Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फाविदडि - मला तेच कळत नाही,
फाविदडि - मला तेच कळत नाही, पाक होस्ट होते ना? त्यांना कोणी बोलवावे का लागावे, त्यांनीच प्रेझेन्टेशन सेरेमनी होस्ट करणे अपेक्षित होते ना?
की त्यांना बाजूला सारले गेले?
जय शहा समजू शकतो , पण बिन्नी कसे काय तिथे हे तेव्हाच आश्चर्य वाटले होते.
की त्यांना बाजूला सारले गेले?
की त्यांना बाजूला सारले गेले?>>>> भारताने त्यांनाच नाही तर इतर सर्व देशांना बाजूला सारुन आयसीसी केव्हाचीच हायजॅक केली आहे. यामुळे सध्यातरी बीसीसीआयच्या प्रचंड आर्थिक ताकदीमुळे ( maximum viewership) भारतासाठी आयसीसीत हम करे सो कायदा अशीच परिस्थिती आहे. आणि अमित शाहच्या वंशजाला ते कसं करतात हे कुणी शिकवायला हवं का??
अग, इतक्या दिवसांचं त्या
*आयसीसी केव्हाचीच हायजॅक केली आहे. * - इतर सर्व खेळांच्या केंद्रीय नियंत्रण संस्था उपखंडाच्या बाहेरील देशात आहेत व त्या खेळांचे नियमन उपखंडातील लोकांची शारीरिक, मानसिक ठेवण, आर्थिक स्थिती इ चा खास विचार न करताच केलं जातं. आपलं हॉकीतील अढळ स्थान आपल्या शारीरिक लावचिकतेचा advantage नियम
बदलून, न परवडणारे कृत्रिम टर्फ आणून आपल्याकडून हिरावून घेण्यात आलं . जर क्रिकेटमध्ये आपण एक ताकद बनून दाखवलं , तर इतरांच्या खोडसाळपणाला आळाच बसेल ह्या दृष्टिकोनातून हे पाहिलं जावं.
अग, इतक्या दिवसांचं त्या स्टेडियमचं भाडं द्यावं लागलं असतं ना त्या दुबईवाल्यांना, यजमान म्हणून मिरवायला आले असते तिथे तर!!
अन् हे घडून येण्यासाठी
अन् हे घडून येण्यासाठी कॅटलिस्ट माझ्यामते लोअर ऑर्डर मधे येणारा अन् कीपिंग करणारा राहुल आहे. > तो, पांड्या नि अक्षर हे त्याचे कॅटॅलिस्ट आहेत. तीनपैकी कोणीही दोघे असले तरी फ्लेक्षिबिलिटी वाढते. त्यातही पांड्ञा नि अक्षर जास्त मौल्यवान ठरतात कारण ते बॉलिंग करू शकतात. राहुल ला पर्याय शोधणे थोडे अधिक सोपे आहे. पांड्या नि अक्षर ला (पांड्या फॉर ऑब्व्हियस रीझन न्नि अक्षर त्याच्या स्ट्रीट स्मार्टनेस मूळे) पर्याय शोधणे अशक्यच आहे.
पांड्या आणि अक्षर २०२३
पांड्या आणि अक्षर २०२३ वर्ल्डकपला नव्हते तरी आपण सर्व सामने जिंकलो. किंबहुना पांड्या जाण्याने शमी आला आणि त्याने धुमाकूळ घातला.
राहुल ट्वेंटी वर्ल्डकप नव्हता ज्याने काही अडले नाही, तर या वर्ल्डकपला चक्क जगातला सर्वश्रेष्ठ गोलंदाज बुमराह नव्हता. शमी ऐवजी तो असता तर केवळ विचार करून बघा. त्याची जागा घेणारे वरुण चक्रवर्ती नावाचे ट्रम्प कार्ड आधीच्या दोन्ही वर्ल्डकप मध्ये नव्हते.
प्लेअर इथे तिथे बदलले गेले. पण तितका मोठा इम्पॅक्ट पडला नाही.
कारण मला वाटते हा संघ प्रामुख्याने दोन खेळाडूंच्या भोवती बांधला गेला आहे.
