चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७८-७९ ही त्याच्या पहिल्या इनिंग चे पीक वर्षे होती. खरेच !
त्यावेळी एका भल्या मोठ्या थिएटर शेजारीच (ज्यात एकाच कॉम्प्लेक्स मध्ये चार होती आणी हाकेच्या अंतरावर आणखी चार) रहात होतो त्यामुळे तो उन्माद, बच्चन चा पिच्चर पहिल्या दिवशी पहाण्याचा अट्टाहास, गर्दी, ब्लॅक तिकिटे सारे पाहिले आहे. ९७८-७९ च्या अमिताभ ची सर नंतरच्या कोणत्याही इनिंग ला नाही , मग ते 'मर्द', लाल बादशह', वाला असो, 'कजरा रे ' वाला असो वा 'सूर्यवंशम'

त्यात तिचे नाव "राखी" !
>>>>>
अरे फा अरे देवा.. म्हणूनच म्हटले Happy
म्हणजे आमच्यावेळी फ्रेंडशिप डे ला आपले नाव लिहून बँड बांधायची पद्धत होती.

खांबाला राखी बांधलेली मीम आठवतेय का ? राखीलाच खांबाला बांधून 'राखी बांधली ' हा राखी पौर्णिमेचा मेसेज. व्हिलनालाही कन्फ्यूज केल्याने तिला मारावे का सोडावे कळायचे नाही पण सणावाराची परंपरा असल्याने शब्दशः बांधून टाकायचे. Proud

म्हणजे आमच्यावेळी फ्रेंडशिप डे ला आपले नाव लिहून बँड बांधायची पद्धत होती. >>> ओह आता आले लक्षात. तो त्यावर नाव लिहायचा प्रकार माहीत नव्हता. आता ट्यूब पेटली Happy

आत्मकेंद्री सुंदरी होती. हे प्रेम नोहे >>> Lol म्हणजे लेडी राकु! मी आधी आत्मसुंदरी असे वाचले. ते ही फार चुकीचे नसावे Happy

खांबाला राखी बांधलेली मीम आठवतेय का ? राखीलाच खांबाला बांधून 'राखी बांधली ' हा राखी पौर्णिमेचा मेसेज >>> Lol हो दरवर्षी येतोच.

राखीलाच खांबाला बांधून 'राखी बांधली ' हा राखी पौर्णिमेचा मेसेज >>> Lol मला नाही आला हा कधी... वर्षा, अक्षय, पांड्या हे लोकच येत राहतात..

यावेळी मी पाठवते तुला राखी Proud

फा, लेडी राकु.. हम्म. विचारात पाडलेस. 'नार्सिसिझम नरेश' राकुंची बरोबरी रजनीकांत सुद्धा करू शकणार नाही अशी भीती मला वाटते. तोही (भूमिका) काकणभर नम्र व विनयशीलच निघायचा. Happy

*राकु - राजकुमार ज्या आत्मकेंद्री, स्वयंशोषित, आत्मपूजक भूमिका करून स्वतःचेच कौतुक करायचा त्याचा संदर्भ.

'नार्सिसिझम नरेश' राकुंची बरोबरी रजनीकांत सुद्धा करू शकणार नाही अशी भीती मला वाटते. तोही (भूमिका) काकणभर नम्र व विनयशीलच निघायचा >>> Lol हो. मी त्या वर्णनावरून जोक केला फक्त. राकूची बरोबरी होउच शकत नाही - हे वाक्य त्याच्याच कोणत्यातरी पिक्चरमधला डॉयलॉग वापरूनही सहज म्हणता येईल.

इस शक्स को देखो. चाहता तो ये अपना घर बसा सकता था. लेकिन देश के लिए.... हे वाक्य स्वतःबद्दलच म्हणण्याची जुर्रत दुसरे कोणी करू शकणार नाही. नुसता शेर किंवा राजा कोणीही हीरो असेल. राकु शेरोंका शेर व राजाओंका राजा असतो. तरूण हीरो समोर "तुम्हारे पास ताकत है और मेरे पास दिमाग" हा संवाद कोणत्याही सिनीयर अ‍ॅक्टरने चालवून घेतला असता. पण राकु त्याला "तुम्हारे पास ताकत है और मेरे पास ताकत और दिमाग दोनो" असे करतो. याचा अर्थ गोविंदाकडे दिमाग नाही असाही होतो हे गोविंदाला बहुधा पिक्चर रिलीज होईपर्यंत समजले नसावे. अर्थात त्यामुळे ते अगदीच काही चुकीचे नव्हते Happy

Timon: Who is the brains of this outfit?
Pumba: ummm...
Timon: My point exactly!

