशलमिडिया याचा वापर करताना एकदा नक्कीच विचार करू.शेवट आवडला.एकंदरीत चित्रपट वन टाइम वॉच आहे.

छोरी २ (सर्वपित्री ओटीटी - आयपीटिव्ही) पाहिला. बरा आहे, एंगेजिंग आहे. पहिला जास्त प्रभावी होता, हा त्यामानाने जास्त लाऊड आणि कमी थ्रिलींग वाटला. सोहा अली खान खूप वर्षांनी अभिनय करताना दिसली आहे, मी तर तिला विसरून गेले होते. गश्मिर महाजनी पोलिसाच्या आणि डॅमसेल ईन हॉरर डिस्ट्रेसचा काळजीवाहू हिरो. सौरभ गोयल स्त्री अर्भकांचे बळी देणाऱ्या नवऱ्याच्या भूमिकेत. पहिल्या छोरीचे एक्स्टेंशन आहे पण कारण तितके झेपत नाही यावेळी.

पहिल्या छोरीत मक्याच्या शेताचे/ कॉर्न मेझचे जाळे करून चांगली गुंतागुंत तयार केली आहे. दुसऱ्यावेळी जमिनीखालची भुयारे आहेत. भयनिर्मिती कुठे कुठे चांगली जमली आहे पण प्रत्यक्षात भूत मात्र कार्टूनिश वाटलं. सोहा अली खानच्या अंगात येते, तेही विशेष भीतीदायक वाटले नाही. पहिल्या वेळी सप्राईज तरी वाटते, दुसऱ्यातिसऱ्यावेळी आपण एकदम कॅज्युअली घेतो. छोटी मुलगी अतिशय गोड आहे. आई आणि मुलीचीच कथा आहे. काही सीन/ चाबकाने मारणे वगैरे फार रिअल वाटतात. मानवी मनातील internal भीती किंवा मनाचे खेळ कमी करून ती भीती खूप external वाटली यात. पहिला प्रकार जास्त भावतो, त्यामुळे भरपूर मसाला असूनही प्रभाव तितका जाणवत नाही. हॉरर जॉन्रा आवडत असेल तर बघू शकता, तसा एंगेजिंग आहे.

कॉन्क्लेव्ह' सिनेमा काल ३ र्‍यांदा पाहीला. अतिशय आवडता सिनेमा आहे. फार आवडता आहे. पोप च्या मृत्युपश्चात, नवीन पोप निवडण्यामधील पॉलिटिक्स, महत्त्वाकांक्षा, संघर्ष. शेवटची कलाटणी फार आवडते.

>>> पण कारण तितके झेपत नाही यावेळी
मला अ‍ॅक्च्युअली मेटॅफर यातला अधिक व्यापक वाटला, शेवट तेवढा रुचला नाही - म्हणजे दिग्दर्शकाची भूमिका पोचली/समजली, पण स्टोरीटेलिंगला मारक वाटला.
भूत कार्टुनिशही इन्टेन्शनलीच केलं असावं असं वाटलं - परंपरा/रूढी (ज्या धर्मापेक्षा वरचढ होत जातात - धर्मात् रूढीर्बलीयसी!) यांचे वळसे उलगडत गेलं तर मुळाशी असलंच काहीतरी निरर्थक आणि हास्यास्पद सापडण्याची शक्यता जास्त. त्यांचा बागुलबुवा मोठा होत जातो पिढीगणिक, आणि दास्यत्वाचं ग्लोरिफिकेशनही! त्या मुलामुलींच्या बोलण्यातून जेन्डर बायसेस नकळत्या वयापासूनच कसे रुजत जातात तेही दिसतं.
गश्मीर मित्र दाखवला, लगेच 'जोड्या जुळवा' मोड ऑन केला नाही, हेही आवडलं.

