Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
सर्व नवीन पोस्टी वाचल्या.
सर्व नवीन पोस्टी वाचल्या.



माझेमन, तो पाकिस्तानी नग मला माहीत आहे
संजय भावे, थॅंक्यू थॅंक्यू. तुमची भरही
राभु-हो, हो. राजकुमार राव 'रारा' गं, पण राकु ते राकुच.
राजकुमार राव 'रारा' गं >>>
राजकुमार राव 'रारा' गं >>> याची रारॉ बरोबर गल्लत करू नये
राकु ते राकुच >>>
राकु ते राकुच >>>
किती दिवस झाले माहिती नाही, पण मी नं युट्यूबवर "हसी के हंगामे" ऐकलं.
त्यातला राजकुमार चा किस्सा ऐकून जमिनीवर लोळण घेतली.
https://www.youtube.com/shorts/dZMeQRVKRxY
संजय भावे - धमाल लिहीले आहे
संजय भावे - धमाल लिहीले आहे
बेनझीर चा संदर्भ मलाही आठवतो ते गाणे ऐकताना.
बरसात कि एक रात मधे अमिताभची हिरॉईन आणि नंतर लगेच शक्ती मधे आई ! >>> राभू, साधारण १९७९-८०-८१ च्या सुमारास अमिताभ व राखी जेव्हा सेटवर येत असतील तेव्हा इथे या सेटवर नक्की कोणते बेअरिंग घ्यायचे आहे हे ते कसे ठरवत असतील असा मला नेहमी प्रश्न पडतो. कोणता सेट आहे त्यावरूनः
)
मुकद्दर का सिकंदर: अमिताभकडून एक अप्राप्य प्रेयसी बद्दल yearning जाणवेल या नजरेने तिच्याकडे. तिने याच्याकडे तु.क टाकायचे. रोते हुए गाण्यात ती काही सेकंद दिसते तेव्हाही तिचा त्रासिक चेहरा बघितला, तर ती सेटवर एरव्हीही ते बेअरिंग सोडत नसेल. ( संतोष जुवेकर सारखे
बेमिसाल: दोन्ही बाजूने मस्त केमिस्ट्री. प्रत्यक्षात मित्राची बायको पण खरे म्हणजे चांगली मैत्रीण,
त्रिशूलः अमिताभकडून आधी फक्त प्यादे म्हणून वापर पण नंतर पश्चात्ताप्/प्रेम. तिच्याकडून आधी प्रोफेशनल संबंध, मग संताप आणि मग प्रेम.
बरसात की एक रात: दोन्ही कडून प्रेम
शक्ती: आई. क्लासिकल "माँ" व्हाइब्ज
लावारिसः आईच, पण अजिबात माहीत नसलेली/न आठवणारी
शानः प्रेमळ पण धाक असलेली थोरली भावजय.
जुर्माना: आधी तिला गंडवणारा व पण नंतर चूक समजलेला, तिच्याबाजूने जेन्युईन प्रेम
काला पत्थर व कभी कभी थोडे आधीचे आहेत, त्यामुळे एकाच काळी या इतरांबरोबर त्यांचे शूटिंग सुरू नसावे. अमिताभचे रेखा व परवीन बरोबरही अनेक पिक्चर्स होते पण बहुतांश केसेस मधे ते सेटवर समोर आले की त्यांचा एकमेकांशी रोमॅण्टिक अँगलच असायचा. त्यामुळे त्यांना आज आपण अमिताभला तु.क द्यायचाय, त्याच्याकडे प्रेमाने बघायचे आहे की रागाने, की आई/वहिनीच्या मायेने हे आठवावे लागत नसेल
त्याकरता तरी राखीला एक लाइक "बनतोच"
त्याकरता तरी राखीला एक लाइक
त्याकरता तरी राखीला एक लाइक "बनतोच" >>> हो ना, नाहीतर बरसात कि एक रात मधे चुकून " बेटा, तुम्हे गाजर का हलवा पसंद है ना ?" म्हणाली असती.
