Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज आफ्रिका न्यूझीलंड
आज आफ्रिका न्यूझीलंड
दोन्ही देशांचा मूड आजची मॅच खेळायच्या आधीच खराब झाला असेल.. काल इंडिया जशी जिंकली हे बघून.
आज जे हरतील ते लवकर घरी जातील.
जे जिंकतील त्यांना उगाच रविवारपर्यंत थांबावे लागेल.
सर, तुमची बॉडी शेमिंगची टेप
सर, तुमची बॉडी शेमिंगची टेप बरेच दिवस पाहतो आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या उपक्रमात आणि त्यासाठी लेख लिहिण्यात मग्न असल्याने तुम्हांला उत्तर द्यायचे राहिले. अधून मधून सर मोड ऑन असेल.
पहिलं - बॉडी शेमिंग म्हणजे काय तेच मला माहीत नाही. आता जो शब्द मला माहीत नाही, ते मी करणं शक्य नाही.
दुसरं - इतके वेळा वाचल्यावर त्या शब्दाचा अर्थ शोधला. कोणाला गुबगुबीत गाल आणि थुलथुलीत पोट आवडत असेल, याची तुम्हांला कल्पना नसेल, अशी कल्पनाही मला करवत नाही.
तिसरं - त्याबद्दल मी माफ केलं असं तुम्ही लिहिलेलं वाचलं.
३ अ मुळात कोणी माफी मागितली आहे का?
३ आ- माफ करणारे तुम्ही कोण ? शर्माजींच्या पत्नीच्या पी आर कंपनीने तुम्हांला इथे शर्माजींबद्दल चांगलं चांगलं लिहा, कोणी तुमच्याशी सहमत नसेल तर त्याच्या मागे लागा अशी असाइनमेंट दिली आहे का ?
३ इ - एकदा माफ केलं असं लिहायचं आणि दर दोन तासांनी बॉडी शेमिंग केलं म्हणून रडायचं याची सांगड घालायला माझा आय क्यू कमी पडतो आहे.
३ ई- कोणी कितीही बॉडी शेमिंग केलं तरी शर्माजी अजून काही वर्षे खेळणार आहेत, असं काहीतरी तुम्ही लिहिलेलं दिसलं. हे वाचून तर माझा मेंदू काही क्षण बंद पडला असं मला वाटलं.
कसोटी सामन्यात शर्माजींना बाहेर बसवलं गेलं त्याला फार दिवस झाले नाहीत.
कालच्या विजयाचा शिल्पकार कोहली असताना ठळक अक्षरांत शर्माजींची आरती घाईघाईत ओवाळून घेतल्यावर, इतर कोणी कोहलीच्या खेळीचं कौतुक केल्यावर नाइलाज म्हणून त्याच्याशी सहमत व्हायचं आणि दुसर्या दिवशी कोहलीला नावं ठेवायची हे अगदी शर्माजींच्या फॅनला साजेसंच आहे.
कालच्या खेळीत कोहलीने ८४ पैकी ५६ म्हणजे दोन तृतीयांश धावा पळून काढल्या. याशिवाय तो जोडीदाराच्याही धावा पळाला असेल ते वेगळं. या वयातलं त्याचं फिटनेस नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याच्या नावावरचा आणखी एक विक्रम कळला. कोहलीने एक दिवसीय सामन्यात ५८७० इतक्या सर्वाधिक एकेरी धावा काढल्या आहेत.
असो. तुम्ही तुमच्याच एका धाग्यावर नुकतंच तुम्ही लिहिलंत की हे सगळं तुम्ही अधिकाधिक प्रतिसाद मिळावेत ( आणि तुम्हांला अधिकाधिक निरर्थक वाद अधिकाधिक घालता यावा ) यासाठी करता . मला हे खरंच माहीत नव्हतं. इतर कोणा मायबोलीकराच्या मनातही असा विचार येण्याची शक्यता कमीच वाटते. तुम्ही सगळं कळकळीने लिहिता असंच मला वाटायचं.
