Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शामीच्या ओवर्स महागात गेल्या,
शामीच्या ओवर्स महागात गेल्या, विराट ची सस्त्यात विकेट गेली, आणि २ आउट झाल्यानंतर पुढे आता रेग्युलर विकेट्स पडत चालल्यात. परिस्थिती त्रासदायक होत आहे. २०-२० मधे २७५ वगैरे अनेकदा खेळलेल्यांना वन डे मधे ५० ओवर्स मधे चा २५० चा स्कोरचा चेस अवघड जातो त्याचे हे क्लासिक उदाहरण आहे.
काय आहे जुन्या जखमांनी पोळलेले मन घाबरून जाते लगेच 
**** ओके वरचे पोस्ट सहर्ष मागे घेते आहे
टीम ने विचलित न होता मॅच अन ट्रॉफी आणली!! धतड ततड!!
हानी होवो किती भयंकर......
हानी होवो किती भयंकर......
..युद्ध आमुचे सुरू !!!
ही विकेट धांवा करायला , विशेषतः स्पिनर्स विरुद्ध, कठीण आहे. सहज जिंकण्याची अपेक्षा नको व विकेट गेल्या म्हणून हरण्याची धास्ती नको !!!
जिंकलो एकदाचे. आता शांत झोप
जिंकलो एकदाचे. आता शांत झोप लागेल.
के एल राहुल ने दोन्ही चेस जे
के एल राहुल ने दोन्ही चेस जे काही कमाल खेळले आहे ना हॅट्स ऑफ
माझे मत बदलले त्याने त्याच्या बद्दलचे.. दोन्ही इनिंग ग्रेट टेम्परमेंट दाखवले अंडर प्रेशर मोठ्या सामन्यात..
हुश्श्य!
हुश्श्य!
सोफ्यावर बसलेल्या छोट्या
सोफ्यावर बसलेल्या छोट्या प्रेक्षकांना तसंच बसवून ठेवणे,
तू स्वयंपाकघरातच असल्यामुळे रन होतायत तर आता बाहेर यायचं नाही म्हणून बाहेर आलेल्या व्यक्तीला परत आत पाठवणे, तू उठलीस तर विकेट गेली आता गप बस इथे म्हणून हात धरून बसवणे अशा सगळ्याच अंधश्रद्धा पुढच्या पिढीपर्यंत पोचवून क्रिकेटच्या बाबतीत आम्ही आमचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं एकदाचं!
वेल प्लेड टीम इंडिया...
वेल प्लेड टीम इंडिया...
*ग्रेट टेम्परमेंट दाखवले अंडर
*ग्रेट टेम्परमेंट दाखवले अंडर प्रेशर मोठ्या सामन्यात." येस, राहुल व श्रेयस अय्यर !!!
भारत अभिनंदन , विजय चॅम्पियन सारखाच मिळवला !!!
न्युझीलंड छान खेळले ! भारताच्या100-0 वरून सामना इतका अटीतटीचा करणं खरंच कौतुकास्पद !!! बॅड लक .
तीन आयसीसी ट्रॉफी एकही सामना
तीन आयसीसी ट्रॉफी एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश
त्यातील दोन विजयी
सलग टॉस हरायचा विक्रम करून देखील हा पराक्रम
निव्वळ अदभुत! निव्वळ अदभुत!!
आणि निव्वळ अदभुत !!!
चॅम्पियन टीम इंडिया
शर्मा कप्तान असेपर्यन्त टॉस
शर्मा कप्तान असेपर्यन्त टॉस करण्यात वेळ घालवू नये. प्रतिस्पर्धी संघाला पहिली फलंदाजी / गोलंदाजी निवड्ण्याची संधी द्यावी.
*१) वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत
*१) वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा मारणारा कर्णधार*
*२) ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा मारणारा कर्णधार*
*३) चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत जिंकलेल्या फायनल मध्ये सामनावीर मिळवणारा कर्णधार*
Hitman रोहीत शर्मा
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तान असतानाही, प्रेझेंटेशन पोडियम वर सगळे देसी (बीसीसीआय किंवा आयसीसी चे)...
पीसीबी चा कुणीच नाही???
हे होस्ट होते की घोस्ट????
भारताचा मालिकावीर श्रेयस
भारताचा मालिकावीर श्रेयस अय्यर आहे.
मिडल ओवर जिथे सामना फसायचा तिथे सातत्याने त्याने स्कोअर टाकला. स्पर्धेत सर्वाधिक धावा भारतातर्फे आणि जगात दुसऱ्या आहेत त्या सुद्धा दुबई पिचवर मिडल ओवर खेळून.