फा, राखीवर रिसर्च करून आला
फा राखीवर रिसर्च करून आला आहे. राखीच्या प्रेमातील १०१ स्थित्यंतरे -
मला तर सगळेच मिक्स व्हेजिटेबलचेच प्रकार वाटले, केमिस्ट्री फार बदललेली स्पष्टपणे दिसत नाही. ब्लर लाईन आहे एक्स्प्रेशन्स मधे. सगळी गाणी सुद्धा दूरदर्शन वरील समुहगीतातील स्त्रियांप्रमाणे त्रयस्थ भाव ठेवून लांब कुठेतरी उभे राहून , ठराविक काठाच्या थोड्या पारदर्शक साड्या नेसून, दोन्ही हात सरळ किंवा एकावर दुसरा ठेवून गायलेलीच आठवतात. थोडी हालचाल आठवते पण नाच, उत्फुल्लता असे काही आठवतच नाही.
पोकर फेस शक्यतो.
जॉनी लिव्हरला 'गोलमाल' मधे स्मृतीभ्रंशाचा आजार असतो पण हौसेने सणवार साजरे करण्याचा उल्हासही. तेव्हा तो ईदला दिवाळी, दिवाळीला ख्रिसमस, ख्रिसमसला होळी साजरी करत असतो. तसेच राखीचे प्रेम सिग्नलांचेही होत असेल पण निदान गोलमाल मधे स्पष्टपणे सांगितले तरी आहे.
हे राभुच्या वरच्या कमेंट वरून आठवले.
तेव्हा तो ईदला दिवाळी,
तेव्हा तो ईदला दिवाळी, दिवाळीला ख्रिसमस, ख्रिसमसला होळी साजरी करत असतो >> हम आपके दिल मे रहते है मधे अस्संच कॅरेक्टर होतं.
फा >>>> काय अब्यास!! काय
फा >>>> काय अब्यास!! काय अब्यास!! पोस्ट वाचून अंदाज आलाच कुणाची असेल.
पोकर फेस राखी
ती नायिका न वाटता पुरंध्री/प्रौढा वाटायची. म्हणजे हिचं लग्न नसून लग्नासाठी आलेली चाळिशीची काकी वगैरे…
बाय द वे मला तिच्या काश्मिर है गाण्यातल्या साड्या आवडल्यात, विशेषतः हलकी गुलाबी सिल्क व ब्लॅक पर्लचं मंगळसूत्र सदृश काहीतरी.
जुर्माना मध्ये तिचे पडद्यावर
बेमिसालमध्ये तिचे पडद्यावर नाव कविता आहे. परिक्षणात ‘राखी असल्याने कादंबरी नाव जास्त शोभले असते ‘ असे लिहिले होते.
राखी शर्मिली आणि जीवन
राखी शर्मिली आणि जीवन मृत्युमधे खूप गोड दिसलीय. नंतर सगळ्याच चित्रपटात प्रौढच वाटत राहिली. पण तिचा अभिनय वाईट नव्हता. विशेषतः बसेरा मधे तिने खूप छान काम केलंय. रेशमा और शेरा मधे २-३ प्रसंग आहेत आणि संवाद नाही पण तरीही छाप पाडली आहे.
श्रद्धांजली अलिकडेच पाहिलाय.
श्रद्धांजली अलिकडेच पाहिलाय. चांगला आहे.
पण राखीचा अभिनय ठीक ठाकच आहे.
डकैत मधे तिचं ते नाचो रे नाचो बघवत आणि ऐकवत नाही.
