Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
ज्यांचं सोशल मिडीयाचं वाचन
ज्यांचं सोशल मिडीयाचं वाचन कमी आणि अन्य वाचन नगण्य असेल त्यांनी.....
>>>>>
नशीब त्यांनी आताच आता मायबोली सोडून जावे असे फर्मान नाही काढलेत
इतिहासाचं वाचन व मराठी
इतिहासाचं वाचन व मराठी साम्राज्याचा इतिहास ही काही सगळ्यांची, शेवटच्या केसमध्ये नॉन मराठी माणसांची आवड नसते.
>>>>>>>>>>
अगदीच!
चित्रपट हिंदी आहे. मुख्य कलाकार हिंदी आहे. हे मी तेव्हाही म्हणालो होतो की हिंदीतला लोकप्रिय चेहरा घेतला हे चांगले झाले जेणेकरून चित्रपट जास्तीत जास्त अमराठी लोकांपर्यंत पोहोचेल. ज्यात काहीना संभाजी राजेंचे नाव सुद्धा माहीत नसेल.
कारण पुस्तकांच्या माध्यमातून
कारण पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा चुकीचा इतिहास पोहोचवला जातोच...
म्हणूनच वाचणारे एकच पुस्तक वाचून थांबत नाहीत
>>>>>>>
दुसरे तिसरे चौथे पुस्तक वाचल्यावर चौघात मतभेद आढळले तर काय करावे? खरे कसे जाणावे?
याचे उत्तर द्यालच, त्या उत्तराचा फायदा इतिहासाच्या अभ्यासकांना होईल..
पण माझा प्रश्न मग असा आहे की सामान्य माणूस इतका वेळ तसाच छंद तशीच आवड असल्याशिवाय कसा काढणार?
कारण आवड नाही तर तुम्हाला इतिहास जाणून घ्यायची गरजही नाही ही भूमिका मला पटत नाही.
बाहुबली रोहित शेट्टी स्टाईल
बाहुबली रोहित शेट्टी स्टाईल दे दणादण मारामारी हवी आहे
मग त्यासाठी कोणीही असलं तरी चालतंय
बाजीराव असो वा बाजीप्रभू वा संभाजी राजे
सगळ्यांनी गाणी म्हणली पाहिजेत, नाच केला पाहिजे, उडत जाऊन 500 लोकांना दे दणादण जमिनीवर आपटून मारलं पाहिजे
>>>>>>
पण इतके काही अतर्क्य नाहीये चित्रपटात.
हे तुम्ही चित्रपट न पाहता लिहीत आहात का?
अर्थात प्रत्येकाच्या अपेक्षा आणि बेंचमार्क वेगळे असतील. पण संभाजी महाराजांना सुपर हिरो कॅटेगिरी कुठे दाखवले असे मला तरी वाटले नाही.
ट्रेलर आला तेव्हा गाण्यावर स्पेशली त्यातील स्टेपवर मी सुद्धा आक्षेप घेतला होता. पण ते गाणेच उडाले.
या मुद्द्यावर एक गमतीशीर उदाहरण देतो.
कित्येकांना हीरोइन म्हणून कुणीतरी सुंदर दिसणारी अभिनेत्री हवी होती. प्रत्यक्षात संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई या किती सुंदर होत्या-नव्हत्या हे त्यांना कदाचित माहितही नसावे. पण चित्रपट म्हटले की तो प्रेक्षणीय असावा अशी अपेक्षा प्रत्येकाची असतेच
हे तुम्ही चित्रपट न पाहता
हे तुम्ही चित्रपट न पाहता लिहीत आहात का?
हे तुम्ही धागा न वाचता लिहीत आहात काय
अर्थात रे साहजिकच आहे म्हणा
कारण शाळेत त्यांच्याबद्दल फार
कारण शाळेत त्यांच्याबद्दल फार इतिहास शिकवला गेला असे मला वाटत नाही. >>>
नेटफ्लिक्स क्रुपेने बघायला
नेटफ्लिक्स क्रुपेने बघायला सुरवात केलिये...अर्धाच पाहुन झालाय अजुन..सिनेमा तुकड्या तुकड्यात चान्गला ते अत्यत वाइट असा रेन्जमधे वाटला.