फ्लॅश बँक मध्ये गेल्यास आठवेल,
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा आपण ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सेमीला हरून बाहेर पडलो तेव्हा शर्मा म्हणाला होता की भारताने आता आपला पारंपारीक ॲप्रोच बदलायला हवा. म्हणजे टॉप तीन खेळाडू इनिंग बिल्ड करत शतक मारणार, आणि विकेट गेल्या की जपून खेळायला बघणार यातून आपण बाहेर यायला हवे आणि याची सुरुवात त्याने स्वतः केली.
अँकर रोल म्हणून कोहली नावाचा एकच खांब पुरे म्हटले कारण त्याच्यासारखा गेम कंट्रोल करू शकणारा फलंदाज या फॉरमॅट मध्ये जगात दुसरा नसावा...
त्याचप्रमाणे सुरुवातीच्या ओवरमध्ये नवीन बॉलवर वर्ल्डक्लास गोलंदाज सुद्धा सामान्य भासावेत असे फटके मारायची क्षमता रोहित शर्मापेक्षा भारी जगात आणखी कोणात नसावी.
त्यामुळे रोहीत कोहलीच्या भोवती टीम बिल्ड होऊ लागली. याच गेम प्लान नुसार प्रत्येकाला त्याचा रोल असाईन झाला. उदाहरणार्थ शर्मा मारतोय तर गिल तू शांत खेळ, कोहली तू सेट व्हायला वेळ घे, नंतर कोहलीने बाजू लावून धरली आहे तर अय्यर तू येऊन नॅचरल खेळ खेळून मार, अक्षर तू सुद्धा येऊन मार... आता मागे वळून पाहताना हे ट्रान्सफॉर्मशन जाणवते आणि त्याचे रिझल्ट सुद्धा आले.
२०२३ वर्ल्ड कपला काही चुकले तर ती सूर्याची निवड. म्हणजे गेम प्लाननुसार ती जागा आक्रमक खेळणाऱ्या प्लेअरचीच होती. पण पंत पांड्या यांच्या अनुपस्थितीत तिथे सूर्याची वर्णी लागली आणि त्याने निराश केले.
आपण सर्व सामने जिंकलो >> मला
आपण सर्व सामने जिंकलो >> पण मला वर्ल्ड कप जिंकल्याच मात्र का कोण जाणे आठवत नाहिये.
खुद्द रोहित ने ( आधीद्रविड नि गंभीर ने ही) ऑल राउंडर खेळाडूंची डेप्थ का जरुरी आहे नि ती असल्याने तो स्वतः त्याचा नॅचरल गेम खेळायला का मोकळा होतोय ह्यावर कालच सविस्तर भाष्य केलेले आहे आहे. ऑल राउंडर खेळाडू हे कॅटॅलिस्ट आहेत. त्यांच्या भोवती संघ बांधला गेला आहे हा दावा नसून फ्लेक्सिबल फॉल्ट टोलरंट संघ बांधणीबद्दल आहे.
पण मला वर्ल्ड कप जिंकल्याच
पण मला वर्ल्ड कप जिंकल्याच मात्र का कोण जाणे आठवत नाहिये. Happy
>>>>>
कालपासून मी अश्या बरेच पोस्ट बघत आहे. मुद्दाम तो एक पराभव आठवणाऱ्या
असो,
अष्टपैलू खेळाडूंचे महत्व कोणी अमान्य करत नाहीये. त्यासाठी कोणी एक्सपर्टने काय म्हटले याचीही गरज नाहीये. पण जिथून या विजयरथाची सुरुवात झाली, तेव्हा जो फलंदाजी मधील एप्रॉच बदल हा जो ठळक आणि चर्चेचा मुद्दा होता त्याची आठवण करून दिली इतकेच. कारण त्या बदललेल्या एप्रॉच मधील सातत्य आपण या काळात कायम राखले आहे. आणि अगदी काल सुद्धा दोन्ही संघातील तो फरक ठरला आहे. थोडी सावध सुरुवात झाली असती तर नंतर हातात राखलेल्या विकेटही कामात आल्या नसत्या..
अष्टपैलू खेळाडूंचे महत्व कोणी
अष्टपैलू खेळाडूंचे महत्व कोणी अमान्य करत नाहीये. त्यासाठी कोणी एक्सपर्टने काय म्हटले याचीही गरज नाहीये. पण जिथून या विजयरथाची सुरुवात झाली, तेव्हा जो फलंदाजी मधील एप्रॉच बदल हा जो ठळक आणि चर्चेचा मुद्दा होता त्याची आठवण करून दिली इतकेच.