सर, आता यातल्या एकेका मुद्द्याल धरून एकेक प्रतिसाद द्या. मला वेळ घालवायला दुसरं काही चांगलं मिळत नाही आणि अर्थपूर्ण वाचन किंवा इतर काही करायचा मूड लागत नाही, तोवर तुमचं लेखन वाचेनच.
भारत न्यूझिलंड सामन्याच्या
भारत न्यूझिलंड सामन्याच्या वेळी ऑसीज अन् आफ्रिकन टीम्स दुबई ला आल्या होत्या. भारत जिंकल्यावर आफ्रिका न्यूझिलंड सोबत लाहोर ला परत गेली (भारत जर हरला असता तर ऑसीज गेले असते).
आता तिकडे जिंकणारी टीम परत दुबई ला येईल.
ट्रॅव्हल प्लॅनरला ओव्हरटाईम पडलाय...
यापेक्षा बाद फेरी पूर्ण एमिराती भागात खेळवायची ना
एक सेमी अबुधाबी ला, दुसरी शारजाह मधे अन् फायनल दुबई ला...
स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय
स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त. वय ३५. . या हंगामातली कामगिरी ५ सामन्यांत ३४.५० च्या सरासरीने १३८ धावा. एक अर्धशतक. त्यात एक अर्धशतक.
शर्माजी वय ३७. या हंगामात ७ सामन्यांत २२६ धावा. सरासरी ३२.२८. त्यात एक शतक ( ११९) . म्हणजे इतर सहा सामन्यांत तब्बल १०७ धावा.
क्रिकेटरने केंव्हा, कुठे व
मी पूर्वीही म्हटलयं, क्रिकेटरने केंव्हा, कुठे व कसं निवूत्त व्हावं, हा त्याचा वैयक्तिक मामला आहे. त्याच्या कारकीर्दीची तेवढी किमान कदर तरी आपण ठेवावी. वय, कामगिरी, फिटनेस , जिद्द इ लक्षात घेवून त्याला संघात निवडायचा की नाहीं, हे ठरवण्याचा अधिकार निवडसमिती व इतर संबंधिताना आहेच. स्मिथ निवृत्त झाला, मग रोहित कां नाही, हा प्रश्न विचारणं किंवा सूचित करणं, खरंच योग्य आहे का ? आपल्याला खरंच काय माहित, स्मिथ कां निवृत्त होतोय व रोहित कां होत नाहीय !
कोहली दाखवत नाही पण तो एक
कोहली दाखवत नाही पण तो एक स्वार्थी खेळाडू आहे. शतक जवळ आलं की हळू खेळतो. रोहित रोहित १९७ असताना पण सिक्स मारतो. हाच फरक आहे. अनेक खेळाडू रोहित शर्माला पसंती देतात. रोहितने स्वार्थीपणा दाखवला असता तर आतापर्यंत त्याने सचिनचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले असते.
(No subject)
न्युझीलंड 202 - 1 ( 32 षटकं
न्युझीलंड 202 - 1 ( 32 षटकं )
रविंद्रचं शतक, विल्यमसन 72 !!
न्यूझीलंडला दुबई खेळायचा एका
न्यूझीलंडला दुबई खेळायचा एका सामन्याचा अनुभव आहे...
आफ्रिकेला नाही.
आपल्या स्पिनरना पुन्हा नवीन ग्राहक मिळतील..
त्यात ते चोकर..
आपण पहिली फलंदाजी असली तर खेळ संपला..
इतके टॉस हरला आहे शर्मा की त्याने क्रिकेटमधली लॉ ऑफ एवरेज ही अंधश्रद्धा पार गाडून टाकली आहे.. किंबहुना मॅथेमॅटिक्स मधील प्रोबॅबिलिटी ला सुद्धा आव्हान दिले आहे.. तर फायनल ला टॉस आपण जिंकूच!