सगळ्याचा कपडे पट उत्तम आहे (थोडा तिथेही बाहुबलीच्या कलर स्किमचा प्रभाव आहे ) सभाजी म्हटल्यावर विकीचा चेहरा समोर यावा इतका तो भुमिकेशी एकरुप झालाय, जेवढा आणी जसा रोल त्याला मीळालाय तो त्याने फार प्रामाणीकपणे केलाय..भावनिक द्रुष्यात विषेशत; आइच्या आठवणीने व्याकूळ होणार हळवा सभाजी पाहुन आपल्यालाही कसतरी होत..रश्मिका सहन होते,दिसलीये पण चान्गली..अस्सल मराठमोळे दागिने मिसिन्ग वाटले.
मासाहेबाच्या आठवणीत राजे व्याकुळ होवुन झोपेतुन उठतात तेव्हा महाराणी त्याना पुढच्या जन्मी माझ्याच पोटी जन्माला या म्हणते तो सगळा सिन त्यातला साधेपणा भावला
अक्षय हॅज नेल्ड इट अॅज औरगजेब..त्याची मुळातच थोड अडरप्ले करण्याची स्ताईल, मेकप सगळ उत्तम मॅच झालय..औरगजेबाच्या शामियान्यात किवा दरबारात सुद्धा मुगल चित्रकारी भिन्तिवर दिसते ते डिटेलिन्ग वैगरे चान्गल आहे.
सभाजी राजाच्या राज्याभिषेकाचा प्रसन्ग, दरबार, महाराजाच आसन,मेघड्न्बरी वैगरे चित्रिकरण फार सुरेख घेतलय..तेव्हा जी विकीची महाराज म्हणून छाप पडते ते फार मस्त आहे.
ह्या सो फार भावलेल्या गोस्टी!!
सगळ्यात खटकलेली व्यक्तीरेखा म्हणजे सोयराबाई, दिव्या दत्ता चान्गली कलाकार आहे पण इथे ती कप्लीट मिसमॅच आहे, एकतर त्या काळी विधवा स्त्रीया भले राजघराण्यातली असोत रन्गित वस्त्र नेसत नसत..शिवाय आपल्याच दालनात का होइना पण सरदारासमोर पान खातिल??विधवानी पान खाण अलाउड होत्?दिव्याची देहबोली अजिबात खानदानी मराठा वैगरे वाटत नाही...मराठी सिरियल मधे हिच सोयराबाइची भुमिका त्या अॅक्ट्रेस फार सुन्दर वठवली होती.
शिवाजी-सभाजी ह्या दोन्ही युग पुरुशानी त्या काळात जे स्वराज्य निर्मितीसाठी लढे दिले ते कर्तुत्वच इतक मोठ होत की त्याला पुश्पा आणी बाहुबली स्टाइल स्टन्टची गरज आहे का? पण मुव्हि हिट करायचा तर हे सगळ हवच हा अट्टाहास मग याला मराठ्याचा इतिहास का म्हणायच?
एकतर सिनेमाचा ७५ % भाग अचाट लढाई आणी साउथ सिनेमा प्रकारचे इफेक्ट यानेच भरलाय...शिरा ताणताणून ओरड्णे आणी जमिनितुन ,पाण्यातुन प्रगट होणे ह्याने मुव्हि खाडकन सामान्य गल्लाभरु फिल्मी लेव्हलला येतो.
परस्त्रीचा अत्युच्च सन्मान करणारे महाराज गनिमी कावा म्हणून आपल्या सैनिकाना स्त्री रुपात वेशातर करायला लावुन मुगलावर जाळ टाकतिल???? हा गनिमी कावा आहे की चला हवा येउ द्या?? आवरा प्लिजच!
उरलेले परिक्षण (उरलेला मुव्हि बघितला तर) ....ब्रेक के बाद!!
बाजीराव, संभाजी अशा
बाजीराव, संभाजी अशा व्यक्तिमत्त्वांची या सिनेमांमुळे नॉन मराठी लोकांना निदान 'ओळख झाली' इतके मात्र खरे. >> एकूण किती मराठी लोकांनी सिनेमा बघितला वि. किती नॉन मराठी लोकांनी सिनेमा बघितला हे बघितल्यावर महाराजांची ओळख होत असेल तर तो जबरदस्त प्लस पॉईंट धरला पाहिजे. आपल्याला सुद्धा चोला किंवा समुद्रगुप्ताबद्दल किती माहिती आहे तसाच प्रकार ना !
हो, शिवाय पीएस ला तमिळ
हो, शिवाय पीएस ला तमिळ लोकांनी शिव्या घातल्याच की!
कुली पिक्चरमुळे योगासनांचा
कुली पिक्चरमुळे योगासनांचा प्रसार झाला.
कालिया मुळे ऑम्लेटची रेसिपी प्रसिद्ध झाली.
त्या आधी योगा बद्दल समाजात चुकीची माहिती पसरली होती.
