काही घरात कुणालाच बीटरूट आवडत नाहीत. मग त्या घरातलेच काही लोक मुद्दाम बीटरूट आणतात बाजारातून. एक दोन न आणता चांगले ४-५ आणतात. तो पदार्थ कुणाच्याही घश्याखाली नाही उतरत ना ? मग असे सर्वच पदार्थ जास्त प्रमाणात आणायचे असतात, तसा नियमच आहे. बीटरूटचा अपवाद करता येत नाही. का करावा ?
पुढचा संपूर्ण दिवस बीटरूट पिशवीतून काढणे, त्यांना दोन तीन पाण्यात न्हाऊनमाखून स्वच्छ करणे, कोरडे करून एका जागी ठेऊन मग काही वेळाने ती जागा बदलणे असे काहीजण करतात. तसे करायलाही पाहिजे. मग तोपर्यंत संध्याकाळ होते. मग आपले जे काही ठरले असेल ते डिनर रांधावे, खावे, झोपी जावे असा परिपाठ आहे.
सकाळी बीटरूट दिसले की “कौन नामुराद ये खाएंगा क्या जाने” असे मोठ्याने म्हणतात, म्हणावे. याऐवजी दुसरे सुयोग्य शब्द योजण्याची मुभा आहे, ती सोय वापरता येते. काहीही म्हटले तरी कुणीच ते ऐकत नाही किंवा ऐकले तरी न ऐकल्या सारखे करतात, त्याकडे दुर्लक्ष करावे लागते.
किचनमधली आपली सर्व कामे उरकून नोकरी-धंदा, wfh, क्लिनिक, ऑफिस, शाळा- कॉलेज जे काही असेल ते करण्यासाठी मेंबरं पांगतात. तत्पूर्वी कुणीतरी सर्व बीटरूटांना आठवणीने फ्रिजमधे ढकलावे लागते कारण बाहेर ठेवले तर ते लवकर पिकतात. या स्टेजला बीटरूट ऑलरेडी लाजू लागलेले असतात. सेम टू सेम टमाट्यांसारखे. Blushing Beetroot Red असे उगाच नाही म्हणत साहेबाच्या भाषेत. त्या भाषेला आपल्याकडे आधी वाघिणीचे दूध असे म्हणत. आता आपण ते दूध नासवून त्याचं पनीर केलयं. पण तो आपला चर्चाविषय नाही. एक मिनिट, That reminds me - फ्रिजमधे फ्रेश दुधाचं केलेलं पाढरं शुभ्र पनीर आहे ठेवलेलं. त्याचं कांपोस्ट ख़त होणार की ते मनुष्यमुखी पडणार हे गुपित ब्रम्हदेवालाच माहिताय. ब्रम्हदेवांना आणि त्यांच्या पिताश्रींना ठाउक असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी हा एका गंभीर चर्चेचा विषय आहे. पण ते आत्ताच नको.
Cut to evening.
आता बहुतेक कामं संपली आहेत. नेहेमीपेक्षा थोडी लवकरच. चहासाठी दूध पाहिजे म्हणून ते शीतकपाट उघडले जातेय. (Refrigerator ला फ्रिज आणि मग शीतकपाट असे चढत्या भाजणीने भारी शब्द लेखक वापरतो आहे, त्याचं लॉजिक समजून घ्या) तर तिथे जुन्या जमान्यातल्या नवीन नवरीसारखे लाजून चूर झालेले बीटरूट सलज्ज मुखाने तुमच्याकडे बघतील, बघतात. “आँखों की गुस्ताखीयाँ माफ हों” असे गाणेही वाजेल, वाजते ब्यागराउंडला. कैसे बचोगे ? सोचो सोचो.
आता चहा तर झाला. भूक लागलीच आहे. ते लाजरे साजरे बीटरूट कधीही मुसमुसून रडायला येतील या स्टेजला आहेत. चढती जवानी मेरी .. तू ने कदर ना जानी रामा असे गाणे ब्यागराउंडला वाजते आहे. उस दर्द को समझो. फ्रिजच्या पडदयाआड असले तरी बीटरूट डोळ्यांसमोरच आहेत. “ये जो चिलमन है दुश्मन है हमारी” गात आहेत.
