काही घरात कुणालाच बीटरूट आवडत नाहीत. मग त्या घरातलेच काही लोक मुद्दाम बीटरूट आणतात बाजारातून. एक दोन न आणता चांगले ४-५ आणतात. तो पदार्थ कुणाच्याही घश्याखाली नाही उतरत ना ? मग असे सर्वच पदार्थ जास्त प्रमाणात आणायचे असतात, तसा नियमच आहे. बीटरूटचा अपवाद करता येत नाही. का करावा ?
पुढचा संपूर्ण दिवस बीटरूट पिशवीतून काढणे, त्यांना दोन तीन पाण्यात न्हाऊनमाखून स्वच्छ करणे, कोरडे करून एका जागी ठेऊन मग काही वेळाने ती जागा बदलणे असे काहीजण करतात. तसे करायलाही पाहिजे. मग तोपर्यंत संध्याकाळ होते. मग आपले जे काही ठरले असेल ते डिनर रांधावे, खावे, झोपी जावे असा परिपाठ आहे.
सकाळी बीटरूट दिसले की “कौन नामुराद ये खाएंगा क्या जाने” असे मोठ्याने म्हणतात, म्हणावे. याऐवजी दुसरे सुयोग्य शब्द योजण्याची मुभा आहे, ती सोय वापरता येते. काहीही म्हटले तरी कुणीच ते ऐकत नाही किंवा ऐकले तरी न ऐकल्या सारखे करतात, त्याकडे दुर्लक्ष करावे लागते.
किचनमधली आपली सर्व कामे उरकून नोकरी-धंदा, wfh, क्लिनिक, ऑफिस, शाळा- कॉलेज जे काही असेल ते करण्यासाठी मेंबरं पांगतात. तत्पूर्वी कुणीतरी सर्व बीटरूटांना आठवणीने फ्रिजमधे ढकलावे लागते कारण बाहेर ठेवले तर ते लवकर पिकतात. या स्टेजला बीटरूट ऑलरेडी लाजू लागलेले असतात. सेम टू सेम टमाट्यांसारखे. Blushing Beetroot Red असे उगाच नाही म्हणत साहेबाच्या भाषेत. त्या भाषेला आपल्याकडे आधी वाघिणीचे दूध असे म्हणत. आता आपण ते दूध नासवून त्याचं पनीर केलयं. पण तो आपला चर्चाविषय नाही. एक मिनिट, That reminds me - फ्रिजमधे फ्रेश दुधाचं केलेलं पाढरं शुभ्र पनीर आहे ठेवलेलं. त्याचं कांपोस्ट ख़त होणार की ते मनुष्यमुखी पडणार हे गुपित ब्रम्हदेवालाच माहिताय. ब्रम्हदेवांना आणि त्यांच्या पिताश्रींना ठाउक असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी हा एका गंभीर चर्चेचा विषय आहे. पण ते आत्ताच नको.
Cut to evening.
आता बहुतेक कामं संपली आहेत. नेहेमीपेक्षा थोडी लवकरच. चहासाठी दूध पाहिजे म्हणून ते शीतकपाट उघडले जातेय. (Refrigerator ला फ्रिज आणि मग शीतकपाट असे चढत्या भाजणीने भारी शब्द लेखक वापरतो आहे, त्याचं लॉजिक समजून घ्या) तर तिथे जुन्या जमान्यातल्या नवीन नवरीसारखे लाजून चूर झालेले बीटरूट सलज्ज मुखाने तुमच्याकडे बघतील, बघतात. “आँखों की गुस्ताखीयाँ माफ हों” असे गाणेही वाजेल, वाजते ब्यागराउंडला. कैसे बचोगे ? सोचो सोचो.
आता चहा तर झाला. भूक लागलीच आहे. ते लाजरे साजरे बीटरूट कधीही मुसमुसून रडायला येतील या स्टेजला आहेत. चढती जवानी मेरी .. तू ने कदर ना जानी रामा असे गाणे ब्यागराउंडला वाजते आहे. उस दर्द को समझो. फ्रिजच्या पडदयाआड असले तरी बीटरूट डोळ्यांसमोरच आहेत. “ये जो चिलमन है दुश्मन है हमारी” गात आहेत.
बहुत हो गया. हीच ती वेळ. फैसले की घडी. आता तो प्रश्न उभा ठाकलाय. यक्ष की गंधर्व प्रश्न म्हणतात तोच. तारुण्याने मुसमुसलेले, मदनभार मज सोसवेना अशी अवस्था असलेले बीटरूट आता आत्महत्या करतील त्याआधी त्यांचा काहीतरी खाणेबल पदार्थ रांधण्याचे काम ज़बरदस्तीने ओढवून घेणारा नरपुंगव कोण ? (नारीपुंगवी असा शब्द आहे का? कुठाय रे तो मराठी बृहद्कोष ? ) कोण हे गांडीव उचलणार ? लाख टके का सवाल. सीता-द्रौपदीच्या स्वयंवरासारखे रामार्जुनाच्या धनुष्याचे रोमांचक टणत्कार ह्या कर्णसंपुटांना कधी चुंबणार ? Time freezes. समय जैसे रुक गया है.