शेवट टिपिकल हॉररपटांसारखा अधांतरी व सिक्वलची सोय करणारा/ अनावश्यक व सशक्त होऊ शकणाऱ्या कथेला अशक्त करणारा वाटला. क्रिएटिव्हिटी असेल तर काय घाबरायचे, पूर्ण पणे वेगळं नवीन काढू असा दम नसतो हल्ली. लगेच फ्रॅन्चाईज करून कुंकू लावून ठेवतात. पहिल्या वेळी राजबीरचा मृतदेह न सापडलेला दाखवून पुन्हा जिवंत केलेच यात. असे लाखो राजबीर असतील. पुरुषसत्ताक विकृतीचे रिप्रेझेन्टेशनच आहे ना, नवीन आणू शकले असते. पण ठीक आहे, हाणहाणहाणून मारून टाकलं. बरं वाटलं पाहायला.

मेटॅफॉर जरी व्यापक असला तरी त्याच्याशी होणारं कनेक्शन कृत्रिम/ ओढूनताणून वाटलं. मधेच मुखिया येऊन किडनॅप करतो. बरं ते मुख्य प्रधानजीला मुलींचा बळी देऊन जिवंत ठेवण्यात यांचा काय फायदा नीट कळाले नाही. गावाची बरकत होते म्हटलं तर सगळे भुयारात खितपत दिसले. सोहा आणि त्या मुलीमधे जिव्हाळा निर्माण होताना पहायला छान वाटले. पण पहिल्यात मीता वसिष्ठ कसली थंड काळजाची बाई होती. गश्मिर भुयारात येऊन नंतर अर्धा तास दिसलाच नाही. त्याचे हिंदी उच्चार चांगले आहेत, मराठी ॲक्सेंट्स नाहीत. सूर्याच्या आशीर्वादाने मुलगी होणं आणि सूर्यप्रकाशात तिची त्वचा जळायला लागणं याची कथा मला तितकी प्रभावी वाटली नाही.

चित्रपट चांगला आहेच पण काही ठिकाणी एकदम weak links आहेत. 'छोरी हो के छोरों जैसे बात करे है, मर्द समझे है अपनेआपको' वगैरे तर एकदम रिलेटेबल आहे. ती मुलं मुलगी नेमकी दिसते कशी हे पहायला येतात तेही एकदम चपखल. स्त्रियांसगट सर्वांनीच स्त्री दास्यत्वाचा उदोउदो करणं, 'समर्पण' म्हणत बहुमान समजणं हेही. अगदी हिडीस परंपरांचा रूढींच्या नावाखाली स्वीकार असणं, वंशसातत्याला अवास्तव महत्त्व हेही.

जोड्या जुळवा केले नाही पण तो नसताच तरी चाललं असतं. तिलाच 'हिरो' दाखवायचे असते. ह्यावरून - 'The little women' मधे Why should I give up my heroism because people want to see a man in my life असं काहीतरी वाक्य आहे.

मुख्य प्रधानजी हेच त्या धर्म/संस्कृतीच्या विकृत रूपाचं प्रतीक आहे ना! परंपरा जिवंत ठेवायची म्हणून सतत बळी दिला जातो तो कोणाचा?! स्त्रियांच्या आहारविहार/आचारविचार सगळ्यावर बंधनं आणली की पुरुषसत्ताक परंपरा आणखी काही पिढ्या मागील पानावरून पुढे चालत राहायची हमी! मग चुली आणि पाटावरवंट्यावरच्या स्वयंपाकाच्या आग्रहापासून पदर आणि कुंकवाच्या सक्तीपर्यंत सगळं आलं!
बापांच्या नाहीशा झालेल्या (म्हणजे पॅन्ट्सनी रीप्लेस केलेल्या Proud ) धोतरांवरून कविता होत नाहीत, आइशीच्या पदरावरून अज्जून होतात! Proud
सूर्यप्रकाश हा ज्ञानाचा आहे असा अर्थ मला लागला. जिला प्रकाश झेपत नाही अशी व्हल्नरेबल स्त्री/मुलगी हाताशी धरून ज्यांना झेपतो त्यांनाही कोंडून घालायचा डाव. आणि 'हीरो' ती आईच आहे की. गश्मीर कुठे हीरो आहे!