पीने वालों को गाणं' मला धमाल वाटतं. मला पाठ होतं, आता उजळणी करते. Happy 'चंद्रमुखी हो या पारो की फरक पैंदा यारो' ह्या ओळी एवढ्या चपखलपणे दिल्यामुळे तुला बोनस पॉईंट
+1
हाथ की सफाई एके काळी गिल्टी प्लेजर होता

याचा अर्थ गोविंदाकडे दिमाग नाही असाही होतो हे गोविंदाला बहुधा पिक्चर रिलीज होईपर्यंत समजले नसावे. अर्थात त्यामुळे ते अगदीच काही चुकीचे नव्हते
Timon: My point exactly!
>>>> Lol Lol

एका सिनेमात राकु ला त्याच्या मुलीचा गरीब बॉ फे भेटायला येतो तेव्हा मेन गेट मध्ये चौकिदार त्याला एक मनगटी घड्याळ देतो, व वेळ बघायला सांगतो. मग तो हिरो आत बंगल्यात जाऊन राकुला भेटतो. राकु म्हणतो की आता किती वाजले ते बघ. हमारे मेन गेट से लिविंग रूम तक आनेमे तुम्ही इतना समय लगा, इससे हमारी दौलत का अंदाजा लगा सकते हो !

राखीचे पूर्ण करिअर मधे कुणावर प्रेम आहे असे वाटले नाही, एक ते 'करण अर्जुन' सोडले तर. सगळ्यांना कन्फ्यूज करणारे मिक्सड सिग्नल देते ती आणि आपल्याला वाटते त्याग केला. >>> हाहाहा, सहीच.

ताकत और दिमाग
>>
या सिनेमात गोविंदानी घातलेला एक शर्ट राकु ला आवडला असं गोविंदाला कळलं, म्हणून त्यानी तो शर्ट गिफ्ट रॅप करून राकु ला भेट दिला.
दुसऱ्या दिवशी बघतो तर राकु च्या गळ्यात त्या शर्ट ला कापून बनवलेला रुमाल होता...

दॅट्स राकु...

ॲन्की आणि विकु Lol
जुनीच पोस्ट 'राक्वार्पण' करते -
'शरारा' सिनेमात शाल पांघरलेले राकु आरशात मिलिटरी गणवेशातील फक्त आपल्या प्रतिंबिबाशी चर्चा करून 'सर्वानुमते' सर्वश्रेष्ठ ठरलेलं दाखवलं आहे. हे त्यांनी 'परस्परांशी' ठरवून आपल्याला कसलातरी संदेश दिला आहे. पण तुम्ही असे त्यांच्यावरच हसत बसल्याने संदेश नीट पोचणार नाही हे लक्षात घ्या. Wink

धमाल.
फ्रेंडशिप डे ला राखी लिहून बँड बांधत असेल >>> Lol

विकु Lol

वक्तमधले राकुचे ‘चिनायसेठ’वाले संवाद आवडले होते. पुढे तो सुटलाच. आणि हा माणूस एकेकाळी पोलिस होता म्हणे…

अरे काय चाललंय काय?
आज सकाळी सकाळी 'हे' सगळं वाचल्यापासून मधेच (वेड्यासारखा) हसतोय...