हो ना! आख्ख्या सेरेमनीत एक
हो ना! आख्ख्या सेरेमनीत एक माणूस पण दिसला नही सो कॉल्ड होस्ट्स चा? भारताने दुबईला मॅचेस नेल्या म्हणून त्यांनी बॉयकॉट वगैरे केले होते ( आणि कुणी नोटिस पण केले नाही) असे तर नाही ना
भारताच्या100-0 वरून सामना
भारताच्या100-0 वरून सामना इतका अटीतटीचा करणं खरंच कौतुकास्पद >> +१
पण भारताची डेफ्ट उपयोगात आली आज. राहुल जडेजा पर्यंत लोक आहेत.
या संघाने न्यूझीलंडला आयसीसी
या संघाने न्यूझीलंडला आयसीसी ट्रॉफीमध्ये चारपैकी चारही वेळा हरवले आणि आपला त्यांच्या विरुद्धचा पराभवाचा रेकॉर्ड पुसून टाकला
जबरदस्त विजय!! अभिनंदन टीम
जबरदस्त विजय!! अभिनंदन टीम इंडिया!!
लागोपाठ दोन विकेट्स, मग ४ मेडन ओव्हर्स आणि शर्माची विकेट ह्यामुळे पहिल्या ड्रिंक्स ब्रेक नंतर तोंडचं पाणी पळालं होतं (पन इंटेंडेड), पण अय्यर-पटेलने परत मॅच फिरवली. मग परत ड्रिंक्स ब्रेक, लगेच अय्यरची विकेट अश्या ताना-पलटे घेत भारताने दिमाखात विजय मिळवला.
बक्षिस समारंभाला होस्ट देशाचा प्रतिनिधी नसणं ही आयसीसीची चूक आहे.
आज आनंदाने झोप येणे अवघड आहे.
आज आनंदाने झोप येणे अवघड आहे.
असे वाटतेय घरचे एखादे कार्य संपन्न झाले आहे..
याचसाठी केला होता अट्टाहास..
दादाने कोहली कडून कर्णधारपद घेऊन जे शर्माला दिले तो निर्णय यापेक्षा अधिक सार्थक ठरला नसता.
१. संपूर्ण संघाने मिळून
१. संपूर्ण संघाने मिळून हातभार लावून जिंकलेली स्पर्धा आहे. (अगदीच किल्मिष असेल तर गिल बद्दल म्हणता येईल).
२. भारतीय फॅन्स चे स्टेप चाईल्ड असलेल्या राहुल ने लोअवर मिडल ऑर्डर मधे त्याला कोहलीपासून रोहित पर्यंट दोघांनीही एव्हढे विश्वासार्ह का मानले आहे ते दाखवून दिले.
३. श्रेयसने मागची दोन वर्षांमधली बीसीसीआयने लावलेली सगळी पापे धुवून काढलीत असे म्हणू शकतो.
४. कुलदीप ने बाद फेरींमधे नांग्याटाकण्याची प्रथा मोडली ह्याचा आनंद झाला. नुसतीच मोदाली नाही तर आज च्या दोन्ही मह्त्वाच्या विकेट्स त्याच्या होत्या.
५. चार स्पिनर्स ने जबरदस्त कामगिरी बजावली नि रोहित ने चौघांनाही अतिशय कुशलतेने वापरले. कुठेही कोणी ओव्हर एक्सपोज होऊ दिले नाही. चार स्पिनर्स च्या जीवाव्र जिंकलेला कप विरळा असेल.
६. लाहोरच्या पाटा पिचेसवर काढलेल्या रचिननच्या धावांपेक्षा ह्या टूर्नामेंटचे मॅन ऑफ द सिरीज अवार्ड भारतीत स्पिन क्वार्ट्रेट किंवा मॅट हेन्रीला द्यायला हवे होते असे मला वाटले. हेन्री नव्हता नि चौघाण्ना कसे देणार म्हणून रचिन असा प्रकार वाटला. तेच गेला बाजार द्यायचेच असेल तर श्रेयस ला द्यायला हवे होते . जवळ जवळ प्रत्येक मॅच मधे त्याचे मोलाचे काँट्रीब्युशन आहे.
जाता जाता : सँटनर सारख्या धुरंधर मआणसाने काईल जेमीसनला अंडर युटीलाईज करणे - तेही भारती संघाविरुद्ध तो हमखास खेळ उंचावतो हा इतिहास असताना - हे ऑड वाटले.