बहुत हो गया. हीच ती वेळ. फैसले की घडी. आता तो प्रश्न उभा ठाकलाय. यक्ष की गंधर्व प्रश्न म्हणतात तोच. तारुण्याने मुसमुसलेले, मदनभार मज सोसवेना अशी अवस्था असलेले बीटरूट आता आत्महत्या करतील त्याआधी त्यांचा काहीतरी खाणेबल पदार्थ रांधण्याचे काम ज़बरदस्तीने ओढवून घेणारा नरपुंगव कोण ? (नारीपुंगवी असा शब्द आहे का? कुठाय रे तो मराठी बृहद्कोष ? ) कोण हे गांडीव उचलणार ? लाख टके का सवाल. सीता-द्रौपदीच्या स्वयंवरासारखे रामार्जुनाच्या धनुष्याचे रोमांचक टणत्कार ह्या कर्णसंपुटांना कधी चुंबणार ? Time freezes. समय जैसे रुक गया है.
तेव्हढ्यात वीज लकाकते. समस्त सरीसृप जागीच थबकतात. एक पुरंध्री आणि तिचा प्राणसखा दोघे ताडकन उठतात. उतणार नाही मातणार नाही असे मूक आश्वासन एकमेकांना देतात. आँखों आँखों मे.
युद्धाला तोंडच काय हात, पाय, नाक, कान फुटतात. चारदोन बटाटे उकडले जातात.त्यांच्या सोबतीला कॉर्न दाणे उकळत्या पाण्यात सती जातात. हिरव्या मिरच्या, कांदे आणि कोथिंबिराच्या जुडीचे निर्घृण हत्याकांड घडते. काट कर बोटी बोटी ! उडवीन चिंधड्या राई राई एव्हढ्या.
तिकडे बीटरूट हसतात, सवयीने पुन्हा लाजून चूर होतात. पण आता माघार नाही. त्यांना आधी स्टीम बाथ. मग हार्ड स्किन रब. मग किस द किसणीचा खेळ. सगळीकडे रंग गुलाबी ! आता ? अब पिया मिलन को जाना.
तापलेले, खुडलेले, भाजलेले वरचे सर्व कलाकार सब दुख दर्द भूल के एकत्र जमतात. “हम साथ साथ हैं” चे आश्वासक सूर शिंपतात. नेहेमीचे मसाले धावून येतात. हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं म्हणणारा black salt विशेष अतिथी. रायगडाप्रमाणे इथे ब्रह्मदेवाला जाग येते - मोक्षासाठी फ्रिजमधे कठोर तपस्या करित असलेले पनीर धावून येते, स्वत:ला या गर्दीत झोकून द्यायला. भेटी लागे जीवा चे एक आर्त आवर्तन !
इन सब रोमांचकारी घटनाओं का नतीजा : गुलाबो उर्फ़ पिंक टिक्की उर्फ़ blushing cutlets गुल खिले गुलाबी, मौसम हुआ गुलाबी. जोडीला आनंदी आनंद गडे. सांगू मी सांगू कुणाला वगैरे.
Why should pink pasta and pink wine steal all the glam ? मेरे बीटरूट किसी से कम है के ?
जाई
जाई
सुंदर आहे. म्हणजे आलिया सुंदरच आहे आणि तिचे डाएट म्हणजे तुमची, म्हणजे बीटरूटची कोशिंबिर अन् तिचा म्हणजे कोशिंबिरीचा फोटूही सुंदर आहे.
हुश्श. जमले!
… बीट इतके आवडत नाहीत की मी
… बीट इतके आवडत नाहीत की मी विकतच आणत नाही..
तुमच्यासारखे असे समजुतदार लोकं कमी असतात हो.
एका पक्षाचे Right to purchase आणि दुसऱ्या पक्षाचे right to refuse eating हे त्रांगडे कसे सोडवायचे यात अर्धा जन्म खर्ची पडलाय इथे
आपलं मराठीतलं 'वीट आला'
आपलं मराठीतलं 'वीट आला' बंगालीत 'बीट आला' होतं का हो?
…. बंगालीत 'बीट आला' होतं का
…. बंगालीत 'बीट आला' होतं का हो?