न्युझीलंड 362 व द.आफ्रिका 27
न्युझीलंड 362 व द.आफ्रिका 27 षटकात 163 - 3 !
दुसरी सेमी अजून सुरू आहे व ' ओपन ' आहे.
कालच्या सामन्यात कोहलीने एक
कालच्या सामन्यात कोहलीने एक दिवसीय सामन्यात दुसर्या डावात खेळताना (पाठलाग करताना) ८००० धावांचा टप्पा पार केला. यासाठी तो १६६ सामने खेळला. सरासरी ६४.५० आता फक्त सचिन त्याच्या पुढे आहे. २३६ सामन्यांत ८७२० धावा. शर्माजी तिसर्या क्रमांकावर आहेत. १५५ सामन्यांत ६११५ धावा.
रविंद्र नडला नाही मणजे झाले.
रविंद्र नडला नाही मणजे झाले. किवीजना सवय आहे आपल्याविरुद्ध खेळ उंचावायची. बाकीच्यांकडून मार खाणारेही आपल्याविरुद्ध खेळून जातात
*रविंद्र नडला नाही मणजे झाले*
*रविंद्र नडला नाही मणजे झाले* - अरे, असा कुणी नडलाच नाही तर आपली फलंदाजी बहरणार तरी कां व कशी ! फायनल ही चुरशीचीच व्हावी ! जिंकणार कोण हे तर आपल्याला माहीत आहेच, पण आत्ता बोला कशाला !!
न्युझीलँड आपल्याला नेहमी
न्युझीलँड आपल्याला नेहमी डावपेचात हरवत आली आहे आणि आयसीसी स्पर्धात ते आपला गेम करतात अशी त्यांची एक इमेज तयार झाली आहे...
जी खरी आहे...
पण जुनी आहे..
आयमीन हा भूतकाळ झाला आहे..
बरेच लोक आज न्यूझीलंडचे टेन्शन घेताना दिसत आहेत..
त्यांचे टेन्शन कमी करायला हा फोटो मी फिरवत आहे
माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या
माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या वर्ल्ड कप सेमी वगळता आपण सेमि नि फायनल्स मधे त्यांच्याविरुद्ध गेल्या दहा वर्षांमधे नेहमीच हरत आलो आहोत. त्यामूळे नुसते आकडे बघून हायसे वाटणे मला तरी कठीण आहे.
“ किवीजना सवय आहे
“ किवीजना सवय आहे आपल्याविरुद्ध खेळ उंचावायची.” - +१ अतिशय डेंजर टीम आहे. सहसा कुणी स्टार्स नसतात पण कलेक्टीव्हली कमालीचं क्रिकेट खेळतात. ऑसीजचा विनिंग अॅटिट्यूड वजा त्यांचा अॅरोगन्स अशी टीम आहे.
गेली सेमी का वगळावी?
गेली सेमी का वगळावी?
गेले तीन आयसीसी सामने का वगळावे?
किंबहुना रिसेंट सामने तर जास्त मॅटर करतात.
ते सुद्धा तिन्ही एकदिवसीय फॉर्मेटचे आहेत.
तिनी सिमिलर कंडिशन मधील आहेत. २०१९ सेमी इंग्लिश कंडीशन मध्ये होती जिथे स्विंग ने आपले कंबरडे मोडले होते.
गेल्या तिन्ही विजयामध्ये कप्तान सेम होता. जो आधीच्या हरलेल्या सामन्यात नव्हता.
आता तो कप्तान रोहित शर्मा असल्यामुळे कोणाला हा मुद्दा मान्य होणार नाही. पण कोणी मान्य करो न करो कप्तान कोण आहे हे मॅटर करते हे वैश्विक सत्य आहे.
आपण पहिली फलंदाजी असो किंवा चेस असो दोन्ही प्रकारात जिंकलो आहोत. त्यामुळे आपल्याला टॉस मॅटर नाही करत. किंबहुना प्रत्येक वेळी टॉस हरून सुद्धा जिंकतच आलोय.