काय आहे जुन्या जखमांनी
काय आहे जुन्या जखमांनी पोळलेले मन घाबरून जाते लगेच >>>
आज १५०/३ असताना श्रेयसने एक सिक्स मारली, लगेच पुढच्या बॉलला त्याचा कॅच सुटला, तरीही एक दोन ओव्हर्स नंतर त्याने हवेत शॉट मारून आउट होणे, रन-अ-बॉल अवस्था असताना नंतर अक्षरनेही तेच करणे हे चालू असताना "रोमहर्षक ९०ज" आठवले. तेव्हा आपल्या लोकांना या मधल्या ओव्हर्समधे टेम्परामेण्ट जमायचे नाही. अगदी ५-६ च्या रन रेटने १०० रन्स हवे असताना फेकलेल्या अनेक मॅचेस आठवल्या. सचिन किंवा गांगुलीची दमदार सुरूवात आणि मग पडझड - हे अगदी कॉमन होते.
पण गेल्या अनेक वर्षांत मधल्या फळीत पेशन्सने खेळणारे आले - २००३ च्या कप मधे पाक विरूद्ध सचिन भन्नाट खेळून आउट झाला तेव्हा अजून १०० रन्स बाकी होते पण द्रविड आणि युवराजने अगदी व्यवस्थित काढले. तसेच २०११ च्या फायनलला पहिले तीन आउट झाल्यावर नंतर गंभीर व धोनीने मधल्या ओव्हर्स परफेक्ट खेळल्या होत्या. त्यामुळे आता सहसा असे होत नाही. पण ९०ज चा "ट्रॉमा" अजून मेमरीत आहे
५. चार स्पिनर्स ने जबरदस्त
५. चार स्पिनर्स ने जबरदस्त कामगिरी बजावली नि रोहित ने चौघांनाही अतिशय कुशलतेने वापरले
>>
त्या चौघांसोबत शमी अन् गरजेला हार्दिक पण
2019 वर्ल्डकपच्या सुमारास आपण 5 बॉलर्स 50 ओव्हर्स टाकणार, सहावा ऑपशनच नाही किंवा जाधव असला तरी त्याला बोलिंग नाही टाईप रिजिड अप्रोच नी खेळत होतो.
आता बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आहोत. बॅटिंग लाईनअप पण गरजेनुसार बदलता येईल असा आहे.
अन् हे घडून येण्यासाठी कॅटलिस्ट माझ्यामते लोअर ऑर्डर मधे येणारा अन् कीपिंग करणारा राहुल आहे. प्युअर बॅटर म्हणून ओपन करायचा त्यापेक्षा कैक पटींनी फायद्याचा तो या रोल मधे ठरतोय. त्याच्या बॅटिंग च्या भरोशामुळे आपण अक्षरला वर पाठवायची रिस्क घेऊ शकलो, अन् आता त्याचाही फायदा मिळतो आहे. हार्दिक पण परत बोलिंग करायला लागल्यानी जास्त व्हॅल्यूएबल झालाय.
अशीच समतोल अन् फ्लेक्झिबल टीम पुढे ही राहिली तर आपला डॉमिनंस ओसीज च्या तोडीचा राहू शकेल...
या धाग्यावरच्या अवास्तव
या धाग्यावरच्या अवास्तव कौतुकाच्या पोस्ट्सपेक्षा योग्य आणि समर्पक विश्लेषण करणाऱ्या पोस्ट्स आणि भाऊंची व्यंगचित्रे नेहमीच जास्त आवडतात..
सामना छान झाला! काल का कोण
सामना छान झाला! काल का कोण जाने पण आपण जिंकणार ह्याची खात्री वाटत होती कारण सर्व खेळाडू निश्चयाने ह्या स्पर्धेच्या सुरवाती पासून जाणवत होते. आणि जुन्या चुकांमधून बरेच काही शिकल्यासारखे खेळले.
आपण तब्बल ४ झेल सोडलेले त्याचा तोटा फारसा झाला नाही हे चांगले झाले. थोडीशी परतफेड म्हणून न्युझिलंडनेही २ झेल सोडले.
काल गावस्कर मस्त नाचत होता..
काल गावस्कर मस्त नाचत होता..
आमच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर आणि आमच्या क्रिकेटप्रेमी घरात सुद्धा हेच वातावरण होते..