तेव्हा तो ईदला दिवाळी,
तेव्हा तो ईदला दिवाळी, दिवाळीला ख्रिसमस, ख्रिसमसला होळी साजरी करत असतो >>>
राखीच्या प्रेमातील १०१ स्थित्यंतरे >>>
हा अभ्यास बराचसा हे पिक्चर बघतानाच झालाय 
थँक्स माझेमन
अमिताभ व राखी जेव्हा सेटवर
अमिताभ व राखी जेव्हा सेटवर येत असतील तेव्हा इथे या सेटवर नक्की कोणते बेअरिंग घ्यायचे आहे हे ते कसे ठरवत असतील >>>

आणि मला वाटत होतं की तुझा फक्त समग्र अमिताभ अभ्यासून झाला आहे
राखीच्या प्रेमातील १०१ स्थित्यंतरे - Lol मला तर सगळेच मिक्स व्हेजिटेबलचेच प्रकार वाटले >>> टोटली. तरी त्रिशूल मधे जरा बदल होतात चेहर्यावर. टोटल मिक्स व्हेज पहायचा असेल तर 'ये वादा रहा' पहा ( यातच ती बदकिस्मती ला बदगस्मती म्हणते
)
टोटल मिक्स व्हेज पहायचा असेल
टोटल मिक्स व्हेज पहायचा असेल तर 'ये वादा रहा' पहा ( यातच ती बदकिस्मती ला बदगस्मती म्हणते
>>>>
बसेरा मध्ये राखीने खरंच
बसेरा मध्ये राखीने खरंच चांगलं काम केलेलं, एरवी फार नाही आवडत. शर्मिलीमध्ये छान दिसली. राखीचे डायलॉगज कधी कधी मला समजतच नाहीत.
संजय भावे पोस्ट भारीच
राखी खरं म्हणजे कारण अर्जुन
राखी खरं म्हणजे कारण अर्जुन आणि धर्मेंद्र बरोबर पल पल दिल के पास गाण्यात चांगली दिसली आहे
अमिताभ बरोबर तिचे confusion जास्ती झाले आहे असे वाटते.
व्वा
व्वा
काय भारी लिहिलंय सगळ्यांनी.
एकदम धमाल
राखी हा कायम Gray area राहिला आहे म्हणजे.....
राखी हा कायम Gray area राहिला
राखी हा कायम Gray area राहिला आहे म्हणजे..... >>>
सगळ्याच राकु-राखी पोस्ट्स
सगळ्याच राकु-राखी पोस्ट्स
सुरुवातीची राखी बरी होती. पल पल दिल के पासचा उल्लेख आलाच आहे. तो सिनेमा (ब्लॅकमेल) peak राखी आहे. त्यातले शरबती तेरी आंखो की झील गाणे पण भारी आहे. कभी कभीमध्ये तिच्या हातून अमिताभ गेला आणि त्यानंतर ती कोमेजली ती कायमचीच.
अर्थात याने आपल्या अॅबसर्डिस्ट दिग्दर्शकांना काहीही फरक पडला नाही. म्हणून विनोद खन्ना स्वत:च्या पावलांनी चालत आलेल्या परवीन बाबीला नकार देऊन राखीच्या मागे जातो - https://youtu.be/k7ESt-Y-oig&t=2808
इतर हिरॉईन्स फिट असताना
इतर हिरॉईन्स फिट असताना सुद्धा त्यांना वनवास पत्करावा लागला त्या मानाने राखी ला आघाडीच्या हिरोंबरोबर काम मिळत राहिलं.
काय रहस्य असावं ?
सलीम जावेद बद्दल असं सांगतात कि ते एखाद्या हिरोला घ्यायला लावायचे ( अमिताभ , अमजद खान, विनोद खन्ना).
( असंही ऐकलंय कि खूप गळेपडू होते).
सलीम यांचं माहिती नाही पण जावेद खूप चुरूचुरू बोलतात. जोपर्यंत निर्माता मान्य करत नाही तोपर्यंत ते कन्व्हिन्स करत असावेत.
तसंच गुलजार यांचंही असावं. राखीला घेता कि नाही नाहीतर फोन वरून कविता ऐकवत असावेत.
अमलतास
खिड़की पिछवाड़े को खुलती तो नज़र आता था,
वो अमलतास का इक पेड़, ज़रा दूर, अकेला-सा खड़ा था,
शाखें पंखों की तरह खोले हुए.
एक परिन्दे की तरह,
बरगलाते थे उसे रोज़ परिन्दे आकर,
सब सुनाते थे वि परवाज़ के क़िस्से उसको,
और दिखाते थे उसे उड़ के, क़लाबाज़ियाँ खा के,
बदलियाँ छू के बताते थे, मज़े ठंडी हवा के!
आंधी का हाथ पकड़ कर शायद.
उसने कल उड़ने की कोशिश की थी,
औंधे मुँह बीच-सड़क आके गिरा है!!