>>
मधल्या फळीत अष्टपैलू नसेल तर नुसता ओपनिंग अप्रोच मधला बदल पुरेसा ठरेलच असं नाही ना...
२३ मधे ओपनिंग अप्रोच होता, पण अष्टपैलू नव्हते, ट्रॉफी नाही मिळाली
२५ मधे दोन्ही आहेत, ट्रॉफी मिळाली
Trophy मिळाली नाही. पण
Trophy मिळाली नाही. पण वर्ल्डकप मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्वच देशांशी सर्वच्या सर्व सामने जिंकणे ही मोठी कामगिरी नाही का? एका सामन्यावरून परफॉर्मन्स जोखणार का, आधीचे काही किंमत राखत नाही का? त्या सामन्यात अष्टपैलू पांड्या ऐवजी केवळ फलंदाज पांड्या असता सूर्याजागी तरी ते पुरेसे होते.
असो, मी अष्टपैलू खेळाडू महत्व अमान्य करत नाहीये असे आधी म्हटले आहेच
पण माझा मुद्दा मान्य करतानाच त्यासोबत रोहीत शर्मा कौतुक करावे लागेल याची कल्पना आहे म्हणून जास्त ताणत नाही
आपण ट्रॉफी जिंकली तेंव्हा जे
आपणजेंव्हा ट्रॉफी जिंकली तेंव्हा जे कॉम्बिनेशन होतं तेंच आदर्श कॉम्बिनेशन, हे अजिबात पटत नाही. त्या त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या प्रतिभावान खेळाडू मधून एक समतोल संघ निवडला जातो. तो संघ विजयी होणं हे त्यातला प्रत्येक खेळाडू समयोचित व सर्वस्व पणाला लावून खेळतो का यावरच अवलंबून असतं. उदा., मी माझं काम केलं म्हणून गोलंदाज आपली जबाबदारी संपली असं समजू लागले की आपला हरण्याच्या वाटेवरचा प्रवास सुरू होतो. ऑल राऊंडर ही देखील खूप फसवी संकल्पना आहे. फार थोडे खेळाडू खऱ्या अर्थाने ऑल राऊंडर असतात. त्याउलट, प्रत्येक खेळाडू जेंव्हा आपण ऑल राऊंड कामगिरी करू, या जिद्दीने खेळतो, तेंव्हा तो संघ सतत अजिंक्य वाटतं राहतो ( उदा. ऑस्ट्रेलिया ). पंड्या दोन सिक्सर मारून विजय जवळ आला की जर पुन्हा सिक्सर मारण्याचा आततायीपणा करत असेल, तर त्याला आक्रमक ऑल राऊंडर म्हणून कौतुक न करतां सक्त ताकीद मिळाली पाहिजे.
ऑस्ट्रेलियाचा जो चॅम्पियन संघ
ऑस्ट्रेलियाचा जो चॅम्पियन संघ होता वॉर्न मॅकग्राथ गिलेस्पी ब्रेट ली वगैरे गोलंदाजी युनिट असलेला त्याची ताकद देखील अष्टपैलू खेळाडू नसून, सारेच प्रॉपर मॅचविनर फलंदाज आणि गोलंदाज यात होती.
तेच आफ्रिकेबाबत मात्र अष्टपैलू खेळाडूंचा भरणा होता. कलिस, हॅन्सी क्रोनिये, पोलॉक, क्लूजनर, मॅकमिलन.. स्पिनर सुद्धा ते पॅट सिमकॉक्स किंवा निकी बोये असा फलंदाजी बघूनच घ्यायचे. (किंवा एखादा पॉल अॅडम्स वगैरे अपवाद वगळता प्रॉपर स्पिनर त्यांच्याकडे नव्हताच म्हणा) पण एखादा डोनाल्ड किंवा फॅनी डीविलिअर्स फलंदाजी न जमणारे होते अन्यथा ऑलराऊंडरचा भरणा असलेली टीम होती.
आता या दोन्ही टीम स्ट्राँग असल्या तरी ऑस्ट्रेलियाच सरस होती. टीम कॉम्बिनेशन आणि अॅप्रोच किंवा डावपेच हे परस्पर पूरक असतात, ते जमवता यायला हवे. आणि हेच कप्तान आणि कोचचे कौशल्य.