मुलीचा सुद्धा रोहीत शर्मा आवडीचा प्लेअर आहे. ४५ नंबरच्या दोन जर्सी आहेत तिच्याकडे. काल तिने देखील शर्माची फलंदाजी एन्जॉय केली. तो बाद झाल्यावर ती गेली. त्यानंतर सामना क्लोज झाला तसे पुन्हा बघायला आली. फिनिश होताना आम्ही एकत्र बघितले. तिचे ते रोको आणि एकूणच भारतीय विजयाचे जल्लोषाचे फोटो व्हिडिओ कॅप्चर करणे सुरू झाले. नवीन जनरेशन आहे. त्यांना स्टेटस लावायचे असतात. मी मात्र एकूण एक शब्द दृश्य डोळ्यात मनात साठवून घेत होतो. ट्वेंटी वर्ल्डकप सारखा थरार झाला नसला आणि तेव्हासारखे कैक वर्षांनी मिळालेली आयसीसी ट्रॉफी नसली तरी गेल्या काही मालिकात जे आपला संघ डाऊन झाला होता तिथून तो पुन्हा मोठ्या स्पर्धेत उसळी मारून चॅम्पियन झाला याचा एक वेगळाच आनंद होता.
नाईनटीज किड म्हणून सचिन दादा द्रविड कुंबळे यांच्या संघाबद्दल एक वेगळीच आपुलकी आणि प्रेम आहे पण गेले काही वर्षात रोहीत शर्माच्या या संघाने सुद्धा प्रेमात पाडले आहे
काल का कोण जाने पण आपण
काल का कोण जाने पण आपण जिंकणार ह्याची खात्री वाटत होती कारण सर्व खेळाडू निश्चयाने ह्या स्पर्धेच्या सुरवाती पासून जाणवत होते.
>>>>>
+७८६
औरा तसाच तयार झाला आहे या संघाचा.. आफ्रिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड हे भारता पाठोपाठ तिन्ही सर्वोत्तम संघ बाद फेरीत पोहोचले होते पण यातले कोणीही येवो सेमी आणि फायनल आपण जिंकायला तयार आहोत असेच वाटत होते. नकारात्मक विचार मनात यायलाच तयार नव्हता. म्हणजे मॅच सिच्युएशन नुसार टेन्शन घेणे होतेच.त्याशिवाय मजा कसली. पण ते देखील अरे यार, जिंका सरळ, नका चान्स देऊ प्रतिस्पर्धी संघाला अश्याच स्वरूपाचे होते.
धर्म की हानी क्यू होती है???
धर्म की हानी क्यू होती है???
अशाने तो दिवस दूर नाही जेंव्हा सध्या जे हाताच्या बोटावर मोजता येणारे क्रिकेट खेळणारे देश या खेळात स्वारस्य दाखवत उरले आहेत ते सुद्धा या खेळाला रामराम ठोकतील आणि तरीही या देशातले भणंग फॅनबॉयज आयपीएलचा चाट मसाला मिटक्या मारत चाटत राहतील!!
https://www.business-standard.com/cricket/champions-trophy/wasim-akram-reveals-why-pcb-chief-missed-champions-trophy-final-ceremony-125031000385_1.html
(No subject)
शर्माचे बॉडी शेमिंग गँग ला चोख प्रत्युत्तर.. जियो
दिमाखदार विजयाबद्दल भारतीय
दिमाखदार विजयाबद्दल भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन.
कालच्या सामन्यातील डोळ्याचे
कालच्या सामन्यातील डोळ्याचे पारणे फेडणारे दृष्य : गिलचा ग्लेन फिलिप्सने घेतलेला झेल. स्पायडर मॅन, सुपर मॅन काहिही.
त्याच्या आधिही गेल्या सामन्यातील कोहलीचा झेल आणि पाकिस्तान विरूद्ध रिझवानचा झेल. हा मानवी शक्यतांच्या पलिकडे काहितरी करतो. जबरदस्त.
अशा सगळ्याच अंधश्रद्धा
अशा सगळ्याच अंधश्रद्धा पुढच्या पिढीपर्यंत पोचवून क्रिकेटच्या बाबतीत आम्ही आमचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं एकदाचं! >> अगदी.
या सदराखाली ४-५ वेळा चहा लाटला. (तू आत गेलीस की त्यांची विकेट जाते). तिनेही बिचारीने घेतल्या.
आमच्या मदतनीस ताईंच म्हणणं त्यांच्यामुळे आपण सामना जिंकतो. त्यांना सांगितल होतं , हरलो तर उद्यापासून येउच नका. (अर्थात अस झाल तर मलाच बाहेर जाव लागलं असत हे नक्की).
Pages