This “beets” me
बीट निकालके
बीट निकालके
आलू भी मिला के
हाथोंसे करे मल मल
पनीर मॅश कर के
टीकी बनाके
गॅसपे करे जल जल
गुलाबो जरा कटलेट बना दो...
गुलाबो लेख अगदी!
गुलाबो लेख अगदी!
माबोकर कोणत्याही विषयाचा किस पाडू शकतात
माधव.. मस्त चालीत एकदम!
बिटाची गुलाबी कोशिंबीर फार आवडते. काकडी गाजर पेक्षा. बिटाचा डेन्सपणा आवडतो दह्यासोबत. मस्त पोट भरतं.
दुसरे एफसी रोड वरचे फक्त बिटाचे कटलेट! नुकताच बीटरुट हलवा खाण्यात आला तोही आवडला.
प्रतिसादही लेखासारखे आणि
प्रतिसादही लेखासारखे आणि लेखातल्या रेसिपीसारखे खुसखुशीत येतायत. प्रत्येकजण 'बीट का जवाब पत्थर से' देत आहे.
आज बीट इज बिटिंग एव्ह्रीथिंग.
आज बीट इज बिटिंग एव्ह्रीथिंग.
बीटावरील सगळी चर्चा अगदी
बीटावरील सगळी चर्चा अगदी ऑफबीट आहे!

अफलातून लिहिलं आहे. मजा आ गया
अफलातून लिहिलं आहे. मजा आ गया.
bit by bit प्रतिसाद वाचतो आहे
bit by bit प्रतिसाद वाचतो आहे
कोणत्याही विषयाचा किस पाडू
कोणत्याही विषयाचा किस पाडू शकतात
चर्चा अगदी ऑफबीट
बीट इज बिटिंग एव्ह्रीथिंग
'बीट का जवाब पत्थर से'
bit by bit
गुलाबो जरा कटलेट बना दो
प्रत्येक प्रतिसादासाठी 1 अशी
प्रत्येक प्रतिसादासाठी 1 अशी गोळा केलीत तर खूप बीटकॉईन्स जमा होतील नाही?
This thread is unbeatable!
जाई ] कुमार१ ] मामी ] भरत ]
जाई ] कुमार१ ] मामी ] भरत ] ऋतुराज ] SharmilaR ] Bhakti Salunke ] सायो ] छल्ला ] मनीमोहोर ] दत्तात्रय साळुंके ] अश्विनी११ ] देवकी ] निनाद आचार्य ] ऋन्मेऽऽष ] अदिति ] स्वाती_आंबोळे ] अमितव ] प्रज्ञा९ ] अस्मिता. ] rmd ] माधव] अंजली_१२ ] आर्च ] हरचंद पालव ]
तुमच्या प्रतिसादांनी मजा आणली. शब्दप्रभूंची मांदियाळी जशी
नीट रेसिपी दिलेल्या दोघींचे आभार, इच्छुकांनी त्या करून बघाव्यात. आम्ही अंदाजपंचे प्रमाणम् वाले, त्यामुळे या नीट प्रमाण, स्टेप बाय स्टेप कृती वगैरे आमच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी होत. ते समजून आले असेलच.
@ भरत, ऋतुराज,
@ भरत, ऋतुराज,
… प्लेट आणि तीतले पदार्थ , दोन्ही सुंदर….
पदार्थाबद्दल लिहिलेच आहे. त्या प्लेट्सची वयं झालीत आता. १२ वर्षांपूर्वी एकूण १८ जणी नांदायला आल्या होत्या. पाठराखण म्हणून तितक्याच त्यांच्या मोठ्या बहिणी, छोटे आणि मोठे बोल, सर्विंग पॉट्स असे सर्व. बड़ा परिवार, सुखी परिवार होता.
मग जीवन के आँधी-तूफान सोसून बिछड़े सभी बारी बारी होता होता आता ह्या ५ जणी उरल्या आहेत.
पोक्त असून, इतके टक्केटोणपे खाऊनही रूप मात्र राखून आहेत.
Special Thanks for noticing what’s my favourite.