Trophy मिळाली नाही. पण
Trophy मिळाली नाही. पण वर्ल्डकप मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्वच देशांशी सर्वच्या सर्व सामने जिंकणे ही मोठी कामगिरी नाही का?... असेल नाही आहेच पण ट्रॉफी जिंकण महत्वाचं आहेच. कारण तुम्ही काय केलं याला महत्व नाही काय मिळवंल याला आहे...
त्या त्या वेळी उपलब्ध
त्या त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या प्रतिभावान खेळाडू मधून एक समतोल संघ निवडला जातो
>>
आधीचे संघ फ्लेक्झिबल नव्हते त्यामुळे समतोल साधला जात नव्हता.
ऐन वेळी 5 बॉलर्स मार खात असतानाही सहाव्या बॉलरचा (संघात असूनही) उपयोग न करणं हा अप्रोच चुकीचा होता, जो आता बदलला आहे. ही फ्लेक्झीबिलिटी अष्टपैलू खेळाडूंमुळे आली आहे.
हॉर्सेस फॉर कोर्सेस हा अप्रोच आपल्याला ट्रॉफीज जिंकून देत नव्हता. बदललेल्या अप्रोच मधे आपण दोन ट्रॉफीज उचलल्या आहेत.
आत्ताचा संघ हा समतोल आहे त्यामुळेच आपण चांगलं परफॉर्म करतो आहोत.
Trophy मिळाली नाही. पण
Trophy मिळाली नाही. पण वर्ल्डकप मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्वच देशांशी सर्वच्या सर्व सामने जिंकणे ही मोठी कामगिरी नाही का?
>>
आपण कोहलीच्या कप्तानीत सेमी फायनल हरत होतो तेव्हा ही आपण वेगवेगळ्या देशांसोबत जिंकूनच तिथे पोचत होतो. पण त्याला तू ही मोठी कामगिरी म्हणत नव्हतासच, कारण कुठेतरी समतोल ढळल्यामुळे (टॉप ऑर्डर च्या कोलॅप्स मुळे / मुख्य गोलंदाजांना मार पडल्यामुळे) आपण ऐन वेळी कच खात होतो.
आताच्या समतोल संघात ऑप्शन्स असल्याने कच खाऊन हाराकिरी होण्याची शक्यता कमी झाली आहे अन् हेच या संघाच्या यशाचं कारण आहे. कुणा एक दोन बॅटर अन् एक दोन बॉलर च्या जीवावर विजय न येता टीम एफर्ट मुळे येतोय, ज्यानी खेळाडूंवर पण दडपण न येता नैसर्गिक खेळ होतोय.
हा अप्रोच मधला बदल रोहित नी आणला असेल, द्रविड नी आणला असेल, गंभीर नी आणला असेल किंवा इतर कुणाचं ही ब्रेन चाइल्ड असेल... त्यामुळे रिझल्ट्स येताहेत हे महत्वाचं. अन् त्याचंच कौतुक आहे...
आपण कोहलीच्या कप्तानीत सेमी
आपण कोहलीच्या कप्तानीत सेमी फायनल हरत होतो तेव्हा ही आपण वेगवेगळ्या देशांसोबत जिंकूनच तिथे पोचत होतो.
>>>>
दुबई मधील ट्वेंटी वर्ल्डकप नव्हतो पोहोचलो सेमीमध्ये.
२०१९ वर्ल्डकप सेमी पोहोचलो तरी सर्व जिंकून नव्हतो पोहोचलो.
सेमी मध्ये पोहोचणे याचा अर्थ स्पर्धा डॉमिनेट करणे असा होत नाही. जे २०२३ वर्ल्डकप मध्ये दिसून आले. आपण सर्वांनी तो वर्ल्डकप आणि आपले तेव्हाचे डॉमिनेशन पाहिले आहे. आधी नव्हते दिसले हे कधी.
शर्माच्या कप्तानीत ऑस्ट्रेलिया मधील ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये देखील आपण सेमीला पोहोचलो होतो पण ती वर्ल्डकप जिंकणारी टीम जराही वाटत नव्हती. प्लेअर साधारण तेच पण जसे २०२३ पासून वाटू लागले ते मिसिंग होते..
आणि ते काय होते तर चॅम्पियन एटीट्यूड, killer instinct .. नुसता फलंदाजी मधील एप्रॉच नाही बदलला तर बॉडी लँग्वेज सुद्धा बदलली.