व्हेन द मोहरी तडतडींग, टेक राईट लेग थ्रू लेफ्ट लेग अॅण्ड गुंडाळींग टिल कांदा टर्न्स रेड...
- आईच्या कात्रणाच्या वहीत एका विनोदी लेखकाची रेसिपी होती. (कुलीच्या आधीची आहे)
ही सुद्धा एक प्रकारची बदनामीच
ही सुद्धा एक प्रकारची बदनामीच म्हणायची
अगदी चकचकीत वेष्टनात गुंडाळून दिली असली तरीही >>> अग्री.
फक्त ऋन्मेष म्हणतो तसं संभाजीराजे माहितीच नसतील किंवा फक्त शिवरायांचा मुलगा म्हणून माहिती असतील तर ते त्यापलीकडेही काहीतरी होते एवढं समजेल.
ज्यांचं सोशल मिडीयाचं वाचन
ज्यांचं सोशल मिडीयाचं वाचन कमी आणि अन्य वाचन नगण्य असेल त्यांनी.....
>>>>>
नशीब त्यांनी आताच आता मायबोली सोडून जावे असे फर्मान नाही काढलेत Happy <<
वरचं विधान तू फक्त तुझ्या सोयीपुरतं इथे दिलंयस.
वरच्या विधानात आणि ते असलेल्या संपूर्ण पोस्टमधे अथवा अन्यत्रही मायबोली सोडून जायचे फर्मान काढलेले नाही अथवा दुरान्वयानेही त्यातून तसा अर्थ निघत नाही.
'नशीब, तसं तुम्ही म्हटलेलं नाहीये' यात तुला हवं ते सुचवून त्यावर कोणी प्रतिवाद केला की परत 'मी सुचवलेलं नाही असंच म्हटलंय' अशी पुन्हा शाब्दिक कोलांटीउडी मारायला तू मोकळाच.
अर्थात तुझी विधान फोल ठरायला लागली की न लिहिलेलं समोरच्याच्या तोंडी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष घुसवायची तुझी सवय जुनीच आहे.
अशी विधान करायची वेळ आली यातच काय ते आलं.
ओके
ओके
शिद्दत … जियो हॉटस्टार
शिद्दत … जियो हॉटस्टार
नावाप्रमाणेच फुल शिद्दतवाली लव स्टोरी आहे. फार आवडली. त्यामुळे शेवट माझ्या मनासारखा नाही झाला याचे वाईट सुद्धा वाटले. पण त्यातच चित्रपटाचे यश आहे.
हिरोचा अभिनय फार आवडला. उत्स्फूर्त वाटला. त्याला हसीन दिलरुबा पार्ट टू आणि चोर निकल के भागा मध्ये सुद्धा पाहिलेले. पण यात धमाल रोल होता.
गूगल करून त्याचे नाव शोधले तर सनी कौशल दिसले. म्हटले हा विकी कौशलचा नातेवाईक तर नाही ना कारण दिसणे, स्टाईल आणि अभिनयाची शैली बघून त्याच्यासारखाच वाटत होता.
ते सुद्धा गूगल करून शोधले तर चक्क त्याचा भाऊच निघाला. मला तर हे बिलकुल माहीत नव्हते
आता याचे अजून काही चांगले चित्रपट आहेत का शोधावे लागेल..
एखाद्याला संभाजी राजे हे
एखाद्याला संभाजी राजे हे निव्वळ शिवाजी महाराजांचे मुलगे म्हणून माहीत असतील पण ते सुद्धा एक पराक्रमी राजे होते याची जराही कल्पना नसेल.
,>>>>> अतिरंजित ऐतिहासिक सिनेमा पाहिल्यावर मला उलट ह्यातले किती फेक आणि किती खरे होते अशी शंका येते. स्केपटीसिजम वाढतो.
अतिरंजित ऐतिहासिक सिनेमा
अतिरंजित ऐतिहासिक सिनेमा पाहिल्यावर मला उलट ह्यातले किती फेक आणि किती खरे होते अशी शंका येते. स्केपटीसिजम वाढतो.
>>>>>>
व्यक्ती तितक्या प्रकृती, पण सर्वसाधारणपणे बहुतांश जनता अतिरंजित दाखवले तरी त्यातला अतिरंजितपणा वगळता इतिहास खरा असेल असे मानतात.
@ स्केपटीसिजम … एवढे अवघड इंग्लिश शब्द रोमन लिपीत लिहीत चला लोकहो, स्पेलिंग समजली तर अर्थ शोधायला सोपे पडते.