मजा सुरुय की इथे.:)
मजा सुरुय की इथे.:)
आमच्या शेजारी केरळी होते.
ते करायचे बिट रूट भाजी.
आणि आम्हा लहान मुलांनाही खा हे चांगले असते म्हणून द्यायच्या त्या मामी.
त्यामुळे लहानपणीच सवय लागली.
आई देखील शिकली भाजी करायला.
आता बायको देखील करते.
आवडते ही भाजी.
रंग मनमोहक असतो.
आम्ही भाकरीसोबत आवडीने खातो.
तुम्ही बनवलेली रेसिपी कटलेट च्या एकदम जवळ.
ते ही आवडते.
:पळा:
बिस्कीट शब्दाची व्युत्पत्ती "बीटाचा कीस उलटसुलट हलवून झालेला पदार्थ" अशी असावी!
अनिंद्य... मस्तच लिहिलंय.
अनिंद्य... मस्तच लिहिलंय.
पिंक टिक्की (खरं तर गुलाबो) तर आवडलीच..
पण तिचा गुलाबो होतानाचा शाब्दिक प्रवास खूपच आवडला..
प्रतिसादही रोचक आहेत..
@ झकासराव,
@ झकासराव,
… रेसिपी कटलेट च्या एकदम जवळ….
कटलेट आणि टिक्की जुळ्याच की. काही प्रकारचे कबाब म्हणजे चुलत घराणे.
एकूणच फार व्हर्सटाइल प्रॉडक्ट.
- करायला सोपे.
- काहीही लोटालोटी करता येते
- काही चुकले तर पहिल्या batch नंतर सहज दुरुस्ती करता येते.
मसाल्यांचे गणित पक्के हवे आणि तेलाचा हात जरा सढळ हवा मात्र
सुक्या भाजीसारखाच बीटरूट कर्ड रैस - गुलाबी. मल्लू स्पेशल. तो नाही करायच्या का केरळी मामी ?
@ अ'निरु'द्ध , मजेमजेतच चाललय इथे आमचं. अन’बीटे’बल फन
खुप छान लिहिले आहे.
खुप छान लिहिले आहे.

बीटरुटची भाजी किसुन किवा एकदम छोटे तुकडे करुन फक्त हिरवी मिरची, ओले खोबरे पेरुन खुप छान होते.
अनिंद्य... मस्तच लिहिलंय.
अनिंद्य... मस्तच लिहिलंय.
पिंक टिक्की (खरं तर गुलाबो) तर आवडलीच..
पण तिचा गुलाबो होतानाचा शाब्दिक प्रवास खूपच आवडला..
प्रतिसादही रोचक आहेत>>>>>
मलाही हेच म्हणायचे होते.. ओनिंदोबाबु हे मीही लिहिलेय असे समजुन वाचा.. सगळ्यांची बिटाबिटी मस्त..
थँक्यू @ भावना गोवेकर, साधना
थँक्यू @ भावना गोवेकर, साधना !
ज्यांना बीटरूट आवडते
ज्यांना बीटरूट आवडते त्यांच्यासाठी बीटरूटचे अनेक उपयोग अशी व्हॉट्सपीय पोस्ट लिहिण्याची दाटून आलेली अनिवार उर्मी थोडक्यात भागवतोय. इच्छुकांनी लाभान्वित व्हावे:
१) ज्यूस - मोठ्ठा स्टॉक पटकन संपवायचा असतांना
२) सूप - रंगासाठी
३) पावभाजी - कश्यप गोत्र आहे पावभाजीचे. सर्वांना सामावून घेते. बीटरूट रंगासाठी रंगापुरतेच घालावे, जास्त घातले तर कडसर चव येते.
४) बीटरूट + पनीर पराठा
५) बीटरूट लस्सी - salty as well as sweet. दोन्ही झकास लागतात आणि काचेच्या सुंदर पेल्यांमधे दिले तर दिसायला “वारी जॉंवा” category !
६) बीटरूट चे काप. सेम बटाट्यांच्या कापासारखे. Shallow fry.
सौथी पेशल:
७) बीटरूट कर्ड रैस - मल्लू स्पेशल. गुलाबी दही भात वर कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, उडिद दाण्याची फोडणी.