यात राहुल नेहमी कच्चा दुवा वाटत होता. मी त्याचा फलंदाजीतील टॅलेंट चे नेहमी कौतुक करायचो आणि या गोष्टीसाठी त्याचे मार्क्स कापायचो.. 2023 ला आपल्या पराभवात याचा देखील फटका बसला होता. पण तेच यावेळी बघा, बांगलादेश सामन्यापासून त्याची जी कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज दिसली ती शेवटपर्यंत कायम राहिली. अगदी फायनलला राहुल आहे तोपर्यंत आपल्याला टेन्शन नाही इतका माझा त्याच्याबद्दलचा विचार बदलला. ग्रेट लीडर नुसते चांगले लीड करत नाही तर लीडर घडवतात सुद्धा.. यावेळी तो राहुलमध्ये तो बदल घडताना दिसला.
क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये तंत्रापेक्षा टेंपरामेंट आणि अटीट्युड जास्त मॅटर करतात असे म्हणतात ते याचसाठी..
ज्या ऑस्ट्रेलियन अटीट्यूडचे आपण कौतुक करतो तो यावेळी आपल्या संपूर्ण संघात दिसत होता. सेमी फायनल किंवा फायनल मध्ये टॉस हरल्यानंतर शर्माची रिएक्शन बघा ती सुद्धा किती कॉन्फिडंट वाटत होती. टॉस हरतो याचे एक्सक्युज पिक्चरमध्येच नव्हते.
कालपासून मी अश्या बरेच पोस्ट
कालपासून मी अश्या बरेच पोस्ट बघत आहे. मुद्दाम तो एक पराभव आठवणाऱ्या >> जिथे तिथे असंबद्ध पोस्ट केल्या कि लोक दाखवत असतील . मला आश्चर्य वाटत नाही.
पण माझा मुद्दा मान्य करतानाच त्यासोबत रोहीत शर्मा कौतुक करावे लागेल याची कल्पना आहे म्हणून जास्त ताणत ना >> तुझा मुद्दा मान्य अमान्य करणे बाजूला ठेव. पहिली गोष्ट तुला हि 'तू रोहित ला फॅन म्हणून ओन करतो नि इतर फक्त त्याचा द्वेषच करतात' ह्या दृष्टीकोनाच्या काविळीतून बरा होशील अशी प्रार्थना करतो. ह्यावरही नेहमीप्रमाणे तुखी व्हॉट्स अबाऊट गिरी येईल ह्याची ७८६% खात्री आहेच. मूळ मुद्द्याबद्दल आम्हि कॅटॅलिस्ट बद्दल बोलत होतो नि इंजिनाबद्दल नाही हे साधे तुला कळणार नाही ह्याची अपेक्षा होतीच ती फारशी चुकीची न ठरवल्याबद्दल तू जसे रोहित ने काहीही केले तरी स्वतःचेच कौतुक करून घेतो त्याप्रमाणे स्वतःचीच पाठ थोपटून घेतो म्हणावे.
त्या त्या वेळी उपलब्ध
त्या त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या प्रतिभावान खेळाडू मधून एक समतोल संघ निवडला जातो
>>
आधीचे संघ फ्लेक्झिबल नव्हते त्यामुळे समतोल साधला जात नव्हता. >> भाऊ तुमचे विधान मान्य आहे नि अँकिने लिहिलेला मुद्दाही मला मह्त्वाचा वाटला. सचिन, सेहवाग ,दादा असतानाही पार्ट टाईम बॉलिंङ चे पर्याय असल्यामूळे फ्लेक्षिबिलिटी होती. ती पुढे रैना, युवी असतानाही मिळत असे. कोहलीच्या काळत ती जवळजवळ गायब झालेली होती. मलाआठवतेय त्याप्रमाणे आपण त्याबद्दल इथे बोललोहि होतो. त्यामुळे अक्षर, पांअक्षर्,नि राहुल ह्यांच्या रोल ने फरक पडतोय असे वाटते.
यात राहुल नेहमी कच्चा दुवा
यात राहुल नेहमी कच्चा दुवा वाटत होता. मी त्याचा फलंदाजीतील टॅलेंट चे नेहमी कौतुक करायचो आणि या गोष्टीसाठी त्याचे मार्क्स कापायचो.. 2023 ला आपल्या पराभवात याचा देखील फटका बसला होता. >> मी हे तुझ्याकडून मागेही ऐकले होते. त्या मॅचचे कार्ड इथे आहे. त्याचा कार्ड मधे विकेट कधी नि कशा गेल्या हे नमूद केलेले आहे. २५% धावा काढलेल्या खेळाडू मूळे सामना हरल्याची लक्षणे विरळाच असावी.
https://www.espncricinfo.com/series/icc-cricket-world-cup-2023-24-136785...