व्यक्ती तितक्या प्रकृती, पण
व्यक्ती तितक्या प्रकृती, पण सर्वसाधारणपणे बहुतांश जनता अतिरंजित दाखवले तरी त्यातला अतिरंजितपणा वगळता इतिहास खरा असेल असे मानतात. >> +१.
अतिरंजित ऐतिहासिक सिनेमा पाहिल्यावर मला उलट ह्यातले किती फेक आणि किती खरे होते अशी शंका येते. स्केपटीसिजम वाढतो. >> कॉमी तुम्ही व्हॉटस अॅप वर नाहित का ? तिथे येणारे विचित्र विश्व लायकीचे पोस्ट्स वाचून ते सत्य आहे मानणार्या भाबड्या जनतेच्या आय क्यूवर तुमचा भलताच विश्वास आहे म्हणायला हवा
सिनेमा बघून ज्यांना इतिहास
सिनेमा बघून ज्यांना इतिहास समजतो त्यांच्या साठी हे गाणं खूप आधीपासून आहे
https://www.youtube.com/watch?v=CvygkpMOiAg
असामी, व्हाट्सअप फॉरवर्ड आणि
असामी, व्हाट्सअप फॉरवर्ड आणि चित्रपट यांची तशी तुलना होऊ शकत नाही.
एकीकडे सेन्सॉर बोर्ड असतो. जे तक्रारीनुसार काटछाट करून चित्रपट प्रदर्शित करायला लावते.
तुला मी काय लिहिलेय त्याचा
तुला मी काय लिहिलेय त्याचा अर्थ कळलाय का रे भावा ?
माहीत नाही.
माहीत नाही.
पण मला काय म्हणायचे आहे ते मला नक्की माहीत आहे.
चित्रपट प्रमाण मानने आणि व्हाट्सअप पोस्ट प्रमाण मानणे यात फरक आहे इतकेच मला म्हणायचे आहे.
चित्रपटांना सेंसोर बोर्ड असल्याने त्यावर एका मर्यादेपर्यंत विश्वास ठेवू शकतो.
व्हाट्सअप पोस्ट काहीही बिनबुडाची असू शकते. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आय क्यू आणि चित्रपटांवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आयक्यू हा एकच नसतो हे मला म्हणायचे आहे.
त्यामुळे इथे व्हाट्सअप पोस्ट उदाहरण गैरलागू एवढेच सांगायचे आहे.
चित्रपटांना सेंसोर बोर्ड
चित्रपटांना सेंसोर बोर्ड असल्याने त्यावर एका मर्यादेपर्यंत विश्वास ठेवू शकतो. >> ह्या विधानातून तू मला जे म्हणायचे त्याला पुरावा देतोयस हे लक्षात येते का ?
सेंसॉर बोर्ड नक्कीकाय काम करते असे तुला वाटते ?
आता नाही कळले प्लीज elaborate
सेंसॉर बोर्ड नक्की काय काम करते असे तुला वाटते?
>>>
इथे प्रश्न माझ्या वाटण्याचा कुठे आला?
त्यापेक्षा विषयाच्या अनुषंगाने उदाहरण घेऊया.
जर कोणी एक चित्रपट बनवला ज्यात भारताचे आताचे कुठलेही राजकीय नेते खरयाखुरया नावासह दाखवले आणि ते दहशतवाद्यांना सामील दाखवले, नुसते दाखवले नाही तर तसा दावाच केला, किंवा एखादा घोटाळा जो कोर्टात केस चालू आहे तो त्यांनीच केला आहे असे ठामपणे म्हटले, तो घोटाळा चित्रपटात करताना दाखवले, घोटाळा सोडा बलात्कारच करताना दाखवले ज्याचा त्यांच्यावर आरोप सुद्धा नाही, म्हणजे समजा काहीही काल्पनिक स्क्रिप्ट पण नाव आणि इतर डिटेल त्या नेत्यांचे खरेखुरे, तर त्या चित्रपटाला प्रदर्शित करता येईल का? सेन्सॉर मान्यता देईल का?
याच आशयाची व्हॉट्सॲप पोस्ट मात्र कोणीही कोणालाही ढकलू शकतो. लागले मासे गळाला तर लागले..
जसे शाहरुख खान ने पाकिस्तानला ५५ कोटी मदत केली आणि भारताला काहीच नाही अशा पोस्ट व्हाट्सअप वर फिरतात. त्याचे दहशतवाद्यांशी संबंध जोडतात, लव जिहाद त्याच्या नावावर खपवतात.. आणि तुम्ही म्हणता तसे काही लोकं ठेवतात सुद्धा यावर विश्वास..