असो - आपल्याला वाद/चर्चेशिवाय सिनेमे बघितल्याचं पुरेसं समाधान मिळत नाही बहुतेक. Proud

मुख्य प्रधानजीला मुलींचा बळी देऊन जिवंत ठेवण्यात यांचा काय फायदा>>> अग तोच तर मेटॅफर आहे ना. मुखिया = पुरुषसत्ताक पद्धती. जी मरता कामा नये म्हणुन सारा समाज प्रयत्न करतो आहे, जी मुलींचा बळी घेऊनच ताकदवान होते. भुयार पण प्रतिकच, अंधारात चापडणारा समाज वगैरे. मुलगी अंधारात सुरक्षित, घराबाहेर (सूर्यप्रकाशात ) पडली, शिकली की जळुन मरणार इ. मला सगळीच प्रतिकं चपखल वाटली या भागात. आधीच्या सिनेमात मला इतकी जाणवली नव्हती.

गश्मिरचे पात्र absolutely नसते तरी असं म्हणतेय, हिरो नव्हताच तरीही. मी प्रतिकं शोधण्याचा आळस केला बहुतेक. Lol मला एकही गोष्ट प्रतिक वाटली नाही. मी एकदम स्त्री प्रधान हॉरर म्हणून पाहिला. आता तुमचं वाचून लिंक लागतेय. एरवी नसलेली प्रतिकं सुद्धा शोधून काढते, घात झाला, घात झाला. असं झाल्याने 'पिव्हळवणार' तरी कशी, छे छे!

मी तर एवढं लिहिणारही नव्हते तू चर्चेत उडी घेतलीस म्हणून भराभर इडल्या खाऊ घालून लगबगीने वाद घालायला आले. चित्रपट राहो एकीकडे, खुमखुमीच फार..! Happy

बापांच्या नाहीशा झालेल्या (म्हणजे पॅन्ट्सनी रीप्लेस केलेल्या ) धोतरांवरून कविता होत नाहीत, आइशीच्या पदरावरून अज्जून होतात!
>>>>> Lol आपण करूया धोतरांवर कविता.

भुयारात खितपत पडलेले >>>पहिल्या भागात वाचलेली छोरी आणि तिची आई यांच्या मुळेच दुष्काळ आणि असं खितपत पडावं लागलेलं असतं अशी त्या मुखीयाची धारणा असते.

मलापण पहिला भाग जास्त प्रभावी वाटला . उलट छोरी पेक्षाही मूळ पूजा सावंत चा"लपाछपी" जास्त हॉरर आणि चांगला आहे.हाही बराय .सोहा आधी कधी तितकी आवडली नव्हती यात आवडली. तो लहान मुलगा मात्र पाहताक्षणी वाटलेलं हा मदत करणार . (हिंदी पिच्चरला सरावलेली नजर Lol )हिरॉईनला मारहाण करण्याचे सीन फार अंगावर येतात त्यातून ती रक्तबंबाळ झालेली असताना पुढच्याच सीनमध्ये एव्हडी रक्तबंबाळ तरीही ठणठणीत उभी हे पटत नाही थोडाफार रक्ताचा मेकअप ही गंडलाय.शेवट परत अर्धवट ठेवलाय.एकूण भीतिबीती वाटली नाही तरी चित्रपट बराय . मुलीचं नक्की काय करायचंय त्याची उत्कंठा टिकवून ठेवलीय, शेवटाला जो मेसेज दिलाय तो सूचक पद्धतीने मांडण्याचा चांगला प्रयत्न केलाय.

हाणहाणहाणून मारून टाकलं >>> Lol
छोरी१ पाहिला नाही म्हणुन छोरी२ मला चंडलब वाटला त्यामुळे अर्ध्या तासात बंद केला.

सिमरन, पहिल्या परिच्छेदातल्या माहितीबद्दल थॅंक्यू. माझं कुठं लक्ष होतं काय माहीत. लपाछपी नाही पाहिलेला.
सुनिधी, बघून पाहा. Happy

Pages