अमलताशचा मायबोली एपिसोड माहीत असल्याने निर्माता राखी चालेल पण कविता आवर म्हणून गयावया करत असेल.
राखी-राकु च्या सगळ्याच
राखी-राकु च्या सगळ्याच पोस्ट्स धमाल आहेत.
सहज शोधलं तेव्हा समजलं कि देवदास च्या कथेवर एकूण २२ वेळा सिनेमे तयार झाले आहेत भारतातल्या वेगवेगळ्या भाषेत (अॅक्च्युअली २१ + १ मूकपट)
सगळेच
सगळेच
गझनी शेवटचा भाग चालू आहे.
गझनी शेवटचा भाग चालू आहे. एकदम स्ट्राईक झालं.
आमीरखानचा चेहरा आडवा ताणला तर तो संजीव कपूर सारखा दिसेल.
>>भो आ क फ:>>
>>भो आ क फ:>>
ओक्के... भोगतो 😀
>>शिक्षेला ऑप्शन -
काश्मीर चं गाणं असल्यानी ' आईस्क्रीम खाउंगी कश्मीर जाऊंगी ' हे गाणं महिनाभर रोज सलग १० वेळा बघण्याची सजा...>>
'आईस्क्रीम खाउंगी कश्मीर जाऊंगी'च्या जागी त्याच चित्रपटातले 'दर्द दिलोंके कम हो जाते' हे गाणं महिनाभरच काय तर वर्षभर, आणि रोज १०च काय ५०-१०० वेळा बघण्याचा ऑप्शन दिला असता, तर (ते गाणे प्रेक्षणीय नसले तरी मोहम्मद इरफानचा जादुई आवाज ऐकण्यासाठी म्हणुन तरी) तो आनंदाने स्विकारला असता. गेला बाजार हिमेशचेच 'ये तेरा मेरा मिलना' हे गाणे देखिल (हंसिका मोटवानीसाठी) स्विकारले असते! पण 'आईस्क्रीम खाउंगी कश्मीर जाऊंगी'? नो वे.... माझ्या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार न करता शिक्षा सौम्य करण्याऐवजी ती अधिकच कठोर केली जात असेल तर काय बोलणार? ह्या ऑप्शन पेक्षा आधिची 'पाकिस्तानी यूट्यूबर्सचे व्हिडीओ बघण्याची सजा'च मान्य केलेली परवडेल मला 😂
त्याच चित्रपटातले 'दर्द
त्याच चित्रपटातले 'दर्द दिलोंके कम हो जाते' हे गाणं महिनाभरच काय तर वर्षभर, आणि रोज १०च काय ५०-१०० वेळा बघण्याचा ऑप्शन दिला असता, तर (ते गाणे प्रेक्षणीय नसले तरी मोहम्मद इरफानचा जादुई आवाज ऐकण्यासाठी म्हणुन तरी) तो आनंदाने स्विकारला असता. गेला बाजार हिमेशचेच 'ये तेरा मेरा मिलना' हे गाणे देखिल (हंसिका मोटवानीसाठी) स्विकारले असते!
>>
सजा आहे
मजा नाही
फा राखी पोस्ट अफाट अभ्यासू
फा राखी पोस्ट अफाट अभ्यासू आहे


अस्मिता
भावे सर,
एक हॉलिवूड मुव्ही आठवला, बहुतेक gone in 60 seconds असावा.
त्यात किलर हिरोला विचारतो, गोळी कुठे मारू?डोक्यात की हृदयात?
तुम्ही असेच दोन्ही options घेतलेत स्वत:साठी
छोरी-२ बघितला प्राइम वर.
छोरी-२ बघितला प्राइम वर. छोरी -१ पाहिला असेल तर त्याच्या शेवटापासूनच कथा सुरु होते. ते बाळ- ती मुलगी ७ वर्षाची झाली आहे. ज्यांना ती मुलगी जन्मल्या जन्मल्या मारून टाकायची होती त्यांनाच आता ती वेगळ्या कारणासाठी हवी असणे या क्रीपी नोट वर.
छोरी -१ मला हॉरर + सोशल मेसेज असा वाटला. हा सिनेमा हॉरर पेक्षा जास्त मेटॅफोरिक वाटतो. सगळेच प्रतिकात्मक वाटले मला. एकूण चांगला प्रयत्न. शेवट थोड अॅब्रप्ट आहे पण यातला मेटॅफॉर बघता असा लॉजिकली संपणारा नाहीच आहे हा विषय.
Hanu-man हनु-मॅन
Hanu-man हनु-मॅन
तेलगू पिक्चर आहे. मी हिंदीत पाहिला जियो हॉट स्टार वर.. बहुधा युट्यूबवर सुद्धा आहे.
हिरो तेजा सज्जा..
आणि हिरोईन अमृता अय्यर.. मस्त आहे दिसायला. पारंपारीक कपड्यात सुद्धा फार छान दिसलीय.
पिक्चर सुपर हिरो टाईप आहे. फक्त शक्ती देणारा कोणी एलियन नसून देव हनुमान म्हणून मायथॉलॉजिकल टच सुद्धा आहे, पण किंचितच.
मुलगा रोज या पिक्चर चे गाणे लावायचा जे बघायला मजा यायची. शोधून पिक्चर बघितला तर आवडला. मग त्यालाही आज दाखवला. फक्त आता उठसूठ पुन्हा पुन्हा तोच पिक्चर लाऊन बसायची भीती आहे. पण हिरोईन आवडल्याने चालून जाईल..
कोणी बघायचा झाल्यास सुरुवातीची दहा पंधरा मिनिटे फार मनावर घेऊ नका. ती खलनायकावर खर्ची घातली आहेत. खरा पिक्चर नंतर सुरू होतो. हिरोच्या एन्ट्रीपासून. मुलाला थेट तिथूनच लाऊन दिला.
वर उल्लेखलेले गाणे इथे बघू शकता.
अवाकाया अंजनेया
https://youtu.be/hHAT-NPflUM?si=-3YuMUlAcIXdCF23
रा व रा ची चर्चा मस्त होती.
रा व रा ची चर्चा मस्त होती.
नेटफ्लिकवरचा नवा हिंदीत डब केलेला ‘कोर्ट’ आवडला. कोर्टकेसचे वादीप्रतिवादी ऐकायला आवडते म्हणुनही आवडला. साधा सरळ आहे. भडक संवाद, भडक सीन, भडक मारामार्या , जास्त ढमढम गाणी नाहीत. कामं ठीकठाक. नो मेकप नायिका. उगाच स्टायलीशगिरी पण नाही. कोणत्याही जादूने कोर्ट जिंकणे , हरणे हे प्रकार नाहीत. हे सगळं आवडलं.
नेफ्लि वर छावा आला म्हणून
नेफ्लि वर छावा आला म्हणून उत्सुकतेने थोडा वेळ पहिला आणि थिएटरमध्ये जाऊन पहिला नाही याचं खूप बरं वाटलं
बुऱ्हाणपूर ची लढाई इतकी हास्यास्पद आणि केविलवाणी आहे की ती बघूनच बंद केलं बघणं
किती टेक्नॉलॉजी होती यांच्याकडे तरीही किती ती लुटुपूतूची लढाई
विकी कौशल स्लो मोशन मध्ये लढतो, घोड्यावरून उडत जातो, स्वतः नंतर उडतो, तो एकटा तावडीत सापडलेला असतानाही मुघल सैन्य एकत्रितपणे हल्ला करत नाही
आम्ही तुला आम्हाला मारायची संधी देतो हे घे मार आम्हाला म्हणत एकेक दोन जणांनी येऊन आत्महुती देतात
किती ती गरीबी
तो जुवेकर मोजून एक सिन मध्ये आहे त्यातही तो घाबरलाय का क्रुद्ध आहे का त्याला कॉन्स्टिपेशन झालंय हे कळत नाही असे एक्सप्रेशन दिलेत त्याने
म्हणूनच कदाचित त्याने ट्रोल होण्यासाठी असली विधाने केली असावी, सिनेमाच्या रोलपेक्षा कैक पटीने जास्त हवा झाली त्याची फुकटात
Pages