तेव्हढ्यात वीज लकाकते. समस्त सरीसृप जागीच थबकतात. एक पुरंध्री आणि तिचा प्राणसखा दोघे ताडकन उठतात. उतणार नाही मातणार नाही असे मूक आश्वासन एकमेकांना देतात. आँखों आँखों मे.
युद्धाला तोंडच काय हात, पाय, नाक, कान फुटतात. चारदोन बटाटे उकडले जातात.त्यांच्या सोबतीला कॉर्न दाणे उकळत्या पाण्यात सती जातात. हिरव्या मिरच्या, कांदे आणि कोथिंबिराच्या जुडीचे निर्घृण हत्याकांड घडते. काट कर बोटी बोटी ! उडवीन चिंधड्या राई राई एव्हढ्या.
तिकडे बीटरूट हसतात, सवयीने पुन्हा लाजून चूर होतात. पण आता माघार नाही. त्यांना आधी स्टीम बाथ. मग हार्ड स्किन रब. मग किस द किसणीचा खेळ. सगळीकडे रंग गुलाबी ! आता ? अब पिया मिलन को जाना.
तापलेले, खुडलेले, भाजलेले वरचे सर्व कलाकार सब दुख दर्द भूल के एकत्र जमतात. “हम साथ साथ हैं” चे आश्वासक सूर शिंपतात. नेहेमीचे मसाले धावून येतात. हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं म्हणणारा black salt विशेष अतिथी. रायगडाप्रमाणे इथे ब्रह्मदेवाला जाग येते - मोक्षासाठी फ्रिजमधे कठोर तपस्या करित असलेले पनीर धावून येते, स्वत:ला या गर्दीत झोकून द्यायला. भेटी लागे जीवा चे एक आर्त आवर्तन !
इन सब रोमांचकारी घटनाओं का नतीजा : गुलाबो उर्फ़ पिंक टिक्की उर्फ़ blushing cutlets गुल खिले गुलाबी, मौसम हुआ गुलाबी. जोडीला आनंदी आनंद गडे. सांगू मी सांगू कुणाला वगैरे.
Why should pink pasta and pink wine steal all the glam ? मेरे बीटरूट किसी से कम है के ?
@ aashu29
@ aashu29
@ सिमरन
थँक्यू.
… घरचे म्हणाले परत नको करू… 😄
फक्त बिटाची किशिंबिरीचा फोटो
फक्त बिटाची किशिंबिरीचा फोटो काढायचा राहिलाय यात थोडंस गाजर आणि काकडी पण आहे पण मेन हिरो बिटच
ही आलिया फेम कोशिंबीर
ही आलिया फेम कोशिंबीर ट्रेंडिंग आहे सध्या.
अल्पना यांच्या माबो रेसिपीने बीटरूट कांजी करायची होती यंदा होळीला पण नाही जमले.
अनिंद्य
अनिंद्य
मस्त आहेत हार्ट शेप गुलाबो
सिमरन, कोशिंबीर पण मस्त
बीटाचे मोजके पदार्थ छान लागतात....
एकदा एका खिचा पापड वाल्याने वरून गाजर आणि बीट किसून घातले.... खूप वाईट लागली चव.
… पापड वाल्याने वरून गाजर आणि
… पापड वाल्याने वरून गाजर आणि बीट किसून घातले....
अरेरे ! बंगलुरू, हैदराबाद, चैनै पैकी बहुतेक ठिकाणी शेवपुरीवर बीट-गाजर किसून पखरतात
हेट इट.
बिटरुट कच्च किसुन नुसती हिरवी
बिटरुट कच्च किसुन नुसती हिरवी मिरची, जिरं, राई, कडीपत्ता, हिंग याची फोडणी देवुन मीठ घालुन वरून ओलं खोबरं पेरावं अन एक वाफ देवुन भाजी बनवावी..खुप छान लागते.
एक बिटरुट थोडा आकाराने मोठा फक्त एक वाफ देऊन उकडुन घेतलेला.. जेवनात फक्त तिखट डाळीबरोबर.. त्याचे गोल काप करुन थोड मिठ अन वरुन लिंबु पिळून तोंडी लावायल घेतला तर खुप छान जेवन होते.
सुप तर छानच होतं.. कोकम कढीमध्ये पण अगदी थोडासा तुकडा घातला की छान कलर येतो कोकम कढीला.
सामोची रेसिपी...बीट उकडून
सामोची रेसिपी...बीट उकडून किसायचे. त्यात दाण्याचे कूट,साखर, मीठ ,हिरवी मिरची आणि हिंग राईची फोडणी घालते.कधीकधी फोडणीतच हि mi घालते.
भावना, देवकी
भावना, देवकी
बीटरूट रेसेपीज् छान.
बीटरूटचे काहीही नाविन्यपूर्ण केले- चाखले तर या धाग्यावर अवश्य लिहा लोकहो
देवकी थँक्स ग.
देवकी
थँक्स ग.
Pages