याउलट न्यूझीलंड मागच्या सामन्यात आपल्याशी चेस करताना हरली आहे. जर आपण टॉस जिंकलो तर आपण नक्कीच तेच रिपीट करायला पहिली फलंदाजी घेऊ आणि उत्तर त्यांना शोधावे लागणार आहे.
So गाईज जस्ट चिल आणि एन्जॉय करा विकेंड.. चॅम्पियन ट्रॉफी भारतात येत आहे
*त्यामूळे नुसते आकडे बघून
*त्यामूळे नुसते आकडे बघून हायसे वाटणे मला तरी कठीण आहे.* - क्रिकेटमध्ये नुसते आकडे बघूच नये; तसे ते पाहणं म्हणजे तोंडघशी पडणं !
एका गावात मंदिराची निर्मिती
एका गावात मंदिराची निर्मिती सुरू असते. काही वर्षानंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण होते. एका शुभ मुहूर्तावर मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरते. गावचा मुखिया शहरात येतो. सुंदर मूर्ती खरेदी करतो. बस थांब्यावर येतो. खूप वाट पाहूनही बस किंवा अन्य वाहने मिळत नाहीत. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त टळेल काय अशी भीती मुखियाला वाटू लागते. इतक्यात आपल्या गावचा कुंभार गाढवाला घेऊन गावाकडे चालल्याचे त्याला दृष्टीस पडते. मुखियाला वाटते की आपण ही मूर्ती गाढवावर ठेवून न्यावी.
मूर्ती गाढवाच्या पाठीवर ठेवून दोघेही गावची वाट चालू लागतात. वाटेत तीन चार गावं लागतात. गावावरून पालखी, नंदीध्वज किंवा देवाची मूर्ती जात असेल तर महिला घड्याने पाणी ओतून हळद-कुंकू लावून स्वागत करतात, अशी ग्रामीण भागात परंपरा आहे. त्यानुसार या मूर्तीची प्रत्येक गावात भक्ती-भावाने स्वागत होते. हे पाहून गाढवाला आनंद होतो. आपल्याला मिळत असलेला मान सन्मान पाहून त्याला मूर्तीचे ओझे वाटू लागते. मूर्ती टाकून देण्यासाठी गाढव उड्या मारू लागतो. हे पाहून मुखिया घाबरतो. तेव्हा कुंभार म्हणतो की, तुम्ही मूर्ती उचलून घ्या. मूर्ती बाजूला केल्यानंतर कुंभार आपल्या जवळील दंडुक्याने गाढवाला प्रसाद देतो. गाढव आता शांत होतो. मूर्ती घेऊन व्यवस्थित चालू लागतो. या प्रसंगाचे मुखियाला आश्चर्य वाटते.
गावागावात होत असलेल्या स्वागताने गाढवाला वाटते की आपलेच स्वागत होत आहे. आपल्यालाच मान सन्मान मिळत आहे. यामुळे आपण गाढव आहोत हे तो विसरला. आता दंडुक्याच्या प्रसादामुळे तो भानावर आला आहे. आपण गाढव असल्याची त्याला जाणीव झाली आहे, असे कुंभार सांगतो.
करेक्ट नुसते आकडे बघूच नाही..
करेक्ट नुसते आकडे बघूच नाही.. त्याचे विश्लेषण करावे.
म्हणून तर वरच्या पोस्टमध्ये फॉरमॅट, कंडिशन, आणि रोहित शर्माचे न्यूझीलंडला वरचढ ठरलेले डावपेच या गेल्या तीन विजयातील तिन्ही महत्वाच्या बाजू कश्या यंदाही सारख्याच असल्याने आपल्यालाच संधी जास्त हे म्हटले आहे.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहेच. त्यामुळे फायनल जर का भारत हरला तर मी तोंडघशी पडलो असा त्याचा अर्थ होत नाही. फायनलमध्ये प्रवेश करताना भारतच वरचढ आणि चॅम्पियन संघ आहे. त्याने तसेच दिमाखात खेळावे आणि जिंकावे अशी ईच्छा.