२५% धावा काढलेल्या खेळाडू
२५% धावा काढलेल्या खेळाडू मूळे सामना हरल्याची लक्षणे विरळाच असावी. Wink
>>>>
हो ३६ % चेंडू वापरून..
मुळात हे आकडे बघायची गरज नाही. राहुलची ती इनिंग आणि त्याहीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या सध्याच्या इनिंगमधील फरक बोलका आहे.
असो. चालू द्या.. मुळात मी इथे कोणाची मते खोडत नाहीये. तर माझी मांडत आहे. पटत नसतील तर ओके.
आणि रोहीत शर्माचा मी फॅन आहे ते काही तो माझा गाववाला आहे म्हणून नाही तर तो त्या ताकदीचा खेळाडू आहे आणि त्याने गेले काही वर्षात कामगिरीच तशी केली आहे
आणि हो,
रोहीत शर्माची बॉडी शेमिंग जे करतात त्यांना मी रोहीत द्वेष्टे समजत असेल तर त्यात मी काही चुकतोय असे वाटत नाही
असामी, फेफ, भाऊ, अँकी, फा
असामी, फेफ, भाऊ, अँकी, फा तुम्ही सगळे जण एकदा "रोहीत हा आणि फक्त हाच जगातला ग्रेटेस्ट खेळाडू, बॅट्समन, बॉलर, फील्डर, कॅप्टन आहे!" असं का लिहून नाही टाकत? त्यामुळे तरी ह्या रोजच्या आरत्या आणि तेच ते दळण बंद होईल का पाहूया.
तुमची चांगली विश्लेषणं, भाऊंची व्यंगचित्र बघायच्या अपेक्षेने इथे यावं आणि इथे हे दळण! कंटाळा येतो खरच.
असामी, फेफ, भाऊ, अँकी, फा
असामी, फेफ, भाऊ, अँकी, फा तुम्ही सगळे जण एकदा "रोहीत हा आणि फक्त हाच जगातला ग्रेटेस्ट खेळाडू, बॅट्समन, बॉलर, फील्डर, कॅप्टन आहे!" असं का लिहून नाही टाकत? >> तुला वाटते अस खरच होईल ? मागे एकदा असेच यंव केले तर सोडून जाईन असे गाजर दाखवून माझा नि फेफचा पोपट केला होता. पण तरीही हे घे मी लिहितो
"रोहीत हाच आणि फक्त हाच जगातला ग्रेटेस्ट खेळाडू, बॅट्समन, बॉलर, फील्डर, कॅप्टन ,कॉमेंट्रेटर, कोच, अॅनालिस्ट आहे. निव्वळ तेच नाही तर ह्या प्रत्येक कॅटेगरीमधे त्याच्या खाली येणार्या सगळ्यांच्या रिस्पेक्टीव्ह आकड्यांची बेरीज त्याच्या आकड्यांच्या आसपासही येणार नाही. त्याच्या सोडा, त्याच्या घरी काम करणार्या लोकांच्या मुलांच्या साऊथ बॉम्बे मधल्या (खास एरिया घेतलाय सरांना आवडावा म्हणून) गल्लीक्रिकेट मधल्या आकड्यांच्याही आसपास येणार नाही. क्रिकेटमधला प्रत्येक विक्रम फक्त रोहितच्याच नावावर आहे , असेल किंवा होईल. भारताचे सोडाच ऑस्ट्रेलिया ने जिंकलेले सलग तीन वर्ल्ड कप, पाकिस्तानचा ९१ मधला रोमहर्षक विजय, विंडीज सत्तर, ऐंशी चे डॉमिनेशन, लंकेचा ९५ मधला लाजवाब चॅप्टर हेच काय गेला बाजार, बॉस्टन रेड सॉक्स चे गेल्या शतकामधले बेसबॉल चे विजय, सेल्टिक्स्ची अशक्यप्राय मालिका, पॅट्रियट्स- स्टीलर्स ची डायनेस्टी , अमेरिकेची चंद्रावर स्वारी इत्यादी सुद्धा रोहोतमूळेच झालेले होते. रोहितचा फिटनेस नि बॉडी टायगर श्रॉफ, पन्नाशीपुढचा शाहरुख खान, ह्रितिक रोशन, विद्युत जामवाल इत्यादी ७८६ जणांच्या पेक्षाही उत्तम असून अॅब्स तर दिशा पटानीलाहि लाजवतील असे आहेत. " माझी संकुचित प्रतिभा इथे नारायणाचा अवतार असलेल्या रोहितचे गुणगान गाण्यास अपुरी पडत आहे रे
हे प्रत्येक पोस्ट च्या वर नि खाली लिहून मग मधे बाकीचे पोस्ट करावी का ह्या विचारांमधे गंडलेला मी ................