पण कोणी शाहरुखवर बायोपिक बनवून त्यात हे दाखवू शकते का? माझ्यामते नाही...
इथे प्रश्न माझ्या वाटण्याचा
इथे प्रश्न माझ्या वाटण्याचा कुठे आला? >> साधे उदाहरण देतो. सेंसॉर बोर्ड ने पास केलय म्हणजे हे खरे ह्या तत्वाने अमर अकबर अँथनीमधे तीन भाउ एकाच वेळ निरुपा रॉयला डायरेक्ट रक्त देतात हे खरे ठरते का ? माझे मूळ पोस्ट अतिशय साधे होते, व्हॉ.अॅ. वरच्या अचाट पोस्ट्सवर जसा विश्वास ठेवणारी जनता असताना सिनेमामधला इतिहास खरा मानणारी जनता असणे सहज शक्यप्राय आहे. (हे मी कॉमीला उद्देशून लिहिले होते) इन फॅक्ट तुझ्याच आधीच्या मुद्द्याला पुष्टी दिलेली होती. पण तुझे नेहमीप्रमाणे 'ये ग ये ग म्हशी, मला कुठे नेशी' सुरूच
"इथे प्रश्न माझ्या वाटण्याचा कुठे आला?" ह्या वाक्याने सुरू होणारी पोस्ट "माझ्यामते नाही..." असा विनोद तुच एव्हढ्या आत्मविश्वासाने करू शकतोस. कौतुक आहे !
हा धागाच मुळी चित्रपट कसा
हा धागाच मुळी चित्रपट कसा "वाटला" याबद्दल आहे ना?
ह.पा. बिजागिरी गंजून
ह.पा.
बिजागिरी गंजून खल्ल्लास झालियो 
एका ट्रोलला गप्प करण्यासाठी
एका ट्रोलला गप्प करण्यासाठी इतर सगळे ट्रोल बनतात हे त्या इतरांसाठी व यात न पडता मुळ विषयावरिल पोस्टी वाचु
इच्छिणार्यांसाठी योग्य की अयोग्य हा विचार करतेय.
एखाद्याला संभाजी राजे हे
एखाद्याला संभाजी राजे हे निव्वळ शिवाजी महाराजांचे मुलगे म्हणून माहीत असतील पण ते सुद्धा एक पराक्रमी राजे होते याची जराही कल्पना नसेल.
>> संभाजी राजांनी सांबार कसे शोधले हे तरी लोकांना कुठे माहिती आहे? पुर्व्वी मायबोलीवर लेख आला होता.
इथे चेन्नै टाईम्स्चा रेफरन्स https://timesofindia.indiatimes.com/city/chennai/sambar-the-great-tamil-...
जसे शाहरुख खान ने पाकिस्तानला
जसे शाहरुख खान ने पाकिस्तानला ५५ कोटी मदत केली आणि भारताला काहीच नाही ...>>>अजुन ३०० वर्षांनी भविष्यात असे बायोपिक बनेल सुद्धा आणि लोक म्हणतील असा होता होय शाखा.
संत ज्ञानेश्वर (जुना ) सहज
संत ज्ञानेश्वर (जुना ) सहज म्हणून बघायला सुरूवात केली आणि मग स्किप करता येईना म्हणून अर्ध्याच्या वर पाहून झाला.
जुनं तंत्र, ब्लॅक अॅण्ड व्हाईट , संवादांची जुनी शैली ( दीपक देशपांडे खूप मस्त नक्कल करतात ) हे सुरूवातीला पाच दहा मिनिटं खटकतं पण नंतर आपन त्यात ओढले जातो. किती तरी वेळा आवंढा येतो गळ्यात. हाच पिक्चर नव्या तंत्रज्ञानाने चकचकीत बनवला तर इतका प्रभावी वाटणार नाही असं वाटतं. ब्लॅक अॅण्ड व्हाईट ने हा जुना काळ आहे असा समज होतो. संत तुकाराम पण असाच दोन तीन वर्षांपूर्वी पाहिला होता. तो ही असाच खूप आवडला होता. नवीन नाही पाहिला. वेगळंच युग होतं प्रभातचं.
आचार्य function at() { [native code] }रेंचा महात्मा फुलेंवरचा पिक्चर आहे, सतत यु ट्यूब फीड मधे पण दिसतोय. पण नवीन पाहिल्यानंतरच तो पाहणार. आधी पाहिला तर नवीन आवडणार नाही असे होण्याची शक्यता आहे.
Pages