विश्वामित्राने कोणे एके काळी
विश्वामित्राने कोणे एके काळी प्रतिसृष्टी वसवली होती म्हणे.
आता एक नवा विश्वामित्र अस्तित्वात आल्याची मला खात्री व्हायला लागलीय.
हा नवा विश्वामित्र त्याच्या सृष्टीत, विश्वात रममाण झाला की आपण पामर ह्या विश्वात सुटकेचा निश्वास सोडू..
(हां.. हां.. खबरदार... इथे इंग्रजीप्रेमींना 'फूल्स पॅराडाईज' वगैरे शब्द आणायची बंदी आहे.)
आकडेवारी, विश्लेषण इ. निरर्थक
आकडेवारी, विश्लेषण इ. निरर्थक आहेत असं माझं म्हणणं नाहीं व भाकीत चूकणं म्हणजे तोंडघशी पडणं असंही नाहीय. फक्त, खेळच आकडेवारी बनवत असतो याचं सदैव भान ठेवलं की खेळ आकडेवारीवर आधारित भाकीतात जेरबंद करणं अशक्य आहे हे लक्षात येतं.
बाकी, भारत ह्या अंतिम सामन्यासाठी सरस वाटतो आहे याच्याशी पूर्णपणे सहमत. कारण - 1 खेळपट्टी व वातावरणाचा अधिक अनुभव, 2 फलंदाजीला गवसलेला सूर व गोलंदाजीची चढती धार, 4 आत्ताच न्यूझीलंडवर मिळवलेला विजय, 5 दुबईतील प्रेक्षक पाठींबा व सध्याची भारताची विजयी घोडदौड इ इ.
शुभेच्छा !!!!!
क्रिकेटमध्ये नुसते आकडे बघूच
क्रिकेटमध्ये नुसते आकडे बघूच नये; तसे ते पाहणं म्हणजे तोंडघशी पडणं !
>>
भाऊ,
कळत असलं तरी वळून घ्यायचं नाहीये ना पण...
भारत हरला तर मी तोंडघशी पडलो
भारत हरला तर मी तोंडघशी पडलो असा त्याचा अर्थ होत नाही.
>>
गिरे तो भी टांग ऊपर...
तुम्हाला असे वाटत असेल मला
तुम्हाला असे वाटत असेल मला आकड्यापलीकडे क्रिकेट कळत नाही तर तुमच्या मताचा आदर आहे
सध्या फक्त एकच गोष्ट
सध्या फक्त एकच गोष्ट भारताच्या विरोधात जात आहे ती म्हणजे फेवरेट असण्याचे प्रेशर !
भारत हरला तर मी तोंडघशी पडलो
भारत हरला तर मी तोंडघशी पडलो असा त्याचा अर्थ होत नाही.>>>>>पण जर भारत जिंकला तर मात्र स्वतः चे तोंड फाटे पर्यंत कौतुक करेन
*तुम्हाला असे वाटत असेल मला
*तुम्हाला असे वाटत असेल मला आकड्यापलीकडे क्रिकेट कळत नाही.. * - हे मला उद्देशून असेल, तर तसं अजिबात नाहीय ,मी तसं सुचवलेलं पण नाहीं करणं तसं माझ्या मनात नाहीं व स्वभावातही नाहीं !
भारताला न्यूझीलंड (२००० CT ,
भारताला न्यूझीलंड (२००० CT , २०१९ WC सेमी ) आणि ऑस्ट्रेलिया (२००३,२०२३,२०१५ WC)कडून हरण्याची परंपरा आहे.
मी तरी यावेळी अपेक्षा ठेवत नाही, स्वानुभावरून सिद्ध.
जिंकल्यावर रोहित शर्मा इथल्या
जिंकल्यावर रोहित शर्मा इथल्या प्रत्येकाला बक्षीस म्हणून प्रत्येकी दहा लाख रुपये देणार आहे.
Pages