उद्या रोहित रिटायर झाल्यावर चुम्मा च्या नावाने हे रामायण ;इहावे लागेल का ह्या विचारांनी हताश झालेला मी .....
चुम्मा रिटायर झाल्यावर कोणाचा बळी चढणार आहे देव जाणे ........
कौतुक खुपते
कौतुक खुपते
बॉडी शेमिंग नाही
असो,
मुळात रोहितचे असे खास कौतुक नव्हतेच माझ्या वरच्या कुठल्या पोस्टमध्ये. फक्त मी जो भारतीय संघातील बदल नमूद केला त्याचे श्रेय कोच कप्तान म्हणजेच पर्यायाने (द्रविड, गंभीरसह) रोहितला जाते. ते जर कोणाला खटकले असेल तर आई कान्ट हेल्प.
टीम कॉम्बिनेशन, अष्टपैलू, संघनिवड, खेळपट्टी वगैरे सगळे मुद्दे आपल्या जागी ठेवून आणि मान्य करून भारतीय संघाचा बदललेला अटीट्युड, एप्रॉच, बॉडी लँग्वेज आणि किलर इन्स्टिंक्ट हे ( प्लीज noted - "हेच" नाही) या यशामागचे सर्वात मोठे कारण आहे या मतावर मी ठाम आहे.
शुभरात्री
रोहीत हा आणि फक्त हाच जगातला
रोहीत हा आणि फक्त हाच जगातला ग्रेटेस्ट खेळाडू, बॅट्समन, बॉलर, फील्डर, कॅप्टन आहे!" असं का लिहून नाही टाकत?
>>
यारोंका यार राहिलं...
म्हटलं असतं रे
पण मग धोनी चं काय हा प्रश्न पडला...
असामीच्या रेवाखंडे,
असामीच्या रेवाखंडे, शर्मापुराणे, रोहित-स्तुतीला ‘मम’ म्हणून पुढची पोस्ट लिहितो.
लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे ऑलराऊंडर्सच्या कामगिरीमुळे एखाद्या टूर्नामेंटमधे एखाद्या टीमला विजयी कलाटणी मिळणे हे पहिल्यापासून चालत आलंय. त्यात नाकारण्यासारखं काही नाहीये. सुरूवातीच्या काळात व्हिव्ह रिचर्ड्स, ८३ - कपिल चे १७५, ८७ मधे स्टीव्ह वॉने मोक्याच्या वेळी काढलेल्या विकेट्स (गॅटिंग), ९२ - इम्रान, ९६- जयसुर्या, १९९९-२००३ - वॉ, बिकेल, २००७-२०११ - युवराज, २०१९ - स्टोक्स, २०२३- मॅक्सवेल ही गूगल न करता आठवलेली उदाहरणं.
https://www.prabhatkhabar.com
https://www.prabhatkhabar.com/education/success-story-of-star-indian-cri...
वरून चक्रवर्तीची स्टोरी वायरल होत आहे
भारी आहे. कुठे कुठे फिरून आणि काय काय करून आलाय.. एकप्रकारे प्रेरणादायी आहे याची स्टोरी.. नक्की वाचा आणि मुलाखत शोधून ऐका..
पहिल्या सामान्यापासून खेळला असता तर कदाचित हा मालिकावीर असता. पण प्लान हाच होता की याला राखून ठेवायचे.
तरी जे सामने खेळला त्यात कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आपला ट्रम्प कार्ड ठरला. महत्वाच्या विकेट मोक्याच्या क्षणी काढल्या.