८) बीटरूट चम्मन्थी विथ राइस/ पेसरट्टू
९) पच्चडी + रैस
१०) रायते
११) लोणचे
१२) चिप्स / पापड
१३) गुलाबी इडली - गाजर किंवा पालक जूस टाकून नै का expert लोकं करतात १५ ऑगस्टच्या पोस्टी पाडण्यासाठी? तेच बीटरूट ज्यूस टाकून करायचे. हवं तर Valentine’s Day ला करा.
International:
१४) Fake meat / smoked beetroot
१५) Beetroot hummus - हे तूफान टेस्टी लागते
१६) Dips / salad / soups in various combinations. इथे तुमच्या कल्पनाशक्तीला प्रचंड वाव आहे.
१७) Beetroot carpaccio - याच्यावर लिंबाच्या साली किसून + रोस्टेड बदाम. रूप हाय हाय. टेस्ट ओके. गुलाबो सारखे हे घरी केले की लेख खरडीन इथे.
जाणकारांनी त्यांच्या बीटच् रेसिपीज्, फोटोज् आणि कहाण्या या धाग्यावर लिहिल्या तर स्वागतच आहे.
काय अफाट लिहीलय अनिंद्य. फारच
काय अफाट लिहीलय अनिंद्य. फारच खुसखुशीत
जाम आवडलं.
माय हार्ट इज 'बिटींग' झालं
माय हार्ट इज 'बिटींग' झालं अगदी ते नव्या नवरीचे लाजणे वाचताना
माय हार्ट इज 'बिटींग'
माय हार्ट इज 'बिटींग'
थँक्यू सामो.
अनिंद्य, प्रसन्न वावर असतो
अनिंद्य, प्रसन्न वावर असतो तुमचा अगदी. माबोवरील असे लोक अनमोल वाटायला लागले आहेत. त्यामुळे मी पुन्हा आले आणि येताना बीटची कोशिंबीर घेऊन आले आहे.
बीट उकडून किसून घेतले. दाण्याचा कूट, किंचित साखर मीठ घालून तूप, जिरे, कढिपत्ता, कोथिंबीर व हिरवी मिरचीची फोडणी घातली. मी सगळे घटक सढळ हाताने घालते.
जाईच्या कोशिंबीरीचा रंग व पोत फार सुरेख दिसतोय.
थँक्यू अस्मिता.
थँक्यू अस्मिता.
धागा “रंग दे गुलाबी” करायला जाईंची आलिया भट फेम पहिली आणि ही तुमची अस्मिता सढळहस्त फेम दुसरी कोशिंबीर !
आता माझ्या वरील लीस्टमधील एक एक बीट पेश्शल करून बघा.
जय हो !
>>>>>बीट उकडून किसून घेतले.
>>>>>बीट उकडून किसून घेतले. दाण्याचा कूट, किंचित साखर मीठ घालून तूप, जिरे, कढिपत्ता, कोथिंबीर व हिरवी मिरचीची फोडणी घातली. मी सगळे घटक सढळ हाताने घालते. Happy
लव्हली!
नवीन Submitted by अनिंद्य on
नवीन Submitted by अनिंद्य on 14 November, 2024 - 22:22. >>> अरारा! बीटींग अराउंड द बीट वरून थेट तुम्ही बीटच्या १०१ पाककृतीवर उतरलात. मला बीटच्या पाकृ काही झेपत नाहीत (अपवाद कटलेट) - म्हणजे तो पदार्थ गोड समजू का तिखट हेच मेंदूला समजत नाही. बहुतेक अन्नयज्ञात 'किंचितम् शर्करा समर्पयामि' हा मंत्र म्हणणार्या पंथातला असलो तरी बीट स्वतःचीच वाटीभर साखर घेउन येते मग प्रकरण झेपेनासे होते.
अनिंद्य, बीटाच्या लोणच्याची नको पण मागे तुम्ही कुठेतरी ताज्या खजुराच्या लोणच्याचा उल्लेख केला होतात - त्याची पाकृ द्या. चांगले रेडीमेड मिळणार्या संकेतस्थळाचा दुवा दिलात तर तुम्हाला जास्तच दुवा मिळेल.
Pages