"राखीचे पूर्ण करिअर मधे कुणावर प्रेम आहे असे वाटले नाही, एक ते 'करण अर्जुन' सोडले तर. सगळ्यांना कन्फ्यूज करणारे मिक्सड सिग्नल देते ती आणि आपल्याला वाटते त्याग केला. इथे डिरेक्ट सिग्नल सुद्धा समजू नयेत असे ऐंशीचे दशक, त्यात मिक्स्ड सिग्नल. विनोद मेहरा, अमिताभ, शशी कपूर सगळे कन्फ्यूज वाटतात तिच्यासोबत."
परफेक्टो... 👍

"राखी मात्र फार बोअर वाटते मला त्यात. काय ती हेअरस्टाइल."
दाणदिशी डोळ्यांसमोर ' प्यार से प्यार करो... ये उम्र प्यार की हैं...' ह्या माझ्या आवडत्या गाण्यातला राखीचा तो 'चिर्कुट' लुक आला!
अरारारा... 'काय ती हेअरस्टाइल' 😂

"खांबाला राखी बांधलेली मीम आठवतेय का ? राखीलाच खांबाला बांधून 'राखी बांधली ' हा राखी पौर्णिमेचा मेसेज. व्हिलनालाही कन्फ्यूज केल्याने तिला मारावे का सोडावे कळायचे नाही पण सणावाराची परंपरा असल्याने शब्दशः बांधून टाकायचे."
गेल्या २ - ३ वर्षांत हा मीम आला नसल्याने विस्मरणात गेला होता, आता पुन्हा आठवला 😀

"लेडी राकु!" 😂

'नार्सिसिझम नरेश' राकुंची बरोबरी रजनीकांत सुद्धा करू शकणार नाही अशी भीती मला वाटते. तोही (भूमिका) काकणभर नम्र व विनयशीलच निघायचा.
🙏
"अब हम तुम्हारे कर्जदार हैं लडकी... और याद रहे, 'राणा' कर्ज और फर्ज दोनोंको एक हि नजरसे निभाता हैं..."
अशा दटावणीवजा सुरात एखाद्याने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानणे/कृतज्ञता व्यक्त करण्याचे विलक्षण प्रकार केवळ 'नार्सिसिझम नरेश' राकुच करू शकतात, रजनीअन्ना व इतर टर्रेबाज लोक म्हणजे त्यांच्यासमोर 'अतिसामान्य', 'किस झाड की पत्ती' वगैरे 😀

"तुम्हारे पास ताकत है और मेरे पास ताकत और दिमाग दोनो" असे करतो. याचा अर्थ गोविंदाकडे दिमाग नाही असाही होतो हे गोविंदाला बहुधा पिक्चर रिलीज होईपर्यंत समजले नसावे."
🤦‍♂

"राकु म्हणतो की आता किती वाजले ते बघ. हमारे मेन गेट से लिविंग रूम तक आनेमे तुम्ही इतना समय लगा, इससे हमारी दौलत का अंदाजा लगा सकते हो !"
😇

"दुसऱ्या दिवशी बघतो तर राकु च्या गळ्यात त्या शर्ट ला कापून बनवलेला रुमाल होता...

दॅट्स राकु..."
😀

एकतर मला कशावरूनही, अचानक काहीही आठवतं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. नव्वदच्या दशकात आम्ही शाळेत असताना पाकिस्तान पीपल्स पार्टीचे 'दिला तीर बीजा...' हे प्रचारगीत भारतातही खूप गाजले होते. त्या गाण्याचा त्यावेळी अर्थ काहीच समजत नसला तरी चाल आणि संगीत खूप कॅची असल्याने ते चांगलेच तोंडात बसले होते. त्याच सुमारास बेमिसाल चित्रपटातील 'ये कश्मीर हैं, ये कश्मीर हैं' हे गाणंही सतत कुठे ना कुठे कानावर पडायचे किंवा छायागीत/चित्रहार मध्ये पहायला मिळायचे. अर्थाअर्थी ह्या दोन्ही गाण्यांचा काहीच परस्पर संबंध नव्हता, परंतु पहिल्या गाण्यात 'जिये... जिये... जिये भुत्तो बेनझीर' आणि दुसऱ्या गाण्यात 'कितनी खूबसूरत ये तसवीर है.... मौसम बेमिसाल, बेनझीर हैं...' असे बोल आहेत. ह्या दोन्ही गाण्यांत आलेल्या 'बेनझीर' ह्या कॉमन शब्दामुळे मनातं त्यांचा असा काही घट्ट परस्पर संबंध जोडला गेला कि आजही कुठे 'बेनझीर' शब्द ऐकला/वाचला की 'ये कश्मीर हैं' गाण्यात दिसणारी भांगात शेंदूर भरलेली, टिपिकल भय्याणी वाटणारी राखीच डोळ्यांसमोर येते 😂 अर्थात का कोणास ठाऊक पण राजकारण वगैरे विषयांचा गंधही नसलेल्या त्या वयात मला 'स्व. इंदिरा गांधी' आणि 'बेनझीर भुत्तो' ह्या दोघींबद्दल विलक्षण आकर्षण आणि आदर वाटायचा, पण हि राखी मात्र कधीच आवडली नाही!

असो, पण डोक्यात कुठे तरी आज सकाळी वाचलेल्या वरील गोष्टी घोळत असल्याने अचानक त्यातली कुठलीतरी किंवा सगळ्याच गोष्टी आठवून दुपारच्या मीटिंगमध्ये चेहरा कोरा ठेवायचा प्रयत्न अपयशी ठरून मी चार-चौघात फिस्सकन हसलो तर निर्माण होणाऱ्या त्या लाजिरवाण्या परिस्थितीसाठी maitreyee, अस्मिता, फारएन्ड, vijaykulkarni, अँकी नं.१ - तुम्ही सर्वजण जवाबदार असाल ह्याची कृपया नोंद घ्यावी 😀

सगळ्यांना कन्फ्यूज करणारे मिक्सड सिग्नल देते ती
>>

काही वेळा गुलजारच्या कानफ्यूजिंग लिरिक्स चं मूळ इथे असावं...

संजय भावे >>> काय हे!! राखीला इग्नोर करून मी 'ये कश्मीर है' गाणं ऐकायचे आणि काश्मीर बघायचे. आता बेनझीर भुट्टो काय, पाकिस्तानी पीपल पार्टी काय, भय्याणी काय Happy तुम्ही गाणं स्पॉईल केलंत माझ्यासाठी. याबद्दल तुम्हांला पाकिस्तानी यूट्यूबर्सचे व्हिडीओ बघण्याची सजा द्यावी काय Light 1

काही वेळा गुलजारच्या कानफ्यूजिंग लिरिक्स चं मूळ इथे असावं .....
>>> तुम्ही फार महत्वाची मिस्टरी सॉल्व केली आहे. ढवळ्याशेजारी पवळ्या झालं की birds of same feather माहित नाही.

>>याबद्दल तुम्हांला पाकिस्तानी यूट्यूबर्सचे व्हिडीओ बघण्याची सजा द्यावी काय>>
अरे देवा... एका क्षुल्लक चुकिसाठी इतकी कठोर शिक्षा? त्या ऐवजी हिमेश रेशमियाची प्रमुख भुमिका असलेले चार-पाच चित्रपट एकापाठोपाठ एक बघण्याची तुलनेने थोडी सौम्य सजा द्यावी अशी मागणी .... आणि ह्या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा अशी विनंतीही करतो 😀

त्या ऐवजी हिमेश रेशमियाची प्रमुख भुमिका असलेले चार-पाच चित्रपट एकापाठोपाठ एक बघण्याची तुलनेने थोडी सौम्य सजा द्यावी अशी मागणी .... आणि ह्या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा अशी विनंतीही करतो
>>
भो आ क फ:
शिक्षेला ऑप्शन -
काश्मीर चं गाणं असल्यानी ' आईस्क्रीम खाउंगी कश्मीर जाऊंगी ' हे गाणं महिनाभर रोज सलग १० वेळा बघण्याची सजा...

धमाल पोस्टी सगळ्या Lol

काल ( कि परवा ?) राजकुमार राव बद्दल (याच धाग्यावर ना ?) लिहीलं आणि आज एकदम राजकुमार, त्यामुळं गोंधळ झाला आधी Proud
शर्मिलीतली निळ्या डोळ्यांची राखी खूप आवडते.
नंतर ती खात्या पित्या घरची वटू लागली.
पंजाबी लोकांच्या मानाने बरंच मेन्टेन केलंय असंच म्हणायला लागेल.
बरसात कि एक रात मधे अमिताभची हिरॉईन आणि नंतर लगेच शक्ती मधे आई ! Sad

Pages