वरुण चक्रवर्तीबद्दल आधी वाचले
वरुण चक्रवर्तीबद्दल आधी वाचले होते. मला सुंदर, अॅशची आठवण झाली होती. माझ्या मते बॉलर्स मॅन ऑफ द टूर्नामेंट हवे होते. वरुण चे नाव फक्त ह्यासाठी नव्हते घेतले कारण तो स्लो पिचेस वर नि कमी सामने खेळला होता. हेन्री ने पाटा विकेट्स वर धुमाकूळ घातला होता. वरुण ची बॉलिंग जबरदस्त झाली होती ह्यात शंकाच नाही.
वरूण आणि बुमराह एकत्र खेळताना
वरूण आणि बुमराह एकत्र खेळताना बघायला मजा येईल.
मी साफ चुकत असेन पण मला असं
मी साफ चुकत असेन, पण मला असं जाणवतं की वरूण प्रथम जितका फसवा व घातक वाटतो, तेवढा तो नंतरच्या डावांत वाटत नसावा (batsmen can read him fairly well after first exposure ); कदाचित, फ्लाईट न देण्यामुळे असं होत असावं. अर्थात, मी चुकीचा ठरलो तर मला आनंदच वाटेल !!
काय हो, पुढच्या विश्वचषकासाठी तुमची तीन कॅप्टन असलेली ही 36 जणांची टीम !! नका हो तिथल्या सगळ्या एक्सपर्ट सूचना इतक्या गंभीरपणे घेवू !!
वर्ल्डकप विजयी संघाचा कप्तान
वर्ल्डकप विजयी संघाचा कप्तान नेहमीच ग्रेट लीडर राहिला आहे.
कपिलदेवची लीडरशिप पाहिली नसली तरी त्या संघातील खेळाडूंच्या मुलाखतीतून जाणवली आहे.
जेव्हा पासून क्रिकेट बघत आलोय तिथपासून कर्णधार घ्यायचे झाल्यास,
अझहर कधीच मला लीडर कॅटेगरी वाटला नाही.
सचिन तेंडुलकर कधी कप्तान वाटला नाही.
दादा येस, माझ्यासाठी भारतीय संघाचा पहिला लीडर तो होता ज्याने आपल्या संघाचा attitude बदलला.
द्रविड कुंबळे हे डावपेचातले वाईट कर्णधार नव्हते पण कधी त्या लेव्हलचे लीडर वाटले नाही जो बेंचमार्क दादाने प्रस्थापित केला होता.
मग धोनी आला आणि त्याने आपला एक वेगळा बेंचमार्क प्रस्थापित केला. जो परवापर्यंत निर्विवादपणे भारताचा आजवरचा सर्वोत्तम लीडर होता.
पुढे कोहली आला जो मला कर्णधार व्हायच्या आधी कधी डावपेचात मातब्बर आहे असे वाटले नव्हते. पण त्याचा अटीट्युड जबरदस्त होता. खेळाडू म्हणून सर्वोत्तम होता. तोच त्याने कप्तानीत दाखवला. वेगवान गोलंदाजी त्याच्या कारकिर्दीत बहरली आणि त्या जीवावर त्याने परदेशात जिंकायला सुरुवात केली. कसोटीत तळाला सातव्या क्रमांकावर गेलेला संघ बघता बघता पहिल्या क्रमांकावर आणला. भले आयसीसी ट्रॉफीत अपयश का आले असेना मी त्याला लीडर मानतो. किंबहुना कसोटी कर्णधार आजही तोच हवा होता असे मला वाटते.
याव्यतिरिक्त रहाणे हा द्रविड स्कूल ऑफ क्रिकेटचा विद्यार्थी वाटत असला तरी लीडर म्हणून तो मला त्यापेक्षाही किंचित सरस वाटला. त्याचा फॉर्म गेला आणि आपण एक चांगला कसोटी कर्णधार गमावला.
असो,
पुढे मग आपला शर्मा आला..
त्याबद्दल नो कॉमेंट्स!
पण मी पाहिलेल्या क्रिकेटमध्ये
दादा, धोनी, विराट, रोहीत हे चार कर्णधार मी असे पाहिले ज्यांना मी लीडर मानतो.
दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर डॅरल
दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर डॅरल कलीनन याने शर्माजींचं भरपूर कौतुक केलं आहे.
शर्माजी माझ्या गावचे आहेत. म्हणजे क्रिकेट खेळायचं म्हणून ते मुद्दाम माझ्या गावात राहाय ला आले. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल विशेष जिव्हाळा आहे. आता ते माझं गाव सोडून गेले असले, तरी तो कायम